©️®️शिल्पा सुतार
........
........
सकाळी सीमा शाळेत आली, आशा तिची वाट बघत होती,
"झालं का बोलणं आशा तुझ तुझ्या भावाशी",.. सीमा
"हो झालं आहे सीमा, आज तो तुम्हाला भेटायला यायला तयार आहे",.. आशा
"नक्की ना तशी मी मीटिंग अरेंज करते",.. सीमा
"हो नक्की",... आशा
"काय नाव आहे तुझ्या भावाचं?",.. सीमा
प्रकाश..
" ठीक आहे",.. सीमाने आदित्यला फोन केला,.." प्रकाश आशाचा भाऊ भेटायला यायला तयार आहेत आज ",..
"ठीक आहे मग मी सांगतो वकिलांना, तुम्ही बरोबर पाच वाजता इकडे या दोघी",.. आदित्य
ठीक आहे..
" आशा तुझ्या भावाला पाच वाजता ऑफिस मध्ये यायला सांग, आपण दोघी पाच वाजता निघू इथून",.. सीमा
"कुठे आहे मिटिंग सीमा? ",.. आशा
" ऑफिसमध्येच भेटावे लागेल, इथे शक्य नाही शाळेत",.. सीमा
" ठीक आहे",.. आशा
"तू तुझ्या भावाला लगेच सांगून दे",.. सीमा
आशा ने फोन केला प्रकाशला,.." आज संध्याकाळी पाच वाजता देशमुख यांच्या ऑफिस मध्ये ये तिकडे",..
"चालेल तु येणार ना आशा तिकडे",.. प्रकाश
" हो मी असेल सीमा असेल सोबत",..आशा
आशा गेली निशा तिथे बसलेली होती,.. "बोलली का ग काही ही, करणार का मदत" ,.
" हो आज तिचा भाऊ येणार आहे आदित्य ला भेटायला",..सीमा
"बरं होऊन जाईल हे काम झालं तर ",.. निशा
" हो ना हे काम झालं तर केस आपण जिंकल्या सारखच आहे",.. सीमा
होईल अस..
"अजून एक काम आहे निशा, आज संध्याकाळी आबा जिंकले म्हणून पार्टी आहे त्यासाठी तू तुझ्या फॅमिली सोबत पार्टीला ये, मी तुला जरा वेळाने पत्ता देते",. सीमा
निशा वर्गात चालली गेली, सीमाने परत आदित्यला फोन केला,.. "काय झालं सीमा काही अडचण आहे का? ",
"नाही आदित्य मी निशा आणि तिच्या फॅमिली लाही पार्टीसाठी बोलवलं आहे, ते लोकही ऍड कर गेस्ट लिस्ट मध्ये ",.. सीमा
" हो बरं झालं बघ लक्षातच नव्हतं त्यांचं नाव, त्यांनी खूप मदत केली आहे आपल्याला केस साठी आणि तुझी प्रिय मैत्रीण ही आहे ती, असं कसं विसरलो होतो आपण तिला, किती घेऊ नाव ",.. आदित्य
"ते आठ लोक असतील",.. निशा
" ठीक आहे",..
" मी जाते आता वर्गात आम्ही येत आहोत संध्याकाळी तिकडे",.. सीमा
" ओके, मी सांगतो आईला तुझ्या घरी फोन करून आमंत्रण द्यायला ",.. आदित्य
" एवढ काय आदित्य ",.. सीमा
" अरे व्यवस्थित सांगायला नको का? , महत्वाच आमंत्रण आहे ते, त्यांना राग आला तर माझी प्रिय बायको रूसेल, मग माझ काही खरं नाही ",.. आदित्य
" हे अस आहे का?, मी अशी करते का? खरं नाही हे, आदित्य तू बोलून बोलून सगळ स्वतः च्या मनाप्रमाणे करतो ",.. सीमा
"काल रात्री बद्दल बोलते का तू सीमा",.. आदित्य
" पुरे आदित्य.... मी ठेवते फोन ",.. सीमा
लंच ब्रेक झाला, सीमा निशा जेवायला बसल्या,.. "झाली का तयारी पार्टीची ",
" हो बाहेर आहे पार्टी, घरी खूप गडबड होते कामाची ",.. सीमा
" तू करतेस का काम सीमा घरी",.. निशा
" मग किती काम असत आमच्या कडे, येणारे जाणारे खूप आहेत, फक्त मेन स्वयंपाक मावशी करतात, पण बर्याच वेळा मी त्यांना मदत करते, चहा नाश्ता करावा लागतो ",.. सीमा
"आशा येणार ना आज मीटिंग साठी ",.. निशा
" हो चांगली आहे ती, तयारच आहे मदत करायला, तिच्या भावाशी ती बोलणार होती, आणि तो हो बोलला आहे आम्हाला मदत करायला तर आज संध्याकाळी जायचं आहे त्याला घेऊन ऑफिसमध्ये, संध्याकाळी पार्टीला नक्की ये बर का ",.. सीमा
हो
" विक्रमला जामीन मिळाला कालच रात्री आदित्य सांगत होता",.. सीमा
" आता ग सीमा",.. निशा
"आता अजिबात घाबरायचं नाही त्याला, तो आता बोलायला आला ना मी तर त्याच्याशी बोलण्या आधी त्याला एक थोबाडीत ठेवणार आहे, पण मला नाही वाटत आता तो माझं नाव घेईल, त्याच्यावर बरेच केस सुरू आहेत, त्यात त्याचं लग्नही मोडलं, तर पैशाची सोय मामांकडून होत नाही ",.. सीमा
"बरं झालं असं पाहिजे, शिक्षा होईल का त्याला",.. निशा
" हो मग शिक्षा तर होणारच आहे त्याला, आदित्य थोडी सोडणार आहे त्याला, असं डेंजर आहे आदित्य बापरे",... सीमा
"तुला बराच अनुभव आलेला दिसतोय आदित्यचा",.. निशा हसत होती
" हो ग तो जरी खूप प्रेम करतो माझ्या वर, मागे मागे करतो, तरी कामाच्या बाबतीत डॅशिंग आहे तो, कोणाचं ऐकत नाही, मलाही आदित्य जे सांगेल ते ऐकावं लागतं, म्हणजे तो परिस्थितीच अशी निर्माण करतो की सगळे आपोआप त्याच ऐकतात",.. सीमा
"असंच पाहिजे हुशार ",.. निशा
हो..
आबा आज सकाळी साखर कारखान्यावर गेले होते, त्यांच्याबरोबर शरद जिजू अनघा होते, ते आज त्या दोघांना सगळं साखर कारखान्याच काम दाखवणार होते आणि कालच इलेक्शन जिंकल्यामुळे बऱ्याचशा कागदपत्रांवर सह्या करायच्या होत्या, आता काम सुरू करावे लागणार होत, ते दुपारपर्यंत वापस आले
संध्याकाळी पाच वाजता आशा आणि सीमा ऑफिसला जायला निघाल्या,.. "आशा प्रकाशला फोन करून विचारून बघ की ते आले का ऑफिसमध्ये, सीमा ने आदित्य त्याला मेसेज केला आम्ही निघालो आहोत",..
आशाने प्रकाश ला फोन केला, तो ऑफिसला पोहोचतच आला होता, तो गेट जवळच उभा होता, सीमा आशा पोहोचल्या, ते तिघे आत मध्ये गेले त्या दिवशी ची पूर्ण रिकामी फॅक्टरी आज पूर्ण भरलेली होती, गेटवर एन्ट्री केली सिक्युरिटी गार्डने आदित्यला सांगितलं... सीमा मॅडम आल्या आहेत
आदित्य उठून बाहेर आला, सीमा आशा आणि प्रकाश समोरून येत होते, आदित्य सीमा ला बघून खूप खुश होता, लाइट पिवळ्या रंगाची साडी सीमा नेसली होती त्या साडीला डार्क काठ होते, खूप शोभत होती तिला ती साडी, किती सुंदर दिसते आहे सीमा अशी लांबून येतांना, सीमा ही आदित्य ला बघून पटकन त्याला भेटायला गेली,
"बाहेर काय करतोय आदित्य" ,.. सीमा
"तुझ्या साठी उभा आहे मी इथे स्वागताला, ते दोघ कुठे आहेत",.. आदित्य
आशा प्रकाश मागे उभे होते
आदित्य सीमा बोलत होते तेव्हा सगळे बघत होते
ते ऑफिस मध्ये आले सगळे कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बसले, आशा सीमा एका बाजूला बसल्या होत्या, समोर मेन खुर्चीवर आदित्य बसला होता, प्रकाश ला बसायला सांगितलं प्रकाश भारावून सगळीकडे बघत होता सगळे गप्प होते
" मी तुम्हाला ओळखतो प्रकाश",.. आदित्य
" हो मी पण ओळखतो तुम्हाला आदित्य साहेब",.. प्रकाश
"तुम्ही तयार आहात का मला मदत करायला",.. आदित्य
" हो मी तयार आहे पण यात आमचा काय फायदा आहे, माझ्या सोबत बरेच लोक आहेत तिथे" ,.. प्रकाश
"एक तर तुम्ही ज्या जागेवर राहत आहात ती जागा आमची आहे, मी तेव्हा परदेशात शिकायला होतो विक्रम आणि काकांनी मिळून हा उद्योग केला आहे, आता आमच्याकडे बरेच पुरावे आहेत, फायद्याचं बोलत आहात तर मी तुम्हाला काहीही दिल नाही तरी मी ही केस जिंकेल, पण मी अस करणार नाही, आमच्या कंपनीतर्फे तुम्हाला काम मिळेल आणि तुमच्या ग्रुपमध्ये ज्या लोकांना स्वतःचे घरं नसतील त्यांना आम्ही थोडीफार घर घ्यायला मदत करू, घर सोडतांना ही पैसे देऊ, त्या बदल्यात तुम्हाला आम्हाला पेपर वर लिहून द्यायचा आहे की तुमच्या आमच्या जागेवर काहीही हक्क नाही ",.. आदित्य
" किती दिवसात आम्हाला ती जागा सोडावी लागेल",.. प्रकाश
" जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर सोडा, परत कोर्टाचे केस संपली तर तुम्हाला घर खाली करून ते घर जमीनदोस्त करायचा खर्च स्वतः करावा लागेल",.. आदित्य
मधेच एका काकांनी सगळ्यांसाठी चहा आणला
"ठीक आहे मी तयार आहे",.. प्रकाश
" तुमच्या वस्तीत कोण कोण लोक आहेत त्यांची लिस्ट मला द्या, कोण कुठे राहतात त्यांचा परमनंट एड्रेस पण मला द्या तुम्ही या कंपनीतल्या काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी सचिन ला कॉन्टॅक्ट करा" ,..
आदित्यने वकील साहेबांना फोन लावला ते पाच मिनिटात आले, ते पेपर तयार करत होते, सचिन आत मध्ये आला
" सचिन प्रकाश ला यापुढे आपल्या स्क्रॅच कॉन्ट्रॅक्ट देत चला अजून काही काम करू शकता का तुम्ही",.. आदित्य
" हो मी त्या बाबतीत सचिन साहेबांशी बोलून घेईन ",..प्रकाश
"चालेल प्रामाणिकपणे काम केलं तर आम्हाला काही हरकत नाही",..आदित्य
वकिलांनी पेपर तयार केले,आदित्य पेपर बघत होता, प्रकाश ने त्याच्यावर सही केली,
" पण आमचे वस्तीतील लोकांना पैसे मिळतील ना? ",.. प्रकाश
"हो त्यांना पैसे मिळतील दुसरीकडे त्यांचा राहण्याची सोय होईल, शाळेत ही त्यांच्या मुलांना ऍडमिशन हवं असेल तर सांगा आणि यापुढे काही लागलं तर मला सांगा",.. आदित्य
बरेचसे पेपर होते सही करायचे त्यावर सह्या झाल्या, अजून थोडे पेपर बाकी आहेत, तुमच्या लोकांची पेमेंट झाल्यानंतर त्याच्यावर सह्या घ्या बाकीच्यांच्या
" हो ते काम करतो मी व्यवस्थित",.. प्रकाश बोलला
" ठीक आहे मग आम्ही निघतो, मी करतो नंतर तुम्हाला फोन ",.. प्रकाश
" खूप धन्यवाद इथे आल्या बद्दल",.. आदित्य
प्रकाश आशा गेले घरी, सीमा कॉन्फरन्स रूम मध्येच बसली होती, वकील साहेब समोर होते,
आदित्य मी राजाला जाऊन भेटते, सीमा बाहेर आली, सगळे सीमा कडे बघत होते, राजा दिसला तिला, ती त्याच्या जवळ जाऊन बसली, राजा काहीतरी कम्प्युटरवर काम करत होता
" झाली का मीटिंग ताई",.. राजा
हो...
" तू आज पहिल्यांदा आली का ऑफिसला",.. राजा
"नाही या आधी आली होती मी रविवारी तेव्हा तुम्ही कोणी नव्हते ऑफिस मध्ये, आज बरीच गर्दी आहे ऑफिसमध्ये खूप कामं चालतात का",.. सीमा
हो
बाजूच्या टेबलवर चा मुलगा यांच्या दोघांकडे बघत होता, ताई हा माझा मित्र आहे रोहन आणि रोहन ही माझी ताई
" ताई का आली आहे ऑफिसला? तू इथे काम करते का? ",... रोहन
" नाही मी मीटिंग साठी आली होती, मी शाळेत टीचर आहे",.. सीमा
" माझी ताई आदित्य साहेबांची बायको आहे",.. राजा
"काय??? हो का तू कधी सांगितल नाही",.. रोहन
"त्यात काय? घर ऑफिस नको एकत्र करायला",.. राजा
" नवीन जॉईन झाला आहे का रोहन? ",.. सीमा
हो ताई..
"काय करतात तुम्ही मुलं दिवसभर",.. सीमा
"इथे काम काय कमी असतात का",.. राजा
" ऑफिसमध्ये सगळे एवढे गप्प का आहेत",.. सीमा
"आदित्य साहेब ऑफिस मध्ये असले की कोणी काही बोलत नाही, खूप काम करतात भराभर",.. राजा
"आणि आदित्य नसला की",.. सीमा
"थोडं रिलॅक्स वातावरण असतं ",.. राजा
सीमा आणि राजा हसत होते, रोहन ही त्यांच्या गप्पांमध्ये शामिल झाला होता
आदित्य कॉन्फरन्स रूम मधून बाहेर आला, तो या तिघां जवळ आला, राजा आणि रोहन उभे राहिले, सीमा बसलेली होती,
"अरे काय झाल? तुम्ही सगळे का उभे राहिले?",.. सीमा
राजा डोळ्याने दाखवत होता, आदित्य आला अस
"सीमा झाल का बोलून? काय चाललं आहे इथे सीमा? का बोलत बसली तू आमच्या ऑफिसमधल्या लोकांशी? डिस्टर्ब करते आहे तू त्यांना",.. आदित्य
"आदित्य आता साडेपाच होऊन गेले आहेत म्हणजे आता ऑफिस सुटलं आहे ऑफिस नंतर आम्ही काहीही करू, याला काय अर्थ आहे, बरोबर आहे ना राजा रोहन",.. सीमा
" ते दोघं काहीही बोलले नाही ",..
.
" तुम्ही दोघ अजिबात घाबरू नका आदित्यला, मी आहे ",.. सीमा
.
" तुम्ही दोघ अजिबात घाबरू नका आदित्यला, मी आहे ",.. सीमा
" तू आमच्या ऑफिस ची शिस्त बिघडवणार आहे सीमा, चल आत मध्ये थोडं काम आहे",... आदित्य केबिन मध्ये गेला
" राजा लवकर घरी जा आज पार्टीला यायचं आहे ना ",.. सीमा
"तू केव्हा निघते आहे ताई",..
"बघते ना आदित्य काम करतो आहे आम्ही निघू दहा मिनिटात ",..
"ठीक आहे तुम्ही गेलो की मी जाईन",.. राजा
सीमा केबिनमध्ये गेली आदित्य समोर बसलेला होता,..." वेलकम मॅडम ही आपली केबिन",..
" आदित्य काय अस तू मला माझ्या भावाशी बोलू का दिल नाही बाहेर, लगेच आत बोलवलं",... सीमा
"मला तुझ्याशी बोलायचं आहे सीमा, तू आल्या पासून काहीही बोलली नाहीस",.. आदित्य
"अरे मग तुझे काम सुरू आहेत ना, बिझी बाबा तू आदित्य साहेब",.. सीमा
"म्हणजे काय आता",.. आदित्य
" तू बॉस आहेस इथला मानाने बोलायला हव, छान आहे आपली केबिन, माझा कुठला अर्धा भाग आहे या केबिन मधला",... सीमा
" मला माहिती होतं सीमा तू हाच विषय काढणार आहे",.. आदित्य
" अरे म्हणजे मला तूच म्हटला होता ना की माझी अर्धी केबिन ",.. सीमा
" सकाळी आठ ते रात्री आठ ही केबिन माझी, रात्री आठ ते सकाळी आठ तुझी",.. आदित्य हसत होता
" मी काय करणार आहे एवढ्या रात्री इथे? म्हणजे मला काहीच नाही, माहिती होतं मला, ठीक आहे लक्षात ठेवेल मी हा पॉईंट, माझ्याशी बोलू नकोस ",.. सीमा
" पण आज तु ऑफिसमध्ये आली तर खूप छान वाटत आहे सीमा, मी काहीही काम केल नाही तू आल्या पासून, तुझ्या कडे बघत बसलो मी ही साडी छान दिसते तुला ",.. आदित्य
सीमा गप्प होती, ती रागाने बघत होती
" सीमा तुझी पूर्ण केबिन दिवस रात्र ठीक आहे, रुसून बसू नको ग ",.. आदित्य
" आता कशाला बोलतोस, आणि माझ्या मागे मागे येतोस",.. सीमा
मी कुठे आलो??
" मी राजा जवळ बसली होती तर मला आत बोलवलं, जरा म्हणून मिसळू देत नाही कोणा मध्ये ",.. सीमा
" अस का? मी बोललो होतो हे त्या दिवशी तेच ऐकाव लागत आहे मला आज",.. आदित्य
" त्या प्रकाशने सही केलेले पेपर नीट ठेवले ना",.. सीमा
" हो ते लगेच उद्या सकाळी कोर्टात जमा करायचे आहेत दोन-तीन प्रति आहे",.. आदित्य
सचिन येऊन भेटला, तो खूप छान बोलत होता सीमा शी, खूप पटलं त्या दोघांचं,
" तुम्ही दोघे केव्हा निघत आहात घरी जायला",.. सचिन
"निघू आता पाच मिनिटात",.. आदित्य
सचिन बाहेर गेला
" सचिन खूपच हुशार आहे ना",.. सीमा
" हो आणि चांगला आहे",.. आदित्य
" चल मग आपण घरी जाऊ",.. सीमा
"थांब जरा पाच दहा मिनिटाचे काम आहे, पवार साहेब पेपर घेऊन येत आहे त्याच्यावर सही करायची आहे",.. आदित्य
" तुला खूप सह्या कराव्या लागतात का दिवसभर आदित्य",.. सीमा
"हो मग मी बॉस आहे इथला, तुला दिसला नाही का माझा दरारा",.. आदित्य
" हो माझ्या भावाला नुसतं घाबरवून ठेवला आहे, किती गप्प बसून सगळे काम करत आहेत",... सीमा
" मग हे ऑफिस आहे सीमा कामं नको का करायला",.. आदित्य
पवार साहेब आत मध्ये आले, आदित्य पेपर वर सही करत होता, तोपर्यंत ते सीमा शी बोलत होते, काम झालं पवार साहेब बाहेर गेले...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा