Login

नवी दिशा ( भाग 3 )

सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन स्वाती जहागिरदारांच्या घरातून इनामदारांच्या घरात आली.मनात असणारी थोडीशी धाकधुक प्रेमाच्या नवीन माणसांच्या सहवासात कमी झाली.साकेतचा जॉब पुण्यात होता आणि आई बाबा गावी असायचे.थोडे दिवस राहून ते परत जाणार होते.सविताबाई अगदी सुगरण होत्या.त्यांना कामाची आवड आणि उरकही होता.त्या रोज सुग्रास जेवण गरम गरम वाढत होत्या.काही दिवसांत त्या परत गेल्यावर 'आपलं कसं होणार या चिंतेत स्वाती होती.'"स्वाती,हे बघ बेटा साकेत अगदी साधा सरळ मुलगा आहे हे तर तुला माहितीच आहे.त्याला घरचं साधं जेवण आवडतं.तुला कामाची सवय नाही हे मला विहींनबाईनी सांगितलं आहे.माझी तशी अपेक्षा ही नाही.अग आपल्या गावाकडचा रामू स्वयंपाकासाठी येईल. तो सगळं अगदी छान करेल सगळं त्यामुळे स्वयंपाकाची काळजी तू सोडून दे.बाकी कामासाठी शांता आहेच.तू तुझं मन हवं तिथे रमव
सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन स्वाती जहागिरदारांच्या घरातून इनामदारांच्या घरात आली.मनात असणारी थोडीशी धाकधुक प्रेमाच्या नवीन माणसांच्या सहवासात कमी झाली.साकेतचा जॉब पुण्यात होता आणि आई बाबा गावी असायचे.थोडे दिवस राहून ते परत जाणार होते.सविताबाई अगदी सुगरण होत्या.त्यांना कामाची आवड आणि उरकही होता.त्या रोज सुग्रास जेवण गरम गरम वाढत होत्या.काही दिवसांत त्या परत गेल्यावर 'आपलं कसं होणार या चिंतेत स्वाती होती.'
"स्वाती,हे बघ बेटा साकेत अगदी साधा सरळ मुलगा आहे हे तर तुला माहितीच आहे.त्याला घरचं साधं जेवण आवडतं.तुला कामाची सवय नाही हे मला विहींनबाईनी सांगितलं आहे.माझी तशी अपेक्षा ही नाही.अग आपल्या गावाकडचा रामू स्वयंपाकासाठी येईल. तो सगळं अगदी छान करेल सगळं त्यामुळे स्वयंपाकाची काळजी तू सोडून दे.बाकी कामासाठी शांता आहेच.तू तुझं मन हवं तिथे रमव.
उद्यापासून रामू येईल,त्याला सगळं नीट समजावून सांगू आपण.मग आम्ही जाऊ चार दिवसांनी.छान संसार करा."
सासूबाईंच्या बोलण्यामुळे स्वाती अगदी आनंदली.
दोघांचा संसार छान सुरू झाला.आई बाबा अधून मधून जाऊन येऊन असत.सिद्धीचा जन्म झाला आणि त्यांचा संसार पूर्ण झाला.सिद्धी शाळेत जाऊ लागली तसा स्वातीने तिच्यात शाळेत जॉब मिळवला.
सकाळी लवकर येऊन रामू सकाळचा नाश्ता,सगळ्यांचे टिफीन तयार करून जायचा.दुपारी सिद्धी आणि स्वाती सोबतच येत.मग शांताबाई यायच्या.दोघी मिळून गप्पा मारत चहा घ्यायच्या.मग बाकीची कामं उरकून रात्रीच्या जेवणाची तयारी करून शांताबाई जायच्या.
आई बाबा येताना चिवडा,शंकरपाळी,चकली ,लाडू असे पदार्थ आणायच्या आणि जाताना करूनही ठेवायच्या. मम्मीप्पांकडून सुद्धा प्रेमाचा खाऊ येतच असे.त्यामुळे स्वातीला फारशी स्वयंपाकाची गरज पडलीच नाही.कधी सुट्टीच्या दिवशी एखादी फॅन्सी डिश बनवली की झालं.
पण आता मात्र अमेरिकेत येऊन आपलं कसं होईल या विचारांनी ती घाबरली होती.
बाकी गोष्टी ती कश्या तरी जमवायची पण पोळ्या मात्र अजूनही तिला जमल्या नव्हत्या.साकेत ऍडजस्ट करत होता पण कधीकधी त्याचीही चिडचिड व्हायची.आता आई आली की छान जेवण मिळेल या आनंदात साकेत होता.तर आपल्याला आता आईंकडून पोळ्या करायला शिकता येतील म्हणून स्वाती आनंदली होती.
आई बाबा येणार म्हणून ते तिघेही तयारीला लागले.
घर छान सजवले.त्यांची रूम सुद्धा त्यांच्या सोयीने सजवली.सिद्धी पण आजी आजोबा येणार म्हणून जाम खुश होती.कुठे कुठे जायचं?काय काय करायचं याचे प्लॅन तिघेही करत होते.आणि तो दिवस उजाडला.
सविताबाई आणि शशांकराव आले.साकेत आणि सिद्धी त्यांना घ्यायला एअरपोर्टवर गेले.घरी स्वातीने स्वागताची छान तयारी केली. भाकर तुकडा ओवाळून आणि पंचारती घेऊन तिने झोकात त्याचं स्वागत केलं.पॅन्ट शर्ट घातलेली आजी बघून सिद्धी खूप हसली.तिने आपल्या आजीला असं कधी बघितलं नव्हतं.
रात्री उशीर झाला म्हणून स्वातीने खिचडी,पापड आणि खीर असा बेत केला.जेवण करून आई बाबा लवकर झोपले.आता उद्यापासून आई करतील आणि आपल्याला छान जेवण मिळेल या विचारात स्वाती आणि साकेत सुद्धा झोपले.
0

🎭 Series Post

View all