नवीन आयुष्याच्या नवीन वाटा
भाग४
मागील भागात आपण पहिले सीमा सगळ्यांना भेटते . तिचा झालेल्या अपघाताबद्दल सांगते . ते ऐकून सगळे सुन्न होतात. सिद्धार्थ ला तर काही सुचत च नाही .
मागील भागात आपण पहिले सीमा सगळ्यांना भेटते . तिचा झालेल्या अपघाताबद्दल सांगते . ते ऐकून सगळे सुन्न होतात. सिद्धार्थ ला तर काही सुचत च नाही .
सीमा म्हणाली , " सिद्धार्थ , माझं तुझ्यावर तू विचारायच्या आधी पासूनच प्रेम आहे . पण त्या वेळेला उत्तर दिले नाही कारण , आपण दोघांनी आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं होते. तो वेळ मी पण घेतला आणि तुला पण दिला. पण आता ची परिस्थिती वेगळी आहे. आता तुला माझ्या पेक्षा चांगली मुलगी मिळेल जी अपंग म्हणून तुझ्यावर ओझे राहणार नाही. तर तू आयुष्यात माझा विचार सोडून पुढे जा . "
असं म्हणून ती एकदा सगळ्यांकडे बघून निघून गेली . ती निघून गेलेली बघून सिद्धार्थ तर पटकन डोक्याला हात लावून खाल्लीच बसला . सगळे एकदम शांत झाले.
सिद्धार्थ म्हणाला , " कृपया , मला एकट्याला सोडा . आपण नंतर परत भेटूया . " त्याने सगळ्यांना जायला सांगून तिथेच बसला.
त्याला तिच्याबरोबरचे घालवलेले क्षण आठवले. आजतागायत ती होकार देईल या आशेवर होता आणि एक क्षणात सगळंच संपवले तिने ....
खूप वेळ विचार करून घरी आला. आई बाबांना सगळी परिस्थिती सांगितली . आणि त्याचा निर्णय पण सांगितला .
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो आई बाबांना घेऊन सीमाच्या घरी आला . आल्यावर सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या . थोड्यावेळाने सिद्धार्थ ने सीमाच्या आईबाबांना म्हणाला , " काका -काकू , मी कॉलेजमध्ये असल्यापासून सीमा वर प्रेम करतो . मला तिच्याशी लग्न करायचे आहे ."
काका म्हणाले , " मला हे माहितीय सिद्धार्थ . पण आता ते शक्य नाही. तुला तिने कालच सगळं सांगितले तरी ...... "
" काका , मला माहितीय ते. तरी पण मला तिच्याशीच लग्न कारायचे आहे आणि मी माझ्या प्रेमाने तिला जपेल . "
" अरे तू तिला नक्की जपशील . पण तीच तयार नाहीय आता "
" मी बोलतो तिच्याशी . आलोच " काका ने फक्त मान हलवली .
सिद्धार्थ सीमाच्या खोलीत आला . " सीमा , येऊ का ? मला तुझ्याशी बोलायचे आहे "
" ये बस ना "
तो तिच्या जवळ जाऊन उभा राहिला . तिच्या डोळ्यात बघत होता तिने एकदा बघून लगेच मान खाली केली आणिम्हणाली , " सिद्धू, मी तुला कालच सगळं सांगितली तरी तू असा का वागतोय . "
त्याने तिला खांद्याला धरून गादीवर आणून बसवले आणि म्हणाला , " हे बघ , तू परवा ऑफिस च्या कार्यक्रमात एवढं छान नृत्य केले. त्यात तुझे कुठे अपंगत्व दिसून आले का नाही कि नाही. मग तू स्वतःला अपंग का म्हणून घेते . आणि दुसरी गोष्ट माझं आणि तुझं मन आधीच जुळलंय . हे मला कधी कळलं माहितीय ?"
" नाही "
" तुझा जेंव्हा अपघात झाला होता त्यादिवशी मी दिवसभर बैचेन होतो . मी जेंव्हा बैचेन होतो त्या दिवशीच्या हे बघ तारखा लिहून ठेवल्यात असं म्हणून त्याने तिला डायरीत लिहिलेल्या तारखा दाखवल्या . मला सांग याच वेळी तू याचा सामना करत होतीस ना ?"
" हो ."
" बघ . म्हणजे माझे तुझ्या मनावर प्रेम आहे ग . शरीरावर नाही. मी तुझा आयुष्यभर पाय बनायला आणि साथ देयाला तयार आहे मग तू का मागे फिरतीय ?"
" अरे तू देशील साथ . पण तुझे आई बाबा .. "
दोघांचे आई बाबा खोलीच्या दारापाशी उभे राहून ऐकत होते . सीमा हे म्हणल्यावर सिद्धार्थ ची आई आत येऊन म्हणाली , " मला तू सून म्हणून पसंद आहे. बाळा आपल्याला बरोबरीने साथ देणारा नवरा असला कि हे आयुष्य सुंदर आहे . आम्ही सगळे कायम तुझ्या बरोबर आहे . "
सीमाची आई म्हणाली , " हे नवीन आयुष्य , येणाऱ्या नवीन वाटा तू आनंदाने जगावे आहे वाटते . बाळा किती दिवस असे स्वतःला गुरफुटून घेणारे . जे झाले ते झाले. आता ते मागे सारून पुढे चाल ."
सिद्धार्थ म्हणाला , " सीमा , आज सगळ्यांसमोर तुला विचारतो , माझी बायको बनून देशील मला आयुष्यभर साथ ?"
तिने लगेच त्याच्या हातात हात दिला . सगळीकडे आनंद पसरला . सीमाच्या आईला असलेली चिंता मिटली .
या पंधरा दिवसात आधी त्यांनी साखरपुडा केला . आणि महिन्याभरात लगेच सिद्धार्थ ने लग्न करायचा निर्णय घेतला. उगाच उशीर केला आणि सीमा बदली तर ....
आज त्यांच्या लग्नाला १० वर्षे होऊन त्यांच्या प्रेमाच्या वेलीवर एक छोटीशी कळी फुलली होती .
खरोखरच मन जुळली कि आयुष्य खूप सुंदर होऊन जाते . आज सिद्धार्थ सारखे बरेच जण आहे जे शरीरावर नाही तर मनावर प्रेम करून आपले आयुष्यात मोगरच्या फुलाप्रमाणे सुगंध दरवाळतात .
समाप्त
कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा .
सौ . चित्रा अ . महाराव
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा