नवीन आयुष्याच्या नवीन वाटा
भाग १
" नमस्कार , नमस्कार मंडळींनो आपल्या ऑफिसच्या वार्षिक समारंभामध्ये मी तुमचे स्वागत करत आहे . माझ्याकडे बघून बरेच जणांना प्रश्न पडलाय हि नवीनच कोण आलीय ? पण मला काही ओळखतात तरीही मी माझी ओळख करून देते .
नमस्कार , मी अनुजा . नवीन च आपल्या ऑफिस मध्ये जॉईन झालीय. चला तर आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया . मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आणि आता आपल्या समोर येत आहे आपल्या ऑफिसमधली सीमा गणेशवंदना घेऊन . "
" एकदंताय वक्रतुण्डाय गौरी तनयाय धीमहि ......... या बरोबरच सीमा गिरकी मारून स्टेजच्या बरोबर मध्ये येऊन आपले नृत्य करत होती. सगळे एक चित्ताने ते बघत होते .
तर कोपऱ्यात बसलेले दोन डोळे तिने गिरकी घेऊन मध्ये आली आणि ताठ च झाले आणि आपोआप तोंडून शब्द पडले " सीमा " मनातच बोलायला सुरवात केली , " हि आपल्याच ऑफिसमध्ये आहे आणि मला माहित नाही. पण हि तर पुण्याला होती ना ? इकडे कधी आली ? मला कोणीच कसे बोलले नाही . काकू पण काही बोलल्याचं नाही . आईला माहिती आहे का ते एकदा विचारले पाहिजे . पण ती तिकडे तर चांगल्या कंपनीत लागली होती ना ? .... .... " तेवढ्यात झालेलया टाळ्यांच्या आवाजाने तो भानावर आला . पुढील कार्यक्रमावर तो लक्ष देऊ लागला .
तिच्याशी बोलूया असा विचार करून तो आपल्या गाण्याची तयारी करायला निघून गेला . थोड्यावेळात गाण्याला सुरवात झाली . त्याला बघून सीमा लाही आश्चर्य वाटले. हा इथे काम कारतो आणि मला माहिती नाही. यामुळे मी याच्या समोर आले. म्हणजे हा मला कधी ना कधी भेटणार . तिच्या या विचारानेच बैचेनी वाढली . आता हा समोर आला तर आपण काय बोलणार याच विचाराने तिला घाम सुटला. आपण लवकरच निघून जाऊया . हा विचार करून ती जायला निघाली.
त्याचे स्टेजवरून पूर्ण लक्ष सीमा कडेच होते. ती जाताना बघताना याला गाणे कधी संपतंय असे वाटतं होते . त्याला पुढचे गाणेच सुचेना म्हणून त्याने खोकल्याचे नाटकं करून गाणं थांबवले आणि खाली आला .
तोपर्यंत सीमाला तिची मैत्रीण प्रिया भेटली . ती थोडी उशिराच आली होती . त्यामुळे सीमाला परत कार्यक्रमात घेऊन बसली. तासाभरात कार्यक्रम संपल्यावर सगळे जेवायला बसले.
तो म्हणजे सिद्धार्थ सीमा च्या शेजारी येऊन बसला आणि हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला , " जेवण झाल्यावर आपण कॉफी प्यायला जातोय. त्यामुळे अजिबात पळून जायचे नाही . . मी आलोच भात घेऊन. तुला काही आणायचे आहे ?"
" नकोय मला काही. मी आलेच हात धुऊन . "
" हो ये . " तो येताना दोघांसाठी पाणी घेऊन आला.
ती त्याच्याकडे पाहतच राहिली मनातच म्हणाली , " अजूनही हा तशीच काळजी घेतोय . मी इतक्या दिवसांनी त्याच्यासमोर आले तरी .... त्याच्या मनात काय चाललय नक्की . "
तो तिच्याकडे प्रेमाने बघत होता . हि एवढा कसला विचार करतीय . अजूनही तशीच आहे सतत विचार करत राहायचे . म्हणजे हिच्यात अजून काही बद्दल झालेला दिसत नाही .
दोंघांची तंद्री प्रियाच्या आवाजाने भंगली . " सीमा , चल ग आपण जाऊया घरी. मी आईला सांगून आलीय . मी तुझ्या बरोबर घरी येईन . "
हि प्रिया बरोबर गेली तर असा विचार करून सिद्धार्थ म्हणाला , " मी सोडतो तुम्हाला. मी तुमच्याच घराजवळ राहतो . "
" पण आम्ही तुम्हाला ओळखत नाही . तुम्हाला कसं माहिती आम्ही कुठे राहतो ते ?"
" ते ते ... "
सीमाच म्हणाली , " अगं , प्रिया . हा माझा मित्र आहे. आम्ही दोघंही जवळ जवळ च राहतो . "
" मग ठीक आहे . चला "
तिघंही सिद्धार्थच्या गाडीतून निघतात . सिद्धार्थ पुढे येऊन सीमा साठी पुढचा दरवाजा उघडतो. तर प्रियाला म्हणतो तुम्ही मागे बसलं का ? "
" हो . "
सीमा त्याने उघडलेल्या दार कडे बघत एकदा बघते तर त्याच्याकडे एकदा बघत होती . त्याने डोळ्यांनींच तिला बसण्याची विनंती केली .
त्याचे गाडी चालवत असताना सीमाच कडे लक्ष होते . तिच्या डोळ्यातून काहीच भावना दिसून येत नव्हत्या. तर ती बाहेर बघत विचार करू लागली . आणि तिला कॉलेज चे दिवस आठवले .
बघूया पुढच्या भागात तिला काय आठवले ते .
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा