नवीन आयुष्याच्या नवीन वाटा
भाग २
मागील भागात आपण पहिले कि सीमा आणि सिद्धार्थ बरेच दिवसांनी एकमेकांसमोर आलेत . तो तिला गाडीतून सोडायला चाललाय . दोघे आपापल्या परीने विचार करतायत . सीमाला तिचे कॉलेजचे दिवस आठवलेत .
सीमा, सिद्धार्थ, रेवा, ऋतू आणि अमोघ नेहमीपणाने चहा प्यायला कॉलेज कॅटीन मध्ये बसले होते . मज्जा मस्ती चालू होती . तेवढ्यात एक मुलगा येऊन सीमा समोर उभा राहिला आणि गुलाबाचे फुल देऊन तिला प्रोपोज करायला लागला .
सिद्धार्थ ने तर त्याची कॉलर च धरली आणि म्हणाला , " तुला कळतंय का तू कोणाला बोलतोयस ? "
" का रे तुझी कोण लागती ती एवढा माझ्यावर धावून येयला . "
" ती माझी चांगली मैत्रीण आहे . "
" फक्त मैत्रीचं आहे ना मग ....... "
" मग काय ?"
" तू कशाला वाईट वाटून घेतो . मी तिला विचारतोय . तू कशाला मध्ये बोलतोय . सीमा बोल ग तू ?"
" मी मी ... "
" ए तू तिच्याशी बोलायचे सुद्धा नाही . निघ इथून ."
" मी नाही जाणार . मला उत्तर पाहिजे . "
" मी देतो उत्तर . ती फक्त माझी आहे कळलं आता निघ इथून . या पुढे तिच्या आजूबाजूला जरी दिसलास तरी ..... "
" नाही दिसणार . माफ कर सीमा मला . मी जातो . "
तो गेल्यावर सगळे त्याच्याकडे बघायला लागले . हे काय होते ?" रेवा म्हणाली .
सीमा तर नुसतं त्याच्याच कडे बघत होती .
सिद्धार्थ म्हणाला , " सीमा मी आज माझ्या मनातील तुला सांगतो , मला माहित नाही तू कधी पासून आवडू लागली . पण तू जवळ असली कि सगळ्या जगाचा विसर पडतो. तू दिसली नाहीस कि मला बैचेन होतं . मला आयुष्यभरा साठी साथ देशील .आपण लग्न दोघंची स्वप्न पुर्ण झाल्यावर च करू . मी तुला कसली सक्ती करणार नाही . तुला पाहिजे ते तू करू शकते . बोल ना देशी साथ आयुष्यभर ?"
" मला सिद्धार्थ आता काहीच सुचत नाहीय . माझे उत्तर येईपर्यंत तू मित्र म्हणून राहशील ?"
" हो अगदी . मी तुझ्या उत्तराची वाट बघायला तयार आहे . "
रेवा आणि ऋतू एकदम ओरडल्या , " ये ये ......... आता ह्या गोष्टीवर अजून एक चहा ? "
त्या दिवशी पासून आज तागायत मी त्याला उत्तर दिले नाही. तो अजून माझी वाट बघत असेल का ? आता काय बोलायचे त्याच्यांशी ? त्याने परत विचारले तर ?"
इकडे सिद्धार्थ विचार करत होता , " हि जाताना तर मला सांगून गेली होती आणि आल्यावर का कळवलं नाही ? तिला काही त्रास आहे का ? कि मला उत्तर देयाचे म्हणून सांगितले नसेल का ?"
दोघांना विचारा मध्ये प्रियाचे घर कधी आले कळलेच नाही . प्रिया म्हणाली ," सीमा , माझे घर आलंय तर पुढे थांबवते का ?"
" हो "
प्रिया उतरून गेल्यावर दोघेच गाडीत होते . एकमेकांकडे चोरून बघत होते पण बोलायला कोणीच तयार नाही . ते नेहमीच्या कॅफे मध्ये आले. ते एका कोपऱ्यात जाऊन बसले . सिद्धार्थ ने सीमाच्या आवडीची कॉफी विथ क्रश चॉकलेट सांगितली.
ते ऐकून ती परत विचार करू लागली , " ह्याला अजून आवडी लक्षात आहे . आज बरोबर पाच वर्ष झाली मी ह्याच्यापासून लांब जाऊन तरी सुद्धा . "
" काय ग ?"
" काही नाही. तू बोल कसे चालू आहे तुझ ? घरचे कसे आहेत ?"
" माझं छान . घरातील पण मस्त . ते जाऊदे . तू कधी आली इथे ? ऑफिस कधी जॉईन केले . मला आलेली सांगितले का नाही ?"
" अरे चार महिने झाले मला येऊन . आल्या आल्या लगेच ऑफिस जॉईन केले . मला माहितीच नव्हते तू इथे जॉब करतोय . "
" अगं कसे माहिती असणार तू जाऊन पाच वर्ष झाली . गेल्या पासून तुझा काही संपर्क तरी आहे का ?"
"
" अरे जमलंच नाही. तिथले सगळंच नवीन. तिथे जुळून घेईपर्यंत कसा वेळ गेला कलेचं नाही "
" अगं पण माझ्याशी नाही पण रेवा, ऋतू यांच्याशी तरी संपर्क करायचा का तुला असे वाटले यांच्याशी बोलले तर सिध्यर्थ शी बोलावे लागेल ना ? "
" अरे असे काही नाही. आणि तुझ्याशी बोलायला मला काही अडचण नाहीय . "
" मग आमच्याशी इतके वर्ष संपर्क का नाही केला . ?"
ती या वाक्यावर शांतच बसली . आता यावर काय बोलावे कळेच ना .
बघूया पुढच्या भागात ती यावर काय उत्तर देतोय ते .
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा