नवीन आयुष्याच्या नवीन वाटा
भाग ३
मागील भागात आपण पहिले कि सीमा आणि सिद्धार्थ एकमेकांशी गप्पा मारतायत. सिद्धार्थ सीमाला विचारतोय कि माझ्याशी नाही पण तिने बाकीच्यांना का संपर्क केला नाही .
सीमा शांत पणे त्यावर काय उत्तर द्यावे या विचारत शांत बसून होती . सिद्धार्थ म्हणाला , " अगं काय झाले . बोला ना काही तरी ?"
" अरे मी काय म्हणतीय उद्या ऑफिसला सुट्टी आहे तर आपण सगळे भेटूया चालेल ?"
" अरे चालेल . पण उद्या भेटून झाल्यावर परत आमच्याशी संपर्क ठेवायचा . कुठेही गायब व्हायचे नाही . आणि तू काही आमच्यापासून लपवलं असेल तर ते पण सांगून टाक . " का कोणास ठाऊक पण सिद्धार्थ ला काही तरी ती आपल्यापासून लपवतीय असं सारखे वाटत होते . म्हणून तो काळजीने म्हणाला . तिने अजून आपलं प्रेम स्वीकारलं नसलं तरी तिने नाकारलं नाही या विचारानेच त्याला थोडी फार आशा होती .
" हो . नाही होणार गायब . चल निघूया. भेटू उद्या . "
ठरल्याप्रमाणे रेवा , ऋतू, अमोघ , सीमा आणि सिद्धार्थ कॉलेजच्या मागच्या बागेत भेटले. बाकड्यावरून बसून गप्पा मारत होते . सीमा भेटल्यामुळे रेवा आणि ऋतू ने एकमेकांची गाळ भेट घेतली .
रेवा म्हणाली , " काय ग कुठे गायब झाली होती. तुझा मोबाईल पण बंद होता. "
" अगं मी नंबर बद्दला आहे. मी सगळ्यांना नमस्कार असा मेसेज करते . "
अमोघ म्हणाला , " ते नंतर कर . आधी सांग तू कशी आहेस ? कुठे होतीस इतके दिवस ?"
सिद्धार्थ फक्त सगळ्यांचे बोलणे ऐकत असतो. मध्ये मध्ये सीमा कडे बारीक लक्ष असते . त्याला आतून खूप वाटत असते तिच्याशी एकट्याने गप्पा माराव्यात . तिला काही त्रास आहे का ते विचारावे . पण ....
" मी पुण्यात होते . एक नोकरी करत होते . आता ती सोडून दोन वर्ष झाले. आता चार महिने झाले इथे आले . "
रेवा म्हणाली , " मग तू आता भेटीतीय आम्हाला "
यावर ती थोड्यावेळ शांत राहिली . सिद्धार्थ म्हणाला , " शांत का बसली ?"
ती धीर गोळा करून म्हणाली , " मला तुम्हाला काही तरी सांगायचंय ."
सगळे एकदम बोलले " काय झाले . काय सांगायचे आहे ?"
" मी इथून पुण्यात गेले तेंव्हा मला एका कंपनी मध्ये चांगला जॉब लागला होता . पहिले सगळं जमतसत्वर एक दोन महिने गेले साधारण . मी तुम्हाला संपर्क करणार होते पण जमतच नव्हते.
सहा महिन्यांनी माझी नोकरी पक्की झाली . त्यादिवशी मी ठरवले कि आज संध्याकाळी सिद्धार्थ ला फोन करून हि बातमी सांगायची आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे . " असं म्हणल्यावर सिद्धार्थ ने कान टवकारले .
" म्हणून मी ऑफिस मधून लवकर निघाले होते . मैत्रिणींसाठी गोड घेऊन चालले होती कि ... ... .. "
सिद्धार्थ पटकन म्हणाला , " काय झाले " . त्याला खूपकाळजी वाट होती. या पाच सेकंदामध्ये काय काय विचार येऊन गेले .
" मला एका गाडीने जोरात उडवले . आणि मी जोरात उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले . आणि माझ्या पायावरून एक मोठी गाडी गेली . "
एकदम सगळे म्हणाले , काय ?"
" हो यामुळे दोन तीन महिने माझ्या दवाखान्यात गेले . पहिले तर मी खूप दिवस शुद्धीवर च नव्हते . यामध्ये माझे एक ऑपेरेशन झाले . डॉक्टरांनी खूप जपायला सांगितले होते . डोक्याला थोडा मार लागला असल्याने मला शुद्ध लवकर येतच नव्हती . डॉक्टरांनी शुद्ध जर आली नाहीतर कोमात जाण्याची शक्यता दर्शवली होती पण सुदैवाने काही दिवसात शुद्ध आली आणि मला मागचे सगळे आठवत होते . "
" मग तुझ्या आईने हे आम्हाला कळवले का नाही ?" सिद्धार्थ म्हणाला
" आईला काही सुचत नव्हते आणि माझा फोन तुटल्यामुळे आई कडे कोणाचा नंबर नव्हता ."
" आता तुझी तब्येत कशी आहे . तू तो जॉब सोडला का ?"
" हो मी सोडला . नुसते डोक्याला नाही तर माझ्या पायाला खूप जोरात मार लागला आहे . मार म्हणजे .... असं म्हणून ती उभा राहिली . तिला खोटा बसवलेला पाय काढून मी अपंग आहे हे सगळ्यांना दाखवले ."
" हो मी सोडला . नुसते डोक्याला नाही तर माझ्या पायाला खूप जोरात मार लागला आहे . मार म्हणजे .... असं म्हणून ती उभा राहिली . तिला खोटा बसवलेला पाय काढून मी अपंग आहे हे सगळ्यांना दाखवले ."
सगळे एकदम ओरडले , " सीमा अगं हे काय ? तू आम्हाला काही कळवलं का नाही . "
ती काही क्षण शांत बसली आणि मग म्हणाली , " मला तुमच्या समोर सिद्धार्थ ला काही तरी सांगायचे आहे ."
बघूया पुढच्या भागात ती सिद्धार्थ ला काय उत्तर देते .
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा