भाग ५
गौरीच्या प्रयत्नांनी शाळेचे वातावरण दिवसेंदिवस बदलत होते. शाळेतील विविध समित्या, उपक्रम, कार्यशाळा सगळीकडे तिचा सहभाग वाढत गेला. मुलांना शिकवण्याची तिची पद्धत, संवादशैली, आणि तिच्या कल्पकतेने शाळेला एक नवीन रूप दिले होते. कर्वे बाईंनी तिच्यावर ठेवलेला विश्वास ती सार्थ ठरवत होती.
दुसरीकडे, आम्ले सर मात्र तिथेच होते, त्याच टेबलामागे, त्याच पद्धतीत मुलांना शिकवत, आणि सदा ना कदा त्याच तक्रारी करत. वय वाढत चालले होते, तरी त्यांची चिडचिड काही कमी होत नव्हती. गौरीचे यश त्यांना सारखे टोचत होते. पण आता तिच्याशी वाद घालण्याचे कारणच उरले नव्हते, कारण तिच्या कामामुळे संपूर्ण शाळेला फायदा होत होता, आणि कर्वे बाईंपासून शाळेच्या विश्वस्तांपर्यंत सगळे तिचे कौतुक करत होते.
हळूहळू दिवस गेले, आणि एक दिवस आम्ले सरांच्या निवृत्तीचा काळ जवळ आला होता. दोनच महिने उरले होते. त्यांच्या डोळ्यांत मिश्र भावना निर्माण झाली होती.
"आता माझ्याशिवाय शाळेतले सगळे खुश होतील ना?" असे ते स्वतःलाच विचारत होते. पण त्यांच्या घरी परिस्थिती वेगळी होती, त्यांची पत्नी आजारी होती, मुलगा परदेशात गेल्यावर तेथेच लग्न करून त्याने परत कधीच संपर्क केला नव्हता, कारण आम्ले सरांनीच त्याला रागावून तसे सांगितले होते, एक मुलगी अजून लग्नाची राहिली होती, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर होत्या. त्यामुळे ते लगेच निवृत्त होऊ शकत नव्हते.
एका दुपारी त्यांनी शाळेच्या कार्यकारी समितीकडे विनंती केली “माझ्या निवृत्तीची मुदत दोन वर्षांनी वाढवता येईल का?”
समिती थोडी साशंक होती. काही सदस्य म्हणाले, “नवे शिक्षक तयार झाले आहेत, आता बदल व्हायलाच हवा.”
आम्ले सर काही बोलू शकले नाहीत. त्यांच्या नजरेत निराशा होती.
तेव्हाच तिथे गौरी आली. तिने शांतपणे सगळ्यांचे बोलणे ऐकले आणि नंतर सौम्य आवाजात म्हणाली,
“मला थोडे बोलू द्याल का?”
सर्वजण थबकले. गौरी उठून उभी राहिली आणि म्हणाली,
“आम्ले सर शाळेचा पाया आहेत. आज आपण ज्या व्यवस्थेवर चालतोय, त्या प्रत्येक नियमाच्या मागे त्यांचा अनुभव आहे. त्यांची दोन वर्षांची मुदत वाढवली तर शाळेला तोटा नाही, उलट फायदाच होईल. आपण नवे विचार आणू शकतो, पण पाय जमिनीवर मजबूत ठेवायला जुना दगड लागतोच.”
तिचे बोलणे ऐकून समितीतील सगळे शांत झाले. मुख्याध्यापकांनी तिच्याकडे बघून मान डोलावली.
थोड्याच वेळात निर्णय जाहीर झाला, आम्ले सरांना दोन वर्षांची मुदतवाढ मंजूर करण्यासाठी कर्वे बाई शाळेच्या विश्वस्तांकडे शब्द टाकतील, आणि त्यांचा शब्द विश्वस्त मंडळी नाकारणार नाहीत हे सगळ्यांनाच माहित होते!
थोड्याच वेळात निर्णय जाहीर झाला, आम्ले सरांना दोन वर्षांची मुदतवाढ मंजूर करण्यासाठी कर्वे बाई शाळेच्या विश्वस्तांकडे शब्द टाकतील, आणि त्यांचा शब्द विश्वस्त मंडळी नाकारणार नाहीत हे सगळ्यांनाच माहित होते!
त्या दिवशी पहिल्यांदा आम्ले सरांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांना विश्वास बसत नव्हता की जिच्याशी ते रोज भांडायचे, तिनेच आज त्यांच्यासाठी सर्वांसमोर विनंती केली होती. शाळा सुटल्यावर त्यांनी गौरीला वर्गाबाहेर बोलावले.
“गौरी,” ते थोडे अडखळत म्हणाले, “मला माहीत आहे, मी तुझ्याशी बऱ्याचदा उद्धट वागलो... तुझ्या कल्पनांवर रागावलो... पण आज तू जे केलेस, त्याबद्दल मी... खरंच तुझा ऋणी आहे.”
गौरी हसली आणि म्हणाली,
“सर, काही झाले नाही. तुम्ही माझ्यावर रागावलात, कारण तुम्हाला देखील शाळेवर प्रेम आहे, आणि माझेही तसेच आहे. ज्या ठिकाणी एकाच ध्येयासाठी दोन माणसे काम करतात, तिथे राग नाही, फक्त काहीवेळा मतभेद असतात.”
आम्ले सरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला,
“देव तुझे भले करो, गौरी. तू शाळेत आल्यावर ‘कानामागून आली, पण तिखट झाली’ अशी माझी अवस्था झाली होती, पण आता 'एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' अशा पद्धतीने माझी पुढची दोन वर्षे मी काढणार आहे, तुझ्या प्रत्येक नवीन गोष्टीत मी नक्की रस घेऊन काम करायचा प्रयत्न करीन.”
गौरी हलके हसली आणि म्हणाली,
“सर, आता तुम्ही राग करायचा नाही हं. माझे लग्न ठरलंय पुढच्या महिन्यात... तुम्ही येऊन तिथे नक्की मदत करायची.”
आम्ले सर चकित झाले, पण लगेचच हसले,
“सर, आता तुम्ही राग करायचा नाही हं. माझे लग्न ठरलंय पुढच्या महिन्यात... तुम्ही येऊन तिथे नक्की मदत करायची.”
आम्ले सर चकित झाले, पण लगेचच हसले,
“आता या मुलीचे लग्न मीच लावणार! आणि हो, आशीर्वाद तर आधीच दिला आहे.”
त्या दिवसानंतर शाळेचे वातावरण अधिक उजळले. गौरीच्या नवनवीन कल्पना आणि आम्ले सरांचा अनुभव या दोघांच्या संगमाने शाळा एका नव्या वातावरणात शिरली होती.
समाप्त
जलद लेखन कथा स्पर्धा नोव्हेंबर २०२५
’कानामागून आली अन् तिखट झाली’
’कानामागून आली अन् तिखट झाली’
Ⓒ ®भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा