Login

नवरा माझा, घर तिचं

Story About Newly Married Couple
(भाग १ - सासरचं घर)

आकांक्षा आणि रोहितचं लग्न नुकतंच झालं होतं. अजून घरात सगळीकडे लग्नाच्या फुलांचा हलकासा सुगंध होता, पण त्या सुगंधासोबत हळूहळू सासरीच्या नियमांचं आणि अपेक्षांचं अस्तित्वही जाणवू लागलं होतं.

आकांक्षा नागपूरची. तिकडचं वातावरण वेगळं — घरात मोकळेपण, आई-बाबांशी सुंदर equation. आणि इथं, पुण्यात, माधुरीताईंचं घर अगदी पारंपरिक. भिंतींवर देवतांची चित्रं, रोज संध्याकाळी अगरबत्तीचा सुगंध, आणि प्रत्येक गोष्टीचा ठरलेला क्रम.

पहिल्या सकाळी आकांक्षा सातच्या सुमारास उठली.
हात धुवून खाली आली, तर माधुरीताई आधीच देवासमोर बसून आरती करत होत्या.
त्यांचा आवाज मंद, पण नियमशिस्तीत.

“बाळ, सासरी थोडं लवकर उठायचं बरं का?” त्या म्हणाल्या, आवाजात सौम्यता होती, पण संदेश स्पष्ट होता.

आकांक्षा थोडी लाजली. “हो आई, आज पहिला दिवस आहे ना, थोडं उशीर झालं.”

माधुरीताई काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त ‘हं’ असं म्हणून पुन्हा घंटा वाजवली.
तेवढं छोटं ‘हं’ पण आकांक्षाच्या मनात दिवसभर गुंजत राहिलं.

राधिका, नणंद, सकाळी ऑफिसला जाण्याच्या तयारीत होती. केस ओले, पर्स शोधत होती.
“भावाचं लग्न झालं, आता आईचं लक्ष सगळं वहिनींकडे गेलं,” ती हसत म्हणाली.
पण ते हसू थोडं टोचणारं होतं — जणू हलकं विनोदात गुंडाळलेलं वास्तव.

त्या दिवशी आकांक्षा दिवसभर प्रयत्न करत राहिली — चहा नीट बनवला, भाजी चिरली, पण माधुरीताईंच्या नजरेत काहीतरी कायम “अजून शिकायचं आहे” असं जाणवत होतं.

रात्री रोहित घरी आला, तोच तिचा सगळ्यात शांत क्षण.
दोघं बाल्कनीत बसले, हातात चहा.
“कसं चाललंय?” रोहितने विचारलं.
आकांक्षा थोडा वेळ गप्प राहिली.
“जमतंय... पण कधी-कधी असं वाटतं की मी या घराचा भाग नाही अजून.”
रोहितने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“अगं, सगळ्यांना वेळ लागतो. आई थोड्या नियमीत आहेत, पण मनाने खूप चांगल्या आहेत. तू फक्त स्वतःसारखी राहा.”

ती हसली, पण त्या हसण्यात थोडं दुःख होतं.

रात्री झोपताना आकांक्षाने मनाशी ठरवलं —

“मी बदलणार नाही, पण या घराला आपलं बनवेन. हळूहळू, पण खरं.”

होइल का ती यशस्वी सगळ्यांना आपलं करण्यात, की अजून वेळ लागेल तिला सगळ्याच्याmanat jaga बनवायला?
पाहूया पुढच्या भागात ह्या 3 अंकी गोष्टी च्या

0

🎭 Series Post

View all