नववर्षाच्या उंबरठ्यावर, आली नवी पहाट
नवे स्वप्न, नवी आशा, लाभो सुखाचा थाट।
येता नविन वर्ष, होई नवाचं हर्ष
प्रत्येक तिमिरास आता, लाभो तेजस्वी स्पर्श।
असावे नवे स्वप्न, घेऊ नवी भरारी
उत्तुंग झेपावत चढु, सदैव यशाची पायरी।
फुलेल नवा बहर, असेल नवे सृजन
चौफेर नाद गुंजेल, होता प्रतिभेचे कूजन।
वसतील नवे विचार, करू नवे संकल्प
ध्येयपूर्तीत अपुल्या, न राहो कुठला विकल्प।
मनात वसे ते ते , सुफळ संपूर्ण व्हावे
सकारात्मकतेने झळाळत, कार्य-कर्तृत्व खुलावे।
ओमीक्रोन, कोरोना, विषाणूंचे संकट
याहीवर्षांत असेल का वाट पुन्हा बिकट?।
असली तरी आम्ही हरणार नाही अजिबात
दिमाखात जगत राहू, देत एकमेकांना साथ।
नववर्षाचे नावीन्य जपत, संपन्न करू वृत्ती
आहे ते मनापासून स्विकारू, राहू आनंदी प्रसन्नचित्ती।
नववर्षात सर्वांना लाभू दे, सुख, समृद्धी, समाधान
निरोगी-निरामय आयुष्याचं, प्रत्येकास मिळू दे वरदान।
© डॉ समृद्धी रायबागकर

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा