नववर्षाच्या उंबरठ्यावर

Past is always good lesson....learn something and enter with new energy .

नववर्षाच्या उंबरठ्यावर

नव्या आशेचं पाऊल पडावं

चित्रपटातून बाहेर वास्तवाशी

एक निधडंसं नातं जडावं...


"जुने जाऊदे मरणालागुनी" 

धडा मात्र ध्यानात हवा...

गेल्या अनुभवाच्या मागावर

जपून टाकावा पाय नवा.


होते काल ते आज कुठे

अंधाराचेही फिटेल धुके

असे पुसावे अपयश कालचे

नव्या यशापुढे ठरवा फिके.


विसरा मतभेद अन हात धरा

एकटेच जगायचा नको होरा

दिशा ओळखून मनबुद्वीने

फिरवा छत्री जिकडे वारा...


©® सदासन