Login

नव्या वाटेवरची सुरुवात. भाग - १

नव्या वाटेवरची सुरुवात
नव्या वाटेवरची सुरुवात. भाग - १      

ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५    

आदित्यला संध्याकाळी ऑफिसमधून घरी यायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे तो घाईघाईने गाडीत बसला आणि गाडी चालू केली. गाडी चालवताना अचानक एक तरूणी त्याच्या गाडी समोर येऊन धडकली त्याने गाडी कंट्रोल करण्याचा खुप प्रयत्न केला पण तरीही तिला धक्का लागून ती खाली कोसळलीच मग तो लगेच खाली उतरून तिच्या जवळ गेला आणि पाहिलं तर तिच्या डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध झाली होती. त्याने लगेच तिला उचलून गाडीत ठेवले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

हाॅस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करून मग त्याने घरी त्याच्या आईला फोन करून कळवले. मग त्याची आई पण तिथे आली. आदित्य हा एका मल्टी नॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. तर त्याची आई शैलजा निशिकांत माने ही एक एन जी ओ चालवत होती. त्याचे बाबा काही वर्षांपूर्वी ऑफ झाले होते. घरी आदित्य आणि त्याची आई दोघेच राहत होते.

डॉक्टरांनी आवाज दिला तसा आदित्य आणि त्याची आई तिथे गेले. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्या शुध्दीवर आल्या आहेत आणि त्यांच्या डोक्याला पट्टी केली आहे. त्यांचे सलाईन झाले की तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता.

थोड्यावेळाने सलाईन संपले तसे ते दोघेही तिला घेऊन घरी आले. घरी आल्यावर ती खूप शांत होती. तिला शैलजाने प्रेमाने जवळ घेतले आणि तिला नाव विचारले तिनेही तिचे नाव काव्या आहे असे सांगितले. तिला शांत बघून मग त्यांनी पण काही प्रश्न विचारले नाही. खूप उशीर झाल्याने ते जेवण करून लगेच झोपले.

सकाळी शैलजा झोपेतून उठल्या आणि पाहिलं तर काव्या गाढ झोपेत होती. मग त्यांनी ही आवाज न करता हळूच बाहेर आल्या. आदित्य पण उठून त्याच्या आईकडे आला.

"आई तू  त्यांना त्यांचा ॲड्रेस विचारला का? म्हणजे मग मी त्यांना त्यांच्या घरी सोडून मग ऑफिसला गेलो असतो." आदित्य म्हणाला.

"नाही.... मी तिला काहीच नाही विचारले, रात्री खूप उशीर झाला होता मग लगेच कसं विचारणार म्हणून मग दोघीही लगेच झोपून गेलो. आता उठली की मग मी विचारते तिला, तू जा ऑफिसला मी सोडेल तिला." शैलजा म्हणाली.

"मला थोडा वेळ आहे अजून जायला. त्या लवकर उठल्या तर मी येईल सोडून." आदित्य म्हणाला. ते दोघे बोलत होते तोच ती उठून त्यांच्या बाजूला येऊन ऊभी राहिली शैलजाने तिला बसायला सांगितले.

"बरं वाटतयं का आता." शैलजाने विचारलं तर काव्याने होकारार्थी मान हलवली.

"तू कुठे राहते सांग.... मग तुला आम्ही तुझ्या घरी सोडून येतो." शैलजाने विचारताच ती रडू लागली. तिला रडताना बघून ते दोघेही एकमेकांकडे बघू लागले.

"अगं रडतेस कशाला, तुला फक्त आम्ही ॲड्रेस विचारला त्यात रडण्यासारखे काय आहे?" शैलजाने विचारलं.

"मला घरी नाही जायचे. तुम्ही मला इथे घर कामासाठी ठेवाल का? हवे तर मी सगळे काम करील पण मला तुम्ही इथे राहू द्या." काव्या रडतच म्हणाली.

"अगं.... का पण? तुला का नाही जायचे घरी." शैलजाने विचारलं.

"तीन महिन्यापुर्वी माझे मिस्टर एका अपघातात वारले. आमच्या लग्नाला फक्त दोन वर्षे पूर्ण झाले होते आणि असे झाले. माझे आईवडील गावी असतात. त्यांना असे समजल्यावर ते दोघेही माझ्याकडे आले होते. ते होते तोपर्यंत सासू सासरे चांगले वागायचे आणि बोलायचे. पण जसे ते गेले तसे, या लोकांनी माझा छळ चालू केला आणि माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला मलाच जबाबदार धरले गेले. काल तर त्यांनी मला मारहाण करून घराबाहेर काढले. दिवसभर अशीच कुठे काही काम मिळतयं का ते बघत फिरत होते. आई वडिलांकडे जाऊ शकत नाही कारण त्यांना हे सगळे सहन होणार नाही. आणि मुलगी आई वडिलांकडे राहते म्हणून आजूबाजूचे सगळे नावे ठेवतील. एवढे बोलून ती परत रडू लागली.

आदित्य आणि शैलजा तर हे सगळे ऐकून सुन्नच झाले, त्यांना काय बोलावे हेच सुचेना. मग थोड्या वेळाने शैलजाने विचारलं की, "
मग तू त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेट का नाही केली." त्यावर ती शांतच झाली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all