नव्या वाटेवरची सुरुवात. भाग - ३
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
शैलजाने समजल्यावर काव्या आत तिला दिलेल्या रूममध्ये जाऊन ड्रेस घालून आली. ती आल्यावर हे दोघेही तिच्या कडे बघतच राहिले, कारण आदित्यने अंदाजे आणलेले ड्रेस तिला एकदम परफेक्ट बसले होते. आणि त्यात ती इतकी सुंदर दिसत होती की आदित्यची सुद्धा आता तिच्या वरून नजर हटत नव्हती. शैलजाने तिला खाली सोफ्यावर बसायला सांगितले तशी ती लगेच त्यांच्या बाजूला जाऊन बसली. त्यावेळी शैलजाने एक नजर तिच्यावर टाकली आणि बोलायला सुरुवात केली.
"काव्या, तुझं वय किती आहे?" शैलजाने विचारलं.
"बावीस चालू आहे." काव्या हळू आवाजात म्हणाली. तिचं वय ऐकून शैलजाला धक्काच बसला.
"अगं एवढ्या कमी वयात तुझ्या आईवडिलांनी तुझे लग्न कसे काय लावून दिलं?" शैलजाने विचारलं.
"माझ्या आईवडीलांची परिस्थिती खूप गरीब आहे. सासरचे लोक म्हणाले की आम्ही लग्नाचा सगळा खर्च करतो. माझी बारावी पण पुर्ण झाली होती मग काय! माझे आईवडील लगेच तयार झाले आणि दिले लगेच लग्न करून. खरे तर लग्न झाल्यावर मी खूप खूश होते. माझा नवरा मला खूप जीव लावायचा पण तो गेल्यावर सगळच विचित्र होऊन बसले." बोलता बोलता काव्याला हुंदका दाटून आला. शैलजा तिला धीर देत होती. पण तिची कहाणी ऐकून शैलजा आणि आदित्य दोघांनाही ही खूप वाईट वाटत होते.
पुढच्या काही काही दिवसांत काव्या इथे येऊन चांगली रुळली होती. आता तिच्या डोक्याची जखम पण बरी झाली होती. ती दिवस भर शैलजा सोबत एन जी ओ मध्ये जायची आणि परत त्यांच्या सोबत घरी यायची ती जरा बुजरी असल्याने शैलजाने तिला एन जी ओ मध्ये न ठेवता घरीच ठेवले होते. आदित्य पण तिच्याशी थोडाफार बोलायचा. दिवसभर एन जी ओ मध्ये जायचे आणि संध्याकाळी घरी यायचे. असे तिचे रुटीनच झाले होते.
बघता बघता काव्याला आदित्यच्या घरी येऊन सहा महिने झाले होते. पण या सहा महिन्यात ना तिच्या सासरचे लोक आले ना माहेरचे कोणी आले. तिला आईवडीलांची आठवण यायची पण ती तसे दाखवत नव्हती. शैलजा मात्र तिला खुप जीव लावायच्या. तिला जे काही हवं ते सगळं त्या तिला द्यायच्या. आदित्य आणि तिची मात्र या सहा महिन्यात चांगलीच मैत्री झाली होती. आदित्य तर तिच्या प्रेमातच पडला होता. तिच्या मनात पण त्याच्या बाबतीत फिलिंग होत्या. पण ती तसं दाखवायला घाबरत होती.
एक दिवस आदित्य हाॅलमध्ये टिव्ही बघत होता. तेवढ्यात शैलजा येऊन त्याच्या बाजूला बसली. आणि त्याच्याकडे बघत हलकसं हसली.
"काय मग आज निवांत बसलाय." शैलजा हसतच म्हणाली.
"हो, आज ऑफिसला सुट्टी आहे आणि दुसरेही काही काम नाही म्हणून मग निवांत आहे. तू बोल काय म्हणतेस आणि काव्या कुठे आहे?" आदित्यने विचारलं
"अरे ती मार्केट मध्ये गेली आहे. पण आदित्य मला तुझ्याशी थोडंसं बोलायचे होते." शैलजा म्हणाल्या.
"हा आई, बोल ना काय बोलायचे आहे. काही सीरियस आहे का?" आदित्यने विचारलं.
"हो, म्हणजे बघ ना काव्याला इथे येऊन एवढे दिवस झाले तरी तिच्या घरचे कोणीही तिला बघायला आले नाही. आपण तरी तिला अजून तिला किती दिवस इथे ठेऊन घेणार. तिच्या भविष्याचा देखील विचार करायला हवा." शैलजा म्हणाली.
"हो आई, मला पटतय तुझं बोलणं, खरं तर मलाही तुझ्याशी या विषयावर बोलायचे होते पण बरं झालं तुच विषय काढला." आदित्य शांतपणे म्हणाला.
"तुला काय बोलायचे आहे, म्हणजे ती इथे राहते म्हणून तुला काही प्रॉब्लेम आहे का?" शैलजा.
"नाही तसं काही नाही. मला तिच्या इथे असण्याचा काही प्रॉब्लेम नाही, खरं तर ती मला खूप आवडते असे बोलून आदित्य गप्प बसला.
"अरे आवडते म्हणजे नेमके काय, जे बोलायचे आहे ते जरा स्पष्ट बोल." शैलजा गोंधळून त्याच्याकडे बघू लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा