#कौटुंबिककथालेखन
#ईरास्पर्धा
#ईरास्पर्धा
शीर्षक:- नील आणि सुनयना भाग-३(अंतिम)
"ठीक आहे." असे बोलून नील आपल्या खोलीत गेला.
"अहो, तुम्ही एवढे बोलायला नको होते." सुनयना झोपताना म्हणाली.
"खरं तर हे सर्व तू बोलायला हवे होतेस. गप्प बसले की सगळे गृहीत धरतात आणि हो, मी तुझा एका ठिकाणी फॉर्म भरला होता. उद्या तुला मुलाखतीसाठी जायचे आहे." तो म्हणाला.
"काय ? कधी? केव्हा? त्याची तयारी?" एकदम त्याने गौप्यस्फोट केल्याने तिला काही कळत नव्हते.
"उद्या माझ्या सोबतच ऑफिसला जाताना तू निघायचे आहेस." त्याने सांगितले.
मनाची धडधड वाढली होती. असे नव्हते की तिने ह्या आधी नोकरी केली नव्हती पण आता ती शहरात राहत असल्याने तिला जास्त माहीत नव्हते. त्यामुळे उद्या कसे बोलणार हेच तिला समजत नव्हते.
"उद्या लवकर उठते म्हणजे आवरून निघता येईल. " ती म्हणाली आणि त्याने ऐकले होते.
रात्रीच्या भांडणाचा आणि उद्या काय प्रश्न विचारतील ह्याचा विचार करत ती खूप वेळ जागी होती. त्याने सकाळी वाजलेला गजर बंद केला होता.
नंतर तिला उठवले आणि आपण लवकर कसे उठलो नाही त्यामुळे स्वत:ला दोष देत ती आवरत होती.
सकाळी चहा झाला तसे त्याने पटकन आवरायला सांगितले.
मग ती काय घालू ह्याचा विचार करत असताना त्याने तिच्या समोर नवीन ड्रेस दिला.
मग ती काय घालू ह्याचा विचार करत असताना त्याने तिच्या समोर नवीन ड्रेस दिला.
"हा घाल आणि तयार हो पटकन." तो हसत म्हणाला.
फिक्या पिवळ्या रंगाची कुर्ती आणि गुलाबी लेगिंज घालून आणि त्यावर साजेशी ओढणी घेवून ती तयार झाली होती.
"तुझी सर्व कागदपत्रे घेतलीस का?" त्याने विचारले.
ती "हो."
"भीती वाटते?" त्याने विचारले.
ती "हो थोडी."
"होईल सर्व ठीक. ही नोकरी नाहीच मिळाली तर दुसरी पाहू. तू तुझे प्रयत्न करणे सोडू नकोस." तो म्हणाला.
देवाला, सासूबाईंना आणि त्याच्या पाया पडली. त्याला त्याच्या पाया पडलेले आवडले नव्हते पण सकाळी तिचा मूड खराब नको व्हायला म्हणून तो काहीच बोलला नाही.
"घरची कामे कोण करणार नील?" त्याची आई जाता जाता दोघांना टोकत म्हणाली.
"थोड्या वेळात भांडे काकू येतील. जेवण आणि बाकी सर्व घरकामे त्या करतील." तो बोलत होता.
"असे बोलतोय जसे हिला लगेच नोकरी लागलीच आहे." मुद्दाम त्या त्यांना ऐकू जाईल अशा बोलल्या.
"चल वेळेवर पोहोचायला हवे." आईकडे दुर्लक्ष करत म्हणाला.
ती त्याच्या बाईकवर बसून मुलाखत जिथे होती तिथे गेली. तिची मुलाखत झाली आणि विचारलेल्या प्रश्नांची सुरुवातीला घाबरत मग आत्मविश्वासाने उत्तरे तिने दिली.
नंतर सांगतो म्हणून सांगण्यात आले. बाहेर आली तर आपल्याला आता एकटे जावे लागेल म्हणून ती पुढे चालत गेली तेवढ्यात तिच्या तो नजरेस आला.
"तुम्ही? ऑफिसला नाही गेलात?" तिने चकित होईन विचारले.
"नाही. तू आत गेलीस मग मला इथेच थांबावेसे वाटले."
"तुम्ही अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकणार का आता?"
"नाही. पूर्ण दिवसाची." तो हसत म्हणाला.
"म्हणजे?" तिला समजत नव्हते.
"आज आपण बाहेर फिरू आणि थांब मी आताच एका चित्रपटाची दोन तिकीट काढतो." तो म्हणाला.
त्यांनी पहिले थोडे पॉपकॉर्न घेतले आणि सिनेमा पाहायला गेले. जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे आरामात विनोदी चित्रपट असलेला ते पाहत होते. ती खळखळून हसत होती. खूप निखळ असे तिचे हास्य तो पहिल्यांदाच पाहत होता.
मध्यांतर झाला आणि काही खायला हवे का म्हणून त्याने विचारले तर ती नाही म्हणाली.
"अहो इथे सर्वच गोष्टी खूप महाग आहेत. आता तुम्ही घरकामासाठी पण भांडे काकूंना कामाला लावले आहे. त्यात काल मला पण एक नवीन ड्रेस विकत घेतला होता. त्यामुळे जरा पैसे सांभाळून खर्च करा." त्याने का असे विचारल्यावर तिने हे उत्तर दिले होते.
"तुला कशाची हौस नाही का?" न राहून त्याने विचारले.
"असे नाही, पण सध्या तुम्ही घरात एकटेच कमावपणारे आहात. कुठला ना कुठला खर्चमध्ये येतोच. त्यावेळी मग हा असा खर्च केल्याचे वाईट वाटते. गरजेला साठवलेला पैसा उपयोगी येतो." त्याने सांगितले.
"हो, पण त्यामुळे प्रत्येकवेळी मन मारून जगणे बरोबर नाही." तो म्हणाला.
तेवढ्यात चित्रपट पुन्हा सुरू झाला.
"तू जास्त विचार करत जावू नकोस. जे असेल ते बोलत जा. काही हवे असेल तर मागत जा."
तिने होकारार्थी मान हलवली.
"कसे आहे, तुम्ही आणि मी वेगळ्या वातावरणात वाढलेलो आहोत. माझे बाबा शेतकरी त्यात पावसाचा खेळ चालू असतो. कधी पीक हाताशी येते तर कधी नाही. म्हणून पहिल्यापासूनच लागेल तरच पैसे खर्च करायचे असे घरचे म्हणायचे." ती तिची परिस्थिती सांगत होती.
त्याला खरे तर आपली पत्नी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे
म्हणून त्याचे मन देवाला आभार मानायचे काम करत होते.
भांडण वाढू नये म्हणून तिचे शांत राहणे आणि तिचा संयमी स्वभाव जाणून असल्याने त्याने तिला रात्री स्वतःसाठी बोलत जा असे मुद्दाम सांगितले होते.
म्हणून त्याचे मन देवाला आभार मानायचे काम करत होते.
भांडण वाढू नये म्हणून तिचे शांत राहणे आणि तिचा संयमी स्वभाव जाणून असल्याने त्याने तिला रात्री स्वतःसाठी बोलत जा असे मुद्दाम सांगितले होते.
तिच्या आई-बाबांनी मोठ्यांचा आदर कर असे संस्कार दिल्याने मनात असूनही ती कधी सासूला आणि नणंदेला काही बोलली नाही.
तेच त्याने नकळत सहकारी जे त्यांच्या बायकोबद्दल सांगायचे ते आठवत होता आणि आपल्या बायकोशी तुलना करत होता. काहींनी घरात पटत नाही म्हणून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. इथे आपली सुनयना मात्र घरासोबतच आपली माणसे जपण्याचे काम करत होती. तसेच त्याने ठरवले होते की काही झाले तरी तिला कधीच दुखवायचे नाही. तिला हवे ते आपण उपलब्ध करून द्यायचे.
दुसऱ्या दिवशी तिला मुलाखत दिलेल्या पदासाठी निवड झाली म्हणून कॉल आला. सुनयनापेक्षा जास्त आनंद हा नीलला झाला होता.
त्या भांडणानंतर नीलच्या बहिणीने जास्त घरी येणे बंद केले. सुनयना नोकरीवर रुजू झाली आणि जमेल तसे घरचे काम करत नीलच्या साथीने तिची स्वप्न पूर्ण करू लागली.
त्याच्या आईला आपली सून काय आहे हे नंतर समजले आणि ती सुध्दा आपले विचार बदलण्याचा प्रयत्न करू लागली.घरात भांड्याला भांडण लागत नव्हते असे नाही पण सुनयना आता बोलायला शिकली होती.
काही पंखांना भरारी देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते तेच काम नीलने आपल्या पत्नीची साथ देत केले.
समाप्त.
© विद्या कुंभार
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा