Login

नीलकृष्ण भाग १

Revenge Love Story
     

साल २००४,


        माळेगांव, तालुक्यातील एक गाव...गाव असलं तरी प्रगतीशीलाच्या वाटेवर होते...साखर कारखाना असल्याने गावातील गावकर्यांची संख्या तशी हळूहळू वाढत चालली होती...दोन तीन मोठी  कॉलेज,दोन शाळा आणि दोन मोठी हॉस्पिटल या गावाला लाभली होती...


         आजही माळेगाव च्या ज्युनिअर कॉलेज वर गर्दी होती... सिद्धार्थ ज्युनिअर कॉलेज हे नाव त्याचं... कारखान्याच्या नावावरून च कॉलेज ला नाव दिले होते...अकरावीत नविन आलेल्या विद्यार्थ्यांनी आज कॉलेज मध्ये गडबड चालली होती....


" हे शमा,  हाय.‌‌..." तोच एका मुलीला तिच्या मैत्रिणी ने आवाज दिला...तशी एक सतरा वर्षाची गोड मुलगी मागे फिरली...दिसायला रंगाने उजळ असली तरी चेहर्यावर हिच्या कायम भिती...जी तिच्या त्या जाड भिंगातून ही कायम दिसायची...केस खांद्यापर्यंत मस्त एका लाईनीत रूळवलेले...बाकी मेकअप चा कसलाही लवलेश नाही...अहं तिला त्याची कधीच गरज वाटली नाही...आपली चार बुक्स हातात छातीजवळ घट्ट धरून च ती त्या मुलीकडे पहायला लागते...


" हाय..अंजली..." कपाळावरचा आता तिला पाहून आलेला घाम पुसत ,दुसर्या हाताने आपले बुक्स संभाळत ती कशीबशी पुटपुटली...आवाज ही तिचा बाहेर पडला नसेल ईतका लहान...


" मॅडम अहो मीच आहे एवढं घाबरायला काय झालं..." पण अंजली तिला हसत तिच्या गालावर एक हलकी चापट मारत म्हणते..


" काही नाही गं..." शमा आता ही घाबरून ईकडे तिकडे पाहत हळूच बोलते...तोच तिची नजर एका झाडामागे गेली जिथे दोन डोळे तिला दिसत होते...तशी तिने पटकन आपली मान वळवली आणि " अंजली चल लवकर...क्लास भरेल..." म्हणत आपल्या मैत्रिणीचा हात धरून क्लासरूम कडे जायला लागली..



" हे रिलॅक्स शमा...अजून अर्धा तास आहे कॉलेज भरायला....आणि तू ईतकं परेशान का झाली आहेस...क्लास शोधायला आपल्याला ईतका वेळ नाही लागणार...कारण गेले तीन वर्ष आपण याच आवारात फिरत आहोत..." अंजली तिचा हात धरून तिला हसतच म्हणते... सिद्धार्थ कॉलेज हे ज्युनिअर कॉलेज आणि दहावीपर्यंत शाळा असं ॲटेच्ड होतं...बारावी पर्यंत... शमा आणि अंजली इयत्ता आठवी पासून एकाच वर्गात शिकत असल्याने मैत्री त्यांची खूप खास होती... त्यामुळे त्या दोघींना एकमेकींचा स्वभाव चांगलाच माहित होता...


" तुला यायचं आहे कि नाही...कि मी जाऊ..." पण आता शमाने परत एकदा त्या झाडामागून तिलाच पाहत असलेल्या डोळ्यांकडे पाहून तिला रागात च बोलली..


" अरे हो किती रागावतेस..." आणि तिचा असा आवाज ऐकून अंजली मात्र हैराण होते... ॲक्चुअली या तीन वर्षांत तिने असा कधीच आवाज शमाचा ऐकला नव्हता... त्यामुळे तिचा असा चढलेला आवाज ऐकून ती परेशान ही सोबत झाली होती..." आणि बाय द वे सृष्टी निष्ठा ही अजून आल्या नाहीत..." तिने पुढे हसत म्हटल..


" हम्म.." पण अचानक ती शांत झाली आणि हसुन हुंकार भरला...ज्याचं कोड आता अंजली च्या चेहर्यावर साफ दिसत होतं..." बरं तू एक काम कर...तू हिथे च वाट पाहा त्यांची ...मी लायब्ररी मध्ये जाऊन बुक्स घेऊन येते एखादं नविन आलं असेल वाचायला तर..." शमा च मग परत एक नजर ईकडे तिकडे टाकत पण यावेळी आवाज कणखर काढत म्हणते..


" तू आणि ही लायब्ररी....कोणते ऋणानुबंध आहेत तुमचे काय माहित..." तशी अंजली तिच्या समोर हात जोडत म्हणते..." बरं जा बाई...मी नाही म्हटलं तर तू नाही जाणार का...त्यापेक्षा मी हसत परवानगी दिलेली बरी..."


" परवानगी आणि ती ही तुझी...चल हट...मला काय भुताने पछाडले आहे काय..." शमा आता मस्त हसुन तिला म्हणते व आलेच म्हणत वरच्या मजल्यावर असलेल्या लायब्ररी त पळत जाते...


" अगं जरा हळू... लायब्ररी तील पुस्तके आज सगळी संपणार नाहीत...मॅडम..." तसं तिला पळत जाताना पाहून मागून अंजली आवाज देत म्हणते, " ही शमा पण ना...एकदम धांदरट आहे मुलखाची..." म्हणत आता अंजली आपल्या दोन मैत्रिणी ची वाट पहायला लागते...या चौघींचा ग्रुप होता...चौघींचे चार स्वभाव...


" काय गं शमा नाही आली का..." तोच तिथे जवळ जवळ दहा मिनिटांनी  धापा टाकत सृष्टी आणि निष्ठा येत अंजली ला विचारतात..


" या महाराण्यांनो या...फारच लवकर आलात कि तुम्ही.." तसं अंजली त्या दोघींना हातातील घड्याळ दाखवत म्हणतात... त्यावेळी मोबाईल जस्ट लॉन्च झाला होता...तरूण मुला मुलींना अजुन वापरायची कॉलेज मध्ये तितकीशी परवानगी नव्हती...


" हो ना फार लवकर आलो ना...हेच मी या सृष्टीला बोलत होते पण ही ऐकतेय कुठे.." तसं निष्ठा आपल्या नाकावरचा चष्मा वर करत म्हणते...


" बरं बरं सोडा आता सर्व...अजून वीस मिनिटे च आहेत क्लास भरायला...ही शमा कुठे आहे ते बघुयात...पुस्तक घेऊन येते पटकन म्हणाली आणि आता दहा मिनिटे झाली तरी अजून आली नाही..." अंजली थोडी रागातच म्हणते...आणि या दोघी ही हो हो म्हणत शेजारीच असलेल्या इमारतीत घुसतात...पण या दहा मिनिटात बरंच काही झालं होतं ज्याच त्यांना किंचित शी ही कल्पना नव्हती...


" कोण आहात तुम्ही..." शमा पुस्तक आपल्या सॅकमध्ये टाकत खाली येतच असते कि अचानक तिच्यासमोर एक स्कार्फ घातलेला मुलगा येतो ज्याचे डोळे फक्त दिसत होते...ती अजून काही बोलणार तोच तो आपला हातातला रूमाल तिच्या नाकावर लावतो आणि पुढच्याच क्षणात आपली शमा बेशुद्ध होते...त्या रूमालावर बेशुद्धीच औषध जे त्याने लावलं होतं...


" मॅम शमा... शर्मिला  आली होती ना..." त्या तिघी लॅब मध्ये येताच समोर रिसेप्शन वर असलेल्या मॅडम ना विचारतात...आज पहिलाच दिवस कॉलेज चा असल्याने लॅब संपूर्ण रिकामी होती...अगदी मॅम सोडून चिटपाखरूही दिसत नव्हतं..


" हो आली होती पण बुक घेऊन मघाशीच पाच मिनिटांपूर्वी ती गेली सुद्धा...तुम्हांला दिसली नाही का..." मॅम त्यांना च आश्चर्याने विचारतात..या चौघींचा ग्रुप शांत आणि स्कॉलर मध्ये मोडत असल्याने संपूर्ण शाळा , कॉलेज व लॅब मधील सर्वच लोक यांना ओळखत होते..


" न...नाही मॅडम..." अंजली जरा घाबरून च बोलते..


" बहुदा ती अंजली क्लास रूम मध्ये गेली असावी..." तसं सृष्टी आपली शंका बोलून दाखवते...त्याच इमारतीत दुसर्या साइडला त्यांचा क्लास भरणार होता अकरावीचा...लॅब एका टोकाला आणि क्लासरूम दुसर्या टोकाला होती ... क्लासरूमच्या शेजारून च अजून एक जिना जात होता जो डायरेक्ट कॉलेज च्या मेन गेटपर्यंत होता..


" हा बहुदा..." म्हणत त्या तिघी ही आता थोड्या रागानेच क्लासरूमकडे गेल्या...पण तिथे ही कुणीच नव्हतं...बराच वेळ शोधूनही ती काही दिसत नव्हती...कुणाला कळवावे हे ही कळत नव्हतं  कारण त्यावेळी मोबाईल हि नव्हता..आणि लॅंडलाईन ही तिच्या घरी होता कि नव्हता त्यांना माहित नव्हतं कारण ती आठवी पासूनच हॉस्टेल ला राहत होती... त्यामुळे तिच्या घरच्यां बद्दल त्यांना जास्त अशी काही माहिती च नव्हती...


८ वर्षांनंतर,


" कृष्णा...उठ बाळ लवकर..."  एका आलिशान बंगलो मध्ये पंचेचाळीस च्या वयाचा एक माणूस खोलीतले पडदे बाजूला सरकवत म्हणतो..पण काहीच आवाज येत नव्हता...बेडवर फक्त चादर अस्ताव्यस्त पसरली होती जणू कुणी त्या खाली झोपल असावं..


" उठ ना लवकर..." तोच तो माणूस तिच्या बेडजवळ येत बोलतो...पण तरी ही कसलाच आवाज येत नाही तसं तो माणूस ती चादर बाजूला सरकावतो तर तिथे एक लोड असतो ज्यावर ही चादर पांघरली होती..


" कृष्णा...." तसा तो माणूस आता जोरात ओरडतो...त्या ओरडण्यामध्ये काय नव्हतं..राग काळजी असं सगळं मिश्रण होतं त्या आवाजात ...


" डॅड...डॅड मी हिथे आहे..." तोच बाहेरून आवाज ऐकू येतो तसे ते त्या खोलीच्या गॅलरीत जातात...


" कृष्णा..." आता ते प्रेमळ आवाज देतात...



क्रमशः

©® चैत्राली यमगर डोंबाळे

🎭 Series Post

View all