Login

नवी सुरूवात भाग १

One girl who tries to give her life by suicide.

      पावसाचे थेंब आभाळातून मार्ग काढत जमिनीवर पडत होते . अंधारातून मार्ग काढत ऍम्ब्युलन्स वेगाने रस्त्यावरून जात होती. गाडीच्या आवाजामुळे रस्त्यावरचे गाडी ऍम्ब्युलन्सला पाहून बाजूला होत होते . अगदी वेगाने ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेनी धावत होती .

काहीवेळाने ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या खाली उभी झाली. त्यातून एक महिला ( वय 45) रडत खाली उतरली . हॉस्पिटलमधून दोघे स्ट्रेचर ऍम्ब्युलन्स जवळ घेऊन आले . गाडीतून एका मुलीला काढले आणि त्या स्ट्रेचरवर झोपवले . तिचे डोळे बंद होते . तिच्या हाताच्या शिरातून रक्त खाली पडत होतं . तिची आई मात्र रडतच होती . ते दोघे वेळ न घालवता स्ट्रेचर वेगाने आतमध्ये नेऊ लागले . तिच्या मागे त्या मुलीची आईही पळत होती . त्या वेळी हॉस्पिटल अगदी शांत वाटत होतं. रात्रीच्या वेळी पेशंट झोपले होते . पण ऍम्ब्युलन्सच्या मोठ्या आवाजाने बरेचशे जागे झाले . डॉक्टर अगदी गडबडीने स्ट्रेचर सोबत जात होते . मुलीच्या डाव्या हातातून रक्ताचे थेंबे खाली पडत होते . आईच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते . डॉक्टर स्ट्रेचरला घेऊन ऑपरेशन थिएटर मध्ये गेले . नर्सने आईला बाहेच थांबण्याच इशारा दिली . तिची आई बाहेरच थांबून तिच्या आयुष्याची मागणी देवाला घालत होती .

    आयुष्यात पहिल्यांदा  एवढे अपयश तिच्या वाटे आलेले होते. लहान पणीच तिचे वडील तिला सोडून गेले होते. तिची आई एकमात्र तिला सांभाळत होती. लहानाची मोठी करताना तिच्या आईला खूप मेहनत घ्यावी लागली.

       ऑपरेशन थिएटर बाहेरील लाल दिवा अजूनही विजलेला नव्हता.

    सकाळचे १ वाजत आलेले होते. अखेर ऑपरेशन थिएटर बाहेरील लाल दिवा विजला. हे पाहताच तिची आई जागेवरून उठली. काही वेळाने डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले. तिची आई त्यांच्या जवळ गेली.

ती -" डॉक्टर . सुमन कशी आहे आता?"

डॉक्टर -" रक्त खूप गेला आहे. आता सध्या बेशुद्ध आहे. काही तासाने शुध्दीत येईल. तिला जनरल वार्ड ला शिफ्ट करण्यात येईल. तेंव्हा तुम्ही बघू शकाल. "

ती -" पण ती ठीक होईल ना? "

डॉक्टर -" ती हे पाऊल उचलण्याच कारण तुम्हाला माहिती असावं. तिला आता मानसिक आधार हवंय. त्या नंतर ठीक होईल ती.. काळजी घेऊ नका..."

ती -" थँक्यु डॉक्टर. "
       
   ५ वाजत आले. सुमन शुध्दीवर कधी येईल हा प्रश्न तिच्या आईला पडलेला होता. तिला आता जनरल वार्ड मध्ये शिफ्ट केलं होतं. तिच्या बेडजवळ तिची आई बसली होती. तिची झोप झालेली नव्हती. म्हणून ती जराशी बेडवर डोकं ठेवून होती. सुमनला खूप काही ट्रीटमेंट सुरू होते. तिच्यात रक्ताची कमी होती म्हणून तिला रक्त चढवत होते. तिच्या हाताला जिथे तिने इज्जा करून घेतली होती तिथे बेंडेज लावलेले होते.
------------------------------------
    अंधुक असं ऊन त्या वॉर्डांत येत होती. हळू हळू सुमन डोळे उघडली.

सुमन -" आई...."

तिच्या त्या हळू आवाजाची हाक तिथेच डोके टेकून झोपलेली तिची आई ऐकली. ती लगेचच  जागी झाली.

आई -" सुमन... कसं वाटतंय आता ?"

सुमन -" आई...  मला माफ कर. "

असं म्हणताच तिला अश्रू अनावर आले. तिच्या गालावरून अश्रू खाली येत होते. आई तिला आधार देऊ पाहत होती. तिच्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले.

आई -" सुमन... असं का केलीस? "

सुमन -" आई ... मला खरचं माफ कर ."

ती आता हुंदके देत रडत होती .

आई -" श श.... आता काही विचार करू नकोस. तू बरी आहेस ना. तेवढंच हवंय मला.... "

सुमन -" पण आई..."

आई -" पण वैगरे काही नाही . आता फक्त आराम कर."

सुमन -" ह्म..."

     ती परत डोळे बंद करून तिथेच बेडवर पडली.

     अगदी प्रसन्न असं सकाळचं वातावरण होतं. सुमन आता बेडवर बसून होती. तिची आई तिच्या हाताने तिला फळ खाऊ घालत होती. इतक्यात त्यांच्या समोर एक इसम चालत आला. तोही पेशंटच्या गणवेशात होता. तोही सुमनच्या वयाचा होता. दिसायला खूप चांगला होता.

तो -" गूड मॉर्निंग. "

आई -" गूड मॉर्निंग.."

सुमन मात्र शांत होती.

तो -" माझं नाव कुशल आहे. मी तुमच्या शेजारच्या बेडवर आहे."

तो बोट दाखवत म्हणाला.

तो -" एक मिनिट."

असं म्हणत तो त्याच्या बेडजवळ गेला आणि काही तर घेऊन परत आला.

कुशल -" हे घ्या."

तो मिठाई देत म्हणाला. सुमन आणि तिच्या आईला थोडं नवलच वाटलं. पण ते दोघे मिठाई घेतले.

आई -" थँक्यु."

सुमन -" थँक्यु.."

सुमन थोडी अडखळत म्हणाली.

आई -" पण ही मिठाई कशासाठी?"

कुशल -" या नवीन दिवसासाठी , सुंदर सकाळ साठी , या नवीन लोकांच्या भेटीसाठी , या आयुष्यात खूप सारे दिवस येऊन जातात. आपण त्याला साजराच करत नाही. ही एक साजरा करण्याची पद्धत आहे असं समजा."

त्याच हे बोलणं ऐकून दोघेही स्तब्ध होते.

आई -" खरचं थँक्यु..."

कुशल -" वेलकम. मी आलोच.."

असं म्हणत तो निघाला आणि वॉर्डमध्ये असलेल्या प्रत्येक जणांना मिठाई वाटू लागला. हे बघून सुमनला नवल वाटलं.

      सुमनची आई डॉक्टरला भेटण्यासाठी गेली होती . वॉर्डांत नर्स येऊन प्रत्येकाला गोळी आणि औषध देऊ लागली. सुमन शून्यात हरवली होती. नर्स तिच्या जवळ असलेल्या कुशलच्या बेडजवळ आली.

कुशल -" कसे आहात सिस्टर?"

नर्स -" मस्त... मग आज आहे का मिठाई ?"

कुशल -" आहे ना... खास तुमच्यासाठी काढून ठेवलीय."

कुशलने तिला मिठाई दिला. नर्स तिला गोळ्या दिली . सगळी चेक अप करून तिला झोपवून सुमनच्या जवळ आली.

नर्स -" सुमन ना ?"

तीच लक्ष मात्र कुशल कडेच लागून होती

नर्स -" सुमन?"

नर्सच्या हाकेने तीच लक्ष मोडल गेलं.

सुमन -" हं..."

नर्स -" कशी आहेस आता ?"

सुमन -" मला माहिती नाही..."

ती जरा निराशेने उत्तर दिली. नर्सला ही हिच अपेक्षा होती. ती आत्महत्येच्या कित्येक केस हाताळली होती.

नर्स -" सुमन, तुला आता खूप काळजी घ्यावी लागेल. ही तुझी गोळी आहे . पण ती जेवल्यानंतर घ्यायचं आहे. ड्रेसिंग उद्या चेंज करूया. तुझी आई डॉक्टरला भेटायला गेली असेल. डॉक्टर काय सांगतील त्यावर परत ट्रीटमेंट घेऊयात."

सुमन -" ठीक आहे.."

नर्स जात होती , तेवढ्यात सुमन हाक मारून तिला थांबवली.

सुमन -"मला तुम्हाला काही तरी विचारायचं होतं."

नर्स -" बोल..."

सुमन -" माझ्या शेजारच्या बेडवरील तो कुशल..."

ती जरा अडकळत विचारली.

नर्स -" तो कुशल आहे. त्याच काय ?"

सुमन -" तो सकाळी मिठाई वाटत होता. "

नर्स -" अच्छा... म्हणजे तुला पण मिठाई मिळाली तर.."

असं म्हणत ती नर्स तिच्या जवळच्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली.

नर्स -" तो कुशल आहे. त्याला या जगात कोणीच नाही. म्हणजे ती अनाथ आहे. अनाथाश्रम मध्ये मोठा झाला . शिक्षण ही पूर्ण केलं. चांगली नोकरीही त्याला भेटली होती. पण त्याच्या नशिबात काही वेगळच लिहिलं होतं"

सुमन -" काय ? म्हणजे तो इथे कसा आला?"

नर्स -" एका वर्षा आधी त्याला कळलं की त्याला ब्रेन  कॅन्सर आहे. शेवटची स्टेज येऊ पर्यंत वाट पाहतोय तो आता. त्याला आता फक्त प्रत्येक दिवस जगायचं आहे. "

सुमन -" किती दिवस आहेत त्याच्याकडे?"

नर्स -" त्याची केस जरा अवघडच आहे. त्याच्याकडे ३ दिवस ही असू शकतात किंवा तीन महिने देखील असू शकतात."

हे ऐकताच सुमन स्तब्ध झाली. नर्स खुर्चीवरून उठली.

नर्स -" चला ... काम आहेत खूप .."

सुमन मात्र कुशल कडे पाहत होती .

******************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती