दुपार होत आलेली होती. डॉक्टरच्या केबिनमधून आई कधीची सुमनकडे आली होती. सुमनला आता मानसिक आधाराची गरज होती.
आई -" सुमन.. तुला जेवणासाठी काय हवंय बेटा ?"
सुमन शून्यात हरवली होती.
आई -" सुमन??"
सुमन -" अह..."
आई -" अगं..कुठ हरवली आहेस?"
सुमन -" काय झालं?"
आई -" मी विचारलं तुला जेवणासाठी काय हवंय?"
सुमन -" काही नको..."
आई -" सुमन तुला आता काहीतरी खाऊन घ्यायला हवं."
सुमन -" आई .. तू एवढं लवकर कशी विसरू शकतेस?"
आई -" काय?"
सुमन -" की मी आता काहीच नाहीये. तू इतकी मेहनत घेऊन मला शिकवत आहेस आणि मी चक्क नापास झाले. लाज वाटते मला माझी... कसं जगू ग मी.. ना मी वडलांना खुश करू शकले ना तुला .. काय करू मी सांग ? ... मला आता जगण्याची इच्छाच राहिली नाहीये आई..."
असं म्हणत ती आईच्या कुशीत गेली. तिची आईही रडत होती. पण आईला आता आधार द्यावा लागणार होता .
आई -" अगं ... तू नापास झालीस म्हणून हे पाऊल उचललीस ? अगं पास - नापास , हार - जीत, हे तर चालूच असतं. हेच तर आयुष्य आहे. तू या आयुष्यालाच नाकारलीस. मी मेहनत घेते बेटा. पण तू पास हो किंवा चांगले मार्क्स मिळू देत यासाठी नवे. तू चांगली जगली पाहिजे ,तुला कशाचीही कमतरता भासू नये या साठी मी मेहनत घेते."
सुमन -" तरीही आई..."
आई -" आता गप्प बस बघू... आराम कर.."
सुमन गप्प झाली. पण अश्रू तर येतच होते. तेवढ्यात तिला आवाज आला.
मेघा -" सुमन..."
हे ऐकताच सुमन डोळे पुसली आणि तिची आई ही मागे पाहिली. तिथे मेघा आणि समीर उभे होते.
आई -" अरे मेघा आणि समीर .. या या ..."
असं म्हणत तिची आई उठली.
आई -" अगं बस..."
मेघा खुर्चीवर बसली. समीर तिथेच उभा होता.
मेघा -" कशी आहेस , सुमन ?"
सुमन -" तू बघत आहेस ना..."
ती समीरकडे पाहत उत्तर दिली .आईला तीच उत्तर खटकल.
आई -" मेघा आणि समीर तुम्ही बसा. मला डब्बा घेऊन यायचं आहे. "
मेघा -" हो काकू... तुम्ही जाऊन या. आम्ही आहोत इथे..."
आई दुपारचा डब्बा आणण्यासाठी गेली. मेघा आणि समीर तिथेच होते. काहीवेळ शांतेत गेलं. शांतता मोडण्यासाठी मेघा म्हणाली.
मेघा -" काही खालीस का सुमन ?"
सुमन -" मेघा पुरे झालं आता... किती ते फॉर्मालिटी?"
सुमन वैतागून म्हणाली.
मेघा -" असं का केलीस सुमन ?"
सुमन -" तुला माहिती नाही का मेघा ?"
समीर आता बेडवर बसला.
मेघा -" तू नापास झालीस म्हणून हे असं करून बसलीस?"
सुमन -" हे एकच कारण नाहीये . दुसरं कारणही आहे."
ती परत समीरकडे पाहत म्हणाली.
मेघा -" तुला काय म्हणायचं आहे?"
समीर -" मला माहिती आहे सुमन . तू माझ्यावर रागवली आहेस ते.."
तिचे डोळे परत ओले होऊ लागले.
सुमन -" तू माझं प्रेम होतास समीर. तुझ्या त्या गोड गोष्टीमुळे मी प्रेमात पडले होते. तूही तसाच प्रेमात पडला होतास असं वाटलं होत. आम्ही दोघेही सोबत भविष्य पाहिलो होतो. पण तू असा का केलास? "
समीर - " काय केलं मी?"
सुमन -" मला जेंव्हा तुझी गरज होती. तेंव्हा तु माझ्याजवळ नव्हतास. मी तेही सहन केलं असतं. पण तू त्याच्याहून वाईट केलास. "
मेघा - " काय झालं सुमन ? जे ते स्पष्ट सांग."
सुमन -" समीर, तू काल कुठे होतास?"
समीर -" मी तुला मेसेज केला होता कि मी माझ्या मावशीच्या घरी होतो."
सुमन -" खरं सांगतोयस?"
समीर -" हो.. सुमन... का खोटं बोलू मी?"
समीर जरा अडखळत म्हणाला.
सुमनने तिचं मोबाईल घेतलं आणि मेघाकडे वळली.
सुमन -" मेघा तू कुठे होतीस?"
मेघा -" का?? ... म्हणजे असं का विचारत आहेस तू?"
तिही अडखळत म्हणाली.
सुमन -" तू कुठे होतीस मेघा ?"
ती जरा जोरातच म्हणाली.
मेघा -" मी काल घरी होते. "
सुमन -" खरं?"
मेघा -" हो... का?"
सुमन तिच्या मोबाईल मधून एक फोटो मेघाला दाखवली. ते पाहून मेघा चकित झाली .हे पाहून समीरला काही कळल नव्हतं .
समीर -" काय झालं मेघा?"
मेघाची नजर आता खाली झाली होती. समीर सुमनच्या हातून मोबाईल घेतला आणि पाहिला. त्यात त्याचा आणि मेघा या दोघांचे एकत्र फोटो होते. ते दोघे कॅफेमध्ये असलेला फोटो होता. दोघेही हात धरून बसले होते. दोघेही एकमेकांकडे बघत होते. त्या फोटोत ते मित्र मैत्रीण म्हणून वाटत नव्हते.
समीरला आता कळून चुकलं की आता लपवून काय फायदा नाही.
समीर -" आम्ही तुला सांगणारच होतो सुमन."
सुमन -" काय सांगणार होतास समीर? की तुला मेघा आवडत आहे म्हणून?"
समीर -" सुमन माझं ऐकून घे.."
सुमन -" मला काही ऐकून घ्यायचं नाहीये आणि तू मेघा.... मी तुला बेस्ट फ्रेंड समजत होते . तू तर त्या लायकीची नाहीस "
ती हे सर्व रडत म्हणत होती .
मेघा -" हे बघ सुमन. मी तुला सांगणार होते. तू समीरला वेळच देत नव्हतीस. तो सतत माझ्या जवळ यायचा. "
सुमन -" मी वेळ द्यायची नाही?? अरे मी याच्यासाठी सकाळी घरातून मी लवकर निघायचे. याच्यासाठी मी लेक्चर बंक करायचे. याच्यासाठी मी खोटं बोलून घरातून पैसे घ्यायचे. याच्यासाठी मी रात्र जागायचे आणि हा म्हणतो की मी वेळ देत नव्हते म्हणून.."
ती आता हुंदके देत रडत होती.
सुमन -" तू ना बेस्ट फ्रेंड होण्याची लायकीची आहेस आणि तू ना बॉयफ्रेंड होण्याचा लायकीचा आहेस. जा इथून... परत मला तोंड दाखवू नका. "
समीर -" अगं ऐक माझं..."
सुमन -" मी म्हणलं ना जा इथून..."
ती खूप जोरात ओरडली. आवाज घुमत होता. सगळे सुमनकडे पाहू लागले. कुशलही त्यातला होता. कुशल शेजारच्या बेडवर होता म्हणून त्याला सर्वकाही ऐकू गेलं होतं.
मेघा आणि समीर दोघांना वाईट वाटत होतं . वेळ न घालवता ते निघून गेले. सुमन मात्र रडत होती. ती शिरातून टाकलेली सुई काढली. कुशल तिलाच पाहत होता. कुशल उठला आणि सुमनकडे आला .
कुशल -" हॅलो..."
सुमन मात्र फक्त वर पाहिली. तिचे अश्रू अजूनही वाहत होते.
कुशल -" मी ऐकलं तुमचं बोलणं."
सुमन -" का?"
ती डोळे पुसत म्हणाली.
कुशल -" कारण ऐकू आलं."
तो स्मित करत म्हणाला.
कुशल -" माझी पण एक गर्लफ्रेंड होती. जॉब मधून तिला खूप वेळ द्यायचो. तिही खूप खुश होती. अचानक तिचं वागणं बदललं. ती मला टाळू लागली. कारण विचारत होतो , पण सतत भांडण होऊ लागले. एक दिवस ती एकाला घेऊन आली आणि मला म्हणाली की हा माझा बॉयफ्रेंड आहे. मी तिथे हारलो होतो. माझं ही तुमच्यासारखी हालत झाली होती. "
इतकं वेळ ऐकल्यानंतर सुमन म्हणाली.
सुमन -" मग काय केलात?"
कुशल -" तेवढ्यात माझ्या या आजाराची खबर मला झाली. मग विचार केला की एकीच्या मागे विचार करून मी उरलेलं आयुष्य का संपवू? ती माझ्या आयुष्याची निर्णय घेऊ शकत नाही. मग ठरवलं की उरलेलं आयुष्य हसत काढणार. कधीही अपेक्षा ठेवणार नाही. आपण जेंव्हा अपेक्षा ठेवतो ना , तेंव्हा आपण दुखावलो जातो. अपेक्षा ठेवायची नाही , फक्त प्रेम करत राहायचं."
तेवढयात एक नर्स आली आणि सुमनच्या हाताला सुई टोचली.
कुशल -" तुम्हाला आयुष्याने दुसरी संधी दिली आहे. आयुष्य हसण्यासाठी असतं. आपण त्याला रडत घालवतो. कधीही आपण आयुष्य हसत जगण्याचा प्रयत्नच करत नाही. जो पर्यंत आपण तो शिकून घेतो , तो पर्यंत आपलं आयुष्य संपायला आलेलं असतं. आपण कित्येक वेळा मनात द्वेष ठेवत जगत असतो. एकदा त्या लोकांना माफ करून बघ. तुलाच बरं वाटेल. त्या द्वेषाने अजून द्वेष वाढतो. आयुष्य द्वेषाने नाही , प्रेमाने जगायचं असतं. तुला नवीन आयुष्य भेटलं आहे. ते मनापासून जगून घे. "
तेवढ्यात मागून आवाज आला. मागे पाहिलं तर आई परत आलेली होती.
आई -" काय झालं सुमन?"
सुमन -" काही नाही..."
आई -" मेघा आणि समीर कुठे आहेत?"
सुमन -" ते गेले ."
आई -" अच्छा... चल आता तू जेवून घे ...."
कुशल त्याच्या बेडवर गेला. सुमन त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माइल दिली.
******************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती.