सुमन आता हॉस्पिटलमध्ये रमली होती. तिला भेटण्यासाठी खूप सारे येऊन गेले होते. कुशल ही सुमन आणि तिच्या आई सोबत रमला होता. सुमनचे मित्र मैत्रीण , तिला शिकवत असलेले शिक्षक, तिचे नातेवाईक ही येऊन भेटून गेले होते. तिला आता थोडीशी आधार भेटत होती. ती आता बरी वाटत होती.
सकाळचा वेळ होता. रोजच्या प्रमाणे कुशल मिठाई वाटून सुमनच्या बेड जवळ बसला होता. सुमनची आई घरून अजून आली नव्हती. कुशल तो पर्यंत सुमनशी गप्पा मारत होता.
कुशल -" मग आता कसं वाटतंय ?"
सुमन -" बरं वाटतंय थोडंसं."
कुशल -" थोडंसं ?"
सुमन -" हो म्हणजे अजून मला वेळ लागेल."
कुशल -" अच्छा..."
सुमन -" तुला कसं वाटतंय ? सगळे केस गेल्यावर.."
कुशलची तब्येत आता बिघडत आली होती. त्याच्या ट्रीटमेंट साठी त्याला सगळे केस काढावे लागले. तो तिचं हे ऐकून गप्प झाला .
सुमन -" सॉरी... मी सहजच बोलले."
कुशल -" नाही... काहीच हरकत नाही. "
तेवढ्यात आई नाश्ता घेऊन आली.
आई -" काय रे कुशल.. ये नाश्ता करूयात."
कुशल -" अरे मग नाही तर काय. काय आणलाय नाश्त्याला?"
कुशल जरा उत्सुकतेने म्हणाला.
आई. -" उपमा आहे, पोहे आहे . तुला काय हवंय?"
कुशल -" काहीही चालेल. "
आई दोघांना प्लेटमध्ये नाश्ता दिली. सुमन आणि कुशल दोघेही नाश्ता करु लागले. हे पाहून आईला बरं वाटतं होतं. सुमन आता बरी वाटत होती.
नाश्ता झाल्यावर आई सुमनला गोळ्या व औषध दिली. कुशल परत त्याच्या बेडवर गेला आणि झोपी गेला. " हाय." कुठूनतरी सुमनला आवाज आला. ती दाराजवळ पाहिली.
आई -" अरे ओंकार.."
ओंकार -" नमस्कार आई..."
आई -" कसा आहेस ?"
ओंकार -" मी मस्त आहे. तुम्ही बरं आहात ना? "
आई -" हो... "
ओंकार -" आणि सुमन?"
तो सुमनकडे पाहत म्हणाला.
सुमन -" मी पण छान आहे. "
ओंकार -" अच्छा ."
सगळीकडे शांतता पसरली. हे शांत वातावरण मोडीत काढण्यासाठी ओंकार म्हणाला.
ओंकार -" कॉलेजमध्ये सगळे तुला मिस करत आहेत. "
सुमन -" खरचं?"
ओंकार -" हो.."
सुमन -" सगळे तर मला भेटून गेले. तू एवढ्या उशिरा आलास."
ओंकार -" ते काय झालं. मला थोडं काम आल होतं. ते पूर्ण करण्यात व्यस्त होतो. काम पूर्ण झाल्यावर मग वेळ मिळाला आणि आलो. मग नाश्ता वैगरे नीट घेत आहेस ना ?"
सुमन -" हो .. "
ओंकार -" गोळ्या औषध ही नीट घेत आहेस ना ?"
सुमन -" हो बाबा..."
तिला जरा विचित्र वाटत होतं. तो जरा काळजीने विचारत होता. इथे आलेला प्रत्येक जण औपचारिक म्हणून विचारत होते , पण हा प्रेमाने आणि काळजीने विचारात होता.
ओंकार -" मग आता कधी येणार आहेस परत ?"
सुमन -" डॉक्टर कधी सांगितलं तेंव्हा येईन. पण अभ्यास कसा सुरू करू?"
ओंकार -" अरे हो. मी तुझ्यासाठी नोट्स आणलोय. तू गेल्यापासून तेवढं जास्त अभ्यास काही झालेला नाही. पण जेवढं झालंय तेवढं या वहीत आहे. "
तो बॅगमधून वही काढला आणि सुमनला दिला.
सुमन -" अरे ओंकार. खरचं खुप खुप थँकयु. तू खरचं खूप केला आहेस माझ्यासाठी.. आधीपासून तू मला अभ्यासात मदत केलास. पण मी तर नापास झाले. तुझी मेहनत वाया गेली ओंकार."
तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले.
ओंकार -" अगं तू रडू नकोस सुमन. मी आहे ना परत मदत करण्यासाठी.. तू फक्त बरी होऊन परत ये. मी मदतीला आहे . तू काळजी करू नकोस. मी तुला सगळं शिकवेन. "
हे ऐकून तिच्या आईलाही बरं वाटलं. तिला समाधान वाटलं की तिच्या सुमन जवळ कोणीतरी आहे. ओंकार जागेवरून उठला.
ओंकार -" चला . आता मी निघतो. कॉलेज आहे ."
आई -" अरे काही तरी खा ना."
ओंकार -" नाही नको. परत उशीर होईल. "
आई -" बरं ठीक आहे. "
ओंकार -" आणि हो सुमन. ती वही नीट पाहून घे. "
सुमन -" हो... "
ती स्मित करत म्हणाली. ओंकार ही हलकीशी स्मित करत निघाला.
--------------------------------------------------------
दुपारची निवांत वेळ होती. नेहमी प्रमाणे आई डब्बा आणण्यासाठी गेली होती. कुशल ही त्याच्या बेडवर होता. ओंकार ने दिलेली वही सुमन तपासात होती. प्रत्येक लेक्चरची नोंद त्या वहीत होती. इतक्यात तिला वहीतून एक कागद सापडला. तिने तो कागद उचलला. त्यात काहीतरी लिहिलं होतं.
' हॅलो सुमन ,
मी ओंकार बोलतोय. हो हे चिट्टी मीच लिहितोय. कारण मी समोरासमोर बोलू शकत नव्हतो. मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो. तेंव्हाच तू मला आवडली होतीस. तुझे ते सुंदर डोळे , तुझे रेशीम मोकळे सोडलेले केस , तुझे गुलाबी ओठ हे सर्व खूप सुंदर दिसतं होतं. मी तर घायाळ झालो होतो. पण हे सगळं तुला सांगू शकलो नाही.
पण मनापासून एक गोष्ट मात्र मी तुला सांगतो. मी तुला मनापासून सगळी मदत केली. कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत केली. तू जेंव्हा समीर सोबत होतीस . तेंव्हा माझं मन मरत होतं. तरीही मी तुझी साथ सोडू शकत नव्हतो. माझे डोळे तुला सतत शोधत होते. पण तू नेहमी समीरच्या मागे असायची.
त्या रात्री मी जेंव्हा तुझी हे घटना ऐकलो. तेंव्हा आतून पूर्ण तुटलो होतो. मला नंतर कळलं की तू नापास झाली होतीस. हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं. पहिल्यांदा मी रात्र भर रडलो. ते अश्रू खरे होते. तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी निघत होते. मला यातून सावरताना कित्येक दिवस गेले. प्रत्येक रात्री मी तुझ्यासाठी प्रार्थना करायचो. तुला जर काहीतरी झालं असत ना तर मी आतून मेलो असतो.
ही सगळी भावना मी तुला सांगू शकलो नाही. कारण मला ही मैत्री तोडायची नव्हती. आता हे का सांगतोय असं तुला वाटतं असेल? कारण आता मी हे सगळं मनात ठेवू शकत नाही.
मला माहिती आहे , हे सगळं ऐकून तुला राग आला असेल. कदाचित तू आता मला पाहणार ही नाही , आपली मैत्री ही तू तोडायला मागे पुढे बघणार नाही . पण तू चांगली आहेस ना ,एवढच हवंय मला. तुला कुठलीही मदत हवी असेल , तर लक्षात ठेव मी आहे अजून. तू फक्त बरी हो... मी तुझी वाट पाहीन.
तुझा होऊ पाहणारा
ओंकार '
हे सगळं वाचून सुमन निशब्द झाली होती. ती विचारात पडली. एकीकडे समीर होता ज्याच्यावर ती प्रेम करत होती आणि एकीकडे हा ओंकार होता जो हिला जिवापाड प्रेम करत होता.
ती अगदी शांत झाली होती. हे पाहून कुशालला राहवलं नाही. तो उठला. सुमन जवळ गेला आणि विचारला.
कुशल -" काय झालं ?"
सुमन -" काय नाही."
कुशल -" खरचं काही नाही?"
ती गप्प झाली.
कुशल -" सांग पाहू काय झालं."
ती सांगू लागली. ओंकार बद्दल , त्याच्या त्या चिट्टी बद्दल तिने सर्वकाही सांगितली.
कुशल -" अच्छा हे आहे तर..."
सुमन -" हो."
कुशल -" बघितलं तुझं आयुष्य कशी पलटली. तुला वाटतं होतं की तुझं कोणीच नाहीये. बघ तुझी काळजी घेणारी आई आहे , तुला प्रेम करणारे आणि काळजी घेणारे मित्रमैत्रिणी आहेत जे मी पाहिलो , तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारा पण आता सापडला आहे. तू खूप भाग्यवान आहेस सुमन. जीवन खूप सुंदर आहे . याला जगून घे. बाकी ओंकार बद्दल तुझा निर्णय तू घे. पण त्याला सोडू नकोस. तो खूप चांगला आहे."
सुमन -" हो..."
ती स्मित करत म्हणाली.
कुशल अचानक डोक्याला हात लावला. सुमनला कसं तरी वाटलं.
सुमन -" कुशल.. काय होतंय ?"
कुशल -" डोकं दुखतंय खूप..."
तो आता ओरडू लागला . सुमन घाबरली . ती मोठ्याने नर्सला बोलवली. नर्स पळतच तिथे आली. कुशलला उचलली. आणखी दोन जण येऊन त्याला स्ट्रेचरवर घेऊन गेले. तो खूप ओरडत होता. सुमनला आता काळजी वाटतं होती.
कुशलला ते डॉक्टरकडे घेऊन गेले.
********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती