कुशालला आता आय. सी . यू मध्ये हलवण्यात आलं होतं. तो आता व्हेंटिलेटर वर होता. त्याच्या मेंदूच्या गाठीमुळे पूर्ण शरीरावर परिणाम होत होता. सुमनला ही कळलं होतं. कुशल आता कधीही बोलणार नव्हता. इतक्या दिवसात तो सुमन आणि तिच्या आईसोबत रमला होता. त्याचे दिलेले शिकवण सुमनला आठवत होते. या कमी वयात तो खूप काही विचार सांगत होता. सुमन ही आता हळूहळू ठीक होत होती ,त्यात कुशलचा थोडा हातभार होता.
तिच्यात ही फरक जाणवत होता. तिच्या हातावरचे जखम ही आता बरे होत होते. डॉक्टरांना फक्त ती ठीक आहे याची खात्री हवी होती. म्हणून सुमनची काऊनसेलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिची आई त्यासाठी परवानगी दिली होती आणि सुमनला हि याबद्दल माहिती देण्यात आली होती.
जेवण आटपून नुकतीच सुमन बेडवर बसली होती. तिला आता जेवण जात नव्हतं. पण गोळ्या आणि औषध असल्याने तिला जेवण करावं लागतं होतं . काही मिनिटांनी तिचं काऊनसेलिंग होणार होतं. काऊनसेलिंग करणारे डॉक्टर महेश सुमनची मानसिक स्थिती तपासणार होते. त्यांच्या परवानगीने डॉक्टर तिला घरी सोडणार होते.
आई -" सुमन.... चल आता काऊनसेलिंगची वेळ झाली आहे."
सुमन -" हो..."
असं म्हणत ती बेडवरून खाली उतरली.
आई -" हे बघ नेहमीचे डॉक्टर असतात ना , ती केबिन सोडून दुसरी केबिनमध्ये जा. तिथे डॉक्टर महेश असतील. ते तुझे काऊनसेलिंग करणार आहेत ."
सुमन -" तू नाही येणार का? "
आई -" मी तुला कशी एकटी सोडू सुमन. पण डॉक्टर सांगितले की काऊनसेलिंगमध्ये तुला एकटीला जावं लागणार."
सुमन -" बर.. "
असं म्हणत ती केबिनच्या दिशेने चालू लागली.
केबिनच्या बाहेर पोहचताच तिने दार वाजवली.
सुमन -" मे आय कम इन?"
खुर्चीवर बसलेले डॉक्टर महेश म्हणाले.
महेश -" या ... "
सुमन केबिनच्या आत गेली आणि त्यांच्यापुढे उभी झाली.
महेश -" नाव सांगा तुमचं.."
सुमन -" माझं नाव सुमन आहे. "
महेश -" बरं बस."
ती समोरच्या खुर्चीवर बसली. डॉक्टर महेश हे सुमनच्या निगडित असलेली फाईल पाहत होते. त्यात सगळं काही नोंदवलेल होतं. त्या केबिनमध्ये खुपकाही होतं. सकारात्मक ऊर्जा देणारे कित्येक पोस्टर तिथे होते. त्या पोस्टरवर काही वाक्य खरोखर ऊर्जा निर्माण करणारे होते. हे निरखून पाहत असताना डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केले.
महेश -" सुमन... बरं मला सांग तुझं लहानपण कसं गेलं? म्हणजे अगदी थोडक्यात सांग."
सुमन -" आई बाबांची मी ऐकलुती एक लेक. आई म्हणत होती की मी जन्माला यावं यासाठी ती खूप नवस केली होती. सुरुवातीचे काही वर्ष मला आठवत नाही. पण अवघ्या १० वर्षाची असताना माझे वडील वारले. "
महेश -" कसे वारले?"
सुमन -" त्यांचा अपघात झाला होता. "
महेश -" बरं. पुढे काय झालं?"
सुमन -" त्यानंतर माझी आईच सगळी कामे करू लागली. "
महेश -" वडील वारल्यानंतर तुझे शाळेचे दिवस कसे होते?"
सुमन -" वडील वारल्यानंतर मला सावरायला खूप वेळ लागला. कधीच मला एवढी पोकळी वाटली नव्हती. मित्र - मैत्रिणी होते. पण ते फक्त शाळे पुरतेच होते. घरी आल्या नंतर एकटं वाटायचं. मला फक्त आई सावरायची. पण नंतर तिही कामाला लागायची."
महेश -" त्याच परिणाम तुझ्या टक्केवारीत झाली का ?"
सुमन -" पहिले दोन वर्ष मला कमी टक्के पडले. पण नंतर मी सावरले. "
महेश -" त्यानंतर तू कॉलेजला गेलीस. काही फरक जाणवला का?"
सुमन -" हो म्हणजे. नवीन मित्र मैत्रीण झाले. त्यांचा सहवास लाभला. त्यानंतर अभ्यास ही होत होता. "
महेश -" सगळं काही चांगलं होतं , तर तू आत्महत्येचा प्रयत्न का केलीस?"
हे ऐकून सुमन शांत झाली.
महेश -" हे बघ सुमन. तु मला सर्वकाही सांगू शकतेस. मी कुणाला काही सांगणार नाही. तुझ्या आईला ही मी सांगणार नाही. आपलं बोलणं हे या केबिनमधून बाहेर जाणार नाही. "
हे ऐकून सुमनला बरं वाटलं. ती सांगू लागली.
सुमन -" माझा बॉयफ्रेंड आणि माझी मैत्रीण मला धोका देत होते. "
महेश -" म्हणजे?"
सुमन -" म्हणजे मी एकाला प्रेम करत होते. माझं सगळं वेळ त्याला देण्याचा प्रयत्न करत होते .पण तो मात्र माझ्याच मैत्रिणी बरोबर फिरू लागला. मला नंतर कळलं की हे सगळं चालू आहे. तरीही मी गप्प होते. त्यात परीक्षा आली. परीक्षेच्या वेळी मी खूप डीप्रेशन मध्ये होते. कशी बशी परीक्षा दिले. जेंव्हा मी नापास झाले. तेंव्हा मी खूप ब्लँक झाले. तेंव्हा मला वाटतं होतं की माझं काहीच होणार नाही. जगून काही उपयोग नाही. म्हणून हा पाऊल उचलले."
महेश -" आता ते सर्व आठवलं तर काय वाटतं?"
सुमन -" आता वाटतंय की तेंव्हा मी कुणाशी तरी बोलायला हवी होती. पण मी त्या विचारात नव्हते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला बरं वाटलं. इथे कुशल भेटला. "
महेश -" कुशल म्हणजे तोच ना , ज्याला ब्रेन ट्युमर झालंय ."
सुमन -" हो तोच. तो मला वेळोवेळी चांगली शिकवण सांगू लागला. त्याच्यामुळेच मला माझ्या आयुष्याची किंमत कळाली. तोच होता जो मला माफ करण्याची शिकवण शिकवला. त्यामुळेच मी माझ्या त्या एक्स बॉयफ्रेंड आणि मैत्रिणीला माफ करू शकले. त्याच्या मुळेच मी आयुष्याला नव्या नजरेने पाहू लागले. मला ते सगळे दिसले जे माझ्यावर प्रेम करत होते. पण दुर्दैव हे आहे की तोच आयुष्य हारत आहे. "
महेश -" खरंय. ज्याच्याकडे जे गोष्ट नाहीये त्यालाच त्या गोष्टीची किंमत कळते. त्याच्याकडे आयुष्य कमी होतं , म्हणूनच तुला आयुष्याची किंमत सांगून गेला."
सुमन -" खरं आहे. "
महेश -" मग मला सांग. हॉस्पिटलमधून गेल्यानंतर काय करशील?"
सुमन -" सर्वात आधी कॉलेजची सगळी तयारी करेन . त्या सर्वांना भेटेन , जे मला धीर देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. मग आईला मदत करेन. माझ्या हातून जे काय होऊ शकेल ते करीन. माझ्या आईला आता मी जास्त त्रास देणार नाहीये. "
महेश -" मग परीक्षेबद्दल काय करशील ?"
सुमन -" अभ्यास करेन. मेहनत घेईन. आता परत आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही. "
महेश -" मला हेच ऐकायचं होतं."
सुमन -" पण एक मात्र आहे. "
महेश -" काय ?"
सुमन -" कुशल ची चिंता वाटतं आहे."
महेश -" हे बघ सुमन. तुला मी एक सांगतो.वाईट वाटून घेऊ नकोस. कुशल चांगला आहे . तो सर्वांना मदत करत होता. पण त्याच्याजवळ खूप कमी वेळ आहे. त्याला जर काही झालं , तू परत त्या तुझ्या आधीच्या विचारात हरवू नकोस. "
सुमन -" हो."
महेश -" ठीक आहे."
असं म्हणत महेशनी एका कागदावर सही केला आणि म्हणाला.
महेश -" तू आता जाऊ शकतेस आणि उद्या तू घरी जाऊ शकतेस."
सुमन -" थेंक यू डॉक्टर. "
ती जागेवरून उठली आणि केबिनच्या बाहेर आली. ती तिच्या बेड जवळ आली. तिथे तिची आई खाली मान करून बसली होती. सुमनला जरा विचित्र वाटलं.
सुमन -" काय झालं आई ?"
आई जराशी गप्प होती.
सुमन -"काय झालं आई?"
ती परत विचारली. ती खाली बसत म्हणाली.
आई -" सुमन... कुशल हे जग सोडून गेला ."
सुमन -" काय???"
सुमनला धक्का बसला. ती खाली बसली. तिच्या डोळ्यातून न कळत अश्रू निघाले.
*******************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती