Login

पुनः श्रीगणेशा

For My Dear Readers


पुन्हा श्रीगणेशा.....

माझ्या सर्व वाचकांना सप्रेम नमस्कार ,
दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...!!! नाव वाचून आणि फोटो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की तुमच्या आवडत्या दोन्ही कथा पुन्हा तुमच्या भेटीला येत आहेत. खरंतर मी 1 ऑक्टोबर पासून पुन्हा भाग पोस्ट करणार होते पण ते शक्य नाही झालं... हॉस्पिटलच्या वाऱ्या चालू आहेत सध्या त्यामुळे मन आणि डोकं दोन्हीही थाऱ्यावर नव्हतं. अशा परिस्थितीत लिहिणं म्हणजे कुठुन तरी ती कथा माथी मारणं असं झालं असतं. अजूनही परिस्थिती पूर्णतः ठीक नाही पण थोडी स्थिर आहे. त्यामुळे उगीच जास्त ताणून न धरता तू तर चाफेकळी आणि बंध रेशमाचे पर्व 2 चे भाग तुम्हाला वाचायला उद्यापासून पोस्ट करत आहे. कधी काय इमर्जन्सी येईल हे सांगता येणार नाही तरीही मी शक्य होईल तितक्या वेळेत दोन्ही कथांचे भाग पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. त्यातूनही वेळ गेला तरी कथा पूर्ण करणार हे नक्की. या मधल्या काळात पण खूप जणांनी मेसेंजर वरती मेसेज केला होता कथा कधी पोस्ट करताय...?? इतक्या नवीन कथा सुरू असताना देखील तुम्ही माझ्या कथा किंबहुना मला लक्षात ठेवताय यासारखं सुख नाही माझ्यासाठी...!! सगळ्यांना खूप खूप थंक्यु...!! असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असुदेत... !!!