पात्र रचना
अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
निकीता चटणीस नितीन ची बायको
शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
रघुवीर अͪवनाश चा ड्रायव्हर
पंडित नितीन चा ड्रायव्हर
वाटवे मॅडम चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
अंजिकर सर चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
साखळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
पांडे सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
बबन चपराशी
चोरघडे सर चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
वाघूळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
चिंतामण चिटणीस अविनाश चिटणीसांचा भाऊ
विमल चिंतामण चिटणीसांची बायको
निखिल चिंतामण चिटणीसांचा मुलगा
शशांक दामले चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
पाटील पोलिस इंस्पेक्टर
परब सब इंस्पेक्टर
गवळी कॉन्स्टेबल
मळेकर पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )
भाग १३
भाग १२ वरून पुढे वाचा ...........
शशिकला चिटणीस
पाटील साहेब, वाघ जसा शिकार करायच्या अगोदर त्याच्या सावजाकडे नजर न हलवता एक टक पहातो, तश्या भेदक पण स्थिर नजरेने निकिता कडे पहात होते. फक्त झडप घालायची योग्य वेळ शोधत होते.
निकिता बोल आता. खेळ संपला आहे तुझा. तुझ्याच तोंडून ऐकायच आहे.
काय ऐकायच आहे.
स्वत:ला निर्दोष शाबीत करण्यासाठी तिकडे दूर नर्मदा परिक्रमेला जावून इकडे बबन च्या हस्ते कार्यभाग उरकलास. बबनने आम्हाला सगळ सांगितल आहे. आता तुझी पाळी. निकिता आता पूर्ण सावरली होती. चेहऱ्यावर करारी पणाची झलक होती. शांत होती, संतापाचा मागमूस पण नव्हता. ती कोसळणार नाही हे पाहून मला हायस वाटल.
बबन आलाय का तुमच्या बरोबर ? मला त्याच्याशी बोलायच आहे.
No. That is not permitted. तो आता कोणाशी बोलणार नाही. आता फक्त तूच बोलायच.
मी विचार करत होते की हा काय प्रकार आहे बबन अस काही बोलण शक्यच नाही. त्याला धाक दपटशा दाखवून तर अस बोलायला भाग पाडल नसेल, बाहेर जाऊन बबन शी बोलाव म्हणजे हे साहेब खरं बोलताहेत की खोट ते कळेल. दामल्यांना टाटा करून येते अस म्हणाव.
साहेब बाहेर माणस बसली आहेत त्यांना बाय बाय करून येते. हा तमाशा त्यांच्या समोर नको.
नाही कोण माणस आहेत ती त्यांना आतच बोलवा. मला त्यांच्याशी पण बोलायच आहे. राधाबाई बोलवा त्यांना.
दामले आत आले म्हणाले. साहेब आम्ही जात नाही बाहेरच थांबतो. तुमच यांच्याशी बोलण होऊन जाऊ द्या. मग आम्ही आहोतच. बबन शी बोलण्याचा मार्ग बंद झाला. आता नुसतं बघायचं काय होते ते. मला निकिताची काळजी वाटत होती. हा प्रसंग ती कसा निभाऊन नेते हे आता सर्वस्वी तिच्यावरच अवलंबून होतं.
हं निकिता आता बबनशी बोलता येणार नाही. आता तूच बोलायच. आमचा वेळ वाया घालवू नकोस. बोल आता.
तुमची खात्री आहे की हा सगळा प्लॅन माझाच आहे म्हणून ? की फक्त संशयच आहे.
तू आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत. ते काम आमच आहे. विचारलेल्या प्रश्नांची तू फक्त उत्तरं दे. उलट प्रश्न विचारू नकोस. परिणाम चांगला होणार नाही. तू कबुली जबाब दे. म्हणजे तुला पुढे त्रास होणार नाही.
ही सूचना आहे की धमकी ?
पुन्हा प्रश्न. तू काय वाटेल ते समज.
मी निकिता कडे बघितल. तीला आता परिस्थितीची कल्पना आली असावी. ती सारसावून बसली. म्हणाली
ठीक आहे. काय विचारायच ते विचारा. मी चौकशीत संपूर्ण सहकार्य करीन कारण माझ्या पतीला मारणारा गुन्हेगार लवकरात लवकर मिळाला तर मला पण हवाच आहे.
हं बोल आता.
मी काय बोलणार. तुम्ही प्रश्न विचारा मी माझ्या माहिती नुसार उत्तर देते.
हे दोन्ही खून कसे प्लॅन केले ते सांग.
मी काहीच केल नाही त्यामुळे प्लॅनिंग काय होत ते मला माहीत नाही.
आमची खात्री आहे की हे तूच केल आहे आणि कसं केल हेही आम्हाला माहीत आहे. पण तू सांग.
एखाद्या गोष्टीची ज्याला माहिती आहे तोच सांगू शकेल तेंव्हा तुम्हीच सांगा कारण तुम्हालाच डीटेल माहिती आहे.
आमच्याकडे तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्डस आहेत. त्यात तू तुझ्या काही खास मित्र मैत्रिणींबरोबर सतत संपर्कात असतेस अस दिसतंय.
हो बरोबर आहे. ती लोक माझ्या अतिशय जवळचे आहेत.
पण त्यांच्यातही एक जरा जास्त जवळचा आहे. कार्तिक बद्दल बोलतोय.
हो बरोबर आहे. कार्तिक माझा जवळचा मित्र आहे, गुरु आहे. मी सतत त्याचा सल्ला घेत असते.
परवा साकाळी सुद्धा तुमच बोलण झालं जवळ जवळ अर्धा तास तुमचं बोलण चालू होत. काय कारण आहे.
आत्ताच तुम्हाला सांगितलं की तो माझा गुरु आहे आणि जेंव्हा माणूस अडचणीत असतो तेंव्हा जवळच्या माणसाचा सल्ला घेणं हे साहजिकच आहे न.
किती जवळचा आहे कार्तिक ?
मी काय बोलू ? तो माझा मित्र आहे. close friend.
Friend आहे की boyfriend ?
तुम्हाला जे अपेक्षित आहे तसं काहीही नाहीये. साधी पण जवळची मैत्री आहे.
तो अमेरिकेत आणि तु इथे तुमच्यात नेहमी फोन वर बोलणं होत. पण नेहमी तुच का फोन करते ? तो का नाही ?
साहेब सल्ले मला हवे असतात, त्याला नव्हे. आणि त्याला फोन करायला परवडत नाही. त्याची नोकरी आहे.
आणि तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. आणि तो पूर्णपणे तुमच्या हातात यावा म्हणून सगळ प्लॅनिंग चालू आहे. बरोबर ना ?
माझ्यावर इथे कसलीच बंधन नाहीयेत. त्यामुळे अस काही करण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही.
इंस्पेक्टर साहेबांचं काही समाधान होत नव्हतं. ते मला म्हणाले
शशिकलाबाई तुम्हाला हिच्या या बॉयफ्रेंड बद्दल माहीती आहे ?
हो. आम्हाला सगळ माहीत आहे. आणि तो फक्त फ्रेंड आहे बॉयफ्रेंड नाही.
शशिकलाबाई, तुम्हाला कल्पना नसेल, पण आमच्या माहिती नुसार ही ज्या ज्या वेळेस औरंगाबादला गेली त्या त्या वेळेस कार्तिकशी बारीक सारिक गोष्टींवर चर्चा करून फूल प्रूफ प्लॅन बनवला. आणि शेवटाला नेला. पहिला बळी अविनाश राव आणि आता नितीन, सगळं कसं योजनाबद्ध रीतीने पार पाडलं आहे या दोघांनी. सगळी आखणी झाल्यावर कार्तिक अमेरिकेला गेला. म्हणजे कुठूनही काहीही लीक व्हायला नको. काय निकिता बरोबर आहे ना. ? तो केमिस्ट्रि चा लेक्चरर होता. त्यामुळे लॅब मधून काही chemicals काढून घेण त्याला सहज शक्य होत. या बद्दल आमची चौकशी चालूच आहे. खरं काय ते समोर येईलच. पण त्या अगोदर निकीता, तू जर कबूल केलस तर तुलाच त्रास कमी होईल.
मला काहीच माहिती नाहीये आणि कशाची कल्पना पण नाहीये त्यामुळे मी काय
कबूल करणार ? सॉरी.
बर.मला सांग हा कार्तिक अमेरिकेत आहे म्हणतेस तर तो तिथे करतो तरी काय ?
तो एक मोठ्या कंपनी मध्ये रिसर्च असिस्टेंट म्हणून नोकरीला आहे.
ऑफिस जॉब आहे ?
नाही. साहेब तो रिसर्च असिस्टेंट आहे. त्याचं काम लॅब मध्ये असतं.
फाइन. कसली लॅब आहे ?
माहीत नाही. कधी विचारलं नाही.
आश्चर्य आहे. इतका जवळचा मित्र आणि काय काम करतो, कोणची कंपनी आहे हे माहीत नाही ? surprising.
मी कधी विचारलं नाही आणि त्यांनी सांगितलं नाही.
ओके कसली लॅब आहे ? केमिकल ची की फिज़िक्स ची की धातू विषयक की फार्मा ? की आणखी वेगळच काही.
माहीत नाही. पण त्यांनी केंव्हातरी एकदा त्यांच्या लॅब बद्दल BSL- 4 असा उल्लेख केला होता.
BSL- 4 असाच उल्लेख केला होता ?
हो
या प्रकारच्या लॅब बद्दल तुला काय माहिती आहे ? म्हणजे नेमकां कशावर रिसर्च चालतो तिथे ?
मला काहीच कल्पना नाही.
एवढी हुशार मुलगी, आणि रसायंशास्त्राची पदवीधर, आणि BSL- 4 लॅब माहीत नाही ?
नाही हा शब्दच मी प्रथम ऐकला.
तुला माहीत नसेल तर मी सांगतो. या प्रकारच्या लॅब मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या poisons किंवा अतिशय खतरनाक virus बद्दल संशोधन चालत. हे सगळं इतकं भयानक असतं की माणूस चुकून जरी संपर्कात आला तर एक मिनिटही पुरतं मृत्यू व्हायला. अमेरिकेच्या पोलिसांना कळवून त्याची चौकशी करावी लागणार आहे. निकिता आता तर तू पुरती अडकलीस. आता तरी तुझे प्लॅन्स सांगून टाक. कबुली दिलीस तर शिक्षा थोडी कमी होईल.
मी कसलाही प्लॅन केला नाही. कबुली कुठून देणार. तुम्ही मला यात उगाच अडकवण्याचा डाव रचता आहात तो मी सफल होऊ देणार नाही.
बर. मी सांगतो. शशिकलाबाई, तुमच्या सुनेचा प्लॅन असा आहे की नितीन च्या मृत्यू नंतर कार्तिक ला बोलावून घ्यायच आणि त्याच्या बरोबर लग्न करून सगळी कंपनी हातात घ्यायची. असा प्लॅन आहे. शशी मॅडम सांभाळा, कदाचित आता नितीन च्या नंतर तुमचा पण नंबर लागू शकतो.
निकिता तुला पोलिस कोठडी म्हणजे काय असत यांची जाणीव नाही म्हणून तू अस बोलते आहेस. तिथे गेल्यावर भल्या भल्यांच् अवसान गळत. आज मी तुझ्याच घरी शांत पणे विचारतो आहे. तिथे भकास खोली असते, चार चार जण असतात प्रश्नांच्या फैरी झाडल्या जातात आणि बाजूला दणकट स्त्री पोलिस पण असतात. तेंव्हा तूच विचार कर.
या वेळेस निकिता थोडी भांबावल्यासारखी वाटली. थोडी गप्प होती. काय उत्तर द्याव यांचा विचार करत होती. पाटलांचा संयम सुटत चाला होता. जमिनीवर काठी आपटत होते. म्हणाले.
ओके एवढ सांगूनही इथे बोलायच नसेल आणि तुझी इच्छा तशीच असेल तर आपण लॉकअप मध्येच बोलू. राधाबाई, बाहेरच्या मंडळींना आत बोलवा.
दामले आत आले पाठोपाठ देशपांडे पण आले. मला वाटल ते आता निघतो अस सांगायला आले असावेत. मी म्हंटल निघाले का ? अहो या सगळ्या प्रकारामुळे तुमची साधी विचारपुस पण करता आली नाही. सॉरी हं माफ करा.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.