पात्र रचना
अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
निकीता चटणीस नितीन ची बायको
शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
रघुवीर अͪवनाश चा ड्रायव्हर
पंडित नितीन चा ड्रायव्हर
वाटवे मॅडम चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
अंजिकर सर चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
साखळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
पांडे सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
बबन चपराशी
चोरघडे सर चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
वाघूळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
चिंतामण चिटणीस अविनाश चिटणीसांचा भाऊ
विमल चिंतामण चिटणीसांची बायको
निखिल चिंतामण चिटणीसांचा मुलगा
शशांक दामले चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
पाटील पोलिस इंस्पेक्टर
परब सब इंस्पेक्टर
गवळी कॉन्स्टेबल
मळेकर पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )
भाग १८
भाग १७ वरून पुढे वाचा .........
निकिता
काल जे काही झाल ते अचानकच झाल पण एक गोष्ट जाणवली. की शशांकशी मला जवळीक हवी आहे. त्याचा सहवास हवा हवासा वाटतोय. आणि हे पण त्यांच्या स्पर्शा वरूनच कळत होत की त्याला पण मी आवडते आहे. तो जेंव्हा डोक्यावरून हात फिरवत होता तेंव्हा एक मोरपिस फिरताय अस वाटत होत आणि सुखाची चाहूल लागली होती. मी डोळे मिटून घेतले होते. सुखच सुख, तो काय बोलतो आहे याकडे लक्षच नव्हत.
नंतर आमच्यामधे जो संवाद झाला त्यावरून तर स्पष्टच झाल की तो माझ्यात पूर्ण गुरफटला आहे. नंतर तर मला त्याला चिडवण्यात गंमत वाटायला लागली. तो अवघडला होता, कळत होत पण बोलण्याची हिम्मत होत नव्हती त्याला. आता त्याला बोलत करायला पाहिजे. मलाच पुढाकार घ्या लागणार आहे अस दिसतंय. बघू.
रात्री नेहमीच्या शिरसत्याप्रमाणे चर्चे दरम्यान मी आईंना म्हंटल की सारंग च्या estimate मध्ये बरीच कपात आहे. म्हणजे आपल्याला अजून खर्च करायला स्कोप दिसतो आहे.
आता आणिक काय तुझ्या डोक्यात शिजत आहे ? बोलून टाक.
मला वाटत की घरच्या बाईच विश्वच किचन मध्ये बांधल्या गेल असत. म्हणून जर आपण किचन मध्ये सर्व सोयी करून दिल्या तर त्या बाईला खूप आनंद होईल आणि पर्यायाने कुटुंब आनंदात राहील.
म्हणजे मोडूलर किचन, चिमणी, जास्तीची कपाट वगैरे ?
हो bedroom wardrobe आणि fans lights सुद्धा. आणि safety door
डन अजून ?
त्यांच्या वरच्या लेवल ला वॉशिंग मशीन, फ्रीज, गॅस कूकिंग रेंज, टीव्ही वगैरे.
डन.
आणि त्यांच्या वरच्या level ला AC आणि dishwasher आणि पूर्ण घर fully furnished.
डन.
आई अस कस ? सर्वच गोष्टींना डन म्हणताय. ?
अग मग काय म्हणू. तुझी इच्छा आहे ना मग हो नाही चा प्रश्न येतोच कुठे ? तू न एक अजब मुलगी आहेस. एवढी संपत्ति तीही विनासायास मिळालेली तू लोकांवर लुटवते आहेस मला तर नवलच वाटतंय. अभिमानही वाटतोय.
आई पैसा पैसा करून काय करायच ? आपल्या दोघींचे नवरे गेले. पैसा असूनही आपण काहीच करू शकलो नाही. मग निदान लोकांचे आशीर्वाद तर घ्यावे. पैसा सत्कारणी तरी लागेल.
खरंय तुझ म्हणण. म्हणूनच म्हणते go ahed. हम तुमहारे साथ है.
आईंची कमाल आहे त्या कशालाच विरोध करत नाहीयेत. म्हणजे त्यांना पण माझ्या कल्पना पटताहेत. मग आजवर कश्या काही बोलल्या नाही ते ?
आई हे सगळ तुमच्याही मनात होत तर आजवर कधी बोलल्या नाहीत
ते ?
हे तू मला विचारू नकोस. सर्वच दिवस सारखे नसतात. तुझे आणि माझे विचार जुळतात हेच खरं. नाही तर एवढा पैसा काहीही कष्ट न करता मिळाल्यावर लोकांची बुद्धी आस्मानात जाते. अहंकार प्रचंड वाढून जातो. सगळे आपले नोकर आहेत अस वाटायला लागत. सगळे दुर्गुण जमा होतात. तू तशी नाहीयेस केवढ भाग्य आहे माझ. तुझे माझे विचार जुळताहेत त्या मुळे मलाच फार आनंद झाला आहे. you are on the right track nikita.
का कोण काणे पण मला अस वाटल की त्यांच्या जीवनातला एक कोपरा माझ्यापासून त्यांनी आत्ता लपवला, असो योग्य वेळ आल्यावर सांगतीलच.
दुसऱ्या दिवशी सारंग आणि देसाई आलेत. देसाई येणार हे मला माहीत नव्हत. मी शशांक ला विचारल तर तो ही माहीत नाही म्हणाला. मीटिंग आईंच्या साठी होती म्हणजे आईच बोलणार होत्या. आम्हाला विचारल तरच आम्ही बोलणार. त्यामुळे आम्ही गप्पच होतो.
नमस्कार आम्ही वेळेत आलो ना ?
हो हो आई म्हणाल्या.
मला अस वाटल की देसाई पण बरोबर मीटिंग मध्ये असले तर बर होईल म्हणून त्यांना पण घेऊन आलो.
मीटिंग बऱ्याच वेळ चालली. आईंनी माझे सर्व मुद्दे त्यांना सांगितले. त्यांनीही ते लिहून घेतले. म्हणाले की
एवढ्या सामानाची जागेची सोय करण्यासाठी एरिया थोडा थोडा वाढवावा
लागेल. चालेल का ?
हो हो चालेल कारण एवढ सगळ करायच आणि हिंडा फिरायला अडचण करायची हे काही बरोबर नाही. बर जमिनीच काम पण तुम्हालाच करायच आहे. त्यांची काय पोजिशन आहे त्या माणसाशी बोलण झाल का ?
हो मॅडम preliminary बोलून झाल आहे. तो तयार आहे. एकरी एक कोटी म्हणतो आहे negotiate करून बघूया किती उतरतो ते.
ते बघा पण जमीन हातची जाऊ देऊ नका. बर इमारती कशा होणार काही सांगू शकता का ?
5 मजली बिल्डिंग करू एका माजल्यावर 4 फ्लॅट्स अश्या 5 इमारती. आता पार्किंग ची व्यवस्था वेगळी करावी लागणार कारण एका बिल्डिंग च्या खाली 20 गाड्या मावणार नाहीत.
ओके. आता मी काय सांगते ते नीट ऐका. माझ्या दृष्टीने हे महत्वाच आहे. इमारती 5 माजल्यांच्याच बांधा पण फाऊंडेशन 11 मजल्यांच घ्या. म्हणजे जर आपली स्ट्रेन्थ वाढली तर मजले चढवता येतील.
दुसरी गोष्ट बिल्डिंग ची एक भिंत मोकळी ठेवा. म्हणजे त्या भिंतीवर खिडक्या नकोत. त्या भिंतीची बाजू सूर्याकडची असली पाहिजे त्यावर पूर्ण solar panels बसवा.
जितक्या गाड्या estimated आहेत तेवढ multi floor पार्किंग बनवा. आणि पार्किंग च्या सूर्याच्या बाजूने panels लावा. इमारती आणि पार्किंगच्या गच्ची वर पण panels लावायचे आहेत. कॉलनी मध्ये ज्या ज्या इमारती बांधाल त्या त्या सर्व ठिकाणी जिथे शक्य तिथे panels लावा. मेन गेट पासून बिल्डिंग पर्यन्त जो अप्रोच रोड असेल तो डबल लेन चा करा. आणि वरुन पूर्ण cover करा. म्हणजे कोणालाही उन्हाचा, पावसाचा त्रास होणार नाही. या कवर वर सुद्धा solar panels लावा. बाकी नेहमीच तुमच जे काही असत ते करा.
सगळे मंत्र मुग्ध. आईंच हे रूप मी प्रथमच पाहत होते. आयडियाज एकदम क्लियर.
थोडा वेळ तसंच गेला. मग देसाईच बोलले.
मॅडम तुम्ही ग्रेट आहात. मी तुम्हाला सलाम करतो. पण मॅडम एवढ करायच म्हणजे बराच खर्च येईल.
येऊ द्या. नो प्रॉब्लेम. हे सर्व करायच आहे. शशांक दामले तुमच्याशी coordinate करतील. आता फायनल झाल आहे तेंव्हा वेळ न घालवता सुरवात करा. आपल्याला हे लवकरात लवकर पूर्ण करायच आहे.
मीटिंग संपली. मी आणि शशांक माझ्या केबिन मध्ये गेलो.
आईंना कस काय सुचत सगळ देव जाणे.
अग म्हणूनच त्या बॉस आहेत.
पण निकिता हे सगळ करता करता तुमच्या सेविंग्स ची वाट लागणार आहे.
काय करतोस पैसे साठवून ? माणसं महत्वाची. relationship महत्वाची. मला नाती जपायला आवडतात. तुझ् तसं नाहीये तुला माणसं आवडत नाहीत.
हे तू काय बोलते आहेस ? मला माणसं आवडत नाहीत ? हा आरोप आहे बिन बुडाचा.
मग तू माझ्याशी फटकून वागतोस. यांची संगती कशी लावायची ?
निकिता This is too much. उगाच काहीतरी बोलू नकोस.
मग माझ्या प्रश्नाच उत्तर दिल नाहीस ते.
हरदासाची कथा मूळपदावर. बोल कुठला प्रश्न ?
जाऊ दे मला बोलायचच नाही. मी मान फिरवली.
निकिता तुला खरं उत्तर हवय ? आणि तेही आत्ताच ?
होय.
आणि जर ते तुला आवडल नाही तर ?
मग मी तसं सांगीन त्याच्यात काय ?
ओके. तुझ्या सारखी असेल तर चालेल. किंवा अस म्हणूया की तूच करतेस का माझ्याशी लग्न ?
किती दिवस या प्रश्नांची मी वाट पाहात होते. कशी बशी हिम्मत करून बोलला. पण बोलला हे खरं.
किती रुक्ष आहेस रे तू. अरे लग्नाची मागणी अशी घालतात ?
ते जावू दे. आता तुझी पाळी आहे उत्तर देण्याची.
मी त्यांच्या जवळ गेली आणि डोळ्यात डोळे घालून विचारल
तुला काय वाटत. ? आणि तो विरघळूनच गेला. आणि त्यांच्याबरोबर मी पण.
प्रोजेक्ट ची काम संपता संपायची नाहीत. दोन वर्ष कशी निघून गेलीत कळल पण नाही.
एक दिवस शशांक म्हणाला
निकिता तू आईंशी बोललीस ?
नाही हिम्मतच होत नाही. तू बोललास ?
आई रोज हा विषय काढते पण तू बोलल्याशिवाय मी कसा बोलणार ? पण आता वेळ निघून जायच्या आत तुला बोलायला हवं. अस किती दिवस चालणार ?
त्या दिवशी रात्री आईंनीच विषयाला वाचा फोडली.
निकिता तू भविष्याचा काही विचार केला आहेस का ? अशी किती दिवस राहणार आहेस ?
म्हणजे काय आई ?
तुला शशांक आवडतो हे माझ्या लक्षात आल आहे. त्यांच्या कडून जर होकार असेल तर त्यांच्या आई वडिलांशी बोलू का ?
तुम्हाला चालेल ?
न चालायला काय झाल चांगलाच मुलगा आहे. सर्वच दृष्टिनी तुला अनुरूप आहे मग प्रश्न येतो कुठे. पण त्यांच्या आई वडिलांना हे पसंत पडेल का हाच प्रश्न आहे. पण काही असल तरी बोलाव तर लागणारच. तू शशांक ला विचारलस का ? त्यांची तयारी असेल तर पुढे जाऊ.
त्यांची तयारी आहे. माझीच हिम्मत होत नव्हती तुम्हाला विचारायची.
ठीक आहे शशांकला फोन करून कळव आणि उद्या केंव्हा भेटायला येऊ अस विचार.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता भेटायच ठरल. शशांक म्हणाला की त्यानी सर्व कल्पना त्यांच्या आई बाबांना दिली आणि त्यांची काही हरकत नाही अस ते म्हणाले.
दुसऱ्या दिवशी आम्ही जरा लवकरच घरी गेलो. आणि तयार होऊन ४ च्या ठोक्याला त्यांच्या घरी पोचलो. आणि आश्चर्याचा धक्काच बसला. समोर दामले काका आणि काकू स्वागताला उभे होते.
दोन महिन्यातच आमच लग्न झाल. निकिता चिटणीस ची निकिता दामले झाले.
वर्षभरातच प्रोजेक्ट जवळ जवळ पूर्ण झाल. आता शशांक आणि मी दोघंही ऑफिस मध्येच बसंत होतो. शशांकनी नितीनची जागा घेतली होती आणि कंपनी उत्तम प्रकारे सांभाळत होता. आईंनी त्यांच्या शेअर्स पैकी फक्त ५ टक्के स्वत: कडे ठेऊन बाकी ४० टक्के शशांक ला दिले. लग्नाची भेट म्हणून. सगळ कसं छान सुरळीत झाल होत. जीवन पुन्हा ट्रॅक वर आल होत.
इंस्पेक्टर मळेकर
नको असलेल्या बातम्या नेहमी संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळेसच का येतात हे एक कोडच आहे. त्या दिवशी पण तसंच झाल. एका माणसाचा रस्त्यावरच मृत्यू झाला होता. आम्ही लगेच घटनास्थळी. आमचा एक शिपाई तिथे गर्दीला कंट्रोल करत होता. आम्हाला पाहून त्यांनी गर्दीला हटवायला सुरवात केली. मयत माणूस कचरा वेचणारा दिसत होता. त्यांच्या जवळ पडलेल्या पोत्यांवरून ते कळत होत. तपासतांना अस दिसल की त्यांच्या शर्टाच्या खिशात injection ची syringe होती आणि सुई छातीत घुसली होती. आता काय समजायच अपघात की हत्या. शेवटी आकामिक मृत्यू म्हणून नोंद करायला सांगितल आणि बॉडी पोस्ट माऱ्टेमला पाठवून दिली. सहकाऱ्यांना सांगितल की आजू बाजूला आणि इतर कचरे वेचणाऱ्यांना हा फोटो दाखवा आणि बघा यांची ओळख पटते का.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यन्त मयताची ओळख पटली होती. तो कचरा वेचणाराच होता आणि त्यांच्या झोपडीत त्यांची लहान मुलगी, जेमतेम ७ , ८ वर्षांची असेल ती एकटीच होती. आईचा पत्ताच नव्हता. तिला बाल सुधार गृहात पोचवल. आणि झोपडीची कसून झडती घ्यायला सांगितली. काही धागा दोरा मिळाला बघा.
६ दिवसांनी रीपोर्ट आला. मृत्यूच कारण विषबाधा अस दिल होत पण ती हत्या नव्हती. सिरींज खिशात घेऊन चालला असतांना बहुधा ठेच लागून पडला असावा आणि छातीत सुई घुसली. असा रीपोर्ट मिळाला. आता प्रश्न उभा राहिला की इंजेक्शन का गोळा केल या माणसांनी, ते विषारी आहे हे त्याला माहीत असण्याची शक्यताच नव्हती. कदाचित मुलीला खेळण्यासाठी घेऊन जात असेल. विचारांती मला हेच कारण पटल.
दुसऱ्या दिवशी गवळीच माझ्याकडे आले. म्हणाले साहेब १० वर्षांपूर्वी अशीच एक चिटणीस डबल मर्डर केस झाली होती. दोन वर्ष तपास चालू होता पण त्याचा काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे फाइल क्लोज केली आहे. मी म्हंटलं की कोणाची केस होती ती, त्या केस ची फाइल काढा.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.