पात्र रचना
- अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
- नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
- निकीता चटणीस नितीन ची बायको
- शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
- रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
- पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
- मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
- अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
- चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
- विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
- दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
- वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
- कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
- रघुवीर अͪवनाश चा ड्रायव्हर
- पंडित नितीन चा ड्रायव्हर
- वाटवे मॅडम चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
- अंजिकर सर चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
- साखळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
- पांडे सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
- बबन चपराशी
- चोरघडे सर चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
- वाघूळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
- चिंतामण चिटणीस अविनाश चिटणीसांचा भाऊ
- विमल चिंतामण चिटणीसांची बायको
- निखिल चिंतामण चिटणीसांचा मुलगा
- शशांक दामले चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
- पाटील पोलिस इंस्पेक्टर
- परब सब इंस्पेक्टर
- गवळी कॉन्स्टेबल
- मळेकर पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )
भाग २१
भाग 20 वरून पुढे वाचा .........
इंस्पेक्टर मळेकर
१४ तारखेला गवळी हात हलवत आले.
काय गवळी काय झालं ? तुम्ही एकटेच ?
साहेब, राधाबाई यायला तयार होत्या पण शशिकलिबाईंनी त्यांना रोकलं. म्हणाल्या की कालच आम्ही आलो आहोत, आमचं वय झालं आहे, थकलो आहोत त्यामुळे २-४ दिवसांनी येऊ.
मोठे दामले साहेब होते तिथे ?
नाही. त्या दोघीच होत्या.
चला त्यांना घरीच interrogate करू.
दार राधाबाईंनीच उघडलं.
मी इंस्पेक्टर मळेकर आणि हे गवळी. आम्हाला काही चौकशी करायची आहे. तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.
बसा तुम्ही. कशाची चौकशी करायची आहे तुम्हाला ? शशिकलाबाईंनी विचारलं.
अविनाश आणि नितीन च्या खुनाची.
आत्ता इतक्या वर्षांनंतर काय चौकशी करणार तुम्ही ? आम्हाला तर वाटलं की खूनी सापडत नाही म्हणून फाइल बंद झाली.
मॅडम फाइल अशी बंद होत नाही. फाइल का बंद झाली त्या प्रत्येक गोष्टीच justification द्याव लागतं. तेच करण्यासाठी आलो आहोत. ती उत्तरं समाधानकारक मिळाली की फाइल बंद होईल. मग विचारू ?
विचारा.
प्रथम राधाबाईंना विचारतो. तुम्ही मध्ये बोलू नका त्यांनाच बोलू द्या.
हं राधाबाई, तुमचा मुलगा कुठे असतो ?
तुम्हाला कोणी सांगितलं की मला मुलगा आहे म्हणून ? मला मूलबाळ नाही. हीच तर खंत आहे. मुलगा असता तर त्याच्याकडे राहिली नसती का ?
शशिकलाबाई मध्येच बोलल्या की अहो असले विचित्र प्रश्न विचारून तुम्ही त्यांच्या दु:खात भर घालता आहात. राधाबाई, असल्या प्रश्नांची उत्तरं देऊ नका.
शशिकलाबाई तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला पण आम्हाला बरंच काही विचारायचं आहे तेंव्हा त्या वेळी बोला. आता यांना बोलू द्या.
आमच्या माहिती नुसार, तुमचा मुलगा इथेच पुण्यात असतो. राधाबाई तुमचा मुलगा इथेच पुण्यात असतांना तुम्ही त्याच्याकडे का रहात नाही ?
अहो आत्ताच सांगितलं ना की मला मूलबाळ नाही म्हणून.
रायगडला जेंव्हा तुमचं बाळंतपण झालं तेंव्हा तुमच्याबरोबर कोण होत ?
अहो, माझं लग्नच झालं नाही मग बाळंतपणाचा प्रश्नच येत नाही तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली.
आमच्या जवळ रायगड च्या दवाखान्याचं लिखित मध्ये पत्र आहे की तुमचं बाळंतपण तिथेच झालं आणि तुमच्या बरोबर धुळ्याहून आलेलं साटोरे कुटुंब होत. तुमच्या मामे भावाने पण यांची पुष्टी केली आहे. आता बोला.
राधाबाईंचा चेहरा पडला. शशिकलाबाईंची अवस्था पण काही वेगळी नव्हती.
बबन साटोरे तुमचाच मुलगा आहे हे तुम्हाला माहीत होत. हे तुम्ही का लपवल ?
राधाबाई रडायलाच लागल्या.
शशिकलाबाई मधेच बोलल्या
साहेब, राधाबाईंना मुलगा आहे किंवा नाही याच्याशी खुनाच्या चौकशीचा
काय संबंध आहे ? मला कळत नाही की तुम्ही त्यांच्या वर्मावर बोट ठेऊन त्यांना उगाच त्रास का देता आहात. आणि मुळात गुन्हेगारांची चौकशी करायचं सोडून आमचीच चौकशी चालवली आहे. हा काय प्रकार आहे. ?
शशिकलाबाई तुम्ही मध्ये बोलू नका अस मी सांगितलं होतं. तुम्हाला जर हे मान्य नसेल तर आम्ही राधाबाईंना दुसऱ्या खोलीत नेतो. आणि ते ही मान्य नसेल तर महिला पोलिस बोलाऊन ठाण्यावर घेऊन जाऊ. आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये पण जर तुम्ही सहकार्य करणार नसाल तर आम्हाला दुसरे मार्ग चोखाळावे लागतील. Choice is yours. मी जरा जरबेनेच बोललो. त्याचा परिणाम झाला. शशिकला आणि राधाबाईंनी माझ्या स्वरातली धार ओळखली.
ठीक आहे मी नाही बोलणार.
हं. राधाबाई आता रडणं थांबवा आणि चट चट आणि खरी खरी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. एकाच प्रश्नावर तास तास घालवायला आमच्या जवळ वेळ नाहीये.
काय सांगू साहेब माझी कहाणी, शशिताईंनी बहिणीची माया दिली नसती तर मला जीवच द्यावा लागला असता. अविनाशने मला ओळखायचंच नाकारलं होतं. मग मामा आलेत. मामा, अविनाश आणि शशिताईंचं काय बोलण झालं ते मला माहीत नाही. पण मग सर्व सुरळीत झालं. त्यांनीच साटोरे कुटुंबांला बबन ची देखभाल करायला सांगितलं. धंदा काढायला भरपूर पैसे दिलेत आणि नंतर बबन मोठा झाल्यावर कंपनीत नोकरी दिली.
तुम्ही मामांना विष मागीतलं होत ?
हो साहेब फार निराश झाले होते मी. विष खाऊन जीव देणार होते. पण मग मामा आले आणि सगळं ठीकठाक करून गेले, मग त्या नंतर विषाचं काही कारणच उरलं नाही.
मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून शशिकलाबाइन्कडे पहात होतो. त्या पूर्णपणे हांदरल्या होत्या.
तुम्ही बबनची आई आहात हे बबनला माहीत आहे ?
नाही साहेब.
अस कस शक्य आहे ? खोटं बोलू नका. आमच्या जवळ सर्व माहिती आहे. पण तुमच्या कडून ते ऐकायचं आहे. बोला त्याला तुमचं नातं माहीत असलच पाहिजे. त्याशिवायच का त्यानी एवढी धोकादायक कामगिरी अंगावर घेतली ?
कसला धोका, कसली कामगिरी ? मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताहात ते. माझं आणि त्याचं बोलणं सुद्धा होत नाही मग मी त्याला काम कस सांगणार ?
राधाबाई खोटं बोलून काही उपयोग नाही. आम्हाला सगळं माहीत आहे. तो तुमचा मुलगा आहे म्हणूनच तो जगदलपुर वरुन विष आणायला तयार झाला. त्यानी विष आणलं म्हणूनच तुम्ही तुमचा कार्यभाग साधू शकलात. बबन चा पण यात सक्रिय सहभाग दिसतो आहे. तुम्ही आणि तो दोघांनाही जन्मभर खडी फोडायला पाठवू. राधाबाई आता सरळ सगळी कबुली द्या.
काय बोलता आहात साहेब, हे सर्व खोटं आहे. मला या बाबतीत काहीच कल्पना नाहीये. शशी ताई तुम्ही तरी काही बोला ना.
नेमका तेव्हडयात मोबाइल वाजला. आमचा एक शिपाई बोलत होता. हायवे वर टँकर उलटा झाला आहे आणि ट्राफिक जाम झाला आहे. टँकर मधून डीजल गळते आहे आणि परिस्थिति चिघळते आहे. मी म्हंटलं
आत्ता तर आम्हाला लगेच निघायला हवं पण आम्ही उद्या येऊ. तुम्ही तयारीत रहा. चला गवळी हायवे वर.
त्या दिवशी स्थिति नियंत्रणात आणायला बरीच रात्र झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गवळींना म्हंटलं की बबनला बोलाऊन घ्या. आधी त्याच्याशी बोलू आणि मग राधाबाईंशी.
साहेब तुम्हाला खरंच अस वाटतंय की राधाबाईच दोषी असाव्यात म्हणून ?
नाही, दोघीही असाव्यात. किंवा कदाचित कोणीतरी एक. पण बबन काय म्हणतो ते बघू आधी. बबन आल्यावर आधी त्याला तोडा मगच त्यांच्याशी बोलू. ......
दोन तासांनी गवळी सांगत आले. साहेब बबन बोलायला तयार आहे.
बबन तू कंपनी मध्ये नोकरीला कसा लागला ?
साहेब माझे वडील सरांकडेच कामाला होते त्यांमुळे मला ही नोकरी मिळाली.
तू तुझ्या वडिलांचा व्यवसाय का सांभाळत नाहीस ?
मला ते जमणार नाही म्हणून.
तू अस काय काम करतोस की तुला तुझे सर ३०००० रुपये कॅश देत होते ?
माहीत नाही. मला अस वाटत की सगळ्यांनाच देत असावेत. माझा मित्र
म्हणतो की टॅक्स वाचवण्यासाठी ते अस करत असावेत.
तुझ्या मित्राला पण मिळतात ?
नाही साहेब.
का ?
माहीत नाही.
तुला जगदलपुरला कोणी पाठवलं ?
..
सोमनाथ इथेच आहे. तू बोलला नाहीस तर तो बोलेल. सोमनाथ ....
नको नको साहेब, सांगतो.
कोणी पाठवलं तुला, राधाबाईंनी ?
राधाबाई कशाला पाठवतील ? त्या सरांच्याकडे बरीच वर्ष कामाला आहेत. माझी आणि त्यांची फक्त ओळख आहे. त्या मला का काम सांगतील ? मला मॅडम नी पाठवलं.
कशाला ?
त्यांना एक छोटस पार्सल आणायचं होतं म्हणून. ते आणलं.
ज्यांच्या कडून आणलं तो कोण माणूस होता ? नाव, पत्ता ?
माहीत नाही साहेब. जगदलपुर ला जाणाऱ्या बस मध्येच तो माणूस होता, मला पार्सल दिलं आणि पुढच्या फाट्यावर उतरून गेला. बस मला एवढंच माहिती आहे.
त्यांनी तुला बरोबर कसं ओळखलं ? आधी तुझी आणि त्यांची भेट केंव्हा झाली होती. ?
कधीच नाही. मी त्या माणसाला पूर्वी कधीच पाहिलं नव्हत.
मग एका अनोळखी माणसाकडून तू पार्सल कसं घेतलं, गवळी, तुम्ही घ्याल ?
नाही. साहेब. नक्कीच नाही.
बघ. असं काय झालं की न बोलता त्यांच्याकडून तू पार्सल घेतलं ? कोण होता तो. तुला नक्कीच माहिती आहे. बऱ्या बोलाने बोल. सोमनाथ इथेच आहे.
खरं सांगतो साहेब मी त्याला ओळखत नाही. त्यांनीच मला विचारलं की माझं नाव बबन साटोरे आहे का ? मी मान डोलावली. मग तो म्हणाला शशिकला चिटणीस बाईंना द्यायचं पार्सल त्याच्या जवळ आहे, आणि ते त्यांनी मला दिलं. मग तो पुढच्या फाट्यावर उतरून गेला. त्याच्या जवळ माझा फोटो होता साहेब. त्यावरूनच त्यांनी मला ओळखलं.
तू रायपूर ला आला आहेस आणि जगदलपूरला जायला याच बस मध्ये चढणार आहेस हे त्याला कसं कळलं ?
मला कसं माहीत असणार साहेब ?
या प्रवासात तुझा शशिकलाबाईंशी संपर्क होता ?
हो साहेब रोज सकाळ ,संध्याकाळी त्यांना दिवासभरातली माहिती द्यावी लागायची.
म्हणजे तू जगदलपुरला जाणाऱ्या कोणच्या बस मध्ये चढणार आहेस हे त्यांना माहीत होतं.
होय साहेब. आदल्याच दिवशी मी रिजर्वेशन केलं होतं आणि तसं त्यांना कळवलं होतं.
पण तुलाच का पाठवलं, कोरियर नि का नाही मागवलं ?
...........
त्या ते कोरियर ने पण मागवु शकत होत्या. तुला का पाठवलं ?
माहीत नाही. साहेब आम्ही नोकर माणसं, सांगितलेलं काम करायचं एवढंच माहिती.
काय होतं त्या पार्सल मध्ये ?
नाही माहीत साहेब.
तू जगदलपूरला जातो आहेस हे अविनाश सरांना माहीत होत ?
काही कल्पना नाही साहेब, मॅडमनी मला सुट्टी घ्यायला लावली होती.
सुट्टीवरून आल्यावर तू सांगितलस ?
नाही साहेब.
का ?
आईची तब्येत खराब आहे म्हणून धुळ्याला जायचं आहे, अस सांगून सुट्टी घे साहेबांना काही सांगू नकोस असं मॅडमनी बाजावून सांगितलं होतं.
पण ज्यांच्याकडे तू वर्षानुवर्ष नोकरी केली, त्यांना अंधारात ठेऊन तुला काम करायला सांगितलं जातं यात तुला काही संशयास्पद वाटलं नाही ?
.......
गप्प बसू नकोस. बोल, तुला या सर्व प्रकारात काही विचित्र वाटलं नाही ?
वाटलं होतं पण मी कोणाला विचारलं नाही. मोठ्या लोकांची काम वेगळीच असतात असा विचार करून गप्प बसलो.
त्या पार्सल मध्ये काय होतं हे तुला खरंच माहीत नाही ?
नाही
ज्यांनी पार्सल दिलं त्याला किती पैसे दिलेस ?
एक लाख रुपये.
कॅश ?
हो.
एवढे पैसे कोणी दिले ?
मॅडमनी.
म्हणजे कोणी ? राधाबाई की शशिकलाबाई ?
साहेब राधाबाई बद्दल का सारखे सारखे विचारता आहात ? राधाबाई मॅडम कडे घरकाम करतात. त्यांचा काय संबंध आहे ? त्या कुठून देणार ? पैसे शशिकला मॅडमनी दिले होते.
त्या जर घरकाम करतात तर त्यांच्याकडे कंपनी चे पांच टक्के शेअर्स कसे ?
साहेब, मी छोटासा नोकर माणूस, मला कसं कळणार ? मला आत्ताच समजतंय.
तुला का ३० हजार देत होते ? ते तरी कळतंय का ?
साहेब ते पैसे माझ्यासाठी नव्हते. मोठे साहेब ते बाबांना देत होते.
का ?
नेमकं माहीत नाही पण बाबांनी कुठल्याशा कामामध्ये मोठ्या साहेबांची खूप मदत केली होती त्याबद्दल परतफेड म्हणून देत होते. एवढच मला माहीत आहे.
कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस ?
केला साहेब पण बाबांनी सांगितलं की हे गुपित आहे आणि ते त्यांच्या बरोबरच संपणार आहे. मग मी खोलात शिरलो नाही.
विचार करून बोल शेवटची संधि आहे.
साहेब इतका मार खाऊन झाल्यावर मी कस खोटं बोलू शकतो.
नितीन ला का मारलस ?
काय बोलता साहेब मी का मारेन त्यांना ? ते माझे अन्नदाते होते. सर्वांचे लाडके होते. देव माणूस होते ते. त्यांना मारण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मीच काय ऑफिस मधले कोणीच नाही.
ठीक आहे. जा तू.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा