पात्र रचना
अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
निकीता चटणीस नितीन ची बायको
शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
रघुवीर अͪवनाश चा ड्रायव्हर
पंडित नितीन चा ड्रायव्हर
वाटवे मॅडम चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
अंजिकर सर चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
साखळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
पांडे सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
बबन चपराशी
चोरघडे सर चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
वाघूळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
चिंतामण चिटणीस अविनाश चिटणीसांचा भाऊ
विमल चिंतामण चिटणीसांची बायको
निखिल चिंतामण चिटणीसांचा मुलगा
शशांक दामले चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
पाटील पोलिस इंस्पेक्टर
परब सब इंस्पेक्टर
गवळी कॉन्स्टेबल
मळेकर पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )
भाग 14
भाग १३ वरून पुढे वाचा...................
शशिकला चिटणीस
पाटील साहेबांनी बोलावलं म्हणून दामले आणि देशपांडे मंडळी आत आली आणि मी दामल्यांशी बोलतच होते तेवढ्यात पाटील मध्येच बोलले. थांबा जरा. मला तुमच्याशी बोलायच आहे. त्यानंतरच तुम्ही जाऊ शकता. निकिता शी पोलिस स्टेशन मध्येच बोलाव लागेल अस दिसतंय. हं तुम्ही कोण आणि यांच्याशी तुमचा काय संबंध आहे.
मी दामले ही माझी पत्नी, हे देशपांडे आणि ह्या त्यांची पत्नी. आम्ही अविनाश रावांचे मित्र आहोत. नितीन गेल्याच कळल्यामुळे आम्ही भेटायला आलो होतो.
तुम्ही पुण्यालाच असता ?
नाही. आमच गाव मिरज च्या जवळ आहे. मुद्दाम भेटायला आलोत.
काय करता ? म्हणजे पोटा पाण्याचा काय उद्योग आहे ?
अहो या वयात काय करणार ? निवृत्तीचा काळ आहे. आमची घरं जवळ जवळ आहेत. रिटायरमेंट एंजॉय करतो आहोत.
देशपांडे तुम्ही काय करता ?
रिटायर्ड.
कुठून
स्टेट बँकेतून. जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालो.
यांच्या बद्दल काय माहिती आहे ?
आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत. चांगली माणसं आहेत. अविनाश माझा शाळे पासूनचा मित्र. त्यामुळे या सगळ्यांना आम्ही चांगल ओळखतो. तुम्ही म्हणता असल काही यांच्या हातून घडुच शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे.
ठीक आहे. आम्ही आता जातोय त्यामुळे तुम्ही थांबलात तरी मला काही हरकत नाही. निकिता आम्ही पुन्हा येउच पण त्या वेळेस तुला घेऊनच जाऊ. अजून वेळ गेलेली नाही. विचार कर. बबन आमच्या कस्टडीत आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करून उपयोग नाही. चला परब.
दामले समोर झाले आणि म्हणाले
पाटील साहेब एक मिनिट, थोड विचारायच होत.
पाटलांच्या कपाळावर आठ्या. चेहरा त्रासिक. काय ? त्यानी विचारल.
नुसत्या संशयावर म्हणजे काहीही सपोर्टिंग नसतांना एका प्रतिष्ठित घरच्या महिलेला जीच्यावर आधीचा कुठलाही डाग नाहीये आशा स्त्रीला तुम्ही लॉक अप मध्ये अडकवू शकता ?
हे बघा आम्ही कोणालाही अडकवू शकतो. तुम्ही विचारणारे कोण ? तुमची इच्छा असेल तर तुम्हाला पण अनुभव देवू, बोला.
साहेब, अनुभवावरून माणूस शिकतो अस म्हणतात पण तुमच्या बाबतीत अस झालेल दिसत नाही.
काय तुमच नाव हं दामले. हे बघ तू आत्ता जे काय बोललास ना ते तुझ वय पाहून मी सोडून देतो. पोलिसी इंगा काय असतो हे बघायच आहे का ? भारी पडेल.
मला कळत नव्हत की दामले अस का वागताहेत. उगाच शब्दाने शब्द वाढतो आणि मग कठीण होऊन बसत. बर दामल्यांची आणि आमची इतकी ओळख पण नव्हती की त्यांनी आमच्यासाठी पोलिसांबरोबर वाद घालावा, दामल्यांना मी खाणा खुणा करून थांबायला सुचवत होते पण त्यांचा मूड वेगळाच दिसत होता, ते थांबायच्या मूड मध्ये दिसत नव्हते. मी निकिता कडे पाहिल ती पण विस्फरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याच कडे बघत होती. तिनि माझ्याकडे पाहिल आणि, काय करणार या अर्थांनी खांदे उडवले.
दामले पाटलांच्या जवळ गेले आणि म्हणाले मला फक्त एवढंच म्हणायच होत की एकाद्या केस च्या चौकशी साठी भुरट्या चोरांना आणि हिस्ट्री शीटर बादमाशांना राऊंड अप करून लॉक अप मध्ये घालणं वेगळ आणि एका प्रतिष्ठित महिलेला पुरावा नसतांना लॉकअप ची धमकी देणं वेगळ.
परब म्हाताऱ्याची जीभ जास्तच वळ वळ करते आहे. घाला याला गाडीत. जरा आपला पाहुणचार देऊ.
परब एक मिनिट थांबा. मी काय म्हणतो ते ऐका आणि मग मला आत टाका आणि पाहुणचार द्या माझ काही म्हणणं नाही.
पाटील साहेब तुमच्या त्या चिकट पट्टीच्या थिअरी वर शेंबड्या पोराचा तरी विश्वास बसेल का ? अहो ब्लड प्रेशर नावाची काही चीज असते की नाही ? अहो प्रेशर असत म्हणून रक्त बाहेर येत. बाहेर ची गोष्ट आत कशी जाईल ? उघड्या जखमे मुळे इन्फेक्शन होऊ शकत पण इन्फेक्शन मुळे माणूस दोन मिनिटांत मरत नाही. काही लक्षात येतेय का ? तो अननुभवी माणूस तुम्हाला त्याची कल्पना सांगतो आणि सगळा तपास तुम्ही त्याच दिशेने करता आणि हातात काहीच लागत नाही. बर लिखित मध्ये तो माणूस काहीच द्यायला तयार नाही. म्हणजे मग तुमच्या हातात काहीच नाही. खर कारण वेगळंच असणार पण ते तुम्ही शोधायला हवं. त्याच्या साठी कष्ट घ्यावे लागतात. ते तुम्ही करत नाही आणि नुसत्याच धमक्या देता ? कदाचित हे धमकी प्रकरण तुमच्या अंगलट येण्याची शक्यता असू शकते. पाटील, शेणवी साळुंके गावाची केस जरा आठवा. आणि मगच धमकी द्या.
पाटलांचा नूरच एकदम बदलून गेला. दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.
साहेब काय बोलताहात, तुम्हाला काय माहिती आहे ?
आता पर्यन्त अरे तुरे करणारे पाटील, दामल्यांना साहेब म्हणाले.
इथेच बोलायच का ? की बाहेर ? दामले म्हणाले.
दोघेही आंगणात गेले तिथे काय बोलण चालल होत ते काही कळल नाही. पण
पाटील साहेब चार चारदा हात जोडून विनवणी केल्यासारखे बोलत होते. थोड्या वेळाने गाडीत बसून निघून गेले. दामले हसत हसत आत आले.
आता तुम्हाला पाटील त्रास देणार नाहीत. चिंता करू नका.
अस काय सांगितल हो तुम्ही की पाटील साहेब चार चारदा हात जोडत होते ? मी विचारल.
ते जाऊ द्या हो. ते महत्वाच नाहीये, पण आता ते तुम्हाला विनाकारण त्रास देणार नाहीत अस मला वाटतंय. बबनला पण आता सोडून देतील. त्यानी कसलाही कबुली जबाब दिलेला नाहीये. पाटील निकिताला घाबरवण्यासाठी तस बोलले. तुम्ही काळजी करू नका. हां त्याला मार हाण झाली आहे, त्याला तुम्ही थोडी सहानुभूति दाखवा. त्याची काळजी घ्या. बस. आता तुम्ही पुढ काय करायच यांची निवांत आखणी करू शकाल. बर आता आम्ही निघू ? बराच वेळ झाला आहे तुमची पण सर्व काम राहिली असतील. चला मुकुंदराव. अरे हो वाहिनी काही अडचण आली तर कुठलाही संकोच न बाळगता फोन करा. माझा आणि मुकुंदाचा फोन नंबर आहेच तुमच्याकडे.
मकुंद भाऊजी तुम्ही तरी काही बोला.
अहो काही नाही दामले पण पोलिस होते. अमरावती च्या कमिश्नर ऑफिस मध्ये होते. तिथूनच रिटायर झाले. अजून काही नाही. चला आता येतो आम्ही. निकिताच पुढे आली आणि म्हणाली जेवणाची वेळ आहे. तुम्ही लोक न जेवता गेलात तर आम्हाला बर वाटणार नाही. तेंव्हा जेवूनच जा
जेवतांना मुकुंद भाऊजी म्हणाले वाहिनी आता सर्व वाईट विचार मानातून काढून टाका. आनंतानी पाटलांना चांगलाच डोस दिला आहे. चिंता करू नका. अहो किती झाल तरी पोलिस कमिशनर म्हणून रिटायर झाले आहेत. अहो पोलिसांची पावलं पोलीसच ओळखणार न.
हा आम्हाला एक आश्चर्याचा धक्काच होता. पण त्या दिवसा नंतर आम्हाला कसलाच त्रास झाला नाही. हळू हळू गाडी रुळावर येत होती. निकिता पण बरीच सावरली होती. आम्ही दोघींनी ऑफिस आणि फॅक्टरी मध्ये जायला सुरवात केली. पूर्वीचच रुटीन पुन्हा सुरू झाल. रात्री जेवणाच्या टेबलवर चर्चा पण व्हायला लागल्या. काळ हे सर्वोत्तम औषध असत अस म्हणतात त्यांची प्रचिती येत होती.
निकिता
त्या दिवशी दामले काकांनी आश्चर्याचे धक्केच दिले. पाटील साहेब सरळ खुनाचे आरोप माझ्यावर करत होते आणि मी पार खचून गेले होते. उसन अवसान आणून बोलत होते पण ते किती काळ टिकल असत माहीत नाही. मला काहीच कळत नव्हत. मी कशातच नव्हते आणि काहीच केल नव्हत तरीही पाटील मला अपराधी ठरवून मोकळे झाले होते. वर बबन ने सगळ कबूल केल आहे असंही म्हणाले. माझ्या डोळ्या समोर अंधारी आली आणि मला फक्त फासाचा दोरच दिसायला लागला होता. आणि अश्या वेळेला दामले काकांनी एंट्री घेतली. काकांचा आवेशच असा होता की कृष्ण धावून आल्यावर द्रौपदीला जे वाटल असेल तसंच मला वाटल. काकांनी काय चाव्या भरल्या ते कळल नाही, पण नंतर कधी त्रास झाला नाही हे खरं.
या सगळ्या घटनांमुळे मी फार भांबावून गेले होते. कार्तिक इथे असता तर खूप बर झालं असतं. तो हाक मारल्यावर लगेच धावून आला असता. पण तो आता अमेरिकेला असल्यामुळे फारच पंचाईत झाली, फक्त फोनवरच त्यांच्याशी बोलता येत होतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कार्तिकशी बोलणं व्हायचं. बऱ्याच वेळेला माझं मन थाऱ्यावर नसायच तेंव्हा कार्तिक शी बोलल्यावर जरा हलक वाटायचं. मी अखेर यावेळी त्याला म्हंटलं की
कार्तिक परत ये, चंदन इंजीनीरिंग जॉइन कर, मला मदत कर. जे काही घडतंय ते फार भयंकर आहे. तू आलास तर मला धीर येईल.
निकिता मी परत आलो तर माझं संगळच करियर संपेल. हा धोका मी पत्करू शकत नाही. ज्या परिस्थितितून तू जाते आहेस त्यावर तुलाच उपाय शोधावा लागेल. काही अडचण आली तर मी आहेच. मला कार्तिक कडून ही अपेक्षा नव्हती. कार्तिक एवढा का घाबरतो आहे हेच मला समजत नव्हत. खरं तर तो एवढा हुशार, कुठेही आपलं विश्व बनवू शकतो. एवढी त्यांची क्षमता आहेच, पण आता सगळंच संपलं होतं. कार्तिकचा अध्याय संपला होता. आता मला एकटीनेच झुंज द्यायची आहे हे स्पष्ट झालं.
नितीन ला जावून वर्ष होत आल होत. मी फॅक्टरी मध्ये चांगलीच रमले होते. कामावर चांगलीच पकड बसवता आली होती. आधीचा अनुभव होताच त्या मुळे फारसा वेळ लागला नाही. आईंच्याच सुचने वरुन मी आठवड्यातले दोन दिवस ऑफिस मध्ये पण जायला सुरवात केली होती. फॅक्टरीच्या कामकाजाची सवय झालीच होती आता व्यावसायिक खाचा खोंचा आईंच्या मार्गदर्शनाखाली शिकण चालू होत. एक दिवस रात्री चर्चा आणि आढावा आटोपल्यावर मी आईंना म्हंटल की
आई मला अस वाटत की आपल्या जवळ भरपूर पैसा आहे. अजून किती जमा करणार ? त्यापेक्षा अस करू की सर्व वजा जाता नेट प्रॉफिट मधला फक्त १० टक्के आपल्या कडे ठेऊन बाकी आपल्या लोकांच्या welfare साठी वापरावा.
चांगली कल्पना आहे. मला पैशांची मुळीच हाव नाहीये. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी भरपूर ठेवल आहे. पण तुझ् आयुष्य समोर आहे तूच पुढचा विचार कर आणि ठरव. काय असत न, की अश्या गोष्टीत अर्ध्या वाटेवरून मागे फिरता येत नाही. आणि त्याच्यासाठी डोंगरे आणि मेहता तयार होणार नाहीत. त्यांना पटल तर ठीकच आहे पण नाही पटल तर त्यांना आधी बाहेर करांव लागेल. पण नेमक काय करायची इच्छा आहे तुझ्या मनात ते तरी ऐकव.
मला वाटत की आपल्या लोकांसाठी चांगली ऐसपैस घर बंधावीत आणि त्यांना नोकरीत असे पर्यन्त फ्री क्वार्टर म्हणून द्यावीत. अर्थात त्यांच्या पदा प्रमाणेच त्याचा एरिया ठरवू. दर वर्षी थोडी थोडी करून काही वर्षात सर्वांना घर मिळतील अस बघू. त्या प्रमाणे तपशील ठरवू.
Good idea. आपल्याला आधी घोडे पेडणेकरांचा सल्ला घ्या लागेल. आणि मग एखादा चांगला कन्सलटंट बघवा लागेल. यांच्याही पुढे जावून मला असंही वाटत की आपल्याला १०० घर बांधायची असणार आहेत तर आपणच एक civil construction company काढली तर वेगळ्या फील्ड मध्ये expansion पण होईल आणि काम पण होईल. आपली घर बांधून होई पर्यन्त चांगला अनुभव गाठीशी येईल आणि contractor म्हणून निरनिराळी कामे पण घेता येतील. घर मिळाल्यावर माणस नक्कीच खुश होतील आणि आपल्या assets मध्ये पण भरघोस वाढ होईल. अर्थात हे २० वर्षांच प्रोजेक्ट असणार आहे. चांगला विचार आहे. पूर्ण तपशील बघायला पाहिजे. चला बघूया कसं जमतय ते. अस म्हणून आई झोपायला गेल्या.
मला अस वाटल की आईंना कल्पना अजिबात आवडलेली नाही. शेवटी स्वत:च्या फायद्या मध्ये कपात झालेली कोणाला आवडेल. योजना डब्यात गेली अस समजून मी पण झोपायला गेले.
पण मला वाटल होत, तस नव्हत. त्यांनी बहुधा रात्री बराच विचार केला असणार. कारण आईंनी कल्पना एकदमच उचलून धरली. अर्थात हे मला नंतरच कळल. त्या दिवशी माझा पण ऑफिस चा वार होता. मला म्हणाल्या दुपारी चार वाजता माझ्या केबिन मध्ये ये. मीटिंग आहे. दुपारी चार वाजता त्यांनी वाघूळकरांना पण बोलावल होत. ते पण आले. थोड्याच वेळाने शशांक पण आला. मला हळूच विचारल अजेंडा काय आहे. मला अजेंडा माहीत नव्हता त्यामुळे मी मला माहीत नाही या अर्थाने मान हलवली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा