पूर्वार्ध
पौर्णिमेच्या आधीची रात्र.
गावातल्या गल्ल्या नेहमीप्रमाणे संध्याकाळी माणसांनी गजबजलेल्या होत्या, पण रात्री अकरा वाजताच सगळीकडे शांतता पसरू लागली. चंद्र ढगांमधून डोकावत होता, आणि वाऱ्याच्या झुळका पिंपळाच्या पानांतून विचित्र आवाज करत होत्या.
गावातल्या गल्ल्या नेहमीप्रमाणे संध्याकाळी माणसांनी गजबजलेल्या होत्या, पण रात्री अकरा वाजताच सगळीकडे शांतता पसरू लागली. चंद्र ढगांमधून डोकावत होता, आणि वाऱ्याच्या झुळका पिंपळाच्या पानांतून विचित्र आवाज करत होत्या.
अर्जुनच्या घरात दिवे विझले होते, पण त्याच्या खोलीत मात्र टॉर्च, छोटी बिस्किटांची पाकिटं, पाण्याच्या बाटल्या, आणि दोरी तयार ठेवलेली होती.
एक वाजल्यावर सगळेजण चुपचाप पिंपळाखाली जमणार होते — हा ठरलेला प्लॅन होता.
एक वाजल्यावर सगळेजण चुपचाप पिंपळाखाली जमणार होते — हा ठरलेला प्लॅन होता.
रात्री बारा वाजताच मयूर आणि विनय आधी आले. मयूरच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता होती, तर विनयने मस्करीत विचारले,
"अरे अजून परत फिरायचं ठरवायचं का? अजून वेळ गेलेली नाही!"
"अरे अजून परत फिरायचं ठरवायचं का? अजून वेळ गेलेली नाही!"
मयूरने थोडंसं हसून डोकं हलवलं,
"नाही, आता मागे नाही."
"नाही, आता मागे नाही."
कावेरी आणि समीरा देखील पोचल्या. कावेरीकडे छोटं नोटबुक होतं, आणि समीराच्या खांद्यावर कॅमेरासह बॅग.
अर्जुन शेवटी आला, टॉर्चचा प्रकाश जमिनीवर टाकत,
"सगळेजण तयार? एकदा आत गेलो की, परत यायचं नसेल…"
सर्वांनी नजरा मिळवून मान डोलावली.
अर्जुन शेवटी आला, टॉर्चचा प्रकाश जमिनीवर टाकत,
"सगळेजण तयार? एकदा आत गेलो की, परत यायचं नसेल…"
सर्वांनी नजरा मिळवून मान डोलावली.
ते सगळे वाड्याकडे निघाले.
शांत गल्ल्या ओलांडत, वाड्याकडे जाणारा रस्ता अधिक गडद होत गेला. जुन्या पिंपळाची सावली त्यांच्या वर पसरली, आणि वाड्याचं उंच, अंधकारमय रूप नजरेसमोर उभं राहिलं.
शांत गल्ल्या ओलांडत, वाड्याकडे जाणारा रस्ता अधिक गडद होत गेला. जुन्या पिंपळाची सावली त्यांच्या वर पसरली, आणि वाड्याचं उंच, अंधकारमय रूप नजरेसमोर उभं राहिलं.
त्या लाकडी जाड दरवाज्याची कडी उघडताच टिटवी ओरडू लागली. तसं सगळे किंचित घाबरले पण पुन्हा पूर्ववत झाले. आणि अर्जुनने दरवाजा पुढे ढकलला.
तसं दाराचा आवाज झाला.
तसं दाराचा आवाज झाला.
पुढे...
सगळ्यांनी आत पाय ठेवताच वाऱ्याची मंद झुळुक त्यांना स्पर्शून गेली. आणि एक मंद पण मनाला प्रसन्न करणारा गंध त्यांच्या नाकात शिरला.
सगळ्यांनी ईकडे तिकडे बघितलं. आजूबाजूला हिरवीगार असलेली झाडे पण आश्चर्य तिथे असणाऱ्या कुठल्याच झाडाला फुले नव्हती. पण त्यांना तिथे गंध जाणवत होता. फुलेच नाहीत प्रश्न असा होता की तो गंध कुठून आला.
चंद्र बरोबर वाड्याच्या वर होता. जणू त्या वाड्याची जबाबदारी त्याचीच असावी. चंद्राचा चंदेरी प्रकाश त्या झाडांवर आणि जमिनीवर पडत होता. पानांची सावली सुंदर आकृती निर्माण करत होती. सगळे जण हळू हळू चालत वाड्याच्या उंबऱ्याच्या दिशेनं निघाले. पायाखाली पानांचा करकर आवाज होत होता.
अर्जुनने दारात पाय ठेवताच त्याला काहीतरी हालचाल जाणवली. त्याच्या पाठोपाठ सगळे आत आले.
आताच्या सगळे बाहेर निघा पटकन... अर्जुन माघारी फिरत सर्वांना म्हणाला. तसं आत येणारे मयुर आणि कावेरी जागेवरच थांबले. विनय आणि समीरा त्याच्या कडे गोंधळलेल्या नजरेने बघत उभे होते. अर्जुन विचित्र का वागत आहे हे कोणालाच समजत नव्हतं. पण विनय लगेच तिथून बाहेर गेला. पण समीरा त्याच्याकडेच बघत होती.
त्याने समीराचा हात पकडला आणि एका क्षणात दाराच्या वर असणाऱ्या तुळव्यामध्ये हालचाल जाणवू लागली. आणि एक एक करत त्या तुलाव्या मातीसोबत धडाधड खाली पडायला सुरुवात झाली.
पण अर्जुनने समीराचा हात पकडत तिला बाहेर नेलं. बघता बघता वाड्यात जाण्याच्या मार्गावर सगळीकडे गंज लागलेले पत्रे लाकडी तुळव्या माती आणि दगडे पडली होती. तिथे पसरलेल्या मातीच्या कनांनी सगळ्यांना ठसका लागला. आणि त्यातच आकाशात एक मोठा गडगडाट झाला.
अर्जुन मला वाटतं आपण माघारी फिरावं. असंही आता आतमध्ये जाण्याचा रस्ता बंद झालेला आहे. आणि गेलो तरी हा वाडा आपल्या अंगावर कधीही कोसळू शकतो... विनय कापत म्हणाला.
किती भित्रा आहेस रे तु... वाडा जुना आहे म्हटल्यावर कधी ना कधी कोसळणारच होता. बरं झालं ते आता कोसळला आता नंतर नाही कोसळणार... आणि काही झालं तरी तोपर्यंत आपण तळघरात असू... सगळा वाडा पडला तरी आपण सेफ राहू... कावेरी
नाही मला इथे ठीक नाही वाटतं... विनय
विनय कम ऑन तु इतका भित्रा असशील असं वाटलं नव्हतं मला... तु भूत प्रेत आणि अश्या गोष्टींवर विश्वास ठेवत अशील तर तुझा मॉडर्न असण्याचा काहीच फायदा नाही. तु सुद्धा त्या बाबांच्या मध्ये जाऊन बस... अर्जुन विनयला इरिटेट होत म्हणाला.
विन्या... टेंशन नको घेऊस... आपण पाच आहोत. भूताने पकडलं तर सगळ्यांनाच पकडेल. तुला एकट्यालाच ती हडळ नाही पकडणार... मयूर.
तसं विनय शांत बसला कारण त्याला स्वतःची कमजोरी दाखवायची नव्हती. आता असंही सगळे जण होते तर जे होईल ते पाच जणांना होईल आणि वाचले तर सगळेच वाचतील असा विचार केला.
मला वाटतं आपण दुसरा रस्ता शोधायला हवा... अर्जुन
अर्जुन तिकडे बघ तिथून कुठलातरी रस्ता आहे. पण तिकडे खूप झाडे आहेत... समीरा म्हणाली तसं सगळे तिकडे गेले.
तिथून वाड्याच्या मागे जाण्यासाठी एक रस्ता होता. झाडे बाजूला करत एकएक सगळे तिथून चालू लागले.
मयुऱ्या इथे बघ बीळ आहेत. जर त्या हडळने इथून हात बाहेर काढला तर... विनय
ए बाबा शांत बस की कशाला उगाच माश्या उठवत आहेस. आणि काढला तरी काय म्हणतात ती एवढी सुंदर होती की स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा मागे पडतील. जरी तिने मला नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही... मयूर
तुला कशाला नेईल ती एवढा छान कुठे दिसतोस तु?... विनय
मग तू तरी कुठे ऋतिक रोशन दिसतोस तूला तरी कशाला नेईल ती? नेलं तर अर्जुनला नेईल. तो जरा जास्त दिसायला चांगला आहे... मयूर.
पण त्याला तर समीरा आवडते! तो कसा जाईल तिच्याकडे?... विनय
गप्प की येड्या... उगाच तिने ऐकलं तर विषय वाढेल. तीन वर्ष झाली पण अजून त्याने तिला सांगितलं नाही आणि तू कर सगळीकडे... मयूर म्हणाला तसं विनय शांत बसला.
चालता चालता ते आता वाड्याच्या मागच्या बाजूला आले होते. सगळीकडे पिंपळाची पाने पडली होती. तिथे सुद्धा आंगण होतं आणि बाजूला एक विहीर होती.
या विहिरीतलं पाणी आटून गेलेय वाटतं... कावेरी.
आजूबाजूला बघ सगळी झाडे आहेत पण इथे एक सुद्धा झाड पाण्याशिवाय मेलेलं नाहीये... हे थोडं विचित्र आहे ना!... समीरा
अर्जुनने दाराला असलेली कढी आता पुढच्या बाजूने काढली. आणि दार उघडले...
अचानकच तिथून कसल्यातरी काळया आकृत्या फडफड करत बाहेर पडू लागल्या. तसं विनय आणि मयुर दोघे तिथे असणाऱ्या दगडामध्ये अडकून खाली पडले. कावेरी आणि समीरा सुद्धा घाबरून मागे गेल्या. अर्जुन त्या काळया आकृत्यांपासून वाचता यावं म्हणून साइडला सरकला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा