Login

निलांती श्रापित ग्रंथाचा शोध भाग 3

वाड्याचे काळे रहस्य आणि सुंदर निलंती
पूर्वार्ध

अर्जुनने दाराला असलेली कढी आता पुढच्या बाजूने
काढली. आणि दार उघडले...

अचानकच तिथून कसल्यातरी काळया आकृत्या फडफड करत बाहेर पडू लागल्या. तसं विनय आणि मयुर दोघे तिथे असणाऱ्या दगडामध्ये अडकून खाली पडले. कावेरी आणि समीरा सुद्धा घाबरून मागे गेल्या. अर्जुन त्या काळया आकृत्यांपासून वाचता यावं म्हणून साइडला सरकला.

पुढे...

वटवाघळे आहेत ती... समीरा आणि कावेरी मोठमोठ्याने किंचाळत होत्या म्हणून अर्जुन ओरडत म्हणाला.

तसं त्या दोघी शांत झाल्या. विनय आणि मयुर दोघे सुद्धा शांत झाले. नाहीतर आता एकसाथ सगळ्यांना हार्ट अटॅक आला असता.

अर्जुन टॉर्चने ईकडे तिकडे बघत आतमध्ये शिरला. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे सुद्धा आतमध्ये आले.

अर्जुन... अर्जुन... तिकडे बघ त्या देव्हाऱ्यात दिवा अजुनही जळतोय... कावेरी म्हणाली तसं सगळ्यांनी एकसाथ तिकडे बघितलं.

ती हडळ तर लावत नसेल ना दिवा?... विनय घाबरून म्हणाला.

मला वाटतं इथे नक्कीच कोणीतरी येत जात असेल त्यामुळेच हा दिवा अजून जळतोय... अर्जुन म्हणाला आणि त्या वाड्यात ईकडे तिकडे फिरू लागला.

मध्ये असणाऱ्या खोलीमध्ये एक मोठी फ्रेम
होती. अर्जुनने रुमालाने तिच्यावरची धूळ पुसून काढली तर समोर अतिशय सुंदर स्त्रीचं चित्र रेखाटलेलं होतं. समुद्रासारखे खोल काळे डोळे, लांबसडक कुरळे केस, गोरी कांती आणि दिसण्यात एक रुबाब तिच्याकडे बघून असं वाटतं होतं की तिच्यामध्ये एक सुद्धा कमी नसेल.

तिला बघून सगळ्यांनाच एक वेगळीच भुरळ पडली. त्या फोटो पासून कुठेच जाऊ नये असं सगळ्यांना वाटतं होतं.

मयुरने त्याच्या फोनमध्ये त्या फ्रेमचा फोटो काढून घेतला.

इतकी सुंदर स्त्री मी आजपर्यंत बघितली नव्हती... विनय

खरंच... पण मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आहे. आपण का तिच्यावेळी जन्म घेतला नाही. घेतला असता तर कदाचित तिला जिवंत बघता आले असते... मयूर.

बिचारी एवढी सुंदर होती. पण तिला जिवंत राहता आले नाही... समीरा

बिचारी काय म्हणतेस तिनेच तर त्या नोकराच्या गळ्यात नखं खुपसून मारून टाकलं... विनय

तुला सत्य माहीत आहे का? लोकांनी सांगितलेलं नेहमीच खरं नसतं... समीरा

असं आहे तर तुला माहीत आहे का तेव्हा काय घडलं होतं. जे लोकं बोलतात ते खरंच असेल आणि नसले तरी थोडीच तुला माहीत
असणार आहे... विनय आणि समीरा त्या वादात अडकले.

हो मला माहीत आहे. तीने त्याला मारलं नव्हतं तर ती... समीरा काही पुढे बोलणार तेवढ्यात अर्जुन ओरडला.

दोघेही शांत बसा आणि तळघर कुठे आहे हे शोधा... अर्जुन म्हणाला तसं ते दोघे शांत बसले.

पण दोन पावले पुढे गेल्यानंतर अर्जुनच्या काहीतरी लक्षात आलं.

समीरा एवढ्या कॉन्फिडंटने हे सगळं कसं बोलू शकते. तिला याबद्दल खरंच काही माहित आहे का?... अर्जुनला प्रश्न पडला पण तो काही म्हणाला नाही.

सगळ्यांनी स्वयंपाक घर शोधून काढले. आतमध्ये अजूनही काही जुनी पितळेची आणि तांब्याची भांडी होती ज्यांच्यावर आता धुळीचा थर चढलेला होता. जुन्या काळातली चूल सुद्धा खराब झालेली होती.

त्या सर्वांनी ऐकल्याप्रमाणे त्यांनी छोट्या देवळीमध्ये असणारी फळी काढून बघितली पण आश्चर्य तिथे कुठेच दार नव्हते. कदाचित भिंतीला मातीचा लेप लावला असेल म्हणून मयूर आणि विनयने एका खोदणाऱ्या अस्त्राने
तिथली माती उखारुन बघितली पण तिथे एका तळघराच्या असण्याची कुठलीच खूण सापडली नाही.

गावातले लोकं खोटं बोलत होते वाटतं. हे ग्रंथ श्राप तळघर सगळं खोटं आहे... असं म्हणत विनय हसू लागला.

नाहीतर काय आपल्याला लोकं मुर्ख बनवत होते. काय भेटलं इथे येऊन माती आणि वटवाघूळे... त्यांना काही माहिती नाही आणि काहीही बोलत असतात... मयूर म्हणाला.

कदाचित असं असू शकतं की तळघराबद्दल कोणालाच काही माहीत नसेल. फक्त बोलायचं म्हणून लोकं म्हणत असतील की ते देवळीत आहे. नाहीतर त्यांना चुकीची माहिती भेटली असेल... अर्जुन.

आता काय करायचं माघारी फिरायचं का आपण?... कावेरी

नाही... लोकं बोलतात म्हणजे तळघर असल्याशिवाय बोलत नाहीत... तळघर असणार... इथेच कुठेतरी असणार... फक्त लुपहोल भेटायला हवा... अर्जुन बॅटरीने ईकडे तिकडे बघत म्हणाला तसं सगळे ईकडे तिकडे शोधू लागले.

इथे कोपऱ्यात अजून एक भट्टी आहे कदाचित हा तर तळघराचा रस्ता असेल!... अर्जुन म्हणाला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all