Login

निलांती श्रापित ग्रंथाचा शोध भाग 5

तांडव निलंतीचा..
पूर्वार्ध...

विनय आणि कावेरी आले तसेच पळत सुटले. ती त्यांच्या मागे गेली. विनय पळता पळता दगडामध्ये अडकून खाली पडला.
तिने तिची काही केस उपटून खाली टाकले. केसांनी विद्रूप सापाचे रूप धारण केले आणि सापांनी त्याचे सगळे शरीर काही वेळातच खाऊन टाकले आणि तिथे फक्त त्याचा सापळा राहिला.

आता ती कावेरीकडे गेली. कावेरीकडे आता पळण्यासाठी जागा राहिली नव्हती. कारण जेव्हा त्यांनी त्या रस्त्यामध्ये प्रवेश केला होता तेव्हाच तिथून जाण्याचा मार्ग निलंतीने बंद करून टाकला होता.

ती हवेतच कावेरीच्या दिशेने जाऊ लागली.
कावेरी भीतीने थरथरत होती. तिचे शरीर घामाने भिजलेले होते. जसजशी ती जवळ यायला लागली तसं ती मोठमोठ्याने ओरडू लागली.

पुढे...

तेवढ्यातच अर्जुन तिच्या मागे गेला. आणि फोनमधला एक मंत्र वाचू लागला. त्याने ती यक्षिणीने मोठ्याने किंचाळी मारली. आणि ती समीराच्या शरीरातून निघून गेली. आणि समीरा खाली पडली.

अर्जुनने पळत जातच बेशुद्ध पडलेल्या समीराला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती उठत नव्हती. म्हणून बाटलीमधल्या पाण्याचे शिंतोडे तिच्या चेहऱ्यावर मारले. ती उठताच जोरजोरात ओरडू लागली.

अर्जुन मी आपल्या मित्रांना मारून टाकले... ती असं म्हणत रडू लागली.

अर्जुनने कावेरी जवळ जात तिला उठवण्याचा प्रयत्न केला तर ती उठत नव्हती. त्याने तिच्या गळ्याजवळ बघितले तर त्या याक्षिणीच्या हाताची नखे तिच्या गळ्यामध्ये रुतलेली होती. सोबतच तिच्या गळ्यावर काळया रंगाचे तिच्या हाताचे छोटे छोटे केस चिटकले होते. हे सर्व बघून त्याला उलटी आली.

त्याच्या डोळ्यांतून पाणी येत होते. आपला एक हट्ट सगळ्यांच्या जीवावर बेतला असं वाटतं होतं.

पण आता स्वतःचा आणि समीरचा जीव वाचवण्यासाठी त्याला इथून लवकरात लवकर बाहेर निघावे लागणार होते. त्याने म्हटलेलं मंत्र हा त्याने इंटरनेटवरून शोधून काढला होता. जिथे यक्षिणीला हरवण्याचे काही उपाय दिले होते. पण हा उपाय काही वेळच प्रभावी ठरणार होता. दहा मिनिटानंतर ती हडळ पुन्हा त्यांच्यावर हावी होणार होती. आणि हा मंत्र पुन्हा कामी येणार नव्हता.

त्याने रडणाऱ्या समीराचा हात पकडला आणि तिला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला.

अर्जुन इथे आपले मित्र आहेत. त्यांना एकटं सोडून कसं जायचे आपण... तिला त्यांना एकटे सोडून जाने जीवावर आले होते.

ते जिवंतच राहिले नाहीत तर त्यांना सोबत नेऊन सुद्धा काही फायदा नाहीये... तो जड मनाने म्हणाला. पण त्याचे मन सुद्धा त्यांना सोडून जाणे मानत नव्हते.

तु इतका निष्ठुर कसा असू शकतोस? त्यांना इथेच कसं सोडून द्यायचं? त्यांच्या घरच्यांना काय उत्तर देऊ मी? त्यांच्या मुलांना मीच नेलं आणि मीच मारून टाकले... ती मोठ मोठ्याने रडत म्हणाली.

प्लिज समीरा ही वेळ हा सगळा विचार करण्याची नाहीये. इथून लवकर बाहेर जायला हवं. बाहेर पडल्यानंतर आपण कुठला तरी उपाय शोधू... अर्जुन म्हणाला पण समीराचे मन शांत बसत नव्हते.

कसेतरी अर्जुनने तिला बाहेर ओढून काढले. पहाट झालेली होती पण अंधार अजूनही होता. त्याचा सुद्धा पाय तिथून निघत नव्हता. पण तिथून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचं होते.

आता त्याला त्या गुरुजींचे बोलणे आठवत होते. त्यांचे ऐकले असते तर आज जे बघावे लागले ते झाले नसते. त्याच्या डोळ्यांतून सुद्धा पाणी यायला लागले. वाड्याच्या बाहेरच्या दगडावर बसून डोक्याला हात लाऊन तो रडू लागला.

शेवटी तो त्याच्या घरी पोहचला समीरा सुद्धा त्याच्यासोबत घरी गेली. भीतीने घसा कोरडा पडलेला होता त्यामुळे त्याने पाण्याचा ग्लास भरुन घेतला. त्याने ते पाणी पिण्याआधी बघितले तर त्यामध्ये तेच कावेरीच्या गळ्याला असलेले केस पडलेले दिसत होते.
हे बघून त्याचे हृदयच बंद पडले. त्याने ते पाणी ओतून दिले आणि पुन्हा दुसऱ्या ग्लासने पाणी घेतले त्यामध्ये सुद्धा तेच केस दिसू लागले.

आता मात्र समीरा भीतीने ओरडली त्याने तिच्याकडे बघितलं तर तिने त्याला रात्रीचे जेवण बघायला सांगितले. रात्रीच्या भाजीमध्ये त्याच हाडळीचे काळे हात दिसत होते. समीराने घाबरून अर्जुनच्या हातातला पाणी पिण्यासाठी पाण्याचा ग्लास घेतला आणि त्यातले पाणी बघून घाबरून ग्लास फेकून दिला.

जे काही होत होतं ते त्यांच्या पचवण्या पलीकडे होते. समोर पाणी आणि अन्न दोन्ही होते पण ते समोर असून सुद्धा खाता येत नव्हते. समीरा डोक्याला हात लाऊन खाली बसली. अर्जुन सुद्धा आता भीतीने थरथरत होता.

आता एकच पर्याय आहे आपल्याकडे त्या गुरुजींकडे जाणे... अर्जुन बराच वेळ शांतपणे विचार करून म्हणाला.

रात्रीचा काळोख अधिकच गडद होत होता.
गुरुजींचं घर डोंगराच्या पायथ्याशी, जुन्या वडाच्या झाडाखाली होतं.
घराभोवती अगरबत्तीचा धूर आणि मंत्रोच्चाराचा क्षीण आवाज ऐकू येत होता.

समीरा: “अर्जुन… हेच घर ना?”
अर्जुन (थरथरत्या आवाजात): “हो… पण बघ, दार आपोआप उघडलं...”

दरवाजा आपोआप किरकिरत उघडला “किर्र्र्र” असा आवाज झाला. तसे दोघे दचकले.

आत मंद दिवा पेटलेला होता.
गुरुजी डोळे मिटून बसले होते… जणू त्यांना आधीच माहिती होतं, कोण आलंय.

गुरुजी (हळू आवाजात): “तुम्ही दोघं… त्या ग्रंथाला स्पर्श केला का?”
अर्जुन गप्प. समीराच्या डोळ्यांत अश्रू.

गुरुजींचा आवाज कडक झाला “सत्य सांगा. तो ग्रंथ निलांतीच्या थडग्याजवळ सापडला का?”

अर्जुन: “हो… पण आम्ही तो वाचलाही नाही… फक्त उघडला…”

गुरुजी उठले. त्यांचे डोळे लाल प्रकाशात चमकू लागले.
“तुम्ही जे उघडलंत, ते फक्त ग्रंथ नव्हता — तो निलांतीचा श्वास होता! आता ती तुमच्या मागे आहे…”

समीरा मागे वळली. पण दार बंद झालेलं होते.
आणि त्या दाराच्या काचेत तिचा प्रतिबिंब दिसले… पण त्या प्रतिबिंबात तिच्या चेहऱ्यावर कावेरीचं हसू होते.

प्लिज गुरुजी आम्ही तुमच्या पाया पडतो. या श्रापातून मुक्त करण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा... अर्जुन त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाला.

तुमच्या या कृत्याला मार्ग नाही. आता हे कोडं कधीच सुटणार नाही... गुरुजी म्हणाले तसं समीरा मोठ्याने रडू लागली.

प्लिज गुरुजी... तिचा श्राप आता आमच्या मागे आहे. आम्ही धड काही खाऊ शकत नाही काही पिता येत नाही... सगळीकडे तिचे विचित्र नखे आणि केस दिसत आहेत... समीरा

प्लिज गुरुजी आम्हीं जे काहीं केलं ते नकळत केलं. आम्ही स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की हे असं काही घडेल. तिच्या श्रपापासून मुक्त व्हायचा आम्हांला मार्ग दाखवा...अर्जुन.

ठीक आहे... पण हा मार्ग फक्त एकाच वेळी चालेल जर त्याच्या पुढे सुद्धा तुम्हीं सर्वजण तिथे गेलात तर काळ चक्रात अडकून राहाल... गुरुजी

म्हणजे? अर्जुनला समजले नाही.

त्यांनी पिशवीतून पाच तावीज बाहेर काढले.

हे तावीज जर तुम्हीं तुमच्या मरण पावलेल्या मित्रांच्या गळ्यात घातलं आणि तो ग्रंथ जिथे होता तिथे ठेवला तर तुम्हीं सर्व पुन्हा काळाच्या मागे जाल... गुरुजी म्हणाले तसं दोघांना आनंद झाला.

पण थांबा हे सगळे एवढे सोपे नाहीये... ते म्हणाले तसं दोघे पुन्हा घाबरले.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all