Login

निलय रहस्य-भाग ७-मोहिनी

ती अजूनही आहे त्याच्या प्रतीक्षेत...

   त्याची पहिलीच शिप कॅडेट म्हणून आलेला 24 वर्षाचा गबरू जवान. पहिली वहिली शिप तो खूप उत्साही होता. समुद्राच वेड त्याला अगदी बालपणापासूनच होत. आपली वॉचच्या आधी आणि नंतर तो आवर्जून बाहेर उभा राहायचा. त्या सळसळणाऱ्या वाऱ्याच वेड होत त्याला. सूर्योदय आणि सूर्यास्त तो न चुकता बघायचा. 
    त्याच शिप कोरल समुद्रातून ग्रेट बर्रीर रिफ पार करून जाणार होत. तो खूप उत्साही होता. तो एका महागड्या आयलँड वरून जाणार होता. ते बघायला मिळणं म्हणजे मोठ्या भाग्यच होत. मग काय तो पहाटेच उठला. आपल्या हिश्याची काम आटोपली आणि बाहेर जाऊन बसला. 
 वाहह्ह्ह्हह्ह  काय नजारा होता... एक मोठ्ठ आयलँड.. अवर्णनीय सौंदर्य.. पाहून तो भौचक्का झाला. सूर्य अगदीच वर डोकावून समुद्राला अलगद डोकावून बघत होता. निळ्याभोर मखमली चादरेने चंदेरी शॉल पांघरली होती. सूर्याचं चंदेरी लेणं समुद्रात पसरलेलं होत. जहाजा जवळच एका छोट्या पहाडावर त्याची नजर गेली. कोणी तरी उभं होत. ती एक मुलगी होती. त्याने आपल्या दुर्बिणीने तिला आणखीन जवळ करून घेतल. 
"ती उभी होती सूर्योच्या नजरेला नजर भिडवून. पांढरा शुभ्र गुडघ्यापर्यंत गवसणारा तिचा ड्रेस तिच्या मोहक कायेला अजूनच वेधक करीत होता. मोकळ्या हवेत सळसळत उडणारे तिचे केस लखलख चमकत होते. सूर्याच्या किरणाने ते अजूनच चंदेरी दिसत होते. तिचा चेहरा तो स्पष्ट बघू शकत होता. तिच्या चेहऱ्यावर कमालीचं तेज होत. अगदीच कोरीव चेहरा होता तिचा. तिला बघून तो चक्क झाला. ती एकटीच होती आजूबाजूला कोणीच नव्हत. 
   तिच्या कोमल कायेवर मन मोहल होत त्याच. किती तरी वेळ तो तिलाच बघत बसला होता. खूप लांब गेल्यावरही ती त्याला दिसत होती. जेव्हा ती दिसेनासी झाली तेव्हा तो आत जायला निघाला पण तेवढ्यातच त्याच्या चेहऱ्यावर काही तरी चमकलं त्याच्या डोळ्यांवर आणि तो अचंभीतच राहिला. बघते तर काय परत तीच होती दुसऱ्या आयलँडवर तशीच उभी होती. तोच पांढरा ड्रेस.. तेच उडणारे केस.. तीच चेहऱ्यावर लाली.. हा डोळ्यांचा भ्रम तर नव्हे ना..! त्याने डोळे चोळले आणि परत बघू लागला. पण ती तीच होती काहीच बदल नव्हता. 
   आता मात्र तिने डोळेवर करून त्याच्याकडे बघितले आणि जीवघेणी स्मित हास्य तिच्या ओठांवर आलं. उफफ्फफफ्फ बघून तो वेडपिसाच झाला आणि बाकी सगळं विसरून तिच्या प्रेमात अडकला. सकाळची दुपार झाली. वारंवार तेच होत होतं. एका आयलँडवर ती दिसेनासी झाली कि पुढच्यावर ती परत हजर असायची. आता त्यांची नजरेला नजर भिडायला लागली होती. तिच्या ओठांवरच हास्य बघून त्याला पोटात गुळगुळ व्हायच. काय करू आणि काय नाही असं त्याला वाटू लागल. उडून जाऊन तिला भेटू कि ओरडू ओरडून आपल्या भावना व्यक्त करू त्याला उमजेना. 
     मोहकतेच्या नादात तो तिची मोहनी समजू शकला नाही. त्याला हे हि कळलं नाही कि ती कशी आपोआप आपल्याला सतत दिसते आहे. आता त्याला ती थोडं थोडं जवळ येत असल्याची भासू लागली. 
आता दुपारची रात्र होत चालली होती. तो आपली वॉच सोडून भलत्या कामात लागला होता. सगळे कामासाठी त्याची वाट बघत होते पण परत यायचं तो काही नाव घेई ना.. वरिष्ठांना वाटलं पहिली पाहिली वेळ आहे जरा आनंद घेऊ द्यायला म्हणून त्यांनी हि त्याला बोलावणं घातलं नाही. 
    पण इकडे तो अश्या मोहाच्या जाळ्यात अडकला होता जिथून रात्र झाली तरी सुटका होईना. आताशा सगळे आयलँड संपले होते जहाज मिड सी मध्ये होत. हळूहळू सूर्य आपल्या गावी परतला. 
     चंद्र समुद्राच्या आरश्यात आपलं शुभ्र प्रतिबिंब बघून इतरत होता..  थंड वाऱ्याची झुळूक आणि तिच्या प्रेमाचा गंध त्याला अलगद शहारत होता... मदमस्त चंद्राच्या शीतलतेत त्यांच्या प्रेमाला मोहोर येत होती. शेकडो चांदण्या लखलखत त्या निर्वाज्य क्षणांची साक्ष देत होता. 
आजूबाजूला काळाकिट्ट अंधार असतांना ती जिथे उभी असायची तिथे मात्र लक्ख प्रकाश असायचा आणि त्यामुळे तो तिला स्पष्ट बघू शकत होता. ती त्याला अजूनच जवळ आल्याची भासत होती. अगदीच शिपच्या लगत असल्यासारखं त्याला वाटत होत. ती काय म्हणते आहे तो आता ऐकू शकत होता.. 
     ती चायनीज होती. तिच्या चायनीज बोलीतून ते त्याला कळलं होत. त्याला चायनीज येत नव्हती. ती एखाद इंग्लिश शब्द बोलायची आणि तो अंदाजे तीच बोलणं समजून घ्यायचा. 
        तो तिच्या चक्रव्यूहाच्या डोहात खोलवर अडकत चाललेला होता. हळूहळू दोघांचा संवाद वाढला. रात्र मध्यरात्रीत विस्तरली होती... 
    डोळ्यांना विश्वास बसणार नाही असा सुखद धक्का त्याला बसला आणि बघता बघता ती त्याच्या अगदी बाजूला येऊन ठाकली. काय कराव... डोळे उघडे करून तिला बघावं आपल्या कुशीत घ्यावं की चिमटा घेऊन सुखद मोहरलेलं स्वप्न तोडाव त्याला कळत नव्हत. 

हवेतील गारवा अचानक वाढला..
प्रकाशाचा झोत चक्क झाला.. 
त्याच्या हृदयाचा ठोका मधूनच चुकला...
धड्धण्याचा वेग सपाट्याने वाढला...
ती त्याच्या अगदीच जवळ होती...
त्यांच्या श्वासाची गती मंदावत होती..
दोघांच्या नजरेला नजर कडाडीने भिडली...
ती लाजत हसली... 
तो नखानीशी शहारला... 
तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला... 
त्याच्या अंगात विद्युत लहरी तरंगल्या...
तिच्या पाणीदार डोळ्यांच्या डोहात तो हळुवार बुडला...
त्याने तिच्या कमरेत विळखा टाकला...
तिने लाजून त्याच्या खांद्यावर आपला भार दिला...
त्याने तिला अलवार मिठीत घेतल... 
तिने मिठीला आणखीन घट्ट केल...
त्याच्या अंगातील रक्त सळसळ सळसळल...

       तेवढया तिने त्याच्या मानेवर जोरदार चाव घेतली आणि तो जागीच निळावला... 
      सकाळी त्याच ताठर निळावलेल शरीर इतर खलाश्यांना दिसल. त्याच्या मानेवरचा पडलेल्या दोन दातांच्या डागांनी आणि त्याच्या निळ्या पडलेल्या शरीराने न सांगताच बरच काही सांगितलेल होत. 
   त्यांनी लगेच कंपनीला फोन केला आणि माहिती दिली. शिपवर भयाच वातावरण निर्माण झालेल होत. कोणी डेकवर जाईना. बाहेर निघेना. त्याला काय झालं असाव? अचानक असं काय झाल की तो निळावला? मृत्युमुखी पडला?  मोठ्ठ रहस्यमयी कोड होत त्यांच्या पुढे अन् त्याच उत्तर हि नव्हत कोणाकडे...
    सिडनीच्या पोर्टवर पोहोचताच त्याचा मृतदेह मरणोत्तर तपासणीकरिता पाठवण्यात आला. त्याच्या शरीरात विष गेल्याचा अहवाल देण्यात आला. ते विष ना कोणत्या प्राण्याचं होत ना मनुष्याच... खूप संशोधनानंतरही ते रहस्य उलगडलं नाही. 
     पण त्या नंतरही याच आयलँडवरून जाणारे बऱ्याच जहाजावरचे कॅडेट तिच्या मनमोहक आणि वेधक सौंदर्याने बळी गेले. बरेच लोक शहाणपणा आणि सुज्ञपणा दाखवून बचावलेही गेलेत. जे बचावले गेलेत त्यांनी दुसऱ्यांना सावध केल आणि जे तिच्या जाळ्यात अडकले ते जीवाने गेलेत.. 
      जवळपासचे लोक म्हणतात कि," त. आपल्या नवऱ्यासोबत शिपवर आली होती फिरायला. दोघांच भांडण झालं आणि त्याने रागात तिला अर्ध्या रात्री शिपवरून या आयलँडच्या जवळ समुद्रात फेकल. तेव्हापासुन ती तिथे फिरत असते."
     अशीच ती रहस्यमयी चेटकीणच अजूनही समुद्राच्या खोल डोहात कधी दृष्टिआड दडते तर कधी तीरावर येऊन आपल्या मदमस्त कायेचा जादू चालविते... 
      अजूनही त्या मार्गावरून जातांना सगळे सावध असतात. काही गोष्टी अनाकलनीय आणि गुपित असतात. आपल्या धंद्या-पाण्यावर असल्या गोष्टींचा परिणाम होवू नये म्हणून काही रहस्य बंद कप्यातच गडप ठेवतात.

धन्यवाद...!
©️®️सौ. अश्विनी दुरुगकर 
     
      जवळपासचे लोक म्हणतात कि," ती आपल्या नवऱ्यासोबत शिपवर आली होती फिरायला. दोघांच भांडण झालं आणि त्याने रागात तिला अर्ध्या रात्री शिपवरून या आयलँडच्या जवळ समुद्रात फेकल. तेव्हापासुन ती तिथे फिरत असते."
     अशीच ती रहस्यमयी चेटकीणच अजूनही समुद्राच्या खोल डोहात कधी दृष्टिआड दडते तर कधी तीरावर येऊन आपल्या मदमस्त कायेची मोहिनी चालविते... 
      अजूनही त्या मार्गावरून जातांना सगळे सावध असतात. काही गोष्टी अनाकलनीय आणि गुपित असतात. आपल्या धंद्या-पाण्यावर असल्या गोष्टींचा परिणाम होवू नये म्हणून काही रहस्य बंद कप्यातच गडप ठेवतात.

धन्यवाद...!
©️®️सौ. अश्विनी दुरुगकर 
     
🎭 Series Post

View all