रहस्य कथा
विश्वासघात भाग - १
आज सोपानरावांना जरा उशिरानेच जाग आली. रात्री देवळात उशिरापर्यंतच्या भजनाने त्यांचा जीव शिणला होता. शरीर अंथरुणावरून उठायला तयार होतं नव्हतं. त्यांच्या पाठीचं दुखणं सुद्धा जास्त त्रास द्यायला लागलं होतं, तरीही उठणं गरजेचं होतं. बाहेर गोठ्यात गुरांना चारा घालणे, म्हशीचं दूध काढणे इत्यादी सर्व कामे त्यांनाच करावी लागत असे. त्यांचा त्यांच्या पत्नीशी बरेच दिवसापासून अबोला होता.
दोघेही एकमेकांशी अजिबात बोलत नसत. आपापली कामे स्वतः करायची. त्यांना लेकीचा आणि छोटा मुलगा प्रशांतचा आधार होता.
"प्रशांत! ए प्रशांत... कुठं गेला रे? उठला नाही का अजून? तुझी सकाळची शाळा आहे ना!"
प्रशांत इयत्ता सातवीत होता. लेकीने नववीची परीक्षा देऊन स्वतःच स्वतः चं शिक्षण थांबविलं होतं.
"मी शेण काढून, गोठा झाडून येतो. गिऱ्हाईक येतील इतक्यात दूध मांगाले."
प्रशांत इयत्ता सातवीत होता. लेकीने नववीची परीक्षा देऊन स्वतःच स्वतः चं शिक्षण थांबविलं होतं.
"मी शेण काढून, गोठा झाडून येतो. गिऱ्हाईक येतील इतक्यात दूध मांगाले."
रूपा तणतणतच उठली. सोपानराव रात्री दुधाच्या बादल्या स्वतःच घासून पुसून स्वच्छ करून ठेवीत. सकाळसाठी त्या कामी पडत म्हणून. रूपाने दुधाचा चहा ठेवला. प्रशांतने सुद्धा तो घेऊन शाळेची तयारी केली. शाळा गावातच होती व सकाळ दुपार अशा दुबार पद्धतीने शाळा भरली जायची.
प्रशांत अभ्यासात हुशार होता. शाळेतील शिक्षकांनी शिकविलेल्या कोणत्याही विषयाचं ज्ञान तो सहज आत्मसात करीत असे; त्यामुळे तो त्याच्या शिक्षिकेचा अत्यंत लाडका विद्यार्थी होता. त्याच्या शिक्षिकेचे तर त्याच्या विना पानही हलत नसे. सोपानराव नेहमी आपल्या मुलाची स्तुती ऐकायला एखादा चक्कर शाळेत मारीत असत. त्याची शिक्षिका सुद्धा त्याच्या वडिलांना नेहमी सांगायची.
'याची बुद्धी उत्तम आहे. उत्तम शिकेल तो.' तो होता ही तसाच शांत, संयमी... त्याच्या वडिलांसारखाच, पण अशा चांगल्या माणसाच्या आयुष्यात कृष्णविवरे असतात. कधी त्यात त्यांना इच्छेविरुद्ध पडावे लागते, तर कधी त्या भोवती विनाकारण गरगर फिरावे लागते.
'याची बुद्धी उत्तम आहे. उत्तम शिकेल तो.' तो होता ही तसाच शांत, संयमी... त्याच्या वडिलांसारखाच, पण अशा चांगल्या माणसाच्या आयुष्यात कृष्णविवरे असतात. कधी त्यात त्यांना इच्छेविरुद्ध पडावे लागते, तर कधी त्या भोवती विनाकारण गरगर फिरावे लागते.
सोपान रावांनी स्वतःला भजनी मंडळात गुंतवून घेतलं होतं. रोजचा व्यवहार करून ते संध्याकाळीच मंदिराची वाट धरित. ते गावातल्या मंडळींना सांगीत की,'तुमचं जीवन जे आहे ते वाट पाहातय की कधी तुम्ही जीवनाचा खरा शोध घेणार. आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य खडतर आहे, कठीण आहे आणि आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या वाट्याला खरोखरच संघर्षमय आणि कठीण खडतर आयुष्य आलं आहे.'
"रूपे! जेवायला काय केलं? वाढ लवकर. मले गाई म्हशी घेऊन जा लागते चाराले."
सोपानराव नेहमी त्यांच्या मुलीशी म्हणजेच रूपाशी संवाद साधित, कारण ही तसच होतं. त्यांच्या पत्नीचं लक्षण काही ठीक नव्हतं. अवलक्षणी बायको त्यांच्या पदरात पडली होती, पण ते काहीही करू शकत नव्हते; त्यामुळे घरात नेहमीच ताण तणाव असायचा .घरात कधीच शांतता नांदत नव्हती. त्याचा परिणाम आपल्या मुलावर होऊ नये याचा ते नेहमी विचार करीत. त्यासाठी ते स्वतःच शांत राहायचा प्रयत्न करत. गावात त्यांच्या या शांत व संयमी स्वभावामुळे कुणीच त्यांना काहीही बोलत नसे.
"अहो किसनराव." शामरावांनी किसनरावला आवाज दिला.
"या बसा थोडा वेळ पारावर."
"बोला! काय म्हणता शामराव."
किसनराव व इतर चार-पाच म्हातारी माणसं पारावर बसले.
किसनराव व इतर चार-पाच म्हातारी माणसं पारावर बसले.
"अहो किसनराव! तुम्हाला माहित आहे काय? सोपानरावची बायको."
"अरे नाव काढू नका तिचं. त्याच्या संसाराचं पार वाटोळं केलं आहे तिनं. अशी अवलक्षणी बायको काय कामाची. तो बिचारा, कसे तरी दिवस ढकलत आहे. बरं झालं तो संध्याकाळी भजनात जातो."
रूपाने तिच्या बापाला ताट वाढलं. रूपा सुद्धा तिच्या बापाशी कधीच चांगल्या नम्र आवाजात बोलायची नाही. आदळ आपट करीत बापाला ताट वाढून देत असे. ते सुद्धा मुकाट्याने ताटात वाढलेलं संपूर्ण जेवण जेवून झालं, की गाई म्हशींना चारायला घेऊन जात. तिकडून संध्याकाळी गुरांना चारा पाणी करून म्हशींचे दूध काढून वाटप करीत व मंदिराची वाट धरीत. त्यांच्या मनाला नेहमी काट्या सारख्या बोचणाऱ्या जखमा झाल्या होत्या. तरीही शांत मनाने ते सर्व सहन करीत होते.
सोपानराव गाई म्हशी घेऊन संध्याकाळी घराकडे निघाले, तेव्हा त्यांच्या कळपातली एक गाय भरकटली. लगेच ते त्या गाईचा मागोवा काढत तिच्या मागे गेले आणि दूर दूर चालत गेल्यामुळे ते थकले व तिथेच खाली बसले. खाली बसल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की त्यांना कसला तरी अस्पष्ट असा पुसट वास त्यांच्या नाकात शिरला आहे. त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर तिथे काहीच नव्हते. त्यांना तो वास अगदी अभद्र वाटला. त्यांना त्या वासाने शिरशिरी आली. अस्वस्थ वाटायला लागले. ते एकटेच विचारांच्या तंद्रीत चालत घरी आले. घरी नेहमीच्या सवयीने गुरे गोठ्यात शिरली होती. भरकटलेली गाय सुद्धा घरी परत आलेली होती.
त्यांनी घरी येऊन आधी थंड पाणी अंगावर घेतले. तरी तो कुबट वास त्यांच्या नाकातून जाईना! त्यांना हे जरा विचित्र वाटले. 'आपल्यालाच हा वास आला. गावकरी या रस्त्यावरून आले आणि गेले, परंतु एकालाही हा वास आला नाही! कसं शक्य आहे?' त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे गुरांना चारा पाणी करून दूध ग्राहकांसाठी विक्रीला ठेवले. त्यांचे मन कुठेच लागत नव्हते. ते तो वास विसरू शकत नव्हते. त्यांचे नाक त्या वासाने राहुन राहुन दाटून येत होते.
त्यांनी मंदिराची वाट धरली. मंदिरात गेल्यावर त्यांना शांत प्रसन्न वाटायला लागलं, पण राहून राहून त्याच वासाची आठवण यायला लागली. त्यांनी दोन्ही हात जोडून म्हंटले,'मी दररोज तुझ्या दारी येतो, भक्ती भावाने तुझे गीत गातो. तुझे गुण गान करतो, तरीही मला असा निराशेच्या गर्दीत का ढकलतोस तू?' ते देवाची आर्ततेने प्रार्थना करीत होते. समोर भविष्यात काहीतरी अभद्र घटना घडणार याविषयी त्यांच्या मनात विचार आला की ते कासावीस होत.
त्यांचा मुलगा प्रशांतवर त्यांची भिस्त होती. हा मोठा झाला, चांगल्या नोकरीवर लागला, की मी इथे मुळीच राहणार नाही. असा ते मनोमन विचार करत. प्रशांतच्या ओढीने ते घरी येत. तो जेवला का? अभ्यास केला का? अशी विचारपूस करत. तो झोपलेला दिसला की ते सुद्धा झोपी जात.
त्यांचं लक्ष रूपावर होतं. तिने स्वतःच स्वतःच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा करून ठेवला होता. घरची कामे करून दिवसभर गावात उंडारायला तिला मजा यायची.
तिची आई म्हणजे सोपानरावांची पत्नी सरला वेगळ्याच धुंदीत होती.
ती उंच पुरी गौरवर्णी, चालण्याची वेगळीच लकब असलेली, भडक मेकअप, सतत आरशात पाहून त्या आरशाला ही कंटाळा येत होता.
मस्त मनमौजी असलेली सरला संपूर्ण घराला डोकेदुखी ठरली होती.
ती उंच पुरी गौरवर्णी, चालण्याची वेगळीच लकब असलेली, भडक मेकअप, सतत आरशात पाहून त्या आरशाला ही कंटाळा येत होता.
मस्त मनमौजी असलेली सरला संपूर्ण घराला डोकेदुखी ठरली होती.
सोपानरावच्या नशिबात काय वाढून ठेवलंय पाहूया पुढच्या भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा