रहस्य कथा- निर्दयी मन भाग - ५ अंतिम
सुनीलने त्या दोघींना योजना पुन्हा समजावून सांगितली. दोघीही सुनीलच्या प्रेमात आंधळ्या झाल्या होत्या. तसेच मुख्य म्हणजे शारीरिक आकर्षण याला कारणीभूत होते.
तिघेही योग्य वेळेच्या, योग्य दिवसाच्या प्रतीक्षेत होते. आता तर सुनील रुपाला जास्तच वेळ देऊ लागला. दोघींनाही सुनील शिवाय करमत नव्हते. आईने स्वतःच्या मुलीला सुद्धा अशा घाणेरड्या प्रकरणात ओढले होते. रूपा तर आई पेक्षाही काकणभर जास्तच पुढे होती. तिला स्वतःच्या भविष्याची चिंता नव्हतीच. तिच्या आईनेच तिचं भविष्य उद्ध्वस्त करायला घेतलं होतं. तिघेही या योजनेला अंतिम स्वरूप देण्यास आतुर झाले होते.
तो दिवस बाजाराचा होता. त्या गावात आठवडी बाजार सकाळी भरायचा. सकाळी बाजाराची सुरुवात होऊन साधारणतः बारा एकच्या दरम्यान संपून जायचा. दर आठवड्याला बाजार भरत असल्यामुळे लोक आठवडाभर भाजी व इतर वस्तू या बाजारातूनच खरेदी करत. कारण तालुक्यावर जाणे त्यांना परवडणारे नव्हते. तसेही प्रत्येक खेड्यात आठवडी बाजार भरत असतो; त्यामुळे लोक आपल्याला लागणाऱ्या वस्तू त्याच बाजारातून खरेदी करतात. आठवडाभर त्या वस्तू पुरवितात आणि आहे त्या परिस्थितीत समाधानी असतात.
गावातील सगळी लहान मोठी मंडळी बाजारात जायची तयारी करू लागली. गावातल्या मोठ्या कास्तकारांकडून शेताच्या कामाची मजुरी घेऊन मजूर वर्ग सुद्धा आनंदाने बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी चालू लागला.
आठवडी बाजाराच्या दिवशी शाळा सकाळ पाळीत भरायची; त्यामुळे प्रशांत सुद्धा शाळेत गेलेला होता. आपल्या घरी काय भयंकर घडतय याची त्याला जरा सुद्धा कल्पना नव्हती. तो बिचारा आपल्या शाळेतल्या अभ्यासात मग्न होता.
बाजारात गर्दी खूप वाढलेली होती. गावात शुकशुकाट होता. जो तो आपापल्या कामात व्यस्त होता. हीच संधी सुनील, सरला व रूपाने साधली. तिघांनीही सोपानरावला घरात घेतले. दाराची कडी आतून लावली. आजूबाजूचे सर्व लोक बाजारात वस्तू खरेदी करण्यात व्यस्त होते.

तिघांनी मिळून सोपानरावला खाली जमिनीवर पाडले. त्यांची देहयष्टी अगदी किरकोळ होती; त्यामुळे ते त्या तिघांनाही विरोध करू शकले नाही.
त्यांच्या तोंडात एक मोठा कापड घातल्या गेला. सुनील त्यांचा गळा दाबणार, इतक्यात सरला व रूपाने घरातला एक मोठा बांबू त्यांच्या मानेवर मधोमध ठेवला. दोन्हीकडून दोघी त्या बांबू वर उभ्या राहिल्यात. व क्षणात तडफडत सोपानराव गतप्राण झाले.

त्यांच्या देहाकडे त्या दोघी व सुनील आसुरी आनंदाने एकटक बघतच राहिले. दुसऱ्याच क्षणाला त्यांना या देहाची विल्हेवाट लावायची आठवण झाली. बाजारातून लोक घरी यायच्या आत त्यांना हे निर्दयी कार्य संपवायचे होते.
तिघांच्याही डोक्यात सैतान संचारलेला होता. तिघांनी सोपानरावचा देह गोठ्यात नेला. आधीच खणून ठेवलेल्या खड्ड्यात त्यांना पुरले. वरून फावड्याने माती त्यांच्या देहावर टाकून एका अत्यंत घातकी कृत्याला पूर्णविराम दिला.

हे बांबू मानेवर टाकतांनाचे दृश्य सुनीलचा चार वर्षाचा मुलगा दाराच्या एका छोट्या छिद्रातून बघत होता. तो सहजच सुनीलला शोधायला आला होता. त्याला त्याच्या वडिलांसोबत बाजारात जायचे होते; त्यामुळे तो दाराजवळ आला. त्याला दार आतून बंद दिसले व आत काहीतरी गोंधळ सुरू आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने दाराच्या छोट्या छिद्रातून बघण्याचा प्रयत्न केला.
त्याला आत धक्कादायक असं दृश्य दिसलं. आत काहीतरी भयंकर घडत आहे हे त्याच्या बालमनाला समजून चुकले. त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याच्या तोंडून एकही शब्द फुटेना.तो पळतच घरी गेला.
सुनील सुद्धा लवकरच सरलाच्या घरातून बाहेर पडला. घरी गेल्यावर त्याला अंगावरील कपड्यांची ताबडतोब वाट लावायची होती. घरी गेल्यावर त्याचा मुलगा त्याला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दिसला. त्याने पाहिलेली घटना कथन केली.
आता सुनीलला घाम फुटला. याने जर तोंड उघडले तर आपले बिंग फुटेल. यासाठी त्याने त्याच्या मुलाला गप्प केले व ही घटना जर कुणालाही सांगितली तर तुला सुद्धा मारून टाकेन. या धमकीमुळे तो लहानगा जीव गप्प बसला.
प्रशांतला शाळेतून आल्यावर सरलाने जेवायला दिले व त्याच्या मामाचा निरोप सांगितला.
"तुला लवकर तुझ्या मामाने बोलाविले आहे. तेव्हा तू ताबडतोब जायला निघ."
प्रशांत तो निरोप खरा समजून मामाच्या गावाला जायला तयार झाला.
सरलाने आधीच सर्व गुरांना व म्हशींना रानात सोडले होते. कुणीही विचारले तर सोपानराव गुरं चारायला गेले याची बतावणी केली.
गोठ्यातच खोल खड्ड्यात प्रेत पुरल्यामुळे कुणालाही संशय आला नाही, परंतु या खुनाचे रहस्य बाहेर यायला वेळ लागला नाही.

चार-पाच दिवसात सोपानराव न दिसल्यामुळे गावकऱ्यांना संशय आला. रानातून गुरे घरी यायला सुरुवात झाली होती, परंतु त्यांच्या मागे सोपानराव दिसले नाही.
गावच्या पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलीस तपासात त्या चार वर्षाच्या मुलाने जे काही सांगितले ते ऐकून सर्वांना धक्काच बसला.
गावच्या पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलीस तपासात त्या चार वर्षाच्या मुलाने जे काही सांगितले ते ऐकून सर्वांना धक्काच बसला.
प्रशांत धाय मोकलून रडायला लागला. त्याच्या मामाला आपल्या बहिणीची लाज वाटू लागली. एका स्त्रीने आंधळ्या प्रेमापोटी संपूर्ण घराची राखरांगोळी केली होती. प्रशांतला त्याच्या मामाने त्यांच्या घरी नेले. तेथेच त्याचं उच्च शिक्षण पूर्ण केलं.
आज तो प्रसिद्ध डॉक्टर म्हणून नावारूपाला आला. त्याच्या आवडत्या शिक्षिकेला सुद्धा त्याच्या डॉक्टर होण्याचा अतिशय आनंद झाला.
समाप्त...
छाया राऊत
अमरावती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा