ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
" मी आता ही सगळी प्रॉपर्टी आश्रमात दान देणार आहे. प्रत्येक जण त्याच तो बघेल. मग... तुझं काय? तू काय करणार आहेस?" नानांनी स्पष्टपणे तिला विचारले
टीम श्रावणी
" मी आता ही सगळी प्रॉपर्टी आश्रमात दान देणार आहे. प्रत्येक जण त्याच तो बघेल. मग... तुझं काय? तू काय करणार आहेस?" नानांनी स्पष्टपणे तिला विचारले
" नाना... तुम्ही सगळी प्रॉपर्टी दान द्या पण मला माझा हिस्सा द्या. सगळेजण सेटल झालेत परंतु, मी अजून झाले नाही. त्यामुळे वडील म्हणून माझ्याप्रती असलेलं तुमचं कर्तव्य अजून पूर्ण झाले नाही." सान्वी अगदी मोठ्या ज्ञानी माणसासारखे बोलत होती.
" बरं... ठीक आहे. जा तू बाहेर आता." नानांनी सांगताच सान्वी पुन्हा मोबाईल बघत बाहेर निघून गेली.
" पाहिलेस का राजश्री... आपली मुले मुली कसे आहेत ते. गर्व होता गं मला आपल्या संस्कारावर, आपल्या पालकतत्वावर. पण नाही... गर्व काय तर साधा अभिमान देखील वाटत नाही आता मला यांच्यावर. सगळं काही गळून पडले बघ काळाच्या ओघात. असो... तू सुटलीस या पीडेतून राजश्री. सुटलीस गं... मी मात्र अडकलो इथेच." भरल्या डोळ्यांनी नाना राजश्रीच्या फोटोकडे पाहत होते. गालावर अश्रुंचे ओघळ आले तसं त्यांनी हलकेच ते पुसत स्वतःला सावरले.
" नानाss वकील काका आलेत." स्वर दारातूनच ओरडला.
" ये ये... गोपाळा... कसा आहेस?" नाना बाहेर हॉलमध्ये आले. त्यांचे मित्र तथा पेशाने वकील असलेले तत्वनिष्ठ असे गोपाळ राजवाडे गृहस्थ नानांच्या समोर हसतमुखाने उभे होते. नानांना बघताच ते पुढे आले. नानांनी लगेच त्यांना आलिंगन देत विचारपूस केली.
" मी ठीक आहे. तू कसा आहेस? झाली का मग मनाची तयारी तुझ्या? बोलायचं ना?" गोपाळ यांनी एकावर एक प्रश्न विचारले.
" हम्म..." नानांनी सगळ्यांकडे पाहिले.
" तर... मी गोपाळ राजवाडे. तुमच्या वडिलांचा वकील. आज इथे मी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि माझ्या अशिलाच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन करणार आहे."
" नानाsss अहो कशाला?"
" रचना..." रचना भावूक होऊन नानांना काही बोलणार तेवढ्यात नानांनीच तिला हात दाखवून थांबवले. नानांनी गोपाळ यांना पुढे बोलण्याचा इशारा केला.
" तर... मी आता सुरुवात करतो. कृपया तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते माझं वाचन पूर्ण झाल्यावरच बोला. सगळ्यांना नंतर बोलण्याची संधी दिली जाईल. ठीक आहे. तर मी आता वाचन करतो. मी खाली सही करणारा सदाशिव रावले. पूर्ण शुद्धीत माझे मृत्यूपत्र तयार करत आहे. माझ्या एकूण संपत्तीची मी वाटणी करत आहे. सगळ्यात आधी माझं हे राहतं घर. हे घर मी वाचनालयाला दान देत आहे. दिनांक १ पासून ह्या घराचा ताबा त्यांना देण्यात यावा. त्यांनतर वडिलोपार्जित मला मिळालेली चाळ ही आधार बालश्रमाला देण्यात यावी. माझी शेती ही आधार वृद्ध आश्रमाला देण्यात यावी तसेच माझे गावाकडचे घर देखील ह्या एक तारखेला आधार आश्रमलाच देण्यात यावे. माझी जी काही दुकाने आहेत ती दुकाने ही माझ्या चारी मुलांना म्हणजे, राघव रावले, रचना मोरे, स्वर आणि सान्वी रावले यांच्यात समांतर वाटून द्यावी. हे मृत्यूपत्र मी माझ्या पूर्ण शुद्धीत आणि माझ्या इच्छेने लिहीत आहे. त्यासाठी माझ्यावर कोणी दबाव किंवा जबरदस्ती केली नाही. खाली सही सदाशिव रावले.
गोपाळ यांनी पूर्ण मृत्यूपत्र वाचून दाखवले. ते ऐकून राघव आणि स्वर दोघेही भयंकर संतापले होते. हातच्या आवळलेल्या मुठी आणि रागाने लाल झालेले डोळे यावरून त्यांच्या रागाचा अंदाज नानांना येत होता. नानांनी घरातील इतर सदस्यांकडे पाहिले. नीला तर त्याच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत होती. सान्वीच्या देखील चेहऱ्यावर रागाची छटा उमटली होती. रचनाचा देखील चेहरा उतरला होता.
" कोणाला काही बोलायचं आहे का? ह्या एक तारखेला आश्रम आणि वाचनालय वाले येऊन सगळ्या गोष्टीचा ताबा घेतील. त्यानंतर मी देखील त्याच आश्रमात राहायला जाणार आहे. कायमचा." नाना शांतपणे बोलले.
" आश्रमाला शेती, घर, चाळ सगळंच काय द्यायची गरज आहे नाना?" स्वर चिडक्या आवाजात बोलला.
" गरज आहे. एकतर मी त्याच आश्रमात यापुढे वास्तव्य करायला जाणार आहे. त्यासाठी लागणारी पैशाची तरतूद मी याच दान दिलेल्या वास्तू मधून करणार आहे. आणि ह्या घराचं म्हणशील तर, माझी खूप आधीपासून इच्छा होती की आपल्या शहरात एखादं तरी वाचनालय असावे. परंतु, ते कधी झालेच नाही. म्हणून मग मीच हे घर सरकारला दान देऊन इथंच वाचनालय काढायला सांगितले. वडील या नात्याने कर्तव्य म्हणून तुम्हाला तुमच्या संसाराला हातभार लागावा त्यासाठी दुकाने तुम्हां सर्वांना समान वाटून देत आहे." नाना एवढं बोलून शांत झाले.
" वाह नाना वाह! काय तर म्हणे कर्तव्य? हे असं कर्तव्य? अहो सरळ सरळ भिकेला लावलं तुम्ही आम्हां सगळ्यांना. समुद्राएवढ्या प्रॉपर्टीमधून वाटीभर पाणी आमच्या ओंजळीत टाकले आणि म्हणताय संसाराला हातभार लागेल. असा कसा सूड उगवला आमच्यावर हो नाना तुम्ही? इतकेच जर आम्ही तुमच्या डोळ्यांत खुपत होतो तर जन्माला तरी कशाला घातले आम्हाला? कशाला वाढवलं? मुद्दाम असं वागत आहात ना नाना तुम्ही आमच्या सोबत. मुद्दाम ना..." राघव प्रचंड चिडला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा