Login

निर्णय घेतांना

Story view gives direction to the girls and boys, how to be more careful while taking decesion about their marriage.

काय ग रेवा काय ठरवलेस तू ह्या स्थळाचे ??अग काकांचा सकाळीच फोन आलेला. लवकर ठरवा म्हणाले,  पुढे जायचे की नाही कारण मंदार चा तर होकार आहे पण तरीही त्याची एक दोनदा  बाहेर भेटायची इच्छा आहे मगच ठरवू म्हणतोय .  मेघा म्हणजेच रेवाच्या आईने विचारलं. 

काय ग आई मला तर हसूच येते बर ह्या काकांचे अन तितकाच रागही . अग मध्यस्थी केली म्हणून ते आपल्याला घाई नाही करू शकत. अग मंदार अन त्याच्या घरचे येऊन गेले मला पाहायला त्याला फक्त पाच  दिवस  झालेत. इतका महत्वाचा निर्णय मी असा घाईत नाही घेणार. यावर रेवा जरा वैतागून  म्हणाली. 

बरं त्यांचे सोड पण मला तरी कळू दे माझ्या लेकीचा डोक्यात काय शिजतय.कारण पाहुणे आले त्यादिवशी तर तू मला खूष दिसली सो मला वाटले की तुला मंदार आवडला .मेघाने विषय समजूतदारपणे घेत  विचारलं. 

हो ग. मंदार अन त्याचे कुटुंब सर्व छान वाटले मला.त्यात तिळमात्र ही शंका नाही.अगदी मनाप्रमाणे आहे सर्व. पण तरीही.... रेवा  

मेघा जरा गोंधळलेल्या चेहऱ्याने रेवा कडे पाहत होती. 

हे पाहून रेवा तशीच उठली,  ठीक आहे तू बस मी आपल्याला  छान अद्रकचा चहा बनवून आणते मग आपण निवांत बोलू.मला ही तुला विश्वासात घेऊनच  सर्व करायचे आहे.  ती मेघाचा उत्तराची प्रतीक्षा न करता किचन मध्ये पळाली .

तर ही, रेवा उच्चशिक्षित  अन चांगल्या कंपनीत नोकरीही करत होती.आधुनिक विचाराची एक सक्षम मुलगी. आता तिच्या  आईचा आग्रह होता की तिने लवकरात लवकर लग्न करावे. रेवाला लग्न करायचे पण सर्व नीट पडताळणी करुन.पण तिचा मनात थोडी जास्तच भीती होती लग्नाची, काही आजूबाजूच्या अनुभव ऐकून,  पण कसे सांगावे आईला  हे मात्र समजत नव्हते. 

काहीच मिनिटात रेवा ने मस्त वाफाळत्या  चहाचे दोन कप आणले अन पुढ्यात ठेवले. तशी रेवा पुढे बोलू लागली. आई तुला साक्षी आठवते का माझ्याच ऑफिसमध्ये होती. तिचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. सासर अगदीच श्रीमंत पण तरी ती उदास असायची. कारण पैसा भरपूर पण समाधान शून्य. तिच्या नवऱ्याला बऱ्याच वाईट गोष्टींचा नाद होता,वेळप्रसंगी  तिला मारझोड करायचा.  किती मोठी फसवणूक. पण साक्षी अगदी कात्रीत सापडली होती की तिचा घरच्याना कसे सांगावे, तिच्या नंतर लहान बहीणही आहे लग्नाच्या वयाची.  कारण साक्षीचे लग्न तिचा माहेरचा लोकांनीच जुळवून अगदी थाटामाटात केले होते. पण आता मात्र तिने खंबीरपणे त्याच्यापासून विभक्त  होण्याचा निर्णय घेतलाय. कधीकधी तर ती तिच्याच लोकांना लग्नासाठी घाई केली म्हणून दोष देते तर कधी स्वतःच्या नशिबाला.खरंच  आपण  भावनिक होतो अन आपल्याप्रमाणे सर्वांना चांगलेच मानतो.कोणत्याही नात्यात आपण प्रामाणिक अन एकनिष्ठ असलो म्हणजे समोरचाही असावा इतकीच माफक अपेक्षा असते ग. पण बऱ्याचदा काही अनपेक्षितच घडते. हल्ली एकतरी बातमी असतेच पेपर मध्ये अशाप्रकारचा फसवणूकी बाबत. 

अग पण सर्वानाच असे वाईट अनुभव येतील असे नाही रेवा.हे बघ मंदारचे म्हणशील तर चांगले शिक्षण आहे,नोकरी आहे, सेटल आहे.  त्याच्या घरचे लोकही समजदार वाटले. पाहिजे तर आपण त्यांच्याबद्दल अजून चौकशी करू मग तर झाले. 
पण मग साक्षीचे ऐकून तू काय ठरवले???
रेवा आई 

होग तू अन बाबा त्याची अजून चौकशी कराच. पण आई आपण त्यांच्याबाबत विचारलं तरी नात्यातले लोक कितपत खरे सांगतात यात जरा मला शंकाच वाटते.शेवटी काही मर्यादा येतातच.

म्हणजे??  

अग तुला आठवते का निशूताईला सासरी जरा जास्तच  त्रास होता सुरुवातीला तर तिचीच आत्या म्हणाली होती तुला की अहो मला माहित होते ते लोक पण सर्व ठरत असतांना  आपण काय अन कसे सांगणार. हे असेच होते बऱ्याचदा नातेवाईक फक्त  बघ्याची भूमिका स्वीकारताना दिसतात. 
म्हणूनच मी निर्णय घेतलाय की आपण त्यांना थोडासा सावकाश पण योग्य असा निर्णय सांगू.हे स्थळ आपल्याला प्रथमदर्शनी योग्य वाटलेना,  मग मी सुद्धा  त्यांची जरा माहिती काढेल मगच योग्य काय ते ठरवेल. मला लग्न झाल्यावर ना तुम्हाला अन ना नशिबाला दोष द्यायचा... अन एक माझ्या मनाला समाधान तर राहील की मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडताना सतर्क होते. अग एखादी वस्तू  विकत घेताना आपण किती चोखंदळ असतो तर हा तर आयुष्याचा इतका महत्वाचा निर्णय आहे.  बाकी भविष्यात काय असेल ते असेल पण स्वतःचे समाधान महत्वाचे. संसार करतांना अनेक  अडचणी येतातच पण त्यावर मात करण्यासाठी योग्य जोडीदार असावा सोबतीला मग करावी लागणारी  तडजोडही सकारात्मक वाटते. आजचा काळात जोडीदार फक्त शिक्षित नाही तर सुशिक्षित हवा. मीही सक्षम आहे की माझ्याबाबत निर्णय घेताना मीही तितकीच जबाबदारी घ्यायला हवी. 

बरं बाई तुला हवे तसे कर पण जरा सांभाळून, तुझ्या आयुष्याचा निर्णय आहे हा. मीही सहमत आहे कारण प्रत्येकजण वरवर चांगलेच बोलतात, नव्याचे नऊ दिवस. बऱ्याचदा लग्नानंतर काही गोष्टी  लक्षात येतात , जोडीदाराचा  स्वभाव, काही व्यसन असेल तर तेही अन बरेच काही,  "व्यक्ती तितक्या प्रकृती". 
 अन त्या लोकांना कळाले तर ग?? 

हो ग आई. मी काळजीपूर्वक करेल सर्व. कळाले तरी जर ते निर्मळ  मनाचे असतील तर त्यांना आनंदच होईल की,  फक्त भावनिक नसून किती प्रॅक्टिकल  विचारांची सून  मिळाली म्हणून. अन आई ज्याअर्थी मंदार आधी भेटून निर्णय घेउ म्हणत आहे तिथेच थोडे आमचेही विचार जुळतात की...रेवा  जरासे लाजूनच म्हणाली... 

बरं बाई. मेघा ही हसूनच म्हणाल्या. 

मग काय रेवाने लगेच तिच्या कंपनीतल्या ऍडमिनला कॉल केला. ते सर नेहमी तत्पर असायचे कुणालाही सहकार्य करायला. तिने मंदार जिथे नोकरी करतो त्या कंपनीची काही जुजबी माहिती दिली त्यांना अन त्याचे तिथली वागणूक कळावी इतरांसोबत ह्या हेतूने. मग काय सरांनीही लगेच ऍडमिन डिपार्टमेंट ला कोण आहे  वगैरे लिंक लावली.योगायोगाने त्यांच्या ओळखीचे सर भेटल्याने  तिथे आवश्यक ती थोडीफार माहिती मिळवली अन तो कष्टाळू, कामाप्रति प्रामाणिक आहे, हे ही तिला यातून समजले. फेसबुकवर काही कॉमन फ्रेंडलिस्ट वगैरे चेक करुन तिला बऱ्यापैकी माहिती मिळाली.त्याच्या कुटुंबाचीही घराच्या आसपास चौकशी केली.  जेव्हा सर्वच तिला ठीक वाटले तेव्हाच तिने होकार कळवला.
You are the artist of your life.... 
Don't give your paint brush to another... 

त्यानंतर रेवा अन मंदार दोघांनीही सहमतीने   लग्नाची तारीख थोडी उशिराची ठरवली होती जेणेकरून एकमेकांना एकमेकांची स्वप्न, अपेक्षा, स्वभाव समजून घेता येईल.काही दिवसातच त्यांचा विवाह  आनंदात पार पडला. आज लग्नाच्या अनेक वर्षांनीही त्यांचा संसार सुखाने चालू आहे. 


ही एक काल्पनिक कथा आहे ???? पण प्रत्यक्षात जर काही समस्या असेल तर ती नक्कीच लक्षात येते. म्हणूनच  केवळ घरचांनीच नव्हे तर मुलामुलींनी ही प्रत्यक्ष विवाह पूर्व भेटीत योग्य असा संवाद साधला तर नक्कीच व्यक्तीचे विविध पैलू उलगडायला मदत होते व योग्य निर्णय घेता येतो.  फक्त मुलांचे, मुलींचे  वय झाले किंवा श्रीमंत, देखणे स्थळ आले म्हणून लगेच लग्न लावून  न देता दोघांनीही योग्य अशी शहानिशा करूनच नाते जुळवले तर कदाचित फसवणूक अन परिणामी होणाऱ्या आत्महत्या  कमी होतील.आतातर विवाहपूर्व समुपदेशन करतात , काहीजणतर रक्त तपासणीही करून घेतात. 
नाहीतर पश्चाताप करण्यापलीकडे काही उरत नाही हातात. 

एक सेल्फी काढताना  आपण चार वेळा ओके आलाय का हे तपासून पाहतो. मग आयुष्याचे काय?? आपण चुकतोय की वेळ मारून नेतोय हे कसे तपासणार? प्रत्येकाने ताळा (क्रॉसचेक ) करायची सवय लावली पाहिजे. सेल्फी काढतांना करतो तसे स्वयंनिर्धारण आयुष्यात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचेही केले पाहिजे.त्यासाठी आपणच अनुभवाद्वारे मापदंड ठरवून निर्णय घेऊ... 

जगण्याच्या या लढाईत सतर्क राहून 
आनंदी जगता आले पाहिजे......
हास्य अन अश्रूचा संगम साधून, 
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे....

0