"केशव , उठ ना. बघ ना , आई अजूनपर्यंत आल्या नाहीत. नऊ वाजायला आले. नेहमी तर आठपर्यंत येऊन जातात. गेल्या दोन–तीन दिवसांपासून रोज अर्धा तास उशीर करतात , पण आज तर एक तास झाला, अजून काही पत्ता नाही."शुभी चिडून म्हणाली.
"अरे, कुठे जाणार … येईल आता.तू नको काळजी करू." केशव म्हणाला.
"का नको करू? अजून नाष्टाच तयार नाही. बाकीचं सगळं काम पडून आहे. कामवालीही आली नाही. आता मी काम बघू की ऑफिसला जाऊ? माझ्या ऑफिसची वेळ होतीये , आणि माझं टिफिन–नाष्टा काहीच तयार नाही. कसला हा निष्काळजीपणा!" शुभी संतापून बोलली.
केशव म्हणाला— "मी मदत करतो. नाहीतर तुला उशीर होईल."
"माझ्या मदतीच सोड. आधी तुझ्या आईची काळजी घे. कुठे जातात आजकाल? आजच विचार त्यांना!" शुभी म्हणाली.
"कुठे जाणार? बहुतेक कोणाशी बोलण्यात गुंतली असेल …"
"काय माहिती ! आजकाल कुणावरही भरवसा ठेवता येत नाही. तरुणांची सोड, म्हाताऱ्यांचेही वेगळे लहरे असतात." शुभी टोमणा मारत म्हणाली.
"काय माहिती ! आजकाल कुणावरही भरवसा ठेवता येत नाही. तरुणांची सोड, म्हाताऱ्यांचेही वेगळे लहरे असतात." शुभी टोमणा मारत म्हणाली.
"काय म्हणायचंय तुला?" केशव चिडून बोलला.
"मी काहीच नाही म्हणत. पण तुझ्या आईला विचार, काय चाललंय त्यांचं."
ही चर्चा सुरू होती शारदाबाईंबद्दल. नवऱ्याच्या निधनानंतर त्या गावाहून शहरात मुलगा–सूनेबरोबर राहायला आल्या होत्या. "गावात एकटी कशी राहशील…" म्हणून केशव त्यांना घेऊन आला होता.
शारदाबाई आल्यापासून हळूहळू घरातील सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर येत गेली. केशव –शुभी दोघेही मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होते.
वंश हा त्यांचा तीन वर्षांचा नातू – त्याला प्लेस्कूलला सोडणे –आणणे याची जबाबदारीही शारदाबाईंकडेच होती.
वंश हा त्यांचा तीन वर्षांचा नातू – त्याला प्लेस्कूलला सोडणे –आणणे याची जबाबदारीही शारदाबाईंकडेच होती.
पूर्वी घरात कामवाली आणि वंशला सांभाळणारी फुल टाइम मेड होती. पण एकामागून एक सगळ्यांना काढून टाकण्यात आलं. आता फक्त भांडी–साफसफाई करणारी येत होती. बाकी सर्व काम शारदाबाई करत होत्या .
घर आहे, मुलगा–सून आणि नातू आहेत, या प्रेमळ भावनेतून त्या एकाही गोष्टीची तक्रार करत नव्हत्या. पण प्रेम, आदर, सन्मान — काहीच मिळत नव्हतं. सुनेला त्यांच्याकडून फक्त कामाचीच अपेक्षा होती. आणि मुलगा सुद्धा तसाच झाला होता.
एके दिवशी शुभी फोनवर हसत बोलत होती. शारदाबाईंने ते ऐकला आणि तिच्या बोलण्याने त्यांचे मन चिरून निघाले.
"आता तर फार आराम झालाय. वंशची काळजी नाही. केशवची आई सगळं छान पाहते. म्हणूनच त्यांना गावाहून आणलं. पैसा पाठवण्याचा त्रास नाही, कामवाल्यांना पगार नाही, आणि घरही छान चालतंय. आणि वंशपण नीट सांभाळाला जातो . फुल टाइम मेडच मिळाली नि तीही फुकटात! नाहीतर या मेड्सच्या नखऱ्यांनी जीव हैराण झाला होता…"
हे ऐकून शारदाबाईंच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी स्वतःला पूर्णपणे निरर्थक समजलं. मुलगा–सूनेसाठी त्या फक्त एक "मेड "
होत्या.
होत्या.
सकाळी त्या वंशला प्लेस्कूलमध्ये सोडायला गेल्या होत्या , पण परत यायला उशीर झाला. आणि घरात त्या आल्या तर…
"अगं आई, कुठे होती ? आम्ही किती टेन्शन घेतलं!" केशव म्हणाला.
शारदाबाई म्हणाल्या—" काळजी तर करणारच ना… कारण अजून घरचं काम झालं नाही."
"आई, हे काय बोलणं झालं? मला वाटलं रस्ता चुकली की काय …" केशव म्हणाला.
"मला आनंद झाला, मुला, की तुला तुझ्या म्हाताऱ्या आईची इतकी काळजी आहे. पण… आता हे घर तुम्ही बघा. मी निघते."
"निघते? पण कुठे? का?" दोघे एकदम ओरडले.
शुभीचा चेहरा उतरला .
कारण शारदाबाई गेल्या तर घर, वंश आणि सगळं काम तिच्यावर येणार होतं.
कारण शारदाबाई गेल्या तर घर, वंश आणि सगळं काम तिच्यावर येणार होतं.
केशव घाबरून म्हणाला, "मग कुठे जाणार आहे ? गावात घरही नाही राहिलं. एकटं कसं राहणार?"
"तू त्याची काळजी करू नकोस. माझी राहणं–खाण्याची सोय झाली आहे."
"कुठे?" केशव चकित झाला.
"एका डे–केअरमध्ये मला काम मिळालं आहे. चांगलं पगार देतील आणि राहणं–जेवणही आहे. उद्यापासून मी तिथे जाणार आहे.आणि हा निर्णय मी स्वतःसाठी घेतला आहे."
"आई! तु डे–केअरमध्ये काम करणार? लोक काय म्हणतील? माझी इज्जत…" केशव ओरडला.
शुभीही म्हणाली, "आम्हाला सांगितलं असतं तर… तुम्ही इथेच रहा. लोक काय म्हणतील…"
शारदाबाई शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या —
"शुभी,काम म्हणजे काम. आणि तिथे मी माणूस म्हणून राहीन. इथे जशी फुल टाइम मेड होते तसे नाही. ठरलेल्या तासाचं ठरलेलं काम."
"शुभी,काम म्हणजे काम. आणि तिथे मी माणूस म्हणून राहीन. इथे जशी फुल टाइम मेड होते तसे नाही. ठरलेल्या तासाचं ठरलेलं काम."
शुभीच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
"आणि हो! तुमची बदनामी मी होऊ देणार नाही. म्हणूनच दुसऱ्या शहरात जाणार आहे. जिथे तुम्हाला कुणी ओळखत नाही."
हे बोलून त्या त्यांच्या खोलीत गेल्या.
केशव आणि शुभी स्तब्ध उभे राहिले.
"पालकांचे प्रेम निःस्वार्थ असते,पण त्यांचा सन्मान ठेवणे ही मुलांची जबाबदारी असते."
समाप्त.
©®निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा