निरोप तुला देतांना ,त्रास काही होत नाही.
काळातून वर्ष एकच निखळतं...
ऱ्हास कसलाच होत नाही.
निरोप तुला देतांना...१
काळातून वर्ष एकच निखळतं...
ऱ्हास कसलाच होत नाही.
निरोप तुला देतांना...१
रूप नववर्षी रेखाटतांना ,छटा काही दिसत नाही.
संकल्पाचं धूसर चित्र विखुरतं...
ध्यास ध्येयाचा उमटत नाही.
निरोप तुला देतांना...२
संकल्पाचं धूसर चित्र विखुरतं...
ध्यास ध्येयाचा उमटत नाही.
निरोप तुला देतांना...२
आठवणी कुरवाळून ठेवतांना,जागा आखता येत नाही.
मृगजळातून शल्य विरहाचं चकाकतं...
व्यास भेटीचा मोजता येत नाही.
निरोप तुला देतांना...३
मृगजळातून शल्य विरहाचं चकाकतं...
व्यास भेटीचा मोजता येत नाही.
निरोप तुला देतांना...३
निरोप तुला देतांना ,आरोप प्रारब्धाला देत नाही.
संचितातून तृण मिलनाचं बहरतं...
श्वास जन्माचा ओळखता येत नाही.
निरोप तुला देतांना...४
संचितातून तृण मिलनाचं बहरतं...
श्वास जन्माचा ओळखता येत नाही.
निरोप तुला देतांना...४
©®पूनम तावडे लोखंडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा