निसर्गाची शिकवण

Short Marathi Story

निसर्गाची शिकवण

निसर्ग आपल्याला जीवनात बरेच काही शिकवतो फक्त डोळे उघडे ठेवून आपण ते शिकले पाहिजे.हेच बघा ना निसर्ग त्याच्याकडे असणाऱ्या सर्वच गोष्टी भरभरून देत असतो. त्या बदल्यात तो कोणतीही अपेक्षा करत नाही. त्याचप्रमाणे आपणही आपण देऊ शकतो तेवढं आपल्या प्रियजनांना जरूर द्यावे त्याबदल्यात त्यांच्याकडून अपेक्षा नसावी, बरोबर ना! पण थांबा
निसर्ग पुढेही बरेच काही शिकवतो
निसर्ग जरी काही मागत नसला तरी त्याने दिलेल्या गोष्टींसाठी आपण नेहमीच ऋणी असले पाहिजे. निसर्गावर प्रेम करून त्याची काळजी घेतली पाहिजे.त्याला नुसतेच ओरबडले तर प्रलय निश्चित आहे.
याचे प्रत्यक्ष उदाहरणे आता आपल्या समोर येऊ लागले आहे.
त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये समोरच्याला आपण काही देऊ शकलो नाही तरी जो आपल्याला देतोय त्याचा आपण आदर ठेवला पाहिजे.त्याला समजून घेतले पाहिजे त्याला नुसतेच ओरबडून चालणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.कारण कधी ना कधी प्रत्येकाच्या सहनशीलतेचा अंत होतो.
*******??*******
सुजाता इथापे