नि:शब्द सांजवेळ
अस्तास सूर्य जाई
गंधाळल्या उन्हाला
अंधार भेदू पाही
अस्तास सूर्य जाई
गंधाळल्या उन्हाला
अंधार भेदू पाही
नि:शब्द सांजवेळ
परतुनी जाय पक्षी
गंधाळल्या अवेळी
खुपसून चोच वक्षी
परतुनी जाय पक्षी
गंधाळल्या अवेळी
खुपसून चोच वक्षी
नि:शब्द सांजवेळ
मन दंग आठवात
गंधळल्या मनात
निःशब्द प्रेमगीत
मन दंग आठवात
गंधळल्या मनात
निःशब्द प्रेमगीत
नि:शब्द सांजवेळ
ओठांवरील नक्षी
गंधाळली जुईही
आहेच मूक साक्षी
ओठांवरील नक्षी
गंधाळली जुईही
आहेच मूक साक्षी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा