निवांत क्षण हा हवाच...भाग 1

Nivant kshn ha hawach
निवांत क्षण हा हवाच...भाग 1

आपल्या आजूबाजूला अश्या कितीतरी स्त्रिया असतात ज्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.
घर,ऑफिस, संसार, मुल यातच त्या गुंतल्या असतात. त्यांना स्वतःसाठी निवांत क्षण नसतोच. त्या स्त्रियांमधली एक आहे निलांबरी.
 
सकाळचा पाचचा गजर वाजला, निलू उठून किचन मध्ये गेली. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा रेडी करून तिने स्वतःसाठी चहा टाकला.

बाकीची मंडळी उठायची होती. 

'आता थोडं निवांत बसून चहा घेऊया.' असं मनात बोलून हातात कप घेऊन निलू बाल्कनीत जाऊन बसली.

चहाचा पहिला घोट घेणार तोच नवऱ्याने आवाज दिला.

“निलू माझा टॉवेल दिसत नाही.”

निलूने हातातला कप टिपायवर ठेवला आणि खोलीत गेली.

नवऱ्याला टॉवेल दिला त्यांनतर त्याचा शर्ट पॅन्ट, रुमाल, पॉकेट, ऑफिस बॅग सगळं काढून ठेऊन किचनमध्ये गेली.

डबा पॅक केला आणि खोलीत आणून ठेवला. 

तोवर सासूबाई जाग्या झाल्या.

“सुनबाई चहा आण.” 

निलूने सासूबाईला चहा दिला.

मुलं उठली, त्यांचं आवरून होईपर्यंत पुन्हा तासभर गेला.

निलू पुन्हा बाल्कनीत आली.

टिपायवर लक्ष गेलं. कप तसाच ठेवलेला होता. चहा थंडगार झाला होता. निलूने  तो चहा बेसिन मध्ये ओतला  आणि दुसरा चहा टाकला तो कप घेऊन बसली तर फोनची रिंग वाजली.

क्रमशः

🎭 Series Post

View all