निवांत क्षण हा हवाच...भाग 3 अंतिम
निलांबरीच्या लग्नाला दहा वर्षे झाली. लग्नानंतर नवरा, सासू-सासरे बाकीच्यांच करण्यात वेळ गेला. घरी वेळ देता यावा म्हणून नोकरी सोडली. त्यांनतर मुलांचं करण्यात वर्ष गेली, निलू विचारात पडली.
'खरंच या दहा वर्षात मी स्वतःसाठी असं काही केलंच नाही. स्वतःला कधी वेळ दिला नाही, स्वतःचे छंद जोपासले नाहीत, कधी मैत्रिणी सोबत बाहेर फिरली नाही. कधी अशी निवांत बसली सुद्धा नाही.'
निलूने हातातला अल्बम ठेवला, उठून तयार झाली.
पार्लरमध्ये गेली मस्त मेकओव्हर करून आली आणि शैलाला फोन करून सांगितलं.
“शैला आय एम रेडी.” निलू
“अरे वा, भेटू मग उद्या.” शैलाने फोन ठेवला.
रात्री जेवताना निलूने सगळ्यांसमोर विषय काढला.
“मी उद्या मैत्रिणीसोबत बाहेर जाणार आहे.”
“अस अचानक आणि कशाला? काय गरज आहे? निलूचा नवरा चिडून बोलला.
“गरज म्हणून नाही, या दहा वर्षात मी कधीच कुठे बाहेर गेली नाही की कधी स्वतःसाठी काही केलं नाही. मी स्वतःसाठी जाणार आहे. मी कुणालाही विचारत नाही आहे तर सांगत आहे की मी उद्या दिवसभर घरी नसणार आहे तर माझ्यामागे सगळ्यांनी स्वतःची कामे करून घ्यावी उगाच माझी वाट बघत बसू नये.” असं बोलून निलू तिथून निघाली.
दुसऱ्या दिवशी निलूने तिच्या जुन्या बॅगमध्ये ठेवलेला जीन्स काढला. फिट होईल की नाही या विचारात घातला आणि तो परफेक्ट बसल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद उसळला.
छान तयार होऊन निलू बाहेर पडली.
सगळ्या मैत्रिणी जमल्या, आधी शॉपिंग झालं,धमाल मस्ती झाली. पार्कमध्ये निवांत बसल्या, सुख दुःख शेअर केले. मग पिक्चर आणि खाणं पिणं झालं. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं.
निलूला घरी येईपर्यंत रात्र झाली. घरी आली तेव्हा सगळे झोपले होते.
निलूला घरी येईपर्यंत रात्र झाली. घरी आली तेव्हा सगळे झोपले होते.
आज खूप दिवसांनी निलूला रिलॅक्स वाटतं होतं. समाधानी झाल्यासारखं वाटतं होत.
तिला स्वतःला फ्रेश वाटलं.
तिने मैत्रिणीसोबत घालवलेले निवांत क्षण तिला नवी उर्मी देऊन गेले.
आणि ती स्वतःलाच बोलली.
“खरचं आयुष्यात निवांत क्षण हा हवाच.”
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा