नियती - एक भयकथा - भाग 19

Horror

नियती 
भाग 19
आम्ही नुकतेच आश्रमातून बाहेर आलो आणि पुन्हा तिचा आवाज यायला लागला..
मंदाकिनी : तुला काय वाटत रे हा वाचवेल तुला ? हाहा गैरसमज आहे तुझा ..तुला आता कोणीच वाचवू शकत नाही माझ्यापासून 
लाला तर गाडीच्यामागेच जाऊन लपला ..तो खूप घाबरलेला दिसत होता ..मी त्याला हाताने धरून उठवलं ..
मी : लाला चल रे बस गाडीत ..गाडी चालू कर 
लाला :अहो पण त त ती 
मी : तू बस गाडीत ..काही करत नाही ती 
ती : अरे तुला इतका विश्वास त्या म्हाताऱ्यावर... हाहाहह ..नाही ..तुला आता बघ मी काय करते ते ..
लाला आणि आम्ही गाडीत बसलो होतो ..त्याने गाडी चालू केली आणि गाडीला बाहेरून धडका बसायला लागल्या ..लाला आता रडायलाच लागला होता 
लाला : आपलं काय खर नाही आता ..हे भूत काय सोडत नाही आपल्याला.. कशाला आलो उगाच तुमच्याइथे कामाला मी ..माझ्या गावीच बरा होतो ..
मी : ए बावळट गाडी चालू कर तू ..नंतर बडबड कर 
लाला : अहो ते भुत गाडी चालू करून देईल तर मी चालवेल ना 
मी : अरे मूर्खा ती आत नाही येऊ शकत तू फक्त नीट लक्ष देऊन गाडी चालव ..चल घाबरू नकोस घे देवीचं नाव आणि कर गाडी चालू ..जगदंब जगदंब ..आणि गाडी चालू झाली 
ती : अरे किती पळशील तू ? काही केलंस तरी तुझी गाठ माझ्याशी आहे ..मी या मुक्तीला मुक्त करून तुझी होणार बघच तू ..
आम्ही सगळे खूप घाबरलो होतो त्यामुळे कोणीच काहीच बोलत नव्हतं ..लाला घामाने पूर्ण ओला झाला होता ...तो राम राम म्हणत गाडी चालवत होता..मी मनात देवीची प्रार्थना करत होतो ..आम्हाला सुखरूप पाहोचव आणि या बयेपासून वाचावं ...गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी आणि मुक्ती हातात हात घालूनच बसलो होतो.. त्यांनी दिलेली एक कसलीशी कागदाची पुडी आमच्या हातात होती ...त्यातूनच कोणतीतरी शक्ती आम्हाला हिम्मत देत होती आणि अगदी शिताफीने आमचे सर्व प्रयत्न चालू होते ...आम्ही सगळे भूक तहान पण विसरून गेलो होतो ...लालाचा रामाचा आणि आमचा देवीचा धाव अखंड चालू होता ..
आता आमचं गाव जवळच आलं होतं आणि अचानक कशी कोण जाणे आमची गाडी एका झाडावर जाऊन आदळली ..नक्की काय झालं कस झालं कोणालाच समजलं नाही ...लाला च डोकं समोरच्या काचेवर आदळले होते त्याच्या डोक्याला मार लागून तो बेशुद्ध झाला होता ...आता मुक्ती मला घट्ट पकडून बसली होती पण आमचा हात हातातच होता ..हातातल्या त्या पुडीतून अचानक धूर निघु लागला ..आम्ही दोघे घाबरलो आणि ती पुडी खाली गाडीत फेकली ..,आणि ती हसू लागली 
ती : काय रे काय झालं त्या म्हाताऱ्याने दिलेलं तुझं सुरक्षा कवच का रे फेकलस ?? आणि ती खूप जोर जोरात हसू लागली त्याने खाली त्या पुडिकडे पाहिलं तर ती जशीच्या तशी होती ...म्हणजे ..म्हणजे तो भास होता आमचा ..आजुनही आम्ही सुरक्षित होतो म्हणजे ..आता प्रश्न होता गाडी चालवायचा...लाला तर जख्मी होता आणि बेशुद्ध पडला होता ..मला गाडी चालवता येत होती पण इतकी सफाईने नाही ..पण शेवटी हिम्मत करून मी मागच्या सीटवरूनच बाहेर न पडता पुढच्या सिटवर आलो आणि लाला ला बाजूला करून गाडी चालू केली ..ती पुडी आता मुक्तीच्या हातात होती मला एक हाताने गाडी चालवणं शक्यच नव्हतं आम्ही घरी पोहोचेपर्यंत ती पुडी आम्हा दोघांच्या हातात असंन गरजेचं होतं आता काय कराव? 
इतक्यात मुक्तीने एक युक्ती केली तिने ती पुडी तिच्या साडीच्या पदरात बांधली आणि तो पदर माझ्या हाताला बांधला मग मी आणि मुक्तीने  लाला ला उचलून मागच्या  सीटवर ठेवलं आता मुक्ती माझ्या हाताला धरून बसली होती आणि मी गाडी चालवत होत ..तिने केलेल्या युक्तीने ती पुडी माझ्या आणि तिच्या दोघांच्या जवळ होती..मला मनातच अस वाटलं खरच किती हुशार बायको मिळाली आहे मला ...आणि मी कुठून त्या मंदाकिनी च्या नदी लागलो कोणास ठाऊक ...
मी गाडी चालवत होतो आणि डोक्यात खूप काही चालू होतं ..ती गाडीला काचेवर मारत होतीच.. वेगवेगळे भयानक आवाज येत होते ..खूप वाईट परिस्थितीत मी गाडी चालवत होतो ..अचानक मला समोरच काहीच दिसेनासे झाले . 
मी : अग मुक्ती समोर बघना अचानक खूप अंधार झालाय. मला काहीच दिसत नाहीये मी आता गाडी कशी ग चालवू ? धोका नको म्हणून मी गाडी जागेवरच थांबवली होती . 
मुक्ती : नाही ओ रस्ता तर साफ दिसतोय ..थांबा ह ..अस म्हणत तिने आमचा दोघांचा हात त्या पुदिसहित समोरच्या काचेवर ठेवला आणि मग माझ्या डोळ्यावर ..काय चमत्कार होता त्या पुडित कोणास ठाऊक पण क्षणात मला समोरचा रस्ता दिसू लागला ...ही बाई आता खूप चिडली ,तिचा प्रत्येक प्रयत्न असफल होत होता. ती आता खूपच जास्त चिडली होती ..आंम्ही अगदी गावच्या वेशीत आलो होतो.. बस फक्त आजून 5 मिनिट हवे होते आम्हाला..अरे हे काय ? सगळीकडे अंधार झाला जमिनीवरची माती हवेत लोळ बनून उडू लागली होती ..आमची गाडी पण हवेत उडत होती..हे काय होत? खर होत की।भास काहीच कळत नव्हतं ..पण आमचा गुरुजी आणि देवावर विश्वास होता मी अशीच हवेत गाडी रेस केली आणि वेशीतून घराचा रस्ता आठवून चालवू लागला ..इतक्यात गाडीत मागे हालचाल जाणवली ..लाला वेड्यासारखा हसू लागला होता ..आणि तो बोलत होता - तू नाही वाचणार काहीही कर ..तू माझा आणि फक्त माझा आहेस ...माझं मन विचलित झालं होतं ..गाडी चालवू की हे प्रकरण बघू ..
मुक्ती : काय झालं मागे काय बघताय 
मी: आग तो लाला बघ ना 
मुक्ती : अहो तो होईल बरा तुम्ही चला लवकर घरी ....म्हणजे हा लाला अस बोलताना फक्त मलाच दिसत होता ? मी आता पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवत होतो ...
मी : तुला समोर अंधार , आणि आलेलं वादळ दिसत आहे का? ,आपली गाडी आत्ता हवेत आहे हे माहीत आहे का तुला ? 
मुक्ती : अहो काहीही काय ? आपण रस्यावर आहोत ..काहीही नका बोलू ..हवेत कशी गाडीचालवणार तुम्ही ? रस्त्यावरच किती भयानक चालवताय तुम्ही ..
मी : मग तू मघाशी का घाबरलीस ?
मुक्ती : तुम्ही मघाशी मोठ्या टेम्पोला धडकणार होते त्यामुळे मी घाबरले ..तुम्ही पण केवढे घाबरले होतात ...पण तुम्ही गाडी धडकून नाही दिलीत..आणि तुमचं असलं गाडी चालवण कोणीही घाबरणारच ना? 
मी : आग अस कस? मला ती दिसत आहे ..मोठं वादळ ,मातीचे लोट दिसत होते समोर ..आणि मी अंदाजाने गाडी चालवत आहे ..तू तर बोलते  तस काही नाहीचे.आणि तिचं माझ्या हाताकडे लक्ष गेल ..अहो धागा कुठे गेला तुमच्या हातातला ?? ती जवळजवळ ओरडलीच...
मी बोललो नक्किच मागे पडला असणार.. त्याचवेळी लाला शुद्धीवर आला ..
लाला : ,अहो साहेब सॉरी मला झोप लागली होती ओ.. या तुम्ही बसा मागे मी चालवतो गाडी ..
मी (चिडून) : काही नको , आलंय घर आता..तू बस शांत मागे , आणि मागे माझ्या हातातला धागा दिसतोय का बघ ..हे बोलेपर्यंत त्याला तो धागा खाली दिसला..  त्याने उचलून माझ्या हातात बांधला ..आणि रस्ता साफ दिसू लागला आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो ..
पण आताखरी कसौटी होती ..ती घरात आल्यावर 

@पुनमः पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all