नियती - एक भयकथा - भाग 22

Horror story

नियती 
 भाग 22
जनाक्का गेल्या आणि मी मुक्तीकडे आलो ..तिने अजूनही डोळे उघडले नव्हते ..मी बाजूच्या जगातलं पाणी हातात घेऊन तिच्या चेहऱ्यावर मारलं आणि ती शुद्धीवर आली ...ती आता कण्हत होती ...झालेल्या जखमा तिला दुखावत होत्या ..
मुक्ती - हे काय? मला इतकं कस लागलंय ? खूप अंग दुखत आहे ..आणि मी अशी इथे जमीनीवर का? मी तर जनाक्का ला नाश्ता बनवायला सांगायला चालले होते ..आणि ..आणि हो आठवलं मी अचानक भिंतीवर आपटले ...माझ्या अंगावर खूप मोठं ओझं आल्यासारख  वाटू लागला मला ...आणि ..मग ..मग ...मला काही आठवत नाहीये हो ..पण हे काय झालंय माझं ?
मी मुक्तीला पटकन जवळ घेतलं ..माझे डोळे नकळतपणे वाहू लागले होते ...मला माझीच खूप लाज वाटत होती ..आज मी केलेल्या चुका माझी मुक्ती , माझे बाबा आणि सगळेच माझे जवळचे भोगत होते ...आता हिच्यावर उपाय तरी काय करायचा ..गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काल एक तर झालो ..पण आज हिने माझ्या मुक्तीला त्रास दिला आमचं आर्थिक आणि मानसिक दोन्ही ही नुकसान करत आहे ही ...मी काय करावं बर ?हा विचार चालू असतानाच पाहिलं तर मुक्तीला माझ्या कुशीतच ग्लानी आली होती ..मी तिला बेडवर झोपवलं आणि डॉक्टरांना फोन करणार इतक्यात समोरून डॉक्टर आले ..त्यांच्या मागोमाग जनाक्का पण होती 
मी : अरे डॉक्टर तुम्ही कसे काय आलात ? मी आत्ता तुम्हालाच फोन करणार होतो 
डॉक्टर : अरे या जनाक्का आल्या होत्या क्लीनिकला .. हातातलं सगळं सोडून आधी चला अस म्हणून मला ओढतच घेऊन आल्या बघ..आणि मग मुक्तीकडे बघत ..काय रे मला बोलवलं नाहीस तू लग्नाला ? एकट एकट लाडू खाल्लेस?
मी : अहो सगळं काही घाईतच झालं ..तुम्ही प्लिज बघा ना हिला ..जनाक्का जरा चहा पाणी बघा ना डॉक्टरांना..हो जी म्हणत जनाक्का निघून गेली ..
डॉक्टरांनी मुक्तीला जवळून पाहिलं आणि ते घाबरलेच - अरे काय रे ..तुला पसंत नाही का ही मुलगी? अरे किती मारलंस हिला तू?लग्न करायचंच नाही ना ..अस का केलंस तू ?
मी : एकदम बावचळत.. म ..मी..अहो नाही हो ..मी का मारु हिला ? काहीही काय? अहो ते ..म्हणजे इतक्यात जनाक्का आली 
जनाक्का : अहो ताईंना यांनी नाही मारलं हो ..रातच्याला ती आग लागली ना तेव्हा तिथं गेल्या होत्या ताई तिथंच काट्याचा कचरा होता त्यात पडल्या ..अंधारात समजलं नाही त्यांना आणि मग आशा जखमी झाल्यात बघा.. 
डॉक्टर : अरे बापरे हा तर भलताच उद्योग झाला म्हणायचं ..बर मी बघतो काय ते ..एक धनुर्वातच इंजेक्शन देतो.. मला जरा गरम पाणी द्या स्वच्छ भांड्यात ..या जखमा स्वच्छ करून, किती खोल आहेत बघाव्या लागतील  ..जनाक्का गरम पाणी घेऊन आल्या ..त्यात डेटॉल च्या वासाच काहीतरी घालून डॉक्टरांनी तिच्या जखमा स्वच्छ केल्या ..मुक्ती झोपतच कण्हत होती ..इतक्यात माझ्या कानाशी आवाज आला - काय रे कशी दिसतीये मुक्ती? हाहाहाहा !!!!बघ विचार कर काय करायचं त्याचा नाहीतर .......आणि आवाज गायब 
मला काय करायचं काहीच समजत नव्हतं ..अडचणींवर अडचणी येतच होत्या ..आजून पाहिल्यातून बाहेर आलो नाही तर दुसर संकट समोर येत होतं ..मी मनातल्या मनात गुरुजी आणि देवीचा धावा करत होतो ...माझ्या झालेल्या चुकीची शिक्षा आता इतर कोणाला नको मलाच दे अस म्हणत होतो ...
डॉक्टरांनी सगळ्या जखमा स्वच्छ करून त्याला ड्रेसिंग केलं होतं चेहऱ्याला फक्त औषध लावलं होत ..मग इंजेक्शन देवून ते निघाले इतक्यात जनाक्का चहा आणि बिस्कीट घेऊन आल्या ..मी तो डॉक्टरांना दिला ...हे काय त्या चहाचा रंग काळा काळा डांबर सारखा दिसत होता ..मी तो कप घेतला आणि घाबरून फेकून दिला ...डॉक्टर वैतागले जनाक्कातर वेड्यासारखी आ करून त्यावर हात ठेवून पाहू लागली..
डॉक्टर : whats wrong with you ? काय होतंय तुला ?अरे काय आहे हे सगळं ? ती बिचारी तिथे जख्मी आहे ..गोठा जळाला आहे , सगळी जनावर मेली त्यात ..तुझे वडील तर ठीक आहेत ना? आणि तू काय अस वेड्यासारखे करत आहेस ? नक्कीच काहीतरी गडबड आहे ..हे बघ तुमचा फॅमिली डॉक्टर आहे मी ..काही प्रॉब्लेम असेल तर सांग आपण उपाय शोधू 
मी : तुम्ही नाही विश्वास ठेवणार माझ्यावर ..इथे जे घडत आहे ते सांगितलं तर तुम्ही मलाच।वेड्यात काढाल 
डॉक्टर : हे बघ तू आत्ता ज्या पद्धतीने माझा चहा फेकू  दिलास ना ...त्यावरून इथे गडबड आहे हे तर मी समजूचं शकतो ..सांग मला काय अडचण आहे .."कोण त्रास देतंय?
मी : म्हणजे ? तुम्हाला समजलं का आम्हाला कोणी त्रास देतंय?
डॉक्टर : अरे माझे केस काय उन्हात पांढरे नाही केले..खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत मी ..तिच्या जखमा काट्यात पडून झालेल्या नाहीत ..हे मी ओळखलं रे ..तिला बोचकारलेले आहे ..नखांच्या खुणा आहेत त्या ...तिचं डोकं भिंतीवर आपटलेलं आहे खूप जोर जोरात ..तिचे केस विस्कटलेले आहेत बरेचसे उपटून काढलेले आहेत...अरे डॉक्टर आहे मी बघताक्षणी परिस्थिती चा अंदाज येतो 
मी एकदम त्यांच्या पायाशी बसलो आणि जोरात रडू लागलो त्यांनी मला डोक्यावर हात ठेवून उठवलं आणि बाजूला बसवलं 
डॉक्टर : हे बघ काहीही न लपवता सगळं नीट सांग जगदंबा नक्कीच मार्ग दाखवेल आपल्याला 
मी : खरच !! खरच का अस होईल? 
डॉक्टर : विश्वास ठेव संपत ..सांग मला सगळं नीट 
मी जनाक्का ला परत चहा घेऊन यायला सांगितलं ..ईच्छा नसताना ती गेली ..मग मी डॉक्टरांना मंदाकीनी आणि माझ्याबद्दल सगळं सांगितलं..मग काल गुरुजींनी सांगितलेलं पण सांगितलं ...बाकी सर्व प्रसंग सांगितले 
डॉक्टर अगदी लक्षपूर्वक सगळं ऐकत होते- हे बघ संपत आपल्या गावातले गुरुजी आहेत त्यांना मी सांगतो हे सगळं ते नक्कीच काहीतरी बंदोबस्त करतील तिचा ..तू पण तुमच्या गुरुजींना बोलावं जमलं तर ..निघेल मार्ग यातून ...फक्त निराश होऊ नकोस ..तिला तू हरलाय हे समजता कामा नये ..एकदा का तिने तुला हरवलं तर तू पुन्हा कधीच जिंकू शकणार नाही म्हणून एकदम होकारात्मक विचार कर सगळं ठीक होईल ..
मी : डॉक्टर एक समजलं नाही तुम्ही इतकं बिनधास्त कस बोलले सगळं म्हणजे ती आली नाही मध्ये तुम्ही बोलताना.. नाहीतर सारखी माझ्या कानाजवळ येऊन मधमाशी सारखी घो घो करत असते ..
डॉक्टर हसले ...अरे मी जरी डॉक्टर असलो ना तरी माझा या गोष्टींवर विश्वास आहे ...त्यांचं दुसरं जग असत हे मी मानतो ...आम्हाला पण खूपवेळा या गोष्टींचा त्रास होतो रे ..कधी कधी आम्ही किती प्रयत्न करून पण एखाद्याला वाचवण्यात यश येत नाही ...कारण त्याचा काळच आलेला असतो ..पण ते आमच्यावर डुक धरून बसतात आणि त्रास देतात ..असाच काहीसा त्रास मला 4 वर्षांपूर्वी झाला होता तेव्हा आपले गुरुजी आहेतना त्यांनी बाहेर काढलं मला ..आणि हा ताविज दिला ...जेव्हा अश्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते हा ताविज मला माझ्या उजव्या हातात बांधायचा असतो म्हणजे त्यांना माझं अस्तित्व समजत नाही ..मग  त्या पेशंटला त्यावर कोणत्या डॉक्टरने उपचार केले हेच समजत नाही आणि ते मला जबाबदार धरत नाही ...तू बोलत असताना मी तुझा हात हातात घेऊन ठेवला होता त्यामुळे तुही त्या ताविजच्या संपर्कात आला आहेस...आणि आपण काय बोललो तिला काहीही समजलं नाही ..इतर वेळी हा ताविज मी माझ्या खिशात ठेवतो पण तेव्हा तो काहीच काम करत नाही ..
इतक्यात जनाक्का चहा घेऊन आल्या ..त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता 
मी : काय जनाक्का वेळ लागला खूप चहा आणायला?  तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही आमचं बोलणं ऐकलय..नाही पण तुम्हाला कस ऐकू येणार?
डॉक्टर हसून : अरे जनाक्का माझी पेशंट किंवा मृतांत्मा नाहीयेत ..त्यां ऐकू शकतात ..
मी : हो का ? म्हणजे तुम्ही ऐकलं ना जनाक्का : हो रे पोरा ऐकलं सगळं ..बर डॉक्टर याला खरच बाहेर काढा बाय यातन ..लई उपकार हुतील तुमचं ...घ्या चाय घ्या ..बिस्कीट बी घ्या..आणि आनंदातच ती गेली 
मी विचार करत होतो मला आई नाही ..पण असती तर अशीच असती ना या जनाक्का सारखी ...इतक्यात डॉक्टरांनी मला खांद्याला धरून हलवलं 
डॉक्टर : काय रे ? कसला विचार करतोस? बर मी निघतो आता..संध्याकाळी क्लिनिकला ये आपण जाऊ गुरुजींकडे.
मला आता आशेचा किरण दिसला होता ..संध्याकाळी मी गुरुजींना भेटणार होतो .. या सगळ्यातून बाहेर निघणार होतो ...

©पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all