नियती - एक भयकथा - भाग 23

Horror

#नियती 
भाग  23
डॉक्टर गेले आणि मी मुक्तीकडे आलो ...खूप लागलं होतं तिला तिची ती अवस्था मला पाहवत नव्हती ..मी तीच डोकं माझ्या मांडीवर घेऊन प्रेमाने तिच्या केसात हात फिरवत होतो ..अरे हे काय तिच्या केसांचे पुंजके च्या पुंजके माझ्या हातात येऊ लागले होते ...मी ते पटकन खाली फेकले ..तीच डोकं खाली ठेऊन बाजूला गेलो...हे काय होत नक्की ?? इतक्यात जोरजोराने हसायचा आवाज आला ...
मंदाकिनी आता जोरजोरात हसत होती - काय रे घाबरलास ?? आता तुझी बायको टकली होणार ...,आणि परत केस वाढणारच नाहीत तिचे ...मी खूप वैतागलो होतो आता 
मी : ए बाई तू माझा जीव घे . पण अस घरच्यांना नको ग बाई त्रास देऊ.. तुला मी हवाय ना? घे माझा जीव घे ...चल मी तयार आहे ...पण माझ्या या माणसांना सोड ग बाई ...हो झाली चूक माझी ...तुझी माफी मागतो बाई ..तू म्हणशील ते करतो पण आता इतर कोणालाही त्रास देऊ नकोस 
मंदाकिनी : अस म्हणतोस का? हो चालेल की ...चल मग हो तयार माझ्या बरोबर यायला ...इतक्यात मुक्तीला शुद्ध आली तिने पाहिलं समोरून एक मोठा सुरा माझ्या दिशेने येत आहे .. मुक्ती पटकन उठून मध्ये आली तो सूरा तिच्या मानेला घासून गेला आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली ..आता तर अगदीच नकळतपणे ती पुन्हा माझ्यावरचा घाव झेलून बसली ...
मंदाकिनी चिडली तिने आमचा ड्रेसिंग टेबलचा आरसा फोडला आणि त्याच्या काचा माझ्याकडे येऊ लागल्या ..इतक्यात जनाक्का आत आली आणि तिने तिच्या हातातील ताडपत्री माझ्यावर फेकून टाकली सगळ्या काचा त्यावरच राहिल्या ..जनाक्का ती ताडपत्री आमच्या खिडकिला लावणार होती ...जाताना आमच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं म्हणे की आमच्या बेडरूममध्ये अंधार असायला हवा ...
खरच मी किती नशीबवान होतो ना ...माझ्यावरच संकट झेलणाऱ्या या दोन देवी होत्या माझ्याकडे आणि ती मात्र मी केलेल्या पापांची राक्षसी होती जी मला मारायला बघत होती ...तिला माझा सर्वनाश करायचा होता ...ती तर सुडाने पेटून उठली होती पण या दोन माऊली मला तिच्यापासून वाचवत होत्या ..आणि मी ...असा लाचार काहीही करू शकत नव्हतो..
मी : मंदाकिनी ...दया कर ग बाई आता जा तू आता ...तिचा राग अनावर  झाला होता, कारण तिचा वार निकामी झाला होता ..तिचा सूर अतिशय भयानक होता अस वाटत होतं तिचा राग सगळ्या घरांच्या वस्तूमध्ये भरलाय सगळ्या मधून ती रागाची धुसफूस जाणवत होती ...लाईट चालुबंद होत होते ..मी तर खूपच घाबरलो होतो मुक्तीला छातीशी घट्ट कवटाळून बसलो होतो. जनाक्का एखाद्या रक्षकासारखी माझ्या बाजूला उभी राहून तिचा अंदाज घेत होती ...
इतक्यात ती ओरडली ..हो आत्ता जाते मी , या म्हातारीला पण नाही सोडणार मी ..आणि तुझ्या मुक्तीला पण ...आणि सगळं काही शांत झाल..जनाक्काने किचनमधून हळद आणली आणि मुक्तीच्या जखमेवर लावली ..तस डॉक्टर तिला औषध देऊन गेले होतेच ..माझ्यामुळे ती आजून किती जख्मी होणार होती कोणास ठाऊक ..
जनाक्का : अरे पोरा तुला डॉक्टरनी बोलावलंय ना संध्याकाळी मग जाऊन ये बाबा तू ...हिच्याजवळ म्या हाये ..तू काळजी नग करुस फकस्त स्वतःची नीट काळजी घे ...आणि मालकांना म्या देवघरात पूजा करायला बशिवते मग तुला बी काय अडचण यायची नाय ...आणि तू बी  ह्या अंगाऱ्यातला थोडा अंगारा घेऊन जा बरोबर...ह्ये बघ मी थोडा हिच्यासाठी बी घेऊन बसलीये जा बाबा आता जा तू लवकर जाऊन त्यांना घेऊन ये..मी पण तडक निघालो ...
अपेक्षा होती की ती लगेच येणार नाही ...इकडे जनाक्का नी तो अंगारा मुक्तीच्या कपाळाला लावला , स्वतःच्या कपाळावर पण लावला आणि पुडी मुक्तीच्या हातात ठेऊन बाबांकडे गेली ..त्यांना तिने सांगितलं 
जनाक्का : अहो मालक मघा बाजूची वैजू म्हणत होती आज रातच्याला बारा वाजेपर्यंत लै वाईट काळ हाय आणि घरातल्या थोर माणसांनी देवघरात पूजा करावी म्हंजी घरवरच संकट टळलं... सायेब बसता का वो तुम्ही??  नाही मंजि कालबी ते केवढं मोठं संकट आल व्हत तव्हा ....
बाबा : आग म्हणजे काय ? माझ्या कुटुंबसाठी मी करणारच ती पूजा तू सगळं समान ठेव देवघरात मी जरा आंघोळ करतो परत ..मला थोडा चहा आणि काहीतरी खायला दे म्हणजे मध्ये भूक नाही लागणार ..
जनाक्का : खुश झाली ...व्हय जी म्हणून ती गेली ...तिने गरम गरम पोहे आणि चहा दिला बाबांना ..ते खाऊन बाबांनी अंघोळ केली आणि मंदिरात जाऊन पूजा केली ..जनाक्काने फुले,नारळ, कलश , हळद कुंकू अस सगळं काही ठेवलं होतं...बाबांनी आत जाऊन मनोभावें पूजा करायला सुरुवात केली होती ...आता जनाक्का मुक्तीजवळ येऊन बसलीब...तिने मुक्तीला उठवलं आणि फ्रेश व्ह्यायला सांगितलं ...तिला पण चहा पोहे खायला घातले ...औषध दिल आणि तिला झालेला सगळा प्रकार सांगितला ...मुक्तीला आजूनपण खुओटर्स होत होता ..मुक्तीने बॅग मधून तिच्या गुरुजींचा फोटो काढला त्यांच्यासमोर अगरबत्ती लावली ..आणि देवीचेनामस्मरण करू लागली जनाक्का पण तिला साथ देत होती एकूण सगळी तयारी झाली होती ..माझ्या हातामध्ये गुरुजींनी दिलेला धागा होता ..अंगारा होता पण तरीही मला भीती वाटत होती ..मी स्वतःच गाडी घेऊन निघालो होतो ...मला गाडीमध्ये सतत तिचा भास होत होता ..सतत वाटत होतं ती येऊन काहीतरी बोलेल ..आणि त्या भीतीतच मी डॉक्टरांकडे पोहोचलो ...
मला पाहून डॉक्टर हसले माझ्या खांद्यावर हात ठेवला ...अरे वाह आलास का तू? तुझीच वाट बघत होतो मी..चल निघुया आपण लगेच ..अरे पण तुझ्या घरच काय? कदाचित गुरुजींनी उपाय चालू केला तर ती त्यांना त्रास देऊ शकते ...,आणि तुला तिने येऊ कस दिल? 
मी : अहो घरातल्यांच काही टेन्शन नाही ...त्यांची व्यवस्था झाली आहे ..हो हे पण खरं आहे की तिने मला अडवलं कसं नाही? बर जाउद्यात बघू काय होईल ते आपण आता लवकर जाऊया ...
डॉक्टर : हो ते पण आहेच ..आम्ही दोघे घाबरतच निघालो ...त्यांनी ताविज स्वतःच्या  हातात बांधला माझा हात त्यांच्या हातात घेतला ...त्यांनी त्यांच्या ड्रायव्हर ला गाडी काढायला सांगितली आणि मला सांगितलं की तू आता आजिबात माझा हात सोडायचा नाहीस,त्यामुळे तिला तु कुठे आहेस  आणि काय करत आहेस हे समजणार नाही..मी डॉक्टरांचा हात धरून एखाद्या लहान मुलासारखा निघालो ..पाचच मिनिटात आम्ही पुजाऱ्यांकडे आलो ..आमचं ग्राममंदिर होत ते ...आमची माय होती त्या मंदिरात ...होय देवीचंच होत ते मंदिर ..अस म्हणतात की तिथे तिचा खरच वास आहे ..आणि हि मूर्ती स्वयंभू आहे ...मी मनापासून तिला हात जोडले ..डोळे मिटून तिची प्रार्थना केली, "आता तूच या संकटातून बाहेर काढा ग माय.. चुकलो मी मान्य करतो ..पण त्याची शिक्षा मलाच दे ना ग ...डॉक्टर पुजाऱ्यांकडे गेले होते ...म्हणजे आता मी त्या ताविजच्या संपर्कात नव्हतो ..आणि मी कुठे आहे हे तिला समजणार होत ..मी या विचारात असतानाच पुजारी आणि डॉक्टर तिथे आले ..माझ्या जीवत जीव आला ...पण प्रश्न होताच इतकं सगळं होत असताना ही आली कशी नाही आजून ..
पुजारी : बोल संपत कसा आहेस ? आता फिटली का हौस तुझी? किती उतमात केलास तू ? शिक्षणासाठी गेलास आणि किती पोरी फिरवल्यास तू? शेवटी आमच्या गावची एक पोरगी भारी पडली तुला ...काय बरोबर ना?
मी चक्रावून कधी त्यांना कधी डॉक्टरांकडे बघायला लागलो ...पण ..पण ..तुऊऊ ..तुम्हाला ? काय माहीत? 
पुजारी : ती माऊली सगळं सांगते पोरा आम्हाला ...आता तू तिला शरण आला आहेस ..तर तिने मला सगळं काही सांगितलं आहे बघ
मी : पुजारीजी मला पण डॉक्टरांसारखा ताविज द्या ना म्हणजे तिला मी कुठे आहे समजणार नाही आणि ती मला त्रास देऊ शकणार नाही ...आम्हाला सगळ्यांनाच द्या ते..
पुजारी हसू लागले - अरे वेड्या आपल्याला तिचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे ...आणि ते ताविज हातातून निघाल्यावर काय रे? आता मी सांगतो तस कर 
मी : अहो पण ती इथे येईल ना...माझ्या घरी जाऊन घरच्यांना पण त्रास देईल ..
पुजारी : नाही ती आत्ता लगेच नाही येणार तिला तिच्या शरीरात रोज थोडावेळ जावं लागतं नाहीतर ते नष्ट होईल आत्ता ती निदान आजून तासभर तर येणार नाही .. चला आपल्याला भराभर सगळं आवरायला हवंय ..
मी : अस होय! म्हणूनच ती आली नाही मला त्रास द्यायला ...
पुजारी : चल आता त्या गोलात बस तू...आणि मी सांगतो तो मंत्र सतत जपत राहयचास... हे घे ह्या कागदावर लिहून दिला आहे बघ मी . हा तर गायत्री मंत्र होता ...जो मला लहानपणापासून येत होता ..
मी : अहो हा तर गायत्री मंत्र मला पाठ आहे ..मी म्हणतो तुम्ही नका काळजी करू ...हा घ्या हा कागद ठेवा तुम्ही तुमच्याकडे 
पुजारी : राहुदेत तुझ्याकडेच गरज पडेल तुला याची ...
मी मनातच हसलो, खांदे उडवून तो कागद माझ्या बाजूला ठेवला ...आता त्यांनी मला आधी माझ्या गुन्ह्याची माफी मागायला लावली .त्याचा ही एक पेपर लिहून मला त्यांनी वाचायला सांगितलं ..मी अगदी मनापासुन ती माफी मागितली ...मंदाकिनी मला माफ कर ग ...माझी खूप मोठी चूक झाली...पण यात तुझं नुकसान व्हावं अस कधीच माझा हेतू नव्हता ग.. मोठ्या मनाने मला माफ कर तू आम्हाला..तू तुझं शरीर पुन्हा तुझ्या ताब्यात घे अशी नको राहुस ...तुला आयुष्यात जे पण लागेल ते सर्व मी करेन तुझ्यासाठी ...मी आता दुसऱ्या कोणाचा तरी आहे ग...मी एखादा छान मुलगा पाहून तुझं लग्न करून देईन ...तुझा संसार उभारून देईल ग..अस स्वतःच आणि बाकीच्यांचे आयुष्य खराब नको करुस ...मंदाकिनी ..ऐक माझं ...
मी अस बोलत असताना माझ्या डोळयातून रक्त येऊ लागले..पुजारी जोरात ओरडले...तिला हे मान्य नाही ..संपत तुझे डोळे ..बघ ..तिने निरोप दिलाय तुला ..ती तुला सोडणार नाही म्हणते 
मी : अहो मग मी आता काय करू? मग न बोलता त्यांनी एक कागद मला दिला आणि वाचायला सांगितलं ..ठीक आहे मंदाकिनी मी येतो तुझ्या आयुष्यात ..पण माझी एक अट आहे तुला तुझ्या शारीरा सह यावं लागेल माझ्या आयुष्यात.. अगदी आधीसारखं ..मी मुक्तीला सोडून देईल ..तू  माझी बायको होशील ..आता तुझ्या शरीरा सह इथे ये या मंदिरात ...तू आत्मा बनून आलीस तर तुला इथे येता येणार नाही .. पण पूर्णपणे आलीस तर तुला येत येईल ...हे बघ हे पुजारी आपलं लग्न लावून देतील ..येतेस का ग? ये ना ग ..माझ्या डोक्यातील रक्त थांबून आता त्यातून अश्रू वाहू लागले होते 
पुजारी : तिला तुझं बोलणं पटलं आहे ..ती येईल आता ..
मी : अहो पण मी लग्न कस ? मला तर काहीच समजत नाहीये तुम्ही मला अस का बोलायला सांगितलं ...हा बाकी ठीक मी तीच लग्न करून देईल सगळं करेल ...पण मी तिचा नाही होणार ..माझ्या मुक्तीला नाही सोडणार कधीच..इतक्यात सगळ्यांच लक्ष मंदिराच्या दरवाजात उभ्या असणाऱ्या मंदाकिनी कडे गेलं ...ती धावतच आली आणि मला मिठी मारली ..
©पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all