नियती - एक भयकथा - भाग 28

भयकथा


#नियती 
#भाग 28
©पुनम पिंगळे
मस्त जेवल्यावर मी आणि डॉक्टर आमच्या रूम मध्ये आलो ...आमच्या मागोमाग मंदाकिनी आणि तिची आई पण आली...मला ते जाणवलं ..मी डॉक्टरला न बोलता हाताने समजावलं की त्या आहेत इथे ..डॉक्टरने डोळ्यानेच खुनवल ठीक आहे ..मग ते बाथरूम मध्ये जाऊन हातात ताविज घेऊन आले ..आणि माझ्यासमोर येऊन बसले ...
डॉक्टर : बोल काय झालं होतं त्या दिवशी ?
मी त्यांचा ताविजच्या हाताला हात लावायला लागलो तर त्यांनी तो मागे घेतला आणि हात खाली करून आत्ता नको असं खुनवल ..मी विचारात पडलो होतो ..ह्या दोघींना समजेल ना मी जे सांगेल ते ..आमचं प्लॅंनिंग..
मी : डॉक्टर त्यादिवशी मी आलो तेव्हा तुमचा ड्रायव्हर बाहेर उभा होता त्याने मला सांगितले की तुम्ही , वहिनी आणि तुमची लहान बेबी ला कुणीतरी मान मोडून मारून टाकलं आहे ...तुमच्या डोळ्यात वहिनीच्या हातातल्या बंगडीच्या काचा घातल्या आहेत ..तुमच्या घराबाहेर खूप गर्दी होती ..मी त्याला विचारलं अरे पण तू पोलीसांना सांगितले का ? तर तो बोलला फोन केला आहे ..येणार आहेत थोड्याच वेळात ..
का नाही आले म्हणून मी पोलिसांना फोन केला ते बोलले फोन आलाच नाही मी गोंधळून ड्रायव्हरला पाहिलं त्याचे डोळे बदललले होते...आणि तो विचित्रपणे हसायला लागला...मी चक्कर आल्यासारखा झालो आणि पडणार इतक्यात पोलीस आले आणि मला सांभाळलं ..आणि ते म्हणाले चल कुठे झाली आहे दुर्घटना दाखव ..समोर पाहिलं तर ती गर्दी नव्हती मी गोंधळलो आणि धावतच तुमच्या घरात आलो समोर बघतोय तर तुम्ही आणि वहिनी जेवत होतात आणि बेबी मस्त नाचत होती ...माहीत नाही मला पुन्हा चक्कर आली पुढचं काही आठवत नाही ...
डॉक्टर : अरे जेव्हा तू खाली पडलास तेव्हा मागेच आमची वडिलोपार्जित संगमरवरी मूर्ती होती त्यावर तुझं डोकं जोरात आपटलं आणि त्यातून रक्त वाहू लागल ...तुला मी लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो ...मुक्तीला पण फोन करून बोलावलं ...पोलिसांना पण समजावून पाठवलं ..तेव्हा चिडून विचारत होते कोण मेल आहे इथे? या माणसाने आम्हाला उगाचच का त्रास दिला ..मी त्यांना सांगितलं तुझं मानसिक संतुलन बिघडलं आहे ..मग पोलिसाला पण आठवलं तुला आधी पण चक्कर आली होती ...मला जोरात ओरडून तो समज देऊन गेला ...तुमच्या या येड्याला सांभाळून ठेवा ...आणि निघून गेले..
तुला बघून मुक्ती रोज रडत होती ...आणि आता अचानक डॉक्टरने तो ताविज बोलता बोलता स्वतःच्या हातात बांधला आणि माझा हात पकडला ... मला बोलले : अरे तिला आपण काहीतरी बोलत होतो हे माहीत होतं ना.. मग म्हूणून जे त्यांना माहीत होतं ते समजू दिल आता मी काय सांगतो ऐक..ज्या दिवशी तुला मी दवाखान्यात घेऊन गेलो लगेचच मुक्तीला फोन करून कळवलं मी ...आणि तिला हे पण सांगितलं की  नक्किच मंदाकिनी परत आली आहे ...आता तुझ्या जीवाला पण धोका आहे ...तू तुझ्या गुरुजींना भेटून मगच इथे ये ..आणि हा फोन करताना मी हातात ताविज घातला होता त्यामुळे मी बोललो ते मंदाकिनीला समजल नाही..मग मला लक्षात आलं की तिला जाताना त्रास होऊ शकतो ..मी तिला क्लीनिकला यायला सांगितलं आणि माझ्या गाडीत तिला घेऊन गेलो... जाताना मी तिला माझा हात धरून ठेवायला सांगितलं आणि त्याच कारण पण सांगितलं ..माझा ड्रायव्हर तेव्हा नेमका सुट्टीवर होता त्यामुळे मी स्वतःच गाडी चालवत होतो ..
थोड्याच वेळात आम्ही गुरुजींच्या आश्रमात पोहोचलो मी मुक्तीला विनंती केली की काही झालं तरी माझा हात सोडू नकोस ...तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो ...मग माझा हात धरूनच आम्ही गुरुजींकडे गेलो ...माझा हात धरलेला पाहून ते चिडले ..मग तिने त्यांना सगळा किस्सा सांगितला ...गुरुजींनी दोन मिनिटं डोळे मिटले ...आणि प्रेमाने आमच्याकडे पाहिलं ...
गुरुजी : मुली खरच चांगला आहे हा डॉक्टर ...नशिबाने वेळेवर योग्य व्यक्ती भेटली आहे तुला ...वेळोवेळी यांची मदत होणार आहे तुला ..आजिबात साथ सोडू नकोस याची ...लवकरच या काळजीतून मोकळी होणार आहेस तू ..फक्त मी सांगतो तस नीट कर ..सर्व काही ठीक होईल ...मग त्यांनी 3 धागे हातात घेतले ...त्यावर कसलं तरी पाणी शिंपडल आणि जोर जोरात काहीतरी पुटपुटले... मग स्वतःच एक धागा माझ्या आणि मुक्तीच्या हातात बांधला ...आणि तिसरा धागा तुझ्या हातात बांधण्यासाठी दिला ...मग मुक्तीच्या कानात काहीतरी सांगितले ...आणि म्हणाले हे धागे तुमच्या हातातून निघाले तर कोणीच तुम्हाला वाचवू शकणार नाही ...बाकी तिचा बंदोबस्त कसा करायचा हे मी तुझ्या कानात सांगितलं आहेच ...
आम्ही थोड्या शांत मनाने निघालो ..तडक हॉस्पिटलमध्ये आलो तर हे काय तुझा ऑक्सिजन काढलेला होता ..व्हेंटिलेटर बंद होता ...तू जोरजोरात श्वास घेत होतास आणि ओरडत होतास ..अस नको करुस..सोड ग मला ..सोड.. पटकन मुक्ती पुढे आली आणि तिने तो धागा तुझ्या हातात बांधला ..तोपर्यंत मी पण तुला  ऑक्सिजन लावला आणि व्हेंटिलेटर चालू केला ...मला माझ्या स्टाफ चा खूप राग आला होता की तुला अस एकट्याला सोडून कसे गेले होते ..पण नंतर लक्षात आलं त्यांना तरी काय माहीत ...आणि जरी नर्स इथे असती तरी या बाईला तिनी कस अडवलं असत ? उलट तिचाच जीव गेला असता ..मग मी मनातच थोडा रिलॅक्स झालो आणि बोललो नशिब कोणी  नव्हतं इथे ...
पण टेन्शन एकच होत तू कोमा मध्ये गेला होतास तुझी हालचाल पूर्ण थांबली होती ..मुक्ती रोज तुझ्याजवळच असायची ..तू अचानक जोरात हात हलवत होतास आणि व्हेंटिलेटच्या वायर निघाल्या ..तू जोरात श्वास घेऊ लागला ..मुक्ती घाबरून गेली ..तिने emergency बेल वाजवली आम्ही तिथे गेलो ..मग आम्हाला तुझे हात बांधावे लागले ..खूप वाईट वाटत होतं ...तुझी अवस्था पाहून मुक्ती खूप रडायची ....
मी : अहो ते हात मी नव्हतो हालवत ..ती  मंदाकिनी माझ्या हातातलं धागा काढायला बघत होती .. मला मारून तिच्यासोबत नेण्याची धडपड चालू होती तिची ...पण हातातल्या या धाग्याने तिला अडवलं होत ..आज मला शुद्ध आली तर ती तिथेच माझ्या बाजूला बसलेली होती ...मी तिच्यासोबत गेलो तर तुम्हा सगळ्यांना ती काही करणार नाही असं बोलली ..आणि तो धागा जर काढला तर तिला माझा जीव घेता येईल असं ती बोलली ...म्हणून मिच काढला होता तो धागा माझ्या हातातून..
डॉक्टर ; अच्छा !!अस होत तर ते ? मुक्तीच्या लक्षात आलं की धागा तुझ्या हातात नाही ..तिने शोधून लगेच बांधला परत..वेडा आहेस का तू ? अस हार मानत होतास तिच्यासमोर? इतकी जिवाभावाची माणस आहेत तुझ्या सोबत ..अस नको करुस रे ..तुला माहीत आहे का ? या नऊ दिवसात मुक्ती घरी गेलीच नाही ..तुझ्याजवळ बसून होती रे ..इथेच अंघोळ करायची ..जेवायची तर तिला ईच्छाच नसायची...रोज जनाक्का मुक्तीला जेवण आणून द्यायची तिचे कपडे आणून दयायची जुने घेऊन जायची ....मुक्तीला बळच जेवायला घालायची ...तिथून रडतच माझ्याकडे यायची आणि माझे पाय धरून सांगून जायची माझ्या पोराला वाचवा ओ डॉक्टर ..खूप जीव आहे तिचा तुझ्यावर ...त्यांच्या प्रेमाची शप्पथ आहे तुला आजिबात हार मानायची नाही ..
आणि आता महत्त्वाचे ऐक ...ती आता एकटी नाही तिच्यासोबत तिची आई पण आहे ..तेव्हा आपल्याला खूप सांभाळून रहावं लागणार आहे ...आम्ही पुढे काही बोलणार इतक्यात बाहेर काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला ..आम्ही धावतच बाहेर आलो ...अरे देवा हे काय? मुक्ती ?माझी मुक्ती ..तिने आमच्या टेरेस वरून उडी मारली होती ..आणि तिचं डोकं..गार्डनच्या एका मोठ्या दगडावर आपटलं होत ..डॉक्टरने पळतच जाऊन तिची नाडी तपासली ..ती गेली होती सोडून आम्हाला ..तिच्या हातातला धागा आता नव्हता तिथे..
मी जोरात ओरडलो ..रडु लागलो ..इतक्यात आवाज आला ...काय रे तू आणि डॉक्टर काय खेळ खेळत होतास? आता बस तू तसाच ..मी आलेच तुझ्या आयुष्यात ...आता मीच तुझी मुक्ती...
क्रमशः

🎭 Series Post

View all