नियती - एक भयकथा - भाग 30

भयकथा


#नियती 
#भाग 30
©पूनम पिंगळे
हेमंत : म्हणजे ..तस ते ..काय ते ..नाही ..म्हणजे हो हो काल जरा sss
वर्षा : (हेमंत ला हाताने गुपचूप खुणावत) नाही असं इतकं काही नाही ..फक्त आम्ही ..म्हणजे ..मी ..नाही म्हणजे त्यांनी ..
हेमंत : अहो आम्ही एकमेकांना मिठीत घेतल काल.. आणि ..आणि ना 
संपतराव : एकदम चढल्या आवाजात बोलले आणि काय? बोला लवकर दोघे?
वर्षा : माझ्यावर विश्वास नाही का तुमचा ? अहो काल आम्ही फक्त एकमेकांना जवळ घेऊन झोपलो रात्री ..बाकी काही  नाही केलं..मला माझ्या मर्यादा माहित आहेत हो ..विश्वास ठेवा माझ्यावर
संपतराव : वाह !!धन्य धन्य आहात तुम्ही दोघे..आजून काय करायचं होतं मग तुम्हाला? 
हेमंत : माफ करा आम्हाला..पण थोडा तोल गेला हो आमचा. खरंच आम्ही काहीच नाही केलं .. फक्त जवळ झोपलो होतो ..जर आम्हाला थोड तरी माहिती असतं तर आम्ही  काळजी घेतली असती .. तुम्ही आधी सांगायला पाहिजे होता आम्हाला..पण आता त्याच्यावर उपाय काय म्हणजे आता ती मंदाकिनी आम्हाला त्रास देणारच का?
 संपतराव: जर तुम्ही बोलल्या प्रमाणे काहीच केलं नसेल आणि फक्त तुम्ही जवळ होतात तर कदाचित तुमचं काही वाईट करणार नाही ती ...फक्त मला हुल देत असेल ..असं मला वाटतं ..पण पोरांनो एक गोष्ट लक्षात घ्या असं काही करु नका की ज्यामुळे ती तुमचं नुकसान करेल..
वर्षा : तिला तर तर मारून टाकला होता ना मग ती आता परत कशी काय येऊ शकली? कशी काय आली?
संपतराव: अग पोरी ती तशी मेलीच नव्हती ..आम्ही सगळे तुझ्या आईचे विधी करून निघालो होतो , तेव्हा रस्त्यामध्ये थोडे अंतर गेल्यावर, अचानक मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या बाजूला बसलय.. मी घाबरलो मला वाटलं मंदाकिनी.. पण बघतो तर काय तुझी आई माझ्या बाजूला बसली होती.. मला खूप आनंद झाला होता मग तिला पाहून मी तिला विचारलं : अगं मुक्ती हे काय तू कशी काय आलीस आणि मग मी आत्ता जे अंत्यविधी करूण आलो ती कोण होती?
मुक्ती :ती मीच होते पण तुमच्या प्रेमाने मला इथे खेचून आणलं ?
मी : गोंधळून विचारला - म्हणजे मला नाही समजलं...?
मुक्ती : त्यादिवशी तुम्ही आणि डॉक्टर बोलत होतात मी गच्चीवर वाळत घातलेले कपडे काढायला गेले होते ...तिथे एकतारेत माझा पदर अडकला मी काढलं आणि पुन्हा कपडे काढायला लागले ..इतक्यात मला जोरात हसायचा आवाज आला ...मी दचकून पाहिलं तर मंदाकिनी उभी होती ...
मी : तू माझं काहीही करू शकत नाहीस, ना त्यांचं काही वाकड करू शकतेस... जोपर्यंत आमच्या हातात हा गुरुजींनी दिलेला धागा आहे ..आणि माझं माझ्या हाताकडे गेलं ..अरे देवा तो रक्षा कवच माझ्या हातात नव्हता ..मी घाबरले इकडे तिकडे शोधू लागले ...कपड्यांच्या मध्ये मला तो धागा पडलेला दिसला मी तो घ्यायला निघाले पण , तोपर्यंत मी हवेत उडू लागले होते ...
मंदाकिनी : आता मी मुक्ती होणार ...तुला मुक्त करून या शरीरातून ...
असबोलत तिने मला वरून खाली फेकलं आणि माझे प्राण बाहेर आले ...मी लगेचच गुरुजींकडे गेले...मला गुरुजींनी ओळखलं ..
गुरुजी : आलीस तू ..बघ मी तुला सांगितलं होतच ना ती असच करणार ..तू रोज मी सांगितलेला मंत्र म्हणत होतीस ना ? म्हणून तुला लगेच मुक्ती नाही मिळाली ...आता तू तिचा सामना करू शकतेस ...मी तुला आजून काही शक्ती देतो आणि उपासना देतो ज्यामुळे तुझा आत्मा बलशाली होईल आणि तू तुझ्या कुटुंबाला त्या वाईट अत्म्यापासून वाचवू शकशील..
मुक्ती : पण गुरुजी आज तर ते पुजारी आणि त्यांच्या मुलाने मारलं ना त्या दोघींना ? त्या दोघी आता मुक्त झाल्या असेतील ना?
गुरुजी : आग नाही मुली ..ती आणि तिची आई आजूनपण अस्तिवात आहेत..आणि त्यांचा पुढचा हल्ला लवकरच होईल जो खूप जास्त जोरदार असेल..आणि त्यासाठी तुला तयार रहावं लागेल ..
मुक्ती : बापरे! अस का हो ? किती वेळा त्यांचा नायनाट केला तरी त्या परत कश्या जिवंत होतात?  
गुरुजी : किती केलं तरी त्या चेटकीणी आहेत त्यांना मारणं इतकं सोपं नाही ..त्यांना मनुष्य मारू नाही शकत ..आणि जरी केलं तरी ते थोडावेळापूरतच... त्यांना एक पिशाच्च योनीच मरण देऊ शकते..त्यासाठी त्या पिशाच्च योनीतील व्यक्तीमध्ये त्या शक्ती असाव्या लागतील तेव्हाच करू शकेल...यावेळी,मला अस वाटत आहे किमान 4-5वर्षे तरी त्या येऊ शकणार नाहीत ...त्या वेळात तू स्वतःला भक्कम बनव ..मी आहेच सोबत तुझ्या..
मुक्ती: मला जमेल ना हे सगळं ? माझे डोळे भरून आले होते..
गुरुजी : मुली तुझं हे प्रेम...नक्कीच तुला ताकद देईल ...तू नक्कीच तुझ्या कुटुंबाचं संरक्षण करशील ...आणि हो मध्ये मध्ये तू जाऊन तुझ्या कुटुंबाला भेटू पण शकशील..पण काही नियम पाळून
मुक्ती : गुरुजी मी तुमची खरच खूप ऋणी आहे..आणि राहील..
गुरुजी : आग मुली , त्यांनी ऋणी व्ह्यायला हवं तुझं ...कारण तू मुक्ती न घेता त्यांना वाचवण्यासाठी या पिशाच्च योनीचा स्वीकार केला आहेस ..तू धन्य आहेस मुली ..
मुक्ती: गुरुजी , अहो यात काय मोठं ? माझ्या कुटुंबातील माणसांची काळजी मी घ्यायला हवीच ना हो ? मला सांगा मी भेटू शकते ना आत्ता माझ्या मुलीला आणि नवऱ्याला ?
गुरुजी : हो तू भेटू शकतेस, पण तुला काही नियमांचे पालन करावे लागेल तुला अजिबात त्यांचा स्पर्श होता कामा नये ... शिवाय तु त्यांना सांगायचं की तुझ्या मुलीला इथे ठेवू नका.. तिला कुठेतरी दूर शिक्षणासाठी पाठवा ..म्हणजे आपल्याला आपले काम करणे सोपे जाईल..
मुक्ती :अहो पण तिला दूर पाठवायला मला नाही वाटत संपतराव तयार होतील.. एकच मुलगी आहे आमची तिला दूर कसं पाठवणार? 
गुरुजी :तिच्यासोबत तुम्ही तुमच्या घरात ति जी मोलकरीण आहे ना, तिला पाठवून द्या ..ती काळजी घेईल तिची.. कस आहे इथे जर तुमची मुलगी राहील तर आपण हव असं काम करू नाही शकणार.. त्यामुळे मी सांगतोय की तिला इथे नका ठेवु ..तिला जाऊ द्या तुम्ही, आणि कदाचित असे होऊ शकतो की जर ती इथे त्यांच्या दृष्टिक्षेपात राहिली तर, कदाचित दोघी मायलेकी लवकर परत येऊ शकतील ...आपल्याला कमीत कमी चार ते पाच वर्षाचा वेळ हवा आहे ..त्यासाठी तुझी मुलगी इथे नसेल तर आपल्या जास्त बर पडेल बघ आता तू काय ते ठरव..
मुक्ती ठिक आहे मी त्यांना समजून सांगेल पाठवतील ते माझ्या वर्षाला आणि तिच्या सोबत आम्ही आमच्या जनकाला पाठवले म्हणजे आम्हाला त्याची काळजी राहणार नाही वजनात का खरंच माझ्या आई पेक्षा ही आमच्यासाठी खूप काही आहे येथे गुरुजी आणि तुम्ही जे सांगाल ते करायला माझी पूर्ण तयारी आहे मी सगळं काही करेल फक्त मला माझ्या कुटुंबाचे संरक्षण करायचा आहे
आणि मग मुक्ती माझ्याकडे आली, आणि तिने माझ्या मनाची तयारी करून घेतली ..मी तुला माझ्या  वर्षाला भारताबाहेर पाठवाव.. आणि त्याप्रमाणे मी लगेचच  तुला भारताबाहेर पाठवून दिल..बघ आज तू आलीस आणि तीही आली ..त्यामुळेच कदाचित गुरुजींनी तुला भारता बाहेर पाठवायचा सल्ला दिला होता ..आता पुढची मदत आपल्याला मुक्ती आणि गुरुजी करणार आहेत.. पण आपल्यालाही काही काळजी घ्यायची आहे . ठीक आहे काल तुम्ही दोघांनी काही नाही केलं ...खूप छान गोष्ट आहे. आपल्याला तिला एकही संधी द्यायची नाहीये की ज्यामुळे ती आपले नुकसान करू शकेल.
वर्षा: बाबा म्हणजे आता नक्की काय करायच आपण ? म्हणजे तिला कसे आडवायचे आपण?
संपतराव: हे बघ आता तुम्ही दोघांनी अजिबात जवळ यायचं नाही , अगदी कुठल्याही परिस्थितीत, बाकी मार्ग आपल्याला मुक्ती आणि गुरुजीला देतीलच.. इतक्यात बाजुला काहीतरी हालचाल जाणवली ..कोण होतं ते ? वर्षाला तिच्या बाजूला कोणीतरी उभे असल्याचा भास होऊ लागला ..तिच्या केसांवरून कोणीतरी हात फिरवत होत.. तिच्या गालांवरून कोणीतरी हात फिरवत होत.. तो स्पर्श तिला खूप  उबदार वाटत होता.. त्या स्पर्शात तिला कोणाची तरी आठवण होत होती... वर्षाचे डोळे आनंदश्रृंणी भरून आले होते ...कोण होत बरं ? 
       हो मुक्तीच होती ती..प्रेमाच्या भरात मुक्ती ने एक नियम मोडला होता ..तिने आज न राहून वर्षाला स्पर्श केला होता ...आता पुढे काय होणार होतं? काय मुक्तीच्या सर्व शक्ती नष्ट होणार होत्या..तिने इतकी वर्षे केलेली सर्व तपस्या व्यर्थ होणार होती ?मुक्तीला तिने केलेली चूक जाणवली ...किती केलं तरी ती एक आई होती ना ..नाही रहावले वेड्या मायेला ..पण आता यातून मार्ग कोण काढणार होतं? गुरुजी की स्वतः मुक्ती ? 

क्रमशः

🎭 Series Post

View all