नियती - एक भयकथा - भाग 33

भयकथा


#नियती 
भाग 33
@पूनम पिंगळे
मंदाकिनी: घ्या घ्या सगळे जेऊन घ्या ...परत जेवायची गरज नाही पडणार तुम्हाला ..
संभा : ओ हसणारे तुम्हास्नि समजतय काय वो ..ह्ये काय जेवण न्हाई नाश्ता हाय..रातच्याला बी हसत हुती ..आत्ता बी हस्तिया... काय ए बायो का समद्याना त्रास देऊ राहिली ग तू ? 
संभाच हे बोलण ऐकून सगळे चकीत पडले ...संभा मध्ये इतकी हिम्मत आली कुठून ? संपतरावांना वाटलं होतं रात्री झोपेत संभा बोलला होता तस ..पण हा तर जागेपणी पण असाच बोलत होता..
संपतराव : अरे संभा ..गप बस की ...तुला माहीत आहे ना ती कोण आहे ते ? अरे वेड्या कशाला तिचा राग वाढवतोस?
संभा : न्हाय वो ..म्या तर तिला समजून सांगतोय ..
आता मात्र हेमंतने कपाळावर हात मारून घेतला.. संभा अस काय वेडेपणा करतोय हेच समजत नव्हतं ...इतका भित्रा असणारा हा ..तिला समजून सांगत होता ? नवलच होत..संपतराव आणि वर्षा पण तेवढेच चकित होते ...संभा तिला चक्क घाबरत नव्हता ?त्याची शरीराची हालचाल पण थोडी वेगळी वाटत होती ...थोडा बायकी वाटत होतं तो ..
संभा : संपतरावांना ..काय हो ..हाच का विश्वास तुमचा माझ्यावरचा? आता वर्षाच समजू शकते ..पण तुम्हीपण? 
संपतराव: म्हणजे रे संभा? अरे मी कसला विश्वास रे? अरे या 2-4 दिवसांची ओळख आपली ...आणि वर्षाच काय रे ? तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का?आणि तू अचानक इतका शुद्ध कसा बोलायला लागलास रे ?
संभा : हेकाय हो ? इश्श!! मी तर नेहमीच असच बोलते की..शी बाई तुम्ही तर सगळंच विसरले..
संपतराव: ए संभ्या आता पुरे रे बाबा..वेडा होईल रे मी आता..
संभा : हो वेडेच आहात तुम्ही ...त्या मंदाकिनी मुळे... सोडणार नाही मी त्या सटविला..
हेमंत : ए मूर्खा !अर काय झालंय काय र तुला ?
संभा : अहो आमचे भावी जावईबापू असे चिडू नका हो..
हेमंत:ए संभ्या आता मुस्काट फोडीन बरका तुझं . नीट बोलरे ..मस्करी बस र ..
संभा: हसत ..मस्करी आणि तुमची ? नाही हो नाही ..अस कस? 
संपतराव:याला आवरा रे . आवरा कोणीतरी...!!
संभा: अस बोलणार आता तुम्ही मला?आणि संभा रडू लागला ..रडत रडत डोळे पुसू लागला. म्हणजे माझी इतक्या वर्षाची तपस्या गेली का पाण्यात..
संपतराव: संभा आता खुप होतंय बरका ..उगाच मार खाशील..
संभा : म्हणजे! तुम्ही मारणार मला? किती बदलले हो तुम्ही..
संपतराव: हेमांतराव आवरा याला उगीच मर खाईल आता माझा हा?
हेमंत:पप्पा थांबा काहीही बोलू नका.. मला काही अंदाज आलाय..तो भोवतेक बरोबर असेल ..मला 5मिनिटं द्या..
संपतराव: हो घे बाबा  चांगला अर्धा तास घे..
हेमंत: धन्यवाद पप्पा ...मग सांभाला.. तुम्ही माझ्या भावी सासूबाई का मग ? 
संभा : बरोबर आता कस ओळखलस तू मला ...वाह मस्तच रे ..नवऱ्याने ,मुलीनी नाही ओळखलं मला पण तु ओळखलस एकदम बरोबर..
हेमंत: पण हे कधी झालं?
संपतराव: जवळजवळ ओरडूनच बोलले ..काय मुक्ती ? तू आणि संभा ? हे कधी?
संभा : काल रात्री ..तुम्ही सगळे झोपले होतात ..आणि मला मंदाकिनी ची चाहूल लागली ...तीला तुम्ही सगळे घाबरता ना मग तिला जास्त चेव येतो ..म्हणून मी संभा झाले आणि तिला चिडवू लागले....तिला पण आता प्रश्न पडला असेल हा संभा तिला घाबरत कसा नाही ...आता लवकरच तिची आई पण येईल मला तेच हवं आहे ..आणि आपल्याला जे पण करायचं ते आपल्या वाड्यातच ..तो देवीचा त्रिशुळ जिथे आहे तिथेच त्या दोघींना आणावं लागणार आहे आपल्याला.. पण यासाठी आपल्याला  पुजाऱ्याची किंवा ब्राह्मणाची गरज पडेल ..जो या दोघींना इथे त्रिशूलासमोर आणू शकेल ..
हेमंत : अहो पुजारी कस करल? यासाठी तर तांत्रिक लागल की आपल्याला ..
मुक्ती : नाही नाही ..ही चूक आजिबात करू नका ..तांत्रिक आमचा गैरवापर करू शकतो ...आमचे सगळ्यांचे आत्मे कैद करून त्यांच्या गैरकामासाठी वापर करू शकतो ..पुजारी किंवा ब्राह्मण बोलवा ..मी सांगेन त्यांना काय करायच ते..
हेमंत : माझा मित्रच आहे की पुजारी ..मी जाऊन घेऊन येतो..
मुक्ती: नाही नाही तुम्ही बाहेर नका जाऊ..संभाला सांगा आणायला..त्याला माहित असेल ना?
इतक्या वाईट वेळी पण हेमांतला हसू आलं..मुक्ती रागात- काय झालं यात हसायला?
हेमंत: अहो सध्या तर तुम्ही संभा आहात.. तुम्ही कसे ओळखणार माझ्या मित्राला पुजाऱ्याला? 
मुक्ती: अरेहो खरच की...मी पण ना..ठीक आहे मी आता गंगी होते.. तुम्ही संभालाच सांगा जायला. तुम्ही आजीबात बाहेर जाऊ नका. 
हेमंत: हो हो चालेल ...आता आमच्या संभाला मोकळा करा हो..म्हणजे मी त्याला सांगतो काय करायचं ते..तेवढयात संभाच्या शरीरातून एक धुसर आकृती बाहेर आली ...आणि क्षणार्धात ती मुक्ती स्पष्ट दिसू लागली.तिच्याकडे संभाच लक्ष गेलं ती त्याच्या बाजूलाच उभी होती ..संभाने दचकून तिथून पळ काढला आणि हेमांतच्या मागे उभा राहिला ..
संभा : मला वाचवा ओ ..त्या बघा भूत बाई उभ्या हायत तिथं..
आता हेमांतला खूप म्हणजे खूप हसू आलं आणि त्याच्यासोबत मुक्तीसहित सगळे हसू लागले..
संभा : सगळ्यांना वेड्यासारखा बघत होता ..आर देवा या समद्यास्नि एकसाथ येड लागलंय का काय? कशी हसत्यात समदी..
हेमंत: अर संभा हसू नग तर काय? आत्तापतूर तू त्या मंदाकिनीला दम देत हुतास आणि आताअचानक असा घाबरलास ..तेबी मुक्ती आईला! म्हणून समदे हसतोया
संभा : म्या ? म्या कवा दम दिला? आन ते बी त्या मंदाकिणीला व्हय? अव्हो काय माझी मस्करी करताय वो..
हेमंत: बर जाऊदेत समद ..तुला लई मोठं काम करायचं हाय बघ ..
संभा: ओ साहेब, म्या कंचबी जोखमीच काम नाय करणार बरका वो..
हेमंत : आर ऐक तर तुला काय करायच हाय त्ये ..आणि त्याने सगळं समजून सांगितले
संभा : आस व्हय? ह्ये तर मय आस टीचकी वाजून करणे की..
हेमंत: जा आता वेळ घालवू नगस दादाला घेऊन ये बर लवकरी..
आणि संभा तिथून निघाला... पण हे सगळ तीने ऐकलं  होत 
क्रमशः

🎭 Series Post

View all