#नियती
अंतिम भाग- 35
©पूनम पिंगळे
उर्मीला होणारा त्रास पाहून दादाच मन पिळवटून निघालं होत ..पण काय करणार ?
दादा: अरे संभा तीची शक्ती आता काम नाही करणार या माळे मुळे, चल पटकन पकड तिला गाडीत घेऊन चल..
ओरडतच ऊर्मी: खबरदार पुढे आलास तर..अरे या दादावर मी प्रेम केलं आणि यानेच मला फसवलं..तुम्हाला कोणालाच सोडणार नाही मी..एकेकाचा बदला घेईन.. तुम्ही कोणीही माझं काहिही वाईट करू शकणार नाही..संभाने तिला पकडलं आणि तिचे हात पाठीमागे बांधले ...ती सध्या शक्तीहीन होती त्यामुळे फक्त चिडून ओरडत होती ..मग तिला खाली झोपवून तिचे पाय पण बांधले .. तिचे हात संभाने आणि पाय दादाने धरून तिला गाडीत ठेवलं...मग दादा पळतच घरात गेले आणि पटकन सगळं पूजेच सामान गोळा केलं.. दरवाजाला कुलूप लावून निघाला ...
अरे हे काय ऊर्मी अचानक रडू लागली..दादा मला सोडा ना..खूप त्रास होतोय अस का बांधून ठेवलंय तुम्ही मला? ए संभा काका तू तरी सोड ना मला..दादाला खरच तिला मोकळं करून तिला जवळ घ्यावं अस वाटत होतं ..पण त्यांनी स्वतःला सांभाळलं होत .त्याने पघळून न जाता संभाला गाडी चालू करायला सांगितली ..
अरे देवा !हे काय ? गाडी चालूच होईना...इतक्यात जोरात हसायचा आवाज आला ..ती ऊर्मी म्हणजे मंदाकिनी ची आई मिरा हसत होती...
मिरा : कर कर गाडी चालू कर..बघू कसा नेतोस मला तू ? अस बोलून ती जोरात हसू लागली..अरे माझी शक्ती कमी झाली पण संपली नाही काय..चल मला नेऊनच दाखव तू आता इथुन..
इतक्यात तिथे आजून एक जोरात हसायचा आवाज आला ..आता हे कोण होत? होय होय मंदाकिनी होती ती : आई आग तुला कस ग अस बांधू शकले हे लोक ..तू इतकी शक्तीहीन कधीपासून झालीस?या संभाच्या मागोमाग मी आले पण मला याच्या घरात काही येता आलं नाही खूप प्रयत्न केला मी..काय माहीत का ते?
मिरा : आग मंदा तुझी तपस्या आजून तितकी नाही झाली ग ..त्यामुळे तुला नाही येता आलं याच्या घरात ..किती केलं तरी एका पुजाऱ्याच घर ना ग ते..बर आता तू सोडव मला ..या दोऱ्या सोड माझ्या ..
संभा आणि दादाला फक्त आवाज येत होता पण मंदाकिनी दिसत नव्हती ..ते अंधारात इकडे तिकडे तिला शोधत होते ...संभा मधेच गाडी चालू करायचा प्रयत्न करत होता पण गाडी काही सुरू होत नव्हती ...एक गोष्ट दादाच्या लक्षात आली होती सध्या मंदाकिनीकडे जास्त शक्ती नाहीत ..त्याला जास्त लक्ष द्यावे लागणार होतं ते मिराकडे.. पण आता यातून माझ्या उर्मीला कस बाहेर काढू आणि मित्राची मदत कशी करू ? इतक्यात मंदाकिनी चा जोरात ओरडल्याचा आवाज आला ...आता हे अस का झालं बर?
मंदाकिनी मिराच्या जवळ गेली आणि तिने तिच्या दोरीला हात लावला ..ती जोरात गाडीच्या बाहेर फेकली गेली होती ..मिरा आता खूप चिडली होती ..तिला मुलीची काळजी वाटत होती ..अत्यंत अस्वस्थ होत ती बोलली ;पोरी लागलं नाही ना ग तुला खूप (आता भुताला कधी लागत का? असा विचार दादा आणि संभाला आला आणि ते दोघे एकमेकांकडे बघून हसले)..माफ कर ग मला लक्षात आलाच नाही ग की ही माळ ,याने माझ्या गळ्यात घातली आहे त्यामुळे तू मला स्पर्श नाही करू शकणार ...ए पुजारी चल ही माळ काढ माझ्या गळ्यातून..
दादा : नाही मी नाही काढणार ..तू माझ्या उर्मीच्या शरीरातून बाहेर ये ..तिला मोकळं कर ..मग मी विचार करेन ती माळ काढायचा..
मिरा : ए विचार करेन म्हणजे काय? हा ?तुला काढावीच लागेल ही माळ चल काढ पटकन...
दादा : नाही ते शक्य नाही
मिरा : मग तू बोलतोस ते पण शक्य नाही ...आग मंदा तू गाडीत येउ नकोस ग ... तुला त्रास होईल ...जा तू त्या संपत च्या घरी ...मी येते याच्या सोबत ..ही लोक काय मला सोडत नाहीत ...चल आज ती वेळ येऊनच जाऊदेत आपण जाऊ दोघी आणि त्या संपतला मारून तुला मुक्त करू ...मग मी पण मुक्त होईन ...
मंदाकिनी: ठीक आहे मी जाते पुढे ..तू ये ...बघू तरी काय तयारी चालू आहे त्यांची तिकडे ..ती मुक्ती काय करतीये ते बघते जाऊन मी ..आता काय तर म्हणे ती गंगी होणार होती ..आई तुला नाही ना ग आजून इतर शरीरात जात येणार आता ..मग तुला तर उर्मीच राहावं लागेल ...पण ती मुक्ती कशी काय ग कपडे बदलावे तशी शरीर बदलते?
मिरा : आग मंदा तिला गुरू आहे ना ग ..गुरुच बळ काही वेगळंच असत बघ.. मी बरेच वर्ष तपस्या केली पण मला कोणी मार्गदर्शक नव्हतं ना ग . मग जस मला सुचेल वाटेल तसे मी केलं पण या मुक्तीला त्या गुरुजींनी बरोबरं दिशा दिली ग ..त्यामुळे ती लवकर शक्तिशाली झाली ..पण मी काही कमी नाही ..तिच्यातल्या काही शक्ती नसतील माझ्याकडे पण म्हणून मी निर्बल नाही काही ..बर आता आपण नको बोलत बसायला जा तू पुढे
हे सगळं बोलणं संभा आणि दादा ऐकत होते ...संभा : ओ मीराबाई मंग आता चालू करा की वो माझी गाडी ..चलायचं ना मंग आपुन संपतरावच्या घरी ?
मिरा: हो कर चालू गाडी ...
संभा ने चावी फिरवली आणि गाडी चालू..वाह मस्त ...थोड्याच वेळात ते संपतराव च्या घरी पोहोचले ..
मिरा: ए दादा आता ही माळ काढ माझ्या गळ्यातली ..आणि हातपाय सोड माझे ..
दादा : नाही ते शक्य नाही ...तू इतकी आयती माझ्या तावडीत सापडली आहेस मी तुला सोडायला काय मूर्ख आहे काय? त्यापेक्षा तू या शरीरातून बाहेर पड.. माझ्या उर्मीला मोकळी कर
पण मीरा जर शरीरातून बाहेर पडेल तर पुन्हा तिला प्रवेश करता आला नसता ..त्यामुळे ती त्यातून बाहेर पडत नव्हती..
मिरा : ए जास्त शहाणपणा करू नकोस , चल सोड पटकन मला..म्हणे माझ्या मुलीला मोकळी कर . आलाय मोठा शहाणा..
ते संपतरावांच्या वाड्याशी पोहोचले . पूर्ण रस्ताभर मिरा आपली मला सोड रे शहाण्या..वैगेरे वैगरे बोलतच राहिली पण संभा किंवा दादाने लक्ष दिलंच नाही ..
दादा : संभा , चल रे आता तू हिचे पाय पकड मी हात ..घेऊन चल घरात तिला ...हिच्यामुळे ती मंदाकिनी पण येईल आपल्या तावडीत..
संभा गाडीतून उतरला ...त्याने आणि दादाने तिला पकडून घरी आणलं ..ते दोघे घरात प्रवेश करताच सगळे एकदम अचंबीत झाले होते ...अरे हे काय? उर्मीला अस का बांधून आणलंय?
हेमंत; अरे दादा ,संभा तुम्ही उर्मीला अस कशापायी बांधलय? अरे लहान पोर ना ती ..सोड र तिला...माझ्यापायी आलास इथं तू ..ती येत नव्हती काय र? म्हणून अशी बांधून आणलीस तिला
मिरा जोरात रडू लागली : हेमंत काका सोडवा ना मला ...बघा ना कस बांधलय मला ..हेमंत तिची दोरी सोडणार इतक्यात संभाने त्याचा हात धरला ...हेमंतने चिडून त्याचा हात जोरात झटकला : ए संभा गप र हात सोड माझा..दादा त्याच्या जवळ गेला
दादा : अरे ती फक्त माझी मुलगी ऊर्मी नाही तर तिच्यात ह्या मंदाकिनीची आई मिरा आहे..तिला सोडवू नकोस ...
हेमंत: अरे दादा काहिही काय ? आर ही तर आपली ऊर्मी हाय..
मिरा : रडत रडत -हो ना काका कधीची सांगतीये पण सोडतच नाही मला ..येना काका सोडव ना मला..हेमंत पुन्हा तिला सोडायला पुढे गेला ..आणि दादाने त्याला मागे ढकलले ..
हेमंत: दादा काय झालंय तुला? तू असा का करत हायस ? अर आपल्याला त्या मंदाकिनीला इथून घालवायचय ...आपल्या उर्मीला नग र त्रास देऊस.. हे सगळ पाहून संपतराव आणि वर्षा पुढे आले
संपतराव: हेमंत, आहो कोणी बाप अस आपल्या मुलीला बांधून ठेवेल का?समजून घ्या त्यामागे काहीतरी कारण असणार ...असे अविचार करून पुढे जाऊ नका ..चला आपण पुढच्या कामाला लागू ..इतक्यात वर्षांने हेमंतच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्याने समजावले.. आणि हेमंत बाजूला झाला ..
तिथे गंगी आली ...म्हणजेच आपली मुक्ती .तिच्या मागोमाग मंदाकिनी पण होतीच....
गंगी: तुम्ही जरा आत येता काय वो दादा ..वाईच बोलायचंय..
दादा तर एकदम उडालाच : म.. म . मी.. मी आत कशाला? इथेच बोला की ..
गंगी : आव्ह इथं न्हाय बोलता येणार..
दादा : नाही नाही मी नाही येणार कुठे ...इथेच बोला ..
संपतराव: दादा ..आमच्या गंगीच ऐका तुम्ही ..महत्वाचे आहे..
दादा : म्हणजे ? अस काय आहे ?
संभा : दादा जावा ओ तुमी..गंगी सांगल समद ..दादा वेड्यासारखे सगळ्यांकडे बघत होते ..हे काय नाटक ? सगळ्यांच्या नजरा ,त्याला तीच ऐक अस सांगत होत्या... आणि दादा मुकाट्याने तिच्या मागोमाग गेले ...
मंदाकिनी काहीही न बोलता शांत होती ..तिला तिचं अस्तित्व कोणाला जाणवू द्यायचं नव्हतं..आणि आता ही गंगी म्हणजे मुक्ती काय सांगते ते ऐकायचं होत..
मिरा : हो जा जा रे दादा जा ...माझं प्रेम नाही समजलं तुला ..आता तु गंगीच प्रेम बघ ...आणि ती जोरात हसू लागली ...तिचे डोळे आगीसारखे लाल लाल झाले होते ..तिला तस पाहून हेमंत घाबरला त्याने वर्षाचा हात घट्ट पकडला ..आणि वर्षा कडे अस पाहिलं की, अरे देवा ..खरच की ...वर्षाने डोळ्यानेच its ok अस खुणावलं... आणि हेमंत जागेवरच उभा राहिला ...आता पुढे काय काय होणार होत कोणास ठाऊक असे त्याचे भाव होते ..
दादा गंगीच्या मागोमाग गेले आणि तिने त्यांचा हात पकडला ..दादाने एकदम शॉक बसल्यासारखा जोरात तिचा हात झटकला : ए बाई इथे वेळ काय आणि तू काय करतीयेस ? तु काय बोलणार होतीस ते बोल ..
मंदाकिनी पण त्यांच्या मागोमाग गेली..
गंगी : पुजारी जी ऐका तरं मी ऊर्मी आहे गंगीच्या शरिरात ..मला तुमचा हात धरावाच लागेल ..नाहीतर मी जे बोलते ते सगळं मंदाकिनी आणि मिराला समजेल ..हा ताविज आहे माझ्याकडे यामुळे आपण बोलू ते त्यांना समजणार नाही ..
मंदाकिनी मनातच : ए शहाणे हात सोड त्याचा ..मोठी आली ताविज मध्ये लपणारी..
दादा: काय बोलताय तुम्ही ? तुम्ही ऊर्मी ? बर ठीक आहे सांगा लवकर काय ते.. आणि मग गंगीने त्यांचा हात पकडला ..अरे हे काय मंदाकिनीला समोर काहीच दिसत नव्हतं ..एक मोठा धुराचा लोट दिसत होता फक्त. ती विचारात पडली हे दोघे गेले कुठे?खूप प्रयत्न केला तिने पण ती त्या दोघांना पाहू शकली नाही ..
ऊर्मी: आपल्याला या दोघींना हरवायचं... पण त्याच सोबत त्यांना मुक्त पण करायचंय ..नाहीतर त्या पुन्हा पुन्हा येतच राहणार आणि त्रास देतच राहणार ...
दादा : हो त्यासाठीच तर आलो ना मी आज ..
ऊर्मी : पण तुम्ही समजता तितकं सोपं नाहीये ते..पण अवघड पण नाही ..मला गुरुजींनी जे सांगितलं तस आपण करू ..सर्व काही नीट होईल..मिरा खूप जास्त शक्तिशाली आहे ..तुमची माळ तिला किती अडवेल काही सांगता येत नाही ...आपल्याला लवकरच हालचाल करावी लागेल .मंदाकिनी मला सध्या तितकीशी शक्तीवाली वाटतं नाहीये ..आधी आपण तिला आजून शक्तीहीन करू . मिरासाठी धडपडत ती येईलच ईथे..
दादा:हो पण आपण काय करायचं त्यासाठी ?
ऊर्मी : तुम्हाला पूजेसाठी काय समान लागत ते तर माहीत असेलच ना ? ते आणलंय का तुम्ही सोबत ?
दादा : हो आणलंय ..
ऊर्मी : मस्त मग आता तुम्ही बाहेर जिथे देवीचा त्रिशूल आहे त्याच्या पासून थोड्याच अंतरावर होम तयार करा ... नंतर लाल कुकुचं एक वर्तुळ तुमच्या भोवती आणि समोर ती बसेल तिथे तयार करा...21 लिंबाच्या दोन माळा तयार कराव्या लागतील, त्या संभाला सांगा..2 माठांमध्ये पाणी भरून ठेवा त्यात कुंकू , हळद घाला...आणि मंदिरातील देवीच्या पायाच कुंकू पण घाला ..होम चालू करून देवीच आवाहन करा ...आणि त्यासोबत मंदाकिनी ला तिथे यायला सांगा ... सध्या मिरा आपल्या ताब्यात आहेच तिला त्या वर्तुळात ठेवा आणि तिच्या गळ्यात लिंबाची माळ घाला.. .आईसाठी मंदाकिनी नक्कीच येईल तिथे ...आणि पुढील काही गोष्टी तिने त्याच्या कानात सांगितल्या...दादा एकदम दचकले हे काय कानात का ?
ऊर्मी: भिंतीला पण कान असतात ..आता तुमच्या हातात सर्व काही आहे ..माझ्या कुटुंबाची आणि माझी सुटका फक्त तुम्हीच करू शकता ..
दादा: मी माझे पूर्ण प्रयत्न करेन ..बाकी सगळं माता बघून घेईल ,"जगदंब..जगदंब"..चला आता मी निघतो ..लागतो माझ्या कामाला...गंगी म्हणजे ऊर्मी त्यांच्या पाया पडली ..दादांनी त्यांना अडवलं ..-अहो त्या देवीच्या मनात असेल तसच होईल ..आपण सगळे नाममात्र..
मंदाकिनी रागाने धुमसत होती ..या दोघांच काहीच बोलण तिला ऐकता आलं नव्हतं. ती ही त्यांच्या मागोमाग निघाली..
दादा बाहेर आले त्यांनी संभाला जवळ बोलावलं आणि लिंबाची माळ बनवून आणायला सांगितले ..मग त्या त्रिशूलाच्या थोड्याच अंतरावर होम केला ..कुंकूच वर्तुळ केलं..आणि हेमंतच्या मदतीने मिराला वर्तुळात आणून ठेवलं ...ती हातपाय झाडू लागली ...हेमंतने तिचे पाय पकडले होते ती त्याला पायाने झिडकारत लाथा मारत होती ...हेमंत पूर्ण ताकत लावून तिला घेऊन आला ...इतक्यात संभा लिंबाची माळ घेऊन आला ...ती माळ मिराच्या गळ्यात घातली.. तिच्या कपाळावर देवीच्या पायाच कुंकू लावलं ..मिरा आता तडफडू लागली ..ती जोर जोरात ओरडू लागली..
इकडे मंदाकिनी बेचैन झाली होती..तिच्या आईची अवस्था तिला पाहवत नव्हती..काय करून सोडवाव हेच तिला समजत नव्हतं..
मिरा : ए पुजाऱ्या sss... काय समजतोस तू स्वतःला ? काही बिघडवू नाही शकत तू माझं ..माझी मंदा मला इथून घेऊन जाईल .(मंदा: ही ग आई पण कस सोडवू तुला?तिचे डोळे पाण्याने भरून आले होते).आणि तुमच्या सगळ्यांना स्वर्गवासी व्हावं लागणार आज ...ती तुमची मुक्ती ..जी सध्या गंगी आहे ..तिचा बंदोबस्त तर मीच करणार ..
दादा : ए गप ग ..उगाचच उडया मारू नकोस ..माझ्या उर्मीला मोकळं कर ..मी तुला सोडतो ..
मिरा : काय रे? हार मानलीस तू तर!!अरे अस कस ? चल रे जा पळ ..मी नाही सोडणार तिला..
दादा : ठीक आहे ..मग हो आता मरायला तयार..
मिरा : जोरात हसू लागली ...अरे मला मरुण तर जमाना झाला ..आता परत काय मारतोस तू !!
दादा : म्हणजे तुला आता मुक्तच करतो मी ..अग कशाला हवी ही भूत योनी ...मुक्त हो ..नवा जन्म घे ..एक सुंदर नवीन आयुष्य वाट पहात आहे तुझी आणि तुझ्या मुलीची ..(मंदाकिनी ला हे पटत होत..जस की कळतंय पण वळत नाही )
मिरा : हाहाहा हा हा हा हा ..अरे कसा रे वेडा तू ? काय करू त्या नवीन आयुष्याच? आत्ता मला हवं ते मी करू शकते..मला कोणीही अडवू शकत नाही ...जे हवं ते मिळवू शकते ..
दादा : हो का ग ? जे हवं ते मिळवू शकतेस तू ? मग मला का नाही मिळवू शकलीस? प्रेम करतेस ना माझ्यावर? ते प्रेम व्यक्त करायला तुला दुसरं शरीर उपयोगात आणावं लागतंय ..आग ती माझी मुलगी आहे ग...तुझ माझ्यावर प्रेम आहे म्हणजे , अजूनही तुझ्यामध्ये प्रेमभावना आहे ..माणुसकी आहे ..आग तुझ्या बरोबर तू बिचाऱ्या मंदाकिनी च आयुष्य ही खराब करत आहेस..आज ती पण बिना शरीराची भटकत आहे ..हा आत्मा नश्वर आहे ...पण त्याला फक्त भटकाव लागत ..त्याच काहीही अस्तित्व नसत ...बिना शरीराचा आत्मा म्हणजे अंगावरच फक्त वस्त्र आहे ...वस्त्राला मानवी देहामुळे अस्तित्व आहे ..जर शरीरच नसेल तर त्याला कोण विचारेल ? मग ते वस्त्र कितीही महाग किंवा सुंदर असेल तरी ? तसच आत्म्याला शरीराशिवाय काहीही अस्तित्व नाही . तुम्ही दोघीही आता मुक्त व्हा आणि पुन्हा नवा जन्म घ्या ...आजून किती अश्या भटकत राहणार ?
दादा हे बोलत असताना मिरा एकदम स्तब्ध झाली होती..काहीही बोलत नव्हती ...हा कशाचा असर होता लिंबु ,माळ,होम, की त्या वर्तुळाचा? कोणास ठाऊक ? सगळे आश्चर्याने बघत होते की ही मिरा इतकी शांतपणे कशिकाय ऐकत आहे ? तेवढ्यात तिथे जोरात हवा सुटली..कोणीतरी आकृती जोरात घिरट्या घालत होती...सगळी झाडाची पाने जोरात वाजत होती ..घराच्या खिडक्या दरवाजे जोरात वाजत होते ..होम विझला होता ..रांगोळी आणि ते कुंकूच वर्तुळ आता हवेने उडून गेले होत ..होय मंदाकिनी आली होती ..ती खूप चिडली होती..तिला तिच्या आईला सोडवायचा होत. पण एकीकडे तिला दादाचे म्हणणं पण पटलं होत ..ती खूपच वाईट मनस्थितीमध्ये होती..
मंदाकिनी: ए पुजाऱ्या ..मुकाट्याने माझ्या आईला सोड ,..नाहीतर तुझं काही खर नाही.. ती आता त्या मिरेच्या अगदी जवळ उभी राहून बोलत होती इतक्यात गंगीच्या शरीरातली मुक्ती तिथे आली आणि बाजूला पडलेली लिंबाची माळ मंदाकिनी च्या गळ्यात घातली आणि तिला धक्का मारून खाली पाडलं.. इतर कोणालाही मंदाकिनी दिसत नव्हती ...सगळे फक्त जे होत आहे ते बघत होते ...
इतक्यात गंगी जोरात ओरडली: ओ पुजारी ते कुंकूच वर्तुळ पुन्हा काढा ..आणि होम पण चालू करा ..पुजारी हातातकुंकू घेऊन उठले आणि मंदाकिनी ला तिथे सोडून गंगी म्हणजे मुक्ती बाजूला गेली ..दादाने पटकन वर्तुळ काढले ...आता मंदाकिनी आणि मिरा जेरबंद झाल्या होत्या.. मिराला वाटलं होतं मंदाकिनी तिला सोडवेल..पण दोघी मायलेकी आता आत अडकल्या होत्या ..घरात सगळ्यांना फक्त ऊर्मी दिसत होती ..बाकी या दोघींचं अस्तित्व समजत नव्हतं, फक्त आवाज येत होता..
आता दादा आपल्या कामाला लागले होते ...त्यांनी काली मातेचे आवाहन सुरू केले...हळू हळू दादांचा आवाज वाढू लागला ...बाजूच्या रातकिड्यांचा आवाज येत होता ..दुरकुठेतरी कावळे जोरजोरात काव काव करत होते ..वटवाघळे आवाज करत होते , हवेत घिरट्या घालत होते ..मंदाकिनी दादाला आणि संपतला शिव्या घालत होती .....मिरा अजूनही स्वतःला सोडवायच्या प्रयत्नात होती... पण तिला ते जमत नव्हतं ...आता 1.30 वाजत आला होता ...आमावस्या संपणार होती या दोघींची राहिलेली शक्ती पण आता जाणार होती..बस आता 5 चच मिनिट बाकी होते ...याच वेळेत ते कुंकवाचे पाण्याचे मटके या दोघींवर फोडायचे होते ...
दादांनी संभाला जवळ बोलवून ते कसं करायचं हे समजावून सांगितलं ..एक मटका हेमंतने आणि एक संभाने घेतला होता ..एका हातात दगड आणि एका हातात मटका असे दोघे उभे राहिले..आता फक्त दादाच्या इशाऱ्याची वाट पहात होते दोघे ..आणि दादाने आवाज दिला ...फोडा ssss... पटकन दोघांनी मटके फोडले आणि दोघींना भिजवले ..मिरा आता उर्मीच्या शरीरातून बाहेर आली होती ..ऊर्मी जोरात रडू लागली ...आणि धावत संभाकडे गेली ...
ऊर्मी: दादा वेडे आहेत काय? हे कसं पाणी ओतलंय माझ्या अंगावर ..वर्षांने तिचा हात पकडून तिला घेऊन गेली ...तिने स्वतःचा एक ड्रेस तिला घालायला दिला .
इकडे आता मंदाकिनी आणि मिरा सगळ्यांना दिसू लागल्या होत्या.. त्या रागाने धुसफूसत होत्या...
दादा वेगळ्याच विचारात होता ..आता या दोघींना एकसाथ त्या त्रिशूळणे कस माराव..एकेकीला मारायचं नव्हतंच ना ..त्याने संपतरावांना जवळ बोलावलं ..कानात काहीतरी सांगितलं ..संपतरावांनी . होकारार्थी मान हलवली आणि त्या त्रिशूळपाशी ते पोहोचले ...तो त्रिशूल त्यांनी हातात घेतला ..इकडे दादा सतत देवीचं आवाहन करतच होते..त्रिशुळ तसा खूप जड होता तो संपतरावांना नीट सांभाळता येत नव्हता, हे पाहून हेमंत ही जवळ गेला . संपतरावांनी हेमंतला काय करायचं हे कानात सांगितले..
दादा आणि संपतरावांची खुणवा खुणवी झाली आणि दादा जागेवरून उठले..हातात देवीचं कुंकू होतच ..ते या दोघीवर टाकू लागले ..आणि अस करत करत त्यांनी दोघींना एका रांगेत आणलं...त्याच क्षणी हेमंतने खूप हिम्मत करून दोघींना त्या त्रिशुळाच्या दिशेने ढकललं..त्या दोघींचं आलेलं वजन संपतरावांना पेलणे शक्य नव्हते ..याचा अंदाज लागून संभा धावत तिथे गेला आणि त्यानेही मागून ते त्रिशूळ पडकले ...या दोघी त्या त्रिशूळावर पडल्या आणि संभा व संपतरावांनी आजून जोर लावून तो दोघींच्या आरपार केला ...अरे हे काय! त्या दोघींची तर वाफ झाली आणि त्या वाफेतूनच त्या दोघींचे धुसर, पुसट चेहरे दिसू लागले...
मिरा :तिचे डोळे पाण्याने भरलेले होते ...चेहऱ्यावर उपकाराची जाण आणि विरहाचे दुःख दिसत होते: दादा तुम्हाला या जन्मी सोडून चालले मी ..पण पुढच्या जन्मी तुम्ही माझेच बरका ...चला येते आता ...तुमचे खूप आभार आम्हाला यातून मुक्त केलंत तुम्ही ...सगळ्यांनी माफ करा आम्हाला ...येतो आम्ही ..आम्हाला पुढचा जन्म चांगला मिळावा अशी प्रार्थना करा आमच्यासाठी
मंदाकिनी: संपत माझ खुप प्रेम होतं तुझ्यावर,पण तू माझा फायदा घेतलास . माझ्या मनाचा कधीही विचार केला नाहिस.. आणि त्यामुळेच मी सुडाच्या भावनेनं पेटून उठले आम्हाला मुक्त केलंत तुम्ही तुमचे आभार ..येते आता मी ..पण संपत ..तूपण पुढच्या जन्माचं आपलं काँट्रॅक्ट तयार ठेव हा... आणि हळूहळू त्या धुसर होत गेल्या आणि दिसेनाश्या झाल्या . काय माहीत का ?पण सगळ्यांच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रु वाहू लागले..काहींचे पस्तावाचे तर काहींचे आनंदाचे..
इतक्यात आवाज आला : आता मी पण निघते . जे माझं काम होत ते झालं . हो गंगीच्या शरीरातून मुक्ती बोलत होती ती . बोलतच ती हेमंत आणि वर्षाच्या जवळ गेली ..त्यांचे हात एकमेकांच्या हातात दिले:- ओ हेमंतराव ..माझी लेक तुम्हाला सोपवून जाते बरका ..तिला जर रडवल तर गाठ माझ्याशी आहे बरका ..आता लवकरच बार उडवून टाका दोघे ..
मग संपतरावांना :-अहो ऐकलत का? या दोघांचा उद्याच लग्न करा..मला ताटकळत ठेऊ नका जास्त. काय रे पोरानो ? समजलं ना ?
कोणालाच काही समजल नाही.. मग गंगी हसली ..मी येणार लवकरच ..वर्षा तुझ्या पोटी..आणि तिचे पण डोळे भरून आले..गंगीच्या शरीरातून एक पुसटशी आकृती बाहेर आली ...आणि तिने काहीतरी हवेत उधळले ...अचानक पाऊस येऊ लागला ..आणि त्यासोबत ती गेली....सगळे त्या दिशेला हात दाखवत होगे....
सगळ्यांनी दादाचे उपकार मानले..दादा घरी आले..आल्या आल्या मंदिरात गेले ...देवीच्या पायी मस्तक ठेऊन तिचे आभार मानले...आणि या तिघींच्या ईच्छा पूर्ण कर अस मागण मागितलं ..
दुसऱ्याच दिवशी हेमंत आणि वर्षाच लग्न झालं ..अत्यंत साध्य पद्धतीने..गंगी आणि संभा ही एकमेकांच्या प्रेमात पडले होते ..ही गोष्ट हेमंतच्या लक्षात आली ..त्याच मांडवात त्याने त्या दोघांच ही लग्न लावून टाकलं..
एकच महिन्यात दोघांकडेही गुड न्यूज होती ...दोघी पण आई बनणार होत्या ..गंगी आणि वर्षा ...नऊ महिन्यांनी रीतसर डिलिव्हरी झाली ..वर्षाच्या पोटी खूप सुंदर मुलीचा जन्म झाला होता ती अगदी मुक्ती सारखी दिसत होती..
आणि गंगीच्या पोटी जुळ्याचा जन्म झाला होता ...दोन्ही खूप सुंदर मुली होत्या ..तिला भेटायला संपतराव गेले होते ..त्यातली एक मुलगी अगदी मंदाकिनी होती ..त्यांनी तिला घेतले तर त्यांचं हाताच एक बोट घट्ट धरून ठेवलं ..किती सोडवलं तरी ते सुटत नव्हतं . हम्म म्हणजे मंदाकिनी ...
सव्वा महिन्यानंतर गंगी आणि वर्षा आपल्या बाळांना घेऊन दादाच्या इथे मंदिरात गेल्या ..पूजा करताना दादा बाळांना कपळाला गंध लावताना त्यातील एक मुलीने त्यांचा हात पकडला आणि तो ती सोडतच नव्हती . दादा घाबरला ..तो फक्त पुपुटला ..म्हणजे मिरा??
शेवटी काय? मनुष्य आपली कर्म करत राहतो आणि त्याचा सगळा लेखाजोखा हा देवाकडे असतो ...त्याच्या प्रकारे तुम्हाला ते इथे आणि इथेच भोगाव लागत.. अगदी मरणानंतरही काही गोष्टी आपल्याला सुटत नाहीत ..असो पुढे याचा शेवट तर चांगला झाला ..आज वयात फरक असूनही मंदाकिनी आणि संपतराव एकत्र आहेत.. तिकडे दादांकडे गंगी च्या पोरी खेळायला रोज जातात.. मुक्तीला खूप इच्छा असूनही आपल्या मुलीला आईचा प्रेम देता आलं नव्हतं ..पण ती आईच प्रेम आपल्या मुलीकडून घेत आहे..आणि त्यातच सुखी आहे ..
शुभं भवतु!!
समाप्त..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा