नियती
भाग ४
सौ.हेमा पाटील.
भाग ४
सौ.हेमा पाटील.
नियती या कथेचा सारांश
बालपणापासून एकत्र वाढल्यामुळे एकमेकांना पुरेपूर समजून घेऊन परस्परांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दोन प्रेमी जीवांची ही कथा आहे.यात एकमेकांपाशी एका शब्दानेही प्रेमाची कबुली न देता ही दोघांनीही एकमेकांचे अवघे भावविश्व व्यापले आहे.अशा अतिशय संयत जीवांची ही कथा ..नियती दोघांभोवतीचे प्रेमाचे पाश आवळत त्यांना जवळ आणतेय यापासून अनभिज्ञ असलेल्या दोघांची ही कथा पुढे कशी फुलली आहे ते वाचा खालील भागात...

ती हाॅस्पिटलमध्ये असताना तिने नर्सकरवी टाईप करून जो मेसेज पाठवला होता, तो मेसेज वाचला तेव्हा त्याला खरेच वाटले होते.त्यामुळे पंधरा दिवस तिचा मेसेज किंवा फोन येतोय का याची त्याने वाट पाहिली. तो मात्र नेहमीप्रमाणे तिला खुशालीचा, तिची चौकशी करणारा मेसेज करतच होता. ती ते मेसेजेस वाचतेय हे त्याला समजत होते.तिने दोनदा थम्बची इमोजी पण पाठवली होती.पण फोनवर बोलणे किंवा मेसेजेस ची देवाणघेवाण मात्र पूर्ण थांबली होती.
पंधरा दिवस उलटून गेल्यावर त्याला चैन पडेना.त्याने मेसेज केला पण तो पोचल्याचे चिन्ह दिसेना.म्हणून त्याने फोन केला तर तिचा फोनच लागेना.सकाळ संध्याकाळी तिला फोन करायचा अन् दिवसभरात आठवण झाली की मेसेज करायचा सपाटा त्याने लावला.कधीतरी तिला मेसेज पोहोचेल किंवा ती फोन उचलेल असे त्याला वाटत होते.पण तसा एकही दिवस उजाडला नाही तेव्हा काहीतरी भयंकर घडले असावे असे त्याला वाटले व त्याने शरुच्या बाबांना फोन केला.शरुच्या बाबांनी फोन तर उचलला पण काय घडलेय ते मात्र सांगितले नाही,कारण शरुने तशी ताकीदच दिली होती. तो शरुबाबत बोलू लागला की ते विषय बदलतायत हे त्याच्या लक्षात आले.मग त्याने आपल्या बालचमूतील एकेकाला फोन करणे सुरु केले.पण त्यापैकी कुणालाच सत्य माहीत नव्हते आणि त्यापैकी कुणीच शरुच्या संपर्कात नव्हते.त्यामुळे त्याला काहीही माहिती मिळाली नव्हती.दोन वर्षांचा बाॅंड असल्याने दोन वर्षे कधी पूर्ण होतात अन् कधी मी परत भारतात जाऊन शरुसमोर उभा रहातो असे त्याला झाले होते.बाॅंड नसता तर याक्षणी मी या नोकरीवर लाथ मारुन परत गेलो असतो असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याची अगतिकता अश्रूंद्वारे त्याच्या डोळ्यांतून पाझरु लागली..पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते..
आपण नियतीच्या हातातील कठपुतळ्या आहोत.जसे नियती नाचवेल तसे नाचायचे.. नाही म्हणायला नियती दोरीला थोडीशी ढिल देते,पण तेवढीच..रंगकर्मी ज्याप्रमाणे तीन तासांत तोंडाला रंग फासून आपले नाटकातील पात्रे रंगवतो तसेच आपणही या जन्मात आपले प्रारब्ध भोगत असतो. तीन तासांच्या नाटकात अनेकदा आपली उत्कंठा शिगेला पोहोचते,पुढे काय होणार म्हणून...तसेच आत्ता शरु आणि अभिच्या आयुष्यात नियतीच्या इच्छेने एक असे वळण आले होते जे दोघांनी स्वप्नातही कल्पिले नव्हते.
जर्मनीमधील म्युनिक येथील विमानतळावर ती उतरली.उतरताना तिची सैरभैर नजर इकडेतिकडे फिरत होती. ती अभिपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती,पण तिचे मन मात्र अभिच्या दर्शनासाठी आतुरले होते. ती वारंवार मनाला सावरण्याचा प्रयत्न करत होती.तिला माहीत होते की,अभि बर्लिन शहरात नोकरीसाठी आलेला आहे बर्लिन आणि म्युनिक यात बरेच अंतर आहे हे तिने येण्यापूर्वी अनेकदा नेटवर सर्च केले होते, त्यामुळे अचानक अभिची भेट होण्याची शक्यता नाही हे तिने मनाला समजावले होते,पण तरीही मन त्याचाच विचार करत होते.आताही ती बॅग घेऊन बाहेर पडली व आपल्या नावाची पाटी घेऊन कोण उभे आहे हे पहाण्यासाठी आजुबाजुला नजर फिरवत होती.खूपजण आपापल्या माणसांना रिसिव्ह करण्यासाठी उभे होते.काहीजण कंपनीतर्फे येणाऱ्या अनोळखी प्रवाशांना घेण्यासाठी हातात नावाची पाटी घेऊन उभे होते.तिकडे नजर टाकताच ती चालली होती,कारण तिला घेण्यासाठी मार्टिना ही मुलगी येणार आहे असे कळवले होते...आणि पुढच्या क्षणी तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.अभि त्या रांगेत हातात नावाचा फलक घेऊन उभा होता.तिला क्षणभर वाटले,अभि आपल्यासाठीच उभा आहे.ती धावतच त्यांच्याकडे निघाली ही होती, तेवढ्यात तिला त्याच्या हातात राॅजर्स या नावाचा बोर्ड दिसला व ती क्षणभर तिथेच थबकली.ती अचानक चालता चालता थबकल्याने मागून येणारा तरुण तिला धडकला तेव्हा ती चपापली.अभि आपल्याला रिसिव्ह करायला आलेला नाही हे तिला समजले आणि तिने त्याच्याकडे पाहिले.जर्मनीत गेले दहा महिने रहात असल्याने त्याचा मूळचा गोरा असलेला रंग अधिकच उजळला होता.देहयष्टीही अगदी छान पीळदार दिसत होती.ती त्याच्याकडे पहात होती पण त्याचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते.आधीचे रुप असते तर तो धावतच तिच्याकडे आला असता यात शंकाच नाही.पण आपले डोळे पाहून तो कदाचित आपल्याला ओळखेल असे वाटून तिने आपल्या डोळ्यांवर गॉगल चढवला व मोठ्या कष्टाने ती त्याच्यापासून पुढे सरकली. थोडे पुढे गेल्यावर तिला आपल्या नावाची पाटी घेऊन उभी असलेली मुलगी दिसली तेव्हा ती तिच्याकडे गेली व आपली ओळख करुन दिली. मार्टिना ने तिला तिच्या हाॅटेलवर पोहोचविले व सगळे सोपस्कार पार पाडून ती परतली...
अभिपासून शरु जेव्हा पुढे सरकली तेव्हा अभिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली.कावराबावरा होऊन तो इकडेतिकडे शरुला शोधू लागला.मागून दिसणाऱ्या शरुची देहयष्टी पाहून ती शरुच आहे असे त्याला खात्रीने वाटले.पण दुसऱ्याच क्षणी त्याने तो विचार दूर सारला.शरु जर येणार असती तर तिने आपल्याला नक्कीच कळवले असते असे त्याला वाटले.आणि त्यात काहीच चूक नव्हते.बालपणापासून तो शरुला ओळखत होता. आपल्याला आता शरुचे भास व्हायला लागले आहेत,आता काहीही करुन तिच्याशी संपर्क साधला पाहिजे असे त्याला प्रकर्षाने वाटले.तेवढ्यात एक तरुण आपल्यासमोर उभा राहून आपले लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे हे त्याच्या लक्षात आले.राॅजर्स आला होता,मग त्याला घेऊन अभि हाॅटेलच्या दिशेने निघाला.
उद्यापासून सुरु होणाऱ्या सेमिनारमध्ये विविध देशांतील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानातील दिग्गज,पर्यावरण आणि बायो टेक्नॉलॉजी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार होते. पर्यावरणाचा समतोल राखून कामाचा दर्जा कसा सुधारावा यासाठी प्रामुख्याने या सेमिनारमध्ये चर्चा होणार होती.अभि काम करत असलेली कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली कंपनी असल्याने या सेमिनारमध्ये सहभागी झाली होती.कंपनीच्या वतीने जे दोघे कर्मचारी सहभागी झाले होते त्यात अभि होता.कंपनीच्या फ्रॅंकफूट येथे काम करणाऱ्या राॅजर्सला विमानतळावरुन हाॅटेलमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती.हाॅटेलवर गेल्यावर अभि आपल्या रुममध्ये पोहोचला व त्याने पुन्हा एकदा शरुला फोन केला, पण तो लागला नाही.
सेमिनारचा दिवस उजाडला आणि हाॅलमध्ये त्याला ती दिसली. दुरुन तर त्याला ती शरुच भासली.तो तिच्याजवळ गेला.तिने डोळ्यांवर चष्मा घातला होता.तिच्या ओबडधोबड चेहऱ्याकडे पाहून ती शरु नाही याची खात्री पटली तरीही तो साशंकपणे तिच्या अवतीभवती घोटाळत होता.कारण त्याला शरुच्या अस्तित्वाची जाणीव होत होती.रंग,रुप या वरवरच्या गोष्टी असतात.जेव्हा खरोखरच मने जुळलेली असतात तेव्हा सूक्ष्म मन चित्ताकडे आकर्षित झालेले असते.डोळे बंद असले तरीही आपल्या माणसाच्या येण्याची चाहूल लागते.अभिच्या बाबतीत असेच झाले होते, पण तो चेहऱ्याकडे पाहून चक्रावला होता. शेवटी तो आपल्या जागेवर जाऊन बसला पण तो बेचैन आहे हे शरुच्या लक्षात आले.
एका क्षणासाठी अभिला आपल्याकडे येताना पाहून शरु घाबरली होती.पण अभिला दूरच थबकलेले पाहून त्याने आपल्याला ओळखले नाही हे तिला समजले.पण ती शरु नाही हे समजल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जी उदासी आली ती पाहून तिला वाटले,आत्ता त्याच्यासमोर जाऊन उभे रहावे आणि त्याला सांगावे...हो मी तुझी शरुच आहे! पण तिने स्वतःला आवरले.त्याच्याच भविष्याचा विचार करून... आपल्या या अवस्थेत ही अभि आपला स्विकार करेल याची तिला खात्री होती.पण त्याच्यासारख्या राजबिंड्या तरुणाने आपल्यासारख्या ओबडधोबड चेहऱ्याच्या व्यक्तीसोबत आयुष्य काढावे हे तिच्या मनाला पटत नव्हते.म्हणून तिने आपली ओळख लपवली होती.क्रमश:
कथा कशी वाटली हे कमेंट्स द्वारे कळवा ही विनंती.
दोघांची भेट होते का? अभि शरुला ओळखतो का? शरुची ओळख पटल्यावर अभिची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भाग...
©® सौ.हेमा पाटील.
दिनांक – २४/७/२०२४

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा