नियती
©® सौ.हेमा पाटील.
“हो.. खूप मिस करतेय मी तुला! मला कळतेय पण वळत नाही.तुझ्यावर इतका जीव लागलाय की आता तिथून परतीचा मार्गच मला दिसत नाही.तू..तू..आणि फक्त तूच हेच माझे जग बनलेय! तुला वगळून एकाही गोष्टींचा विचार मी करु शकत नाही.सकाळी उठताना तुझ्याच फोटोकडे पाहून तुला शुभ सकाळ म्हणते व कल्पनेनेच अंगावर मऊ दुलई घेऊन शांतपणे झोपलेल्या तुला पहाते, तुझ्या चेहऱ्यावर असलेले तृप्ततेचे भाव पहाते आणि मी माझा दिवस सुरू करते”...शरु रोजच्याप्रमाणे फोटोतील अभिजितशी बोलत होती.वाॅटसअप नंबरवर असलेला अभिजितचा फोटो ती रोज जेव्हा जेव्हा त्याची आठवण येईल तेव्हा तेव्हा पहायची, फोटोतील त्याच्याशी आपल्या मनातील गुजगोष्टी करायची... एकांतात!
अभिजित हा तिचा बालमित्र! दोघेही बालपणी एकाच वर्गात होते.शेजारीच रहात असल्याने एकमेकांच्या घरी जाणे येणे होतेच. शाळेतून घरी आल्यावर कसेतरी चार घास पोटात ढकलायचे आणि सगळा बालचमू हळूहळू एकत्र जमायचा.कधी पत्त्यांचा डाव जमायचा, कधी लगोरी,कधी खो खो रंगात यायचा तर कधी कब्बडी! ही दोस्ती तुटायची नाय..अशी खरंच सर्वांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे नोकरीमुळे आईवडिलांची इतरत्र बदली झाली तरीही पत्राच्या माध्यमातून का होईना पण सगळा गृप एकमेकांच्या संपर्कात होता.अभिजित आणि शरु भाग्यवान कारण, शरुच्या वडिलांचे गावातच किराणामालाचे दुकान होते.अन् अभिजित गावातील शाळेच्या आश्रमात रहात होता.अभिच्या घरची गरीबी असल्याने घरच्यांनी त्याला आश्रमात ठेवले होते त्यामुळे त्याची आणि शत्रुची जोडी दहावीपर्यंत एकत्र टिकून राहिली.दहावीनंतर मात्र अभिजित शिकण्यासाठी शहरात गेला.शरुनेही गावाजवळच्या शहरातील काॅलेजात अॅडमिशन घेतले व रोज येऊन जाऊन ती आपले शिक्षण पूर्ण करत होती.
अभिजितला बारावीला ९४% मार्क्स पडले.त्याला मुंबईतील उत्तम काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला.जोपर्यंत तो जवळच्या शहरात शिक्षण घेत होता, तोपर्यंत तो शनिवारी रविवारी गावी यायचा.सगळा वाडाच परिचित असल्याने तो कुणाकडेही रहायचा.दोघांची मैत्री आता अधिकच घट्ट झाली होती.त्या मैत्रीच्या पदराला आता एकमेकांच्या सहवासाने फुललेल्या प्रेमाची आस पण जोडली गेली आहे याची जाणीव दोघांनीही मनोमन झाली होती.परंतु त्याबाबत दोघांनीही एकमेकांसमोर याबाबत काहीच वाच्यता केली नव्हती.अजून आपले शिक्षण पूर्ण झाले नाही,आपण आपल्या पायावर उभे नाही तर कुठल्या तोंडाने माझी होशील का असे शरुला विचारायचे असा विचार करून अभि गप्प होता.अभि काहीच बोलला नाही,अगर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत तरीही त्याचे डोळे त्याच्याशी एकनिष्ठ राहिले नव्हते.त्यांनी ते गुपित कधीच शरुला सांगून टाकले होते.त्यामुळे शरुला माहीत होते की,आपल्या इतकेच किंबहुना आपल्यापेक्षा ही जास्त अभिचे आपल्यावर प्रेम आहे.आणि त्यामुळेच तीही अबोलपणे त्याच्या नजरेतील प्रेमाच्या सागरात न्हाऊन जात होती.
असेच दिवस जात होते.शरु दर आठवड्याला शनिवार कधी येतो याची वाट पाहत असायची.शनिवारी ती अभिच्या आवडीची भाजी बनवायची.त्याला शेंगदाण्याचे कूट घालून केलेली मेथीची भाजी खूप आवडते हे तिला माहीत होते.आंबटगोड वरण, कधी तिळाची चटणी तर कधी कारळ्याची चटणी ती बनवायची.त्याला आठवडाभर पुरेल अशी बनवायची.लहानपणापासून तो वाड्यात वावरत असल्याने तिच्या घरच्यांसाठी ही तो घरचाच मेंबर असल्यासारखा होता, त्यामुळे तिने बनवलेल्या त्याच्या आवडीच्या पदार्थांवर कुणीही आक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता.महिन्यातून एकदा तरी ती त्याच्यासाठी अळू वडी बनवायची.हिरव्या मिरच्या व जिरे, लसूणाचे वाटण घालून केलेली अळूची वडी अभिला फार आवडते हे तिच्याशिवाय कुणाला माहीत असणार? पण तो नसताना जर तिच्या पानात अळू वडी आली तर ती तिच्या घशाखाली उतरत नसे.त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी उभे रहात असे.असेच दिवस जात होते.ऊनपावसाचा खेळ पहात पहात एकेक वर्षे उलटून गेली.शरुने बी.एस्सी.केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी तिला कोल्हापुरला प्रवेश मिळाला. अभिचे इंजिनिअरींग पूर्ण झाले व एम.टेक. साठी त्याला बेंगलोरला प्रवेश मिळाला.ती कोल्हापुरात आणि तो बेंगलोरला..अशी दोघे दोन शहरात गेल्याने आता भेटीगाठी वरचेवर होईनाश्या झाल्या.मग आता दोघांचे वाॅटसअप वर बोलणे सुरू झाले.वेळ असेल तेव्हा फोन करत, नाही तर मग वाॅटसअप वर मेसेज टाकून ठेवत.वेळ मिळाला की उत्तर दिले जायचे.पण अजूनही दोघांपैकी कुणीही आपल्या मनातील गोष्ट स्पष्टपणे सांगितली नव्हती.पण तरीही दोघेही एकमेकांना गृहीत धरुनच चालले होते.हा दोघांचा परस्परांवरचा विश्वास म्हणजेच तर प्रेम असते हे मात्र त्या प्रेमवेड्यांनी जाणले नव्हते.
अशीच पोस्ट ग्रॅज्युएशनची दोन वर्षे ही भुर्रकन उडून गेली आणि त्याला जर्मनीमध्ये एक चांगली संधी चालून आली.त्याने शरुला फोन केला व फोनवर याबाबत सांगितले.हे ऐकून शरुला खूप आनंद झाला.तिच्या स्वरांमधून तो डोकावला ही..पण काही वेळाने तिच्या लक्षात आले की,ही संधी त्याने स्विकारावी तर तो आपल्यापासून खूप दूर जाईल..
पण त्याच्या प्रगतीच्या आड आपण यायचे नाही असा मनाशी निश्चय करून तिने अभिला ही संधी अजिबात डावलू नकोस असे सांगितले.अभि कात्रीत सापडला होता.चांगली संधी चालून आली आहे,स्विकारावी तर आयुष्याचे सोने होईल,पण ही संधी स्विकारावी तर शरुपासून दूर जावे लागेल.अजून आपण आपल्या भावनाही तिला सांगितल्या नाहीत.तिच्याशिवाय आयुष्य वैराण वाळवंट बनेल.त्यामुळे ती आपल्या सोबत कायम असणे आवश्यक आहे.नोकरीपेक्षाही..
चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण शरुपासून दूर जायचे नाही हे त्याने मनोमन ठरवले व तो भारतातील इतर नोकरीच्या संधी शोधू लागला.
पंधरा दिवस झाले तरीही अभिने अजूनही आपल्याला काहीच सांगितले नाही म्हणून तिने त्याला फोनवर स्पष्टच विचारले,” अरे,अजून जर्मनी वरुन काही रिप्लाय आला नाही का? मला तयारीला सुरुवात करायचीय.सांग ना जायची तारीख”?
यावर अभि म्हणाला,”अगं, ती संधी स्विकारायची नाही असे मी ठरवलेय”.
“तू एकटा कोण ठरवणार? तुझ्या आईने तुझा दुरावा सहन करत तुला बालपणापासून शिक्षणासाठी दूर ठेवले ते यासाठी?त्यांना आता सुखात ठेवणे तुझे कर्तव्य आहे आणि तू ते पार पाडलेच पाहिजे “.
“अगं, इथेही मिळेल ना नोकरी.. परदेशी एवढ्या दूर जायची माझी इच्छा नाही”.
अरे, पण चालून आलेली संधी कुणी डावलले का? ते काही नाही.आजच्या आज तिकडे फाॅर्म भर.नाही भरल्यास तर उद्यापासून मी तुझ्याशी बोलणार नाही”.
“अगं..ऐक ना गं”...
“मला काहीही ऐकायचे नाहीय”.
“तुझ्यातच जीव अडकलाय गं माझा... त्यामुळेच तर मी जायला तयार नाही”.पण हे स्वागत तो मोठ्याने बोलू शकला नाही व त्याने फोन ठेवला...सौ.हेमा पाटील
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा