नियोजन
भाग १
भाग १
" अद्वैत, तुला खरंच वाटतं का ? की तुझ्या लॅपटॉपच्या बॅटरीपेक्षा तुझ्या आईची एनर्जी जास्त टिकणारी आहे ? " ईशानीने बेडरूमचा दरवाजा लोटत शांतपणे विचारलं.
अद्वैतने कोडिंगमधून डोकं वर काढलं आणि गोंधळून विचारलं,
" काय झालं ? आईला काय झालं ? आणि बॅटरीचा काय संबंध ? "
ईशानीने घड्याळाकडे बोट दाखवलं.
" रात्रीचे अकरा वाजलेत अद्वैत. तू तुझ्या डेडलाईन्स संपवून नेटफ्लिक्स बघायला मोकळा झाला आहेस, पण तुझी आई अजूनही काम करत आहे. किचनमध्ये उद्याच्या डब्यासाठी भेंडी चिरतेय. सकाळच्या दह्यासाठी विरजण लावतेय. गेल्या सोळा तासांपासून त्या स्त्रीने एक मिनिटही विश्रांती घेतलेली नाहीये. तुला हे नॉर्मल वाटतंय?"
अद्वैतने हसून विषय उडवून लावला.
अद्वैतने हसून विषय उडवून लावला.
" अगं, आई आहे ती ! तिला सवय आहे ग ! आणि तिला रिकामं बसलेलं आवडतही नाही. तू जास्त ओव्हरथिंक नको करू, सीए आहात ना तुम्ही, प्रत्येक गोष्टीचा हिशोब मांडायची सवय आहे तुला."अद्वैतने तिची थट्टा केली.
ईशानी काही बोलली नाही, पण तिने मनातल्या मनात घराच्या ऑडिटची पहिली नोंद केली होती.
रोझवूड सोसायटीच्या एका सुसज्ज आणि आधुनिक फ्लॅटमध्ये ईशानीचे गृहप्रवेश झाले. ईशानी एक हुशार चार्टर्ड अकाउंटंट आहे. तिचं व्यक्तिमत्व एखाद्या बॅलन्स शीटसारखं अचूक आणि स्पष्ट होतं.
रोझवूड सोसायटीच्या एका सुसज्ज आणि आधुनिक फ्लॅटमध्ये ईशानीचे गृहप्रवेश झाले. ईशानी एक हुशार चार्टर्ड अकाउंटंट आहे. तिचं व्यक्तिमत्व एखाद्या बॅलन्स शीटसारखं अचूक आणि स्पष्ट होतं.
ईशानी आणि अद्वैतचे लग्न झाले तेव्हा सर्वांना वाटले होते की, दोन कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक एकत्र आले की आयुष्य खूप स्मूथ चालेल. पण ईशानीसाठी खरी आव्हाने ऑफिसच्या प्रेझेंटेशनमध्ये नव्हती, तर घराच्या डायनिंग टेबलवर होती.
लग्नानंतरचा पहिला आठवडा पाहुणचारात आणि सूनमुख बघण्यात गेला. पण जसा हा उत्साह ओसरला, तशी ईशानीची प्रोफेशनल नजर घराच्या मॅनेजमेंटवर पडली. तिने पाहिलं की, घरात कामाची विभागणी नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. तिथे फक्त एकच अनपेड वर्कर होता.तिच्या सासूबाई, विमलकाकू.
सकाळी ५:३० ला विमलकाकूंच्या कामाचा श्रीगणेशा व्हायचा. चहा, नाश्ता, डबे, दुपारचं जेवण आणि घराची साफसफाई... विमलकाकू जणू एखाद्या सुपरफास्ट अल्गोरिदमवर चालत होत्या. दुसरीकडे, घराचे रिटायर्ड चेअरमन आनंदराव ऊर्फ भाऊ.
भाऊ रेल्वेतून निवृत्त झाले होते. सकाळी ७ वाजता ते बाल्कनीत पेपर वाचत बसायचे आणि तिथूनच त्यांची पहिली ऑर्डर सुटायची,
" विमले, पेपर वाचून झाला की चहा आण ग, आणि आज नाश्त्याला जरा गरम वाफवलेले पोहे कर, वाटाणे घाल त्यात ! "
भाऊंना वाटायचं की रेल्वेतून निवृत्ती मिळाली म्हणजे आयुष्यातल्या सर्व कामांतून रिटायरमेंट मिळाली. अद्वैतचं तर वेगळंच होतं. तो स्वतःला मॉडर्न म्हणायचा, पण घरी आल्यावर तो चक्क सोळाव्या शतकातल्या सरंजामी मानसिकतेत जायचा.
" आई, पाण्याचा ग्लास दे ग ! " किंवा
"आई, माझा तो निळा शर्ट कुठे आहे ? "
हे त्याचे लाड विमलकाकू कौतुकाने पुरवायच्या, पण त्या कौतुकाखाली विमलकाकूंची हाडं खिळखिळी होत होती.
एके दिवशी सकाळी ईशानी किचनमध्ये मदत करायला गेली. विमलकाकू घाम पुसत घाईघाईत पोळ्या लाटत होत्या. एका बाजूला दूध उकळत होतं, दुसऱ्या बाजूला मिक्सरचा आवाज येत होता आणि त्याच वेळी भाऊंचा बाहेरून ओरडा आला
" विमले, माझा चष्मा कुठे आहे ? "
विमलकाकू तशाच हाताला पीठ लागलेलं असताना बाहेर पळाल्या. ईशानी तिथेच थांबली. तिने पाहिलं की विमलकाकू दिवसातून किमान १५-१६ तास काम करत होत्या, ज्याला कोणताही वीकेंड नव्हता की पेड लीव्ह नव्हती. ईशानीला जाणवलं की, हे केवळ प्रेम नाही, तर हे पद्धतशीर चाललेलं श्रमांचं शोषण आहे. अर्थात ते नात्याच्या गोंडस आवरणाखाली झाकलेलं होतं.
" जर ऑफिसमध्ये रिसोर्स मॅनेजमेंट बिघडलं तर कंपनी तोट्यात जाते. इथे तर घराची मुख्य रिसोर्स म्हणजे आई आहेत आणि त्या पूर्णपणे एक्झॉस्ट झाल्या आहेत. हे बॅलन्स शीट तर मला टॅली करावंच लागेल." ईशानीने मनाशी निश्चय केला.
ईशानीला कळून चुकलं होतं की, केवळ पगार आणून आणि सून म्हणून किचनमध्ये थोडी मदत करून हे प्रश्न सुटणार नाहीत. तिला घराच्या सिस्टीममध्येच बदल करावा लागणार होता. तिला अद्वैत आणि भाऊ दोघांनाही त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं होतं.
त्या रात्री ईशानीने आपल्या आयपॅडवर एक होम रिस्पॉन्सिबिलिटी चार्ट तयार करायला सुरुवात केली. तिने ठरवलं की, उद्या सकाळी ती या घराच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स समोर एक नवीन प्रपोझल ठेवणार आहे. हे प्रपोझल वादाचे ठरणार होते की सुधारणेचे, हे तिला ठाऊक नव्हते.
पण एक सीए म्हणून तिला हे माहिती होते की, जेव्हा हिशोब चुकला की नाती दिवाळखोरीत निघतात.
पण एक सीए म्हणून तिला हे माहिती होते की, जेव्हा हिशोब चुकला की नाती दिवाळखोरीत निघतात.
ईशानीचा हा कॉर्पोरेट गृहप्रवेश आता घराच्या त्या पारंपरिक भिंतींना वैचारिक हादरे देणार होता !
" भाऊ, मला आज चर्चा करायची आहे ! "
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा