पुतण्याचे काकाला पत्र(विनोदी)
प्रिय काकाश्री,
सप्रेम नमस्कार,
सप्रेम नमस्कार,
कसे आहात हे विचारण्यात मी वेळ न घालवता तुम्ही निवांतच असाल असे मी गृहीत धरतो. काल मला तुम्ही वकिलांची नोटीस पाठवली, हेच अपेक्षित होते तुमच्याकडून. आता आपले भांडण असे तुम्ही चव्हाट्यावर आणाल असे वाटले नव्हते. हरकत नाही. मोठ्यांनी चुकले तर लहानांनी ते मोठ्या मनाने समजून घ्यायचे असते.
तुम्ही केलेला दावा मला काही पटला नाही काका. अहो,आधीच तुम्ही आम्हाला ती ओसाड जमीन दिलीत तरी बी आम्ही गप्पच होतो. तसेच आपली एकूण जमीन आहे एक एकर पण कदाचित वकिलाने तुमच्या सांगण्यावरून दिलेल्या दाव्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल आणि त्या जागी १० म्हणजे तो एका समोर जास्तीचा शून्य लावला गेला आहे. तेवढे तुम्ही बघा. आजोबांनी दिलेले मृत्युपत्र त्यांनी स्वतः शुद्धीत असताना नीट लिहिले होते तर तुम्ही का म्हणून ते हरकत पत्र झोपेत लिहिलेले आहे? एकदा व्यवस्थित पाहा.
मला पण सर्व शांतेत सोडवायचे होते, परंतु तुम्ही आता सुरूवात केलेलीच आहे तर शेवट मला करू द्या.
मला सफलता मिळावी आणि हा दावा मीच जिंकावा म्हणून तुमच्यासोबत काकींचे पण सही रुपी आशीर्वाद ना हरकत पत्रावर दिलेत तर खूप बरे होईल.
तेवढे आपल्या लाडक्या नसलेल्या पुतण्याचे ऐकावे ही नम्र विनंती.
कळावे फक्त प्रेमाचा लोभ असावा संपत्तीची हव्यास नसावी हीच मागणी.
तुमचा पुतण्या,
सरळराव कापमाने
सरळराव कापमाने
© विद्या कुंभार
प्रस्तुत साहित्य हे विनोदी पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे ह्यातून कोणाला दुखवण्याचा हेतू नाही हे इथे नमूद करत आहे.
त्यामुळे ह्यातून कोणाला दुखवण्याचा हेतू नाही हे इथे नमूद करत आहे.
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा