मागील भागात आपण पाहिले की नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या रोहितला नोकरी मिळाली पण परदेशात.. त्याचे आईवडील होकार देतील का यासाठी? बघू आजच्या भागात..
" खरं?"
" हो..अगदी खरे. पण.."
" पण काय? पगार कमी आहे का?" सुमतीबाईंनी चिंतेनी विचारले.
" ती परदेशात आहे.. त्यांचे पॅकेजही भरपूर आहे." अपराधी स्वरात रोहित बोलला.
" तुझे सगळे ठरले का?" बाबांनी विचारले.
" ठरले असे नाही. तुम्ही म्हणाल तर नाही जात."
" अजिबात नाही. माझे तर कधीचे स्वप्न होते. तुला परदेशी जायला मिळावे, मोठे घर असावे. सगळ्यांची मुले तिथे आहेत. माझेच कोणी नव्हते. आता मी पण अभिमानाने सांगेन सगळ्यांना , माझा मुलगाही परदेशात आहे म्हणून.."
" तुला वाईट नाही वाटले आपला मुलगा दूर जातो तर ?" आश्चर्याने बाबांनी विचारले.
" त्यात काय वाईट वाटायचे? तिथे जाऊन खोर्याने पैसे कमवेल. बरोबर ना?"
आईला जेवढा आनंद झाला, तेवढा काही बाबांना झाला नाही. रोहितनेही मग जास्त विचार न करता जायची तयारी सुरू केली. त्याचा पासपोर्ट तयार होताच. व्हिसा वगैरे सगळे काम झाले. आणि एक दिवस सगळ्यांचा निरोप घेऊन रोहित परदेशी निघाला..
परदेशात आल्यावर आधी तर त्याला खूप चुकल्यासारखे, एकटे पडल्यासारखे वाटले. तरी सुरूवातीचे काही दिवस नवीन ऑफिसशी जुळवून घेणे, नवीन जागा शोधून तिथे सगळे सामान लावणे यातच गेले. तो रोज आईबाबांशी फोनवर बोलायचाच. तोच त्याच्यासाठी एक विरंगुळा होता. सुरूवातीला रोहित परदेशी गेला म्हणून खुश असणाऱ्या सुमतीबाई पण आजकाल नाराज दिसत होत्या.
" काय ग, आजकाल जास्त बोलत नाहीस ते?" श्रीधररावांनी विचारले.
" काय बोलणार? बोलायला विषय तर पाहिजेत ना?"
" तुझ्याकडे विषय नाहीत? आधीतर तोंडाचा पट्टा सतत चालू असायचा. तुझ्या किटी पार्टीज बंद झाल्या वाटते."
" त्या का बंद होतील? त्या आहेत चालू. आताशा माझेच मन रमत नाही."
" मन न रमायला काय झाले?"
" एकटे वाटते हो. दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये. घरी आलात तरी तुमची कामे सुरू असतात. आधी निदान रोहित असायचा तरी. त्याच्याशी बोलण्यात वेळ तरी जायचा. आता दिवस उठतो खायला. त्याच नातेवाईकांशी आणि मैत्रिणींशी किती आणि काय बोलायचे? प्रत्येकाला आपला संसार आहे. काम आहेत. मीच रिकामी असते जणू.."
" पण तुलाच आपला लेक परदेशी जायला हवा होता ना? खोर्याने मिळणारा पैसा हवा होता. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तुला एकच बाजू दिसली. आता दुसरी बाजू समजेल."
" पण मी काय म्हणते रोहितला परत बोलावले तर?"
" तो परत आला आणि त्याला तशी नोकरी नाही मिळाली तर काय करशील?" सुमतीबाई गप्प बसल्या पण त्यांच्या मनात प्रचंड खळबळ सुरू होती.
"त्याचे लग्न करून देऊया? त्यानिमित्ताने जर तो इथे राहिला तर?"
" तू काय बोलते आहेस? हा काय भातुकलीचा खेळ सुरू आहे. हा नाही पटला तर मोडा आणि नवीन डाव चालू करा. आत्ताच तर तो गेला ना तिकडे? तर लगेच लग्न करायचे म्हणतेस? लग्न जरी झाले तरी त्याची बायको आणि मुले काय इथे राहतील?"
" मग यापुढे आपण हेच जगणे जगायचे?"
" ते आपण ओढावून घेतलेले आहे. आता नाईलाज आहे." श्रीधररावांनी विषय संपवला तरिही सुमतीबाईंच्या मनातून हा विषय गेला नाही. त्यांच्या मनाने घेतले की रोहितचे लग्न केले की तो इथेच रहायला येईल. मग त्याच्या कुटुंबासह तो इथेच राहिल. त्यांनी आता रोहितसाठी स्थळे बघायला सुरुवात केली. हे कधी त्याच्या कानावर घालतो असं त्यांना झाले होते.
" रोहित, कसा आहेस?"
" आई, मी छान आहे. मला ना तुला एक छान बातमी द्यायची आहे."
" तू परत येतो आहेस?"
" ते कसे शक्य आहे आता इतक्यात? आई मी जिथे राहतो ना तिथेच एक भारतीय मुलगी राहते. आम्ही लग्न करायचे ठरवले आहे. आई... आई... ऐकते आहेस ना?" सुमतीबाईंना धक्का बसला होता. स्वतःला सावरून त्या म्हणाल्या..
" हो. ऐकते आहे. तू बोलत रहा."
" आई, तुझे आणि बाबांचे तिकिट पाठवतो. आम्हाला असे वाटते की इथेच लग्न करावे. तसेही आम्हाला जास्त सुट्ट्या मिळणार नाहीत. तुम्हीच जर इथे आलात तर तुम्हाला इथे फिरवताही येईल आम्हाला.."
" अरे पण, इथे लग्न केले असतेस तर नातेवाईकांना बोलावता आले असते. धडाक्यात करता आले असते लग्न."
" आई, तेवढा पैसा नाहीये माझ्याकडे. मी इथे घर विकत घ्यायचा विचार करतो आहे. त्यासाठी पैसा लागणार. मधुला गाडी घ्यायची आहे. तो खर्च."
" मधु??"
" हो.. तिचे नाव." रोहित फोनवर लाजत म्हणाला. "चल, मी फोन ठेवतो. तुझे आणि बाबांचे काय ठरते ते ठरव. तसे तिकीट पाठवतो." यांत्रिकपणे सुमतीबाईंनी फोन ठेवला. लग्नाच्या निमित्ताने रोहित इथे येईल हे स्वप्नच भंगून गेले त्यांचे. त्यांना वाटत होते, त्याच्या लग्नाच्या निमित्ताने सगळ्यांना बोलावता येईल. वरमाय म्हणून मिरवता येईल. पण आता तसे काहीच होणार नव्हते. श्रीधरराव आल्यावर त्यांनी नीरसपणे त्यांना ही गोष्ट सांगितली.

सुमतीबाई समजुन घेऊ शकतील रोहितची परिस्थिती? येऊ शकेल का रोहित परत भारतात? पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा