Login

नॉट आऊट (भाग 1)

Cricket , School and We

नॉट   आऊट   

भाग 1

 नुकतीच    दहा   दिवसांची  रजा  टाकली  होती  . मनात  वादळ  भरलेलं  होत  . " कुठेतरी   फिरायला  जाऊ  काही  दिवस   "  यशवंत  आपल्या  बायकोला  म्हणाला  . तिने  यशवंतकडे  आश्चर्याने  बघितल  . तिची  नजर   याने  हेरली  . नवराच  शेवटी  तो  .. " हो   , लग्न   झाल्यापासून   कधीच  तुला     कुठे  फिरायला  नेलं   नाही  हे  माहिती  आहे  मला  .. पण  यावेळी  स्वतःहून  म्हणतोय "  . तिच्या  चेहऱ्यावर     एक     गोड      स्माईल      आली       आणि     ती      म्हणाली      " मी      कधी    तुमच्याकडे     याबद्दल    तक्रार     केली     आहे  का     ? " . तोही   हसला   . रडण्याचा    आवाज   आला   . बबडी  झोपेतून  उठली   होती  . त्यांची   दोन  वर्षांची  पोरगी  !! परीच  जणू   ! महाबळेश्वर  जाण्याच  ठरल  . त्याची  इच्छा   तर  नैनिताल  वैगरे  वैगेरे  फिरवण्याची  होती  परंतु  बँकेचे  आकडे जास्त दिवस खोटं बोलू शकणार नव्हते  . मध्यमवर्गीयच    शेवटी  !  सर्व तयारी झाली होती . निघणार एवढ्यात त्याचा फोन वाजला . ." काय ? कधी समजलं ? आणि कधी आहे ? " त्याने एकावर एक प्रश्न विचारल्यास सुरुवात केली . फोन ठेवला . नजर खाली घालून बायकोला म्हणाला " अगं , ऐक ना "  . ' ठीकेय ठेवते  मी बॅगा आत ' तणफ़न करत तिने सर्व बॅगा पुन्हा आत ठेवल्या . दरवाजा जोरात लोटण्याचा आवाज झाला . अरे मी कधी तक्रार केली का ? अस ती म्हणत असली तरीही कृतीतून सगळं राग काढण्याची कला   तिला  अवगत  होती   . स्त्री  वर्गाच   हे   एक   ब्रम्हास्त्र   आहे  जणू  . दिवसभर  ती   एक  शब्ददेखील   बोलली  नाही  . स्वयंपाकात  त्याला  न आवडणारी गिलक्याची भाजी केली होती  . आणि  त्यात  लसूण  देखील  खूप टाकलेले  होते  . " भाजी खूप छान झाली आहे आज "  तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न चालू होता . 'हो ना ! अजून घ्या  मग ' म्हणत तिने कढईतील सर्व भाजी ताटात ओतली . " पायावर कुऱ्हाड मारणे "  ही मोरे सर म्हणत असलेली म्हण त्याने प्रत्यक्षात अनुभवली . वर्तन " चांगले " तर  मराठीमध्ये देखील प्रॅक्टिकल करता येऊ शकतात हे त्याला समजून चुकले होते . सकाळ झाली . रात्रभर कसलातरी विचार करत असताना झोप उशिरा लागली परिणामी नेहमीपेक्षा थोडी उशिरा जाग  आली . डब्याला त्याच्या आवडीची वांग्याची भाजी होती . बायकोचा राग शांत व्हायला वेळ लागत नाही हेही तितकच खरं . " यावेळी नॉट आऊट रहा " जाता जाता  ती म्हणाली . नवऱ्याला प्रत्यक्षात कुणाचा फोन आला होता , काय बोलणं झालं हे तिला त्याने सांगितलं नसताना देखील तिने अंदाज बांधला होता . ही दैवी शक्ती त्यानांच प्रदान झाली   आहे . सकाळ कधी होते असं त्याला झाला होता . सारी तयारी करून तो शाळेत गेला . शाळा सुरु होण्यास अजून बराच अवधी होता . स्टाफ रूम मध्ये बॅग न ठेवता तो तसाच मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे गेला ."मी आत येऊ सर ?" समोरून   मान   डोलली . टेबलावर ठेवलेला एक कागद मुख्याध्यापकांनी पुढे केला . तो कागद वाचून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळच तेज आलं होत. " येतो सर " म्हणत तो  स्टाफ रूम कडे जाण्यास निघाला . "यशवंत सर  , यावेळी नॉट आउट राहा . ही शेवटची संधी आहे  " . मान  डोलावत तो पुढे गेला .  टेम्पररी क्रीडा शिक्षक म्हणून यशवंताची निवड  झाली होती , स्वतःला सिद्ध करण्याची हि कदाचित शेवटची  संधी आहे याची त्याला कल्पना होती . शिपायाकडे तो कागद देऊन त्याने एक नोटीस तयार करण्यास सांगितली .  स्टाफ रूम हळूहळू भरू लागला . यशवंत गहण विचारात गडलेला होता . दोघा-तिघांनी त्याची विचारणाही केली . तेवढ्यात शिपाई प्रिंटेड नोटीस घेऊन आला . " क्रीडाशिक्षक - यशवंत जाधव " च्या पुढे त्याने स्वाक्षरी केली आणि नोटीस बोर्डवर  लावायला लावली .  जसजशी शाळेत बातमी पसरली तसतशी बोर्ड भोवती गर्दी वाढू लागली . गण्याने नोटीस बघितली . "सुम्या , सुम्या " बाकीच्यांना धक्काबुक्की करत तो गर्दीतून वाट काढत वर्गाच्या दिशेने निघाला . " सुम्या कुठाय ? नोटीस लागली " बेंच वर झोपलेला सुम्या अचानक जागा झाला . त्यालाही काही सुचेनासं झालं . नोटीस बोर्डकडे धावत गेला . नोटीस बोर्ड वाचून डायरेक्ट स्टाफ रूम कडे धावला . "अरे इकडे कुठे ?" वर्गशिक्षक पवार सरानी टोमणा मारला .नेहमीप्रमाणे     त्याकडे लक्ष न देता तो थेट यशवंत सरांच्या टेबलाकडे धावला . " सर " एवढ बोलताच त्याच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला . " उद्या पोरांना घेऊन मैदानावर ये " सुम्या पळत पळत पुन्हा वर्गाकडे धावला . " सरानी उद्या सकाळी ७ वाजता मैदानात बोलावलंय " त्याची सगळी गँग उड्या मारू लागली . सकाळी ६ वाजताच सगळी पोरं मैदानावर !! " सर ,सगळी पोरं आली आहेत . सुरू करायचा ? " सरांनी नकारार्थी मान डोलावली ."  नाही अजून नाही , आपल्याला काही नवीन पोरांची निवड करावी लागेल , त्यानंतरच सगळं "

सुम्या , आश्या , पक्या यांचा हिरमोड झाला . शाळेत गेल्यानंतर आठवी , नववी , दहावीच्या प्रत्येक वर्गात नोटीस फिरली . " अंडर १७ च्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा पुढील महिन्यात होणार आहे , तर त्यासाठी इच्छुकांनी उद्या निवडीसाठी मैदानावर उपस्थित राहावे "

पोरांमध्ये एक वेगळा संचार आला . दुसऱ्या दिवशी मैदानावर भली मोठी गर्दी !! तसा सराना पूर्ण संघ निवडयाचा नव्हता परंतु संघातल्या ५-६ जागांसाठी हा सगळा खटाटोप होता !! यशवंत सर , मराठीचे मोरे सर आणि सोबतीला मागील वर्षातील संघातील खेळाडू या पोरांची निवड करण्यास सज्ज झाले . संघासाठी काही फलंदाजांची , विकेटकीपरची आणि अष्टपैलू खेळाडूंची गरज होती . निवडीला सुरुवात झाली . फलंदाजांची निवड करण्यास सूम्या सज्ज झाला  . सुम्याची गोलदांजी म्हणजे बुलेट ट्रेन !! समोरच्याची पापणी लवत नाही तोपर्यंत त्याच्या दांड्या गुल होत असे . सूम्याची एक्स्प्रेस सुरू झाली . कुणाचा  हाथ ,कुणाचा पाय , कुणाचा आणखी काय सुम्याच्या गोलंदाजीने सगळ्यांना जखमी केलं होत . " सर , यालाच बोलिंग दिली तर आपल्याला एक पण फलंदाज मिळणार नाही " मोरे सरांनी यशवंत सराना चिमटा काढला !! मग सुम्याला बाजूला केले . त्याजागी आश्या आणि पक्याला गोलंदाजी दिली . सुम्या एवढे ते वेगवान नसले तरीही त्यांच्याकडे चतुरता होती . वेगामध्ये बदल करून ते समोरच्याला कोड्यात टाकत असत !!  आता सराना २-३ मुलं फलंदाजी साठी मिळाली होती . एक छोटंसं पोरग ट्रायल देण्यासाठी पुढं आल. "कोणत्या वर्गात आहेस ? " सरांनी विचारले . " आठवी क सर " त्याच्या उंचीवरून आणि तब्येतीला बघून वाटत नव्हते !! जरा हळू चेंडू टाका असा इशारा सरांनी दोघांना दिला . हा  छोट्या फलंदाजीला गेला . " या छोट्याला बाऊनसर टाकतो " आश्या म्हणाला . वेगात धावत येऊन त्याने बाऊन्स टाकला , या छोट्या पोराने उडी मारून अप्पर कट मारला !! पक्या आश्या कडे पाहून हसू लागला. "  थांब , आता माझा यॉर्कर बघ " धावत धावत पक्या चेंडू टाकण्यास पुढे सरसावला तोच तो छोट्या देखील आपली पावलं टाकत पुढे आला . स्कुप , हो हो दिलशान वाला !!! दोघेही मास्तर  एकमेकाकडे पाहू लागले . सरांनी , संघातील एकमेव फिरकी गोलदाजला चेंडू टाकण्यास सांगितले .पण थांबेल हा छोट्या कसला ..याने स्वीप , पैडल स्वीप सुरू केले . सरांना अश्याच पोराची गरज होती !! तेवढ्यात सुम्याने चेंडू हातात घेतला , सुम्याचा वेग आणि छोट्या पोराची चतुरता हे बघण्याची मजाच वेगळी होती. त्याच्या वेगात आलेल्या चेंडूला त्याने अलगदपणे प्लेस करून दोन धावा घेतल्या !! सर खुश झाले , पोरा नाव काय तुझं " सर , प्रसाद , इयत्ता आठवी " प्रसाद मध्ये ताकद   नव्हती परंतु बुद्धी भलतीच तेज होती . खेळण्यातले बारकावे त्याला माहिती होते . आज केवळ ३-४ लोकाची निवड करण्यात आली होती . जातांना पक्या प्रसाद कडे आला , " अे पोरा , हे फटके कुठे शिकलास " "टीव्ही वर बघून बघून " अस म्हणत सायकलला  टांग मारत प्रसाद पसार झाला .